▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Question Bank No.2

1. एकूण स्थूल देशांतर्गत (घरेलू) उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग, 1900-2000 किमतींवर, टक्केवारीच्या स्वरुपात 1950-51 च्या 56.5 पासून 2012-2013 च्या 13.6 पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलीत आहे?

  1.  केवळ शेती
  2.  शेती व वने फक्त
  3.  शेती व मत्स्यव्यवसाय फक्त
  4.  वरील एकही पर्याय योग्य नाही

उत्तर : वरील एकही पर्याय योग्य नाही


2. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून —— हे औषध वापरतात.

  1.  नॅलिडीक्सिक अॅसिड
  2.  अॅस्पिरीन
  3.  पॅरासिटामॉल
  4.  रॅनटक

उत्तर : अॅस्पिरीन


3. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा हा निष्कृष्ट ठरण्याचे कारण —– असते.

  1.  आंतर परावर्तन
  2.  सस्पंदन
  3.  निनाद
  4.  स्पंदन

उत्तर : निनाद


4. समुद्राची खोली मोजण्यासाठी —– वापरतात.

  1.  वर्णलेखन तंत्रज्ञान
  2.  सोनार तंत्रज्ञान
  3.  निष्कर्षण तंत्रज्ञान
  4.  अपवर्तनांकमापी

उत्तर : सोनार तंत्रज्ञान


5. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्याचे

  1.  बाष्पीभवन होते
  2.  संघनन होते
  3.  संप्लवन होते
  4.  यापैकी नाही

उत्तर : संप्लवन होते


6. —— वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.

  1.  पृथ्वीच्या ध्रुवावर
  2.  पृथ्वीच्या विषुववृत्तावर
  3.  पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये
  4.  पृथ्वीच्या पृष्ठभागावर

उत्तर : पृथ्वीच्या ध्रुवावर


7. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?

  1.  लोखंड व कार्बन
  2.  लोखंड, क्रोमीअम व निकेल
  3.  लोखंड, क्रोमीअम व कोबाल्ट
  4.  लोखंड, टिन व कार्बन

उत्तर : लोखंड, क्रोमीअम व निकेल


8. ‘डेटॉल’ मधील हा मुख्यघटक असतो –

  1.  बायथायनॉल
  2.  टिंक्चर आयोडीन
  3.  बोरिक अॅसिड
  4.  क्लोरोझायलेनॉल

उत्तर : क्लोरोझायलेनॉल


9. —— ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.  

  1.  लालोत्पादक ग्रंथी
  2.  यकृत
  3.  स्वादुपिंड
  4.  जठरग्रंथी

उत्तर : यकृत


10. मानवी शरीरात जवळजवळ —— किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.

  1.  10,000
  2.  98,000
  3.  97,000
  4.  98,500

उत्तर : 97,000


11. विंचू हा —— प्राणी आहे.

  1.  अंडी देणारा
  2.  पिलांना जन्म देणारा
  3.  वरीलपैकी दोन्ही
  4.  यापैकी कोणतेही नाही

उत्तर : पिलांना जन्म देणारा


12. खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढताक्रम कोणता?

  1.  सूर्य, सूर्यमाला, पृथ्वी, विश्व, आकाशगंगा
  2.  विश्व, आकाशगंगा, सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य
  3.  सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य, विश्व, आकाशगंगा
  4.  वरील एकही नाही

उत्तर : वरील एकही नाही


13. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण

  1.  जास्त विद्युतभार मिळवण्यासाठी
  2.  जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
  3.  ही जोडणी सोपी आहे
  4.  वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर : जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी


14. खालीलपैकी कोणत्या धातूकेमध्ये तांबे व लोखंड आहेत?

  1.  मॅलचाईट
  2.  चालकोपायराईट
  3.  चालकोसाईट
  4.  अझुराईट

उत्तर : चालकोपायराईट


15. एका माध्यमाकडून दुसर्‍या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला —— म्हणून ओळखले जाते.

  1.  परावर्तन
  2.  अपवर्तन
  3.  अपस्करण
  4.  अपसरण (विचलन)

उत्तर : अपवर्तन


16. गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?

  1.  डोकेदुखी
  2.  हगवण
  3.  डायरिया
  4.  निद्रानाश

उत्तर : डोकेदुखी


17. एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?

  1.  GZTZLMH
  2.  GZHTZIM
  3.  GZHTAZM
  4.  GZHLMZT

उत्तर : GZHTZIM


18. चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?

  1.  W<Y<X<Z
  2.  Y<W<X<Z
  3.  X<Z<Y<W
  4.  Z<X<W<Y

उत्तर : Y<W<X<Z


19. एका अक्षर मालिकेची विविध पदे दिलेली आहेत. त्यापैकी प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद गाळलेले आहे. ते गाळलेले पद, दिलेल्या पर्यायांमधून शोधा.

ak, eo, is, (?), qa, ue

  1.  lv
  2.  mw
  3.  lw
  4.  mv

उत्तर : mw


20. 4 ने पूर्ण भाग जाणार्‍या तीन-अंकी संख्या किती आहेत?

  1.  220
  2.  224
  3.  225
  4.  228 

उत्तर : 225

No comments:

Post a Comment

Post Top Ad