▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.23

1. खालील निर्देशित ऐकण्याच्या प्रमाणानुसार नागरिकांची ऐकण्याची क्षमता, ऐकण्यात बिघाड न होता किती आहे?

  1.  110 db
  2.  85 db
  3.  95 db
  4.  100 db

उत्तर : 110 db


2. खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?

  1.  ओझोन
  2.  प्राणवायू
  3.  कार्बाम्ल वायू
  4.  हवा

उत्तर : कार्बाम्ल वायू


3. कर्बाचे कोणते अपररूप कर्तन व वेधनसाठी वापरता?

  1.  हिरा
  2.  ग्राफाईट
  3.  सक्रिय कर्ब
  4.  काळे कर्ब

उत्तर : हिरा


4. खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही?

  1.  क्षयरोग
  2.  विषमज्वर
  3.  हिवताप
  4.  यकृतदाह-ब

उत्तर : हिवताप


5. दशमान पद्धतीचा आधार कोणता आहे?

  1.  2
  2.  16
  3.  10
  4.  8

उत्तर : 10


6. देशाच्या विकासाचे प्रमाण काय आहे?

  1.  शहरीकरण
  2.  शैक्षणिक विकास
  3.  औध्योगिक विकास
  4.  रोजगार विकास

उत्तर : औध्योगिक विकास


7. चलनाच्या अवमूल्यनामुळे

  1.  आयात वाढते
  2.  निर्यात वाढते
  3.  बेरोजगारी वाढते
  4.  दोन राष्ट्रांमधील विश्वास वाढतो

उत्तर : निर्यात वाढते


8. कोणत्या वर्षी भारताची नियात आयातीपेक्षा जास्त होती?

  1.  1972-73
  2.  1973-74
  3.  1969-70
  4.  1970-71

उत्तर : 1972-73


9. आयात-निर्यात पास-बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली?

  1.  पाचवी
  2.  तिसरी
  3.  सातवी
  4.  यापैकी नाही

उत्तर : सातवी


10. जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

  1.  पॅरिस
  2.  जिनेव्हा
  3.  न्यूयॉर्क
  4.  नवी दिल्ली

उत्तर : जिनेव्हा


11. खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही?

  1.  ठेवी स्वीकारणे
  2.  कर्ज देणे
  3.  रकमांचे स्थानांतरण
  4.  पत नियंत्रण

उत्तर : पत नियंत्रण


12. दि स्टेट बँक ऑफ इंडिया खालील वर्षी अस्तीत्वात आली.

  1.  1935
  2.  1949
  3.  1955
  4.  1969

उत्तर : 1955


13. 1951-52 मध्ये एकूण ग्रामीण कर्जपुरवठ्यात संस्थात्मक साधनांचा खालील वाटा होता.

  1.  19%
  2.  7%
  3.  12%
  4.  31%

उत्तर : 7%


14. कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते?

  1.  नाबार्ड
  2.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
  3.  स्टेट बँक ऑफ इंडिया
  4.  वरील सर्व

उत्तर : नाबार्ड


15. भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘अग्रणी बँक योजना’ खालील वर्षी सुरू केली.

  1.  1991
  2.  1969
  3.  1949
  4.  1959

उत्तर : 1969


16. केंद्र सरकार कडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो?

  1.  अबकारी कर
  2.  प्राप्ती कर
  3.  संपती कर
  4.  विक्री कर

उत्तर : प्राप्ती कर


17. भारतामध्ये सर्वप्रथम खालील राज्य सरकारतर्फे शून्याधारित अर्थसंकल्प मांडला?

  1.  महाराष्ट्र
  2.  पश्चिम बंगाल
  3.  केरळ
  4.  मध्यप्रदेश

उत्तर : महाराष्ट्र


18. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी पुरस्कृत केला?

  1.  राज्य सरकार
  2.  जिल्हा परिषद
  3.  महानगरपालिका
  4.  केंद्र सरकार

उत्तर : केंद्र सरकार


19. भारत सरकारचा आकस्मीक निधी —– च्या अखत्यारीत असतो.

  1.  राष्ट्रपती
  2.  उपराष्ट्रपती
  3.  पंतप्रधान
  4.  मंत्रीपरिषद

उत्तर : राष्ट्रपती


20. सार्वजनिक लेखा-समिती त्यांचा अहवाल खालील सभेला सादर करते.

  1.  संसद
  2.  राष्ट्रपती
  3.  पंतप्रधान
  4.  वित्त-मंत्री

उत्तर : संसद

No comments:

Post a Comment

Post Top Ad