▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.28

1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतचलनाचे नियंत्रण कशाप्रकारे करते?

  1.  बँक दर
  2.  रोख राखीव निधीचे प्रमाण बदलणे
  3.  खुला बाजार व्यवहार
  4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


2. खालील संख्यामाला पूर्ण करा.

 4,3,12,9,36,81,?

  1.  72
  2.  108
  3.  64
  4.  124

उत्तर : 108


3. महाराष्ट्रात —– लाख चौ. हे क्षेत्र निमखार्‍या पाण्यातील मच्छिमारीसाठी योग्य आहे.

  1.  0.19
  2.  0.50
  3.  0.75
  4.  0.90

उत्तर : 0.19


4. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते?

  1.  देशमुख
  2.  कदम
  3.  पाटील
  4.  महाजन

उत्तर : कदम


5. शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते?

  1.  समाज सेवा
  2.  शैक्षणिक गुणवत्ता
  3.  शास्त्रीय संशोधन
  4.  साहित्य

उत्तर : शास्त्रीय संशोधन


6. योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या कोणती दिशा आहे?

  1.  पूर्व
  2.  उत्तर
  3.  आग्नेय
  4.  दक्षिण

उत्तर : उत्तर


7. महाराष्ट्रात ग्राम पंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

  1.  ग्रामसेवक
  2.  सरपंच
  3.  उपसरपंच
  4.  तलाठी

उत्तर : ग्रामसेवक


8. महाराष्ट्रात सन 2009 च्या 12 व्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत किती महिला उमेदवार निवडून आल्यात?

  1.  14
  2.  09
  3.  12
  4.  11

उत्तर : 11


9. वर्ष 2009 चा उत्कृष्ट अभिनेत्रीचा व्ही.शांताराम पुरस्कार कुणास देण्यात आला?

  1.  प्रियंका चोपडा
  2.  विद्या बालन
  3.  करीना कपूर
  4.  राणी मुखर्जी

उत्तर : राणी मुखर्जी


10. एका रांगेत प्रत्येकी 10 फुट अंतरावर एक झाड आहे. तर पहिल्या व पाचव्या झाडांतील अंतर किती फुट असेल?

  1.  50
  2.  40
  3.  45
  4.  55

उत्तर : 40


11. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणार्‍या प्रतिनिधीची संख्या किती?

  1.  20
  2.  23
  3.  15
  4.  19

उत्तर : 19


12. अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो?

  1.  उत्पादक
  2.  विक्रेता
  3.  ग्राहक
  4.  वरील सर्व

उत्तर : ग्राहक


13. सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते?

  1.  बी लावून
  2.  फांदी लावून
  3.  स्टम्प (खुंटा) पद्धतीने
  4.  कलमाने

उत्तर : स्टम्प (खुंटा) पद्धतीने


14. मेंढीची कोणती जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे?

  1.  निलगिरी
  2.  अविवस्त्रा
  3.  काश्मीर मेरीनो
  4.  वरील सर्व

उत्तर : काश्मीर मेरीनो


15. भिन्न संख्या ओळखा: 09,10,16,36,81

  1.  09
  2.  10
  3.  81
  4.  16

उत्तर : 10


16. महाराष्ट्रात —– या पिकाचे राज्यांतर्गत उत्पादन हे राज्यांतर्गत वापरापेक्षा अधिक आहे.

  1.  भात
  2.  गहू
  3.  ज्वारी
  4.  मोहरी

उत्तर : ज्वारी


17. कृषी मूल्य आयोगाची स्थापना सन —– साली झाली.

  1.  1955
  2.  1965
  3.  1975
  4.  1985

उत्तर : 1965


18. तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पीक उत्पादनात —–% वाढ होते.

  1.  12 ते 31
  2.  10 ते 15
  3.  15 ते 20
  4.  35 पेक्षा अधिक

उत्तर : 12 ते 31


19. लोह व अल्युमिनियमचे प्रमाण —– मध्ये जास्त असते.

  1.  काळीमृदा
  2.  गाळाची मृदा
  3.  जांभी मृदा
  4.  क्षारयुक्त मृदा

उत्तर : जांभी मृदा


20. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन —– जिल्ह्यात अधिक आहे.

  1.  रत्नागिरी
  2.  भंडारा
  3.  सिंधूदुर्ग
  4.  अकोला

उत्तर : भंडारा

No comments:

Post a Comment

Post Top Ad