▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.11

1. आहारात —– जीवनसत्वाच्या आधीक्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो.

  1.  अ जीवनसत्व
  2.  ब जीवनसत्व
  3.  क जीवनसत्व
  4.  ड जीवनसत्व

उत्तर : अ जीवनसत्व


2. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून, त्यांच्या पायांची संख्या 144 आहेत तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

  1.  28, 22
  2.  24, 26
  3.  22, 28
  4.  26, 24

उत्तर : 28, 22


3. संपृक्त मेदघटकांच्या अतिसेवनाची परिणती म्हणजे —– होय.

  1.  अशक्तता
  2.  लठ्ठपणा
  3.  ताजेपणा
  4.  वजन कमी होणे

उत्तर : लठ्ठपणा


4. 0.0049 या संख्येचा वर्गमुळाचा घन किती?

  1.  0.000343
  2.  0.00343
  3.  0.0343
  4.  0.343

उत्तर : 0.000343


5. एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 असेल, तर ती संख्या कोणती?

  1.  3
  2.  6
  3.  7
  4.  14

उत्तर : 7


6. शुद्ध लोखंडाचा प्रकार म्हणजे —– होय.

  1.  ओतिव लोखंड
  2.  बीड लोखंड
  3.  घडीव लोखंड
  4.  वितळलेले लोखंड

उत्तर : घडीव लोखंड


7. एका 8 सें.मी. त्रिज्या असलेल्या शिशाच्या गोळ्यास वितळवून 1 सें.मी. त्रिज्या असलेले लहान लहान गोल तयार केल्यास असे किती गोल तयार होतील?

  1.  256
  2.  64
  3.  712
  4.  512

उत्तर : 512


8. महितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना —— यांनी केलेल्या आंदोलनामुळे मिळाला.

  1.  विवेक पंडित
  2.  डॉ. बाबा आढाव
  3.  अण्णा हजारे
  4.  कुमार केतकर

उत्तर : अण्णा हजारे


9. लाल बहादुर शास्त्री अवार्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक अॅडमिनिश्ट्रेशन (Lal Bahadur Shastri Award For Excellence in Public Administration) हा पुरस्कार कुणाला मिळाला?

  1.  जुईली रफिक
  2.  इला भट
  3.  शिवानी ठाकूर
  4.  योगिता शिवा

उत्तर : इला भट


10. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?

  1.  पुणे
  2.  नाशिक
  3.  नागपुर
  4.  मुंबई

उत्तर : नाशिक


11. राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस (26 जुलै) —— या नावाने साजरा करण्यात येतो.

  1.  राष्ट्रीय एकात्मता दिन
  2.  महराष्ट्र दिन
  3.  सामाजिक न्याय दिन
  4.  कामगार दिन

उत्तर : सामाजिक न्याय दिन


12. संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या घटनादूरस्ती विधेयकानुसार किती देशातील भारतीय वंशाच्या नागरिकांना दुहेरी नागरिकत्वचा फायदा मिळणार आहे?

  1.  4
  2.  16
  3.  12
  4.  5

उत्तर : 16


13. देशातील पहिली 540 मेगावॉट वीजनिर्मिती करणारी अनुभट्टी कोठे सुरू करण्यात आली?

  1.  रावतभाटा
  2.  तारापुर
  3.  काक्रापार
  4.  श्रीहरीकोटा

उत्तर : तारापुर


14. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात —– प्रकारची मृदा आढळते.

  1.  क्षारयुक्त व अल्कली
  2.  रेगुर
  3.  जांभी
  4.  दलदलयुक्त

उत्तर : जांभी


15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?

  1.  उदारमतवादी पक्ष
  2.  स्वराज्य पक्ष
  3.  काँग्रेस पक्ष
  4.  मुस्लिम लीग

उत्तर : स्वराज्य पक्ष


16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?

  1.  स्वामी दयानंद
  2.  स्वामी विवेकानंद
  3.  अॅनी बेझंट
  4.  केशवचंद्र सेन

उत्तर : अॅनी बेझंट


17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?

  1.  इस्लामाबाद
  2.  ढाका
  3.  अलाहाबाद
  4.  अलिगड

उत्तर : ढाका


18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?

  1.  1895
  2.  1896
  3.  1897
  4.  1898

उत्तर : 1897


19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

  1.  डॉ. बी.आर. आंबेडकर
  2.  वि.रा. शिंदे
  3.  महात्मा जोतिबा फुले
  4.  भास्करराव जाधव

उत्तर : वि.रा. शिंदे


20. हिमालय हा —– आहे.

  1.  अर्वाचीन वलीपर्वत (घडीचा पर्वत)
  2.  अवशिष्ट पर्वत
  3.  ठोकळ्यांचा पर्वत
  4.  ज्वालामुखीय पर्वत

उत्तर : अर्वाचीन वलीपर्वत (घडीचा पर्वत)

No comments:

Post a Comment

Post Top Ad