मराठी व्याकरण
· शब्दांच्या शक्ती :
· प्रत्येक शब्दामध्ये आपला अर्थ प्रकट करण्याची अंगभूत शक्ती असते त्यांना शब्दांच्या शक्ती असे म्हणतात.
·
शब्दांच्या
अंगी तीन
प्रकारची
शक्ती असते.
1. अभिधा
2. लक्षणा
3. व्यंजन
· 1. अभिधा :
· एखादा शब्द उच्चारल्यावर त्याच्याशी निगडीत जो सर्वसामान्य अर्थ निघतो, त्या शब्दांच्या शक्तीस अमिधा असे म्हणतात.
·
उदा. 1.
मी एक वाघ
पहिला.
2. आमच्याकडे
एक कासव आहे.
· 2. लक्षणा :
· ज्यावेळी आपण शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घेतो त्यावेळी शब्दांच्या शक्तीस लक्षणा असे म्हणतात.
·
उदा. 1.
आम्ही
बाजरी खातो.
2. घरावरून
उंट गेला.
3. सूर्य
बुडाला.
· 3. व्यंजन :
· ज्यावेळी शब्दांच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करतो तेव्हा शब्दांच्या शक्तीस व्यंजन असे म्हणतात.
·
उदा. 1.
भुंकणारे
कुत्रे चावत
नाही.
2. समाजात
भरपूर लांडगे पहावयास
मिळतात.
3. समाजात
वावरणारे
असले साप
ठेचून काढले
पाहिजे.
· शब्दयोगी अव्यय :
· वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणार्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
· शब्दयोगी अव्यव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणार्या शब्दाला जोडूनच येतात.
· शब्दयोगी अव्ययवाचे पंधरा प्रकार पडतात.
· 1. कालवाचक :
·
कालवाचक
अव्ययवाचे
दोन प्रकार
पडतात.
अ) कालदर्शक - पावेतो, नंतर, आधी, पुढे, पूर्वी
इ.
उदा. 1. आजपावेतो
मी आंबा
खाल्ला नाही.
2. यापुढे मी
जाणार नाही.
3. सकाळनंतर
मी तिकडे
जाणार आहे.
ब) गतिवाचक - पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून
इ.
उदा.1. कालपासून
माझी परीक्षा
सुरू झाली.
2. उद्या
पर्यंत ते
दुकान बंद
राहील.
· 2. स्थलवाचक :
· आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, समोर, जवळ, ठायी, पाशी, समक्ष, समीप, नजीक इ.
·
उदा. 1. पुस्तक
टेबलाजवळ
ठेवले आहे.
2. घरामध्ये
मोठा साप
घुसला आहे.
· 3. कारणवाचक :
· करवी, योगे, हाती, व्दारा, कडून, मुळे इ.
·
उदा. 1. सावलीमुळे
कपडे लवकर
वाळत नाही.
2. सिंहाकडून
हरिण मारले
गेले.
· 4. हेतुवाचक :
· करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रीत्यर्थी, निमित्त, स्तव इ.
·
उदा. 1.
यश
मिळविण्याकरिता
मेहनत लागते.
2. जगण्यासाठी
अन्न हवेच.
· 5. व्यतिरेकवाचक :
· विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त
·
उदा. 1.
तुझ्याशिवाय
माला करमत
नाही.
2. त्याच्या
खेरीज दूसरा
कोणताही
चालेल.
· 6. तुलनात्मक :
· पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.
·
उदा. 1. माणसांपेक्षा
मेंढरं बारी.
2. गावामध्ये
केशर सर्वात
हुशार आहे.
· 7. योग्यतावाचक :
· समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे इ.
·
उदा. 1. तो
ड्रेस माझा
सारखा आहे.
2. आम्ही दोघे
समान उंचीचे
आहोत.
· 8. संग्रहवाचक :
· सुद्धा, देखील, ही, पण, केवळ, फक्त,इ.
·
उदा. 1.
मी देखील त्या
कार्यक्रमात
सहभागी होईल.
2. रामही
भक्तासाठी
धावून येईल.
· 9. कैवल्यवाचक :
· च, ना, मात्र, पण, फक्त, केवळ इ.
·
उदा. 1. विराटच
आपला सामना
जिंकवेल.
2. किरण मात्र
आपल्या सोबत
येणार नाही.
· 10. संबंधवाचक :
· विशी, विषयी, संबंधी इ.
·
उदा. 1.
देवाविषयी
आपल्या मनात
फार भक्ति
आहे.
2. त्यासंबंधी
मी काहीच
बोलणार नाही.
· 11. संबंधवाचक :
· संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेत इ.
·
उदा. 1.
त्याने
सर्वांबरोबर
जेवण केले.
2. आमच्या सह
तो पण येणार
आहे.
· 12.विनिमयवाचक :
· बद्दल, एवजी, जागी, बदली इ.
·
उदा. 1. त्याच्या
जागी मी
खेळतो.
2. सूरजची
बदली
पुण्याला
झाली.
· 13. दिकवाचक :
· प्रत, प्रती, कडे, लागी इ.
·
उदा. 1.
या
पेपरच्या
दहाप्रत
काढून आण.
2. त्याच्याकडे
पैसे दिले
आहेत मी.
· 14. विरोधवाचक :
· विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.
·
उदा. 1.
भारताविरुद्ध
आज
पाकिस्तानची
मॅच आहे.
2. त्याने उलट
माझीच माफी मागितली.
· 15. परिणामवाचक :
· भर
·
उदा. 1.
मी दिवसभर
घरीच होतो.
2. राम
रात्रभर
शेतात पाणी
भरत होता.
· वर्णमाला
· वर्ण - आपल्या तोंडावाटे पडणार्या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.
·
मराठीत
एकूण 48 वर्ण
आहेत.
1. स्वर
2. स्वरादी
3. व्यंजन
· 1. स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.
· अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ
· स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.
· 1. र्हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हस्व स्वर असे म्हणतात.
· अ, इ, ऋ, उ
· 2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
· आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
· स्वरांचे इतर प्रकार
· 1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
· अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ
· 2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
· अ-ई, उ-ए, ओ-ऋ
· 3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
· याचे 4 स्वर आहेत.
· ए - अ+इ/ई
· ऐ - आ+इ/ई
· ओ - अ+उ/ऊ
· औ - आ+उ/ऊ
· 2. स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
· स्वर + आदी - स्वरादी
· दोन स्वरादी - अं, अः
· स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
· दोन नवे स्वरदी : ओ, औ
· हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
· उदा. बॅट, बॉल
· 3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.
· ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
·
व्यंजनाचे
पाच प्रकारात
वर्णन केले
जाते.
1. स्पर्श
व्यंजन (25)
2. अर्धस्वर
व्यंजन (4)
3. उष्मा, घर्षक
व्यंजन (3)
4. महाप्राण
व्यंजन (1)
5. स्वतंत्र
व्यंजन (1)
· 1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत.
· ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श
· करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
· उदा. क, ख, ग, घ, ड
· च, छ, ज, झ, त्र
· ट, ठ, ड, द, ण
· त, थ, द, ध, न
· प, फ, ब, भ, म
·
स्पर्श
व्यंजनाचे
तीन प्रकारात
वर्गीकरण केले
जाते.
1. कठोर वर्ण
2. मृदु वर्ण
3. अनुनासिक
वर्ण
· 1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
· उदा. क, ख
· च, छ
· ट, ठ
· त, थ
· प, फ
· 2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
· उदा. ग, घ
· ज, झ
· ड, ढ
· द, ध
· ब ,भ
· 3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
· उदा. ड, त्र, ण, न, म
· केवल प्रयोगी अव्यय
· आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांच्या केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.
·
1. हर्षदर्शक :
अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
- उदा. अहाहा!
किती सुंदर
दृश्य आहे.
·
2. शोकदर्शक :
आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे
- उदा. अरेरे!
खूप वाईट
झाले.
·
3. आश्चर्यदर्शक :
ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या
- उदा. अबब!
केवढा मोठा
साप
·
4. प्रशंसादर्शक :
छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड
खाशी
- उदा. शाब्बास!
तू दिलेले काम
पूर्ण केलेस.
·
5. संमतीदर्शक :
ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा
- उदा. अछा!
जा मग
·
6. विरोधदर्शक :
छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च
- उदा. छे-छे!
असे करू नकोस.
·
7. तिरस्कारदर्शक :
शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी
- उदा. छी!
ते मला नको
·
8. संबोधनदर्शक :
अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे
- उदा. अहो!
एकलत का ?
·
9. मौनदर्शक :
चुप, चुपचाप, गप, गुपचुप
- उदा. चुप!
जास्त बोलू
नको
· विशेषण :
· नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
· उदा. चांगली मुले, काळा कुत्रा, पाच टोप्या
· विशेषण - चांगली, काळा, पाच
· विशेष्य - पिशवी, कुत्रा, टोप्या
· विशेषणाचे प्रकार :
· 1. गुणवाचक विशेषण
· 2. संख्यावाचक विशेषण
· 3. सार्वनामिक विशेषण
· 1. गुणवाचक विशेषण :
· ज्या विशेषणांच्या योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण किवा विशेष दाखविला जातो, त्यास गुण विशेषण असे म्हणतात.
· उदा. हिरवे रान, शुभ्र ससा, निळे आकाश
· 2. संख्या विशेषण :
· ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.
· संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.
· 1. गणना वाचक संख्या विशेषण
· 2. क्रम वाचक संख्या विशेषण
· 3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण
· 4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण
· 5. अनिश्चित संख्या विशेषण
· 1. गणना वाचक संख्या विशेषण :
· ज्या विशेषनाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्यास गणना वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
· उदा. 1. दहा मुले, तेरा भाषा, एक तास, पन्नास रुपये
· गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात
· 1. पूर्णाक वाचक - पाच, सहा, अठरा, बारा.
· 2. अपूर्णाक वाचक - पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.
· 3. साकल्य वाचक - पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.
· 2. क्रमवाचक संख्या विशेषण :
· जी विशेषणे वस्तूचा क्रम दाखवितात त्यांना क्रमवार संख्या विशेषणे असे म्हणतात.
· उदा. पहिल दुकान, सातवा बंगला, पाचवे वर्ष.
· 3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :
· जी विशेषणे संख्याची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवतात त्यांना त्यांना आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
· उदा. तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग
· 4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :
· जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
· उदा. मुलींनी पाच-पाच चा गट करा, प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा.
· 5. अनिश्चित संख्या विशेषण :
· जी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात.
· उदा. काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी
· 3. सार्वनामिक विशेषण :
· सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
· उदा. हे झाड, ती मुलगी, तो पक्षी.
सर्वनाम :
नामऐवजी वापरल्या जाणार्या शब्दांला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामचे मुख्य प्रकार सहा आहेत.
· 1. पुरुषवाचक सर्वनाम
· 2. दर्शक सर्वनाम
· 3. संबंधी सर्वनाम
· 4. प्रश्नार्थक सर्वनाम
· 5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
· 6. आत्मवाचक सर्वनाम
विरुद्धार्थी शब्द
शब्द |
अर्थ |
तिरपा |
सरळ |
नम्रता |
गर्विष्ठपणा |
एकमत |
दुमत |
उदय |
अस्त |
आशीर्वाद |
शाप |
अधिक |
उणे |
धूर्त |
भोळा |
थोर |
सान |
अनुयायी |
पुढारी |
धनवंत |
गरीब |
निंध |
वंध |
दोषी |
निर्दोषी |
दीर्घ |
र्हीस्व |
अभिमानी |
निराभिमानी |
देशभक्त |
देशद्रोही |
अक्कलवान |
बेअक्कल |
दाट |
विरळ |
अनायास |
सास |
कृत्रिम |
नैसर्गिक |
सकर्मक |
अकर्मक |
लोभी |
निर्लोभी |
लाजरा |
धीट |
साहेतुक |
निर्हेतुक |
हिंसा |
अहिंसा |
राजमार्ग |
आडमार्ग |
श्वास |
नि:श्वास |
सुर |
असुर |
साक्षर |
निरक्षर |
सुरस |
निरस |
पूर्णांक |
अपूर्णांक |
नि:शस्त्र |
सशस्त्र |
सुजाण |
अजाण |
गंभीर |
अवखळ |
सुलक्षणी |
कुलक्षणी |
चोर |
साव |
सुज्ञ |
अज्ञ |
सुकाळ |
दुष्काळ |
सगुण |
निर्गुण |
टणक |
मऊ/ मृदु |
चपळ |
मंद |
सुबोध |
दुर्बोध |
अनीती |
नीती |
सदैव |
दुर्दैव |
दुष्ट |
सुष्ट |
स्वातंत्र्य |
पारतंत्र्य |
साकार |
निराकार |
स्वर्ग |
नरक |
दिन |
रजनी |
अध्ययन |
अध्यापन |
स्वकीय |
परकीय |
मनोरंजक |
कंटाळवाणे |
सौंदर्य |
कुरूपता |
खंडन |
मंडन |
एकी |
बेकी |
उघड |
गुप्त |
अवखळ |
गंभीर |
उथळ |
खोल |
पूर्वगामी |
कर्मत |
अतिवृष्टी |
अनावृष्टी |
रणशूर |
रणभिरू |
माजी |
आजी |
शाप |
वर |
अवनत |
उन्नत |
तीव्र |
सौम्य |
शीतल |
तप्त, उष्ण |
कंजूष |
उघडया |
अवधान |
अनावधान |
प्रसन्न |
अप्रसन्न |
मर्द |
नामर्द |
शंका |
खात्री |
कृपा |
अवकृपा |
व्दार |
जीत |
गमन |
आगमन |
कल्याण |
अकल्याण |
ज्ञात |
अज्ञात |
स्तुति |
निंदा |
वंध |
निंध |
सत्कर्म |
दुष्कर्म |
खरे |
खोटे |
भरती |
ओहोटी |
स्थूल |
सूक्ष्म, कृश |
सुसंबद्ध |
असंबद्ध |
हर्ष |
खेद |
विधायक |
विघातक |
हानी |
लाभ |
संघटन |
विघटन |
सुंदर |
कुरूप |
सार्थक |
निरर्थक |
स्वस्थ |
अस्वस्थ |
लठ्ठ |
कृश, बारीक |
भरभराट |
र्हास |
मलूल |
टवटवीत |
सुसंगत |
विसंगत |
तप्त |
थंड |
आंदी |
अनादी |
धर्म |
अधर्म |
सनाथ |
अनाथ |
सशक्त |
अशक्त |
कीर्ती |
अपकीर्ती |
ऐच्छिक |
अनैच्छिक |
गुण |
अवगुण |
अनुकूल |
प्रतिकूल |
उत्तीर्ण |
अनुत्तीर्ण |
यश |
अपयश |
आरंभ |
अखेर |
रसिक |
अरसिक |
उंच |
सखल |
आवक |
जावक |
कमाल |
किमान |
उच्च |
नीच |
आस्तिक |
नास्तिक |
अल्पायुषी |
दीर्घायुषी |
अर्वाचीन |
प्राचीन |
उगवती |
मावळती |
अपराधी |
निरपराधी |
उपद्रवी |
निरुपद्रवी |
कृतज्ञ |
कृतघ्न |
खरेदी |
विक्री |
गध |
पध |
उपयोगी |
निरुपयोगी |
उत्कर्ष |
अपकर्ष |
उचित |
अनुचित |
जहाल |
मवाळ |
जमा |
खर्च |
चढ |
उतार |
कर्णमधुर |
कर्णकर्कश |
गोड |
कडू |
कच्चा |
पक्का |
चंचल |
स्थिर |
चढाई |
माघार |
चिमुकला |
प्रचंड |
जलद |
सावकाश |
तीक्ष्ण |
बोथट |
शक्य |
अशक्य |
दृश्य |
अदृश्य |
प्रेम |
व्देष |
समता |
विषमता |
सफल |
निष्फल |
शोक |
आनंद |
पौर्वात्य |
पाश्चिमात्य |
मंजूर |
नामंजूर |
विधवा |
सधवा |
अज्ञान |
सज्ञान |
पोक्त |
अल्लड |
लायक |
नालायक |
सजातीय |
विजातीय |
सजीव |
निर्जीव |
सगुण |
निर्गुण |
साक्षर |
निरक्षर |
प्रकट |
अप्रकट |
नफा |
तोटा |
सुशिक्षित |
अशिक्षित |
शांत |
रागीट |
सुलभ |
दुर्लभ |
सदाचरण |
दुराचरण |
सह्य |
असह्य |
सधन |
निर्धन |
बंडखोर |
शांत |
संकुचित |
व्यापक |
सुधारक |
सनातनी |
सुदिन |
दुर्दिन |
ऋणको |
धनको |
क्षणभंगुर |
चिरकालीन |
आभ्राच्छादित |
निरभ्र |
अबोल |
वाचाळ |
आसक्त |
अनासक्त |
उत्तर |
प्रत्युत्तर |
उपकार |
अपकार |
ग्राह्य |
व्याज्य |
घाऊक |
किरकोळ |
अवजड |
हलके |
उदार |
अनुदार |
उतरण |
चढण |
जागृत |
निद्रिस्त |
टंचाई |
विपुलता |
तारक |
मारक |
दयाळू |
निर्दय |
नाशवंत |
अविनाशी |
धिटाई |
भित्रेपणा |
पराभव |
विजय |
राव |
रंक |
रेलचेल |
टंचाई |
सरळ |
वक्र |
शाश्वत |
आशाश्वत |
सधन |
निर्धन |
वियोग |
संयोग |
मृर्त |
अमृर्त |
राकट |
नाजुक |
लवचिक |
ताठर |
सचेतन |
अचेतन |
वैयक्तिक |
सामुदायिक |
सूचिन्ह |
दुश्चिन्ह |
सुकीर्ती |
दुष्कीर्ती |
रुचकर |
बेचव |
प्रामाणिक |
अप्रामाणिक |
लिखित |
लिखित |
विवेकी |
अविवेकी |
समानार्थी शब्द
शब्द |
अर्थ |
अभिनेता |
नट |
उदर |
पोट |
एकता |
एकी, ऐक्य |
अंचल |
स्थिर, शांत, पर्वत |
अनर्थ |
अरिष्ट, संकट |
कट |
कारस्थान |
आज्ञा |
आदेश, हुकूम |
आरसा |
दर्पण |
अपराध |
गुन्हा |
उणीव |
कमतरता,न्यून, न्यूनता |
अंगार |
निखारा |
चाड |
आवड, गरज, गोडी |
अविरत |
सतत, अखंड |
औक्षण |
ओवाळणे |
मनोरंजन |
मनोरंजन |
आसक्ती |
लाभ, हव्यास |
गवई |
गायक |
ग्रंथ |
पुस्तक |
किमया |
जादू, चमत्कार |
अवर्षण |
दुष्काळ (पाऊस न पडणे) |
कृपण |
कंजूष, चिकट |
कृश |
हडकुळा, बारीक |
खडक |
दगड, पाषाण |
खटाटोप |
प्रयत्न, मेहनत, धडपड |
गनीम |
शत्रु, अरी |
गरुड |
खगेंद्र, व्दिजराज, वैनतेय |
गाणे |
गीत |
गाय |
धेनू, गो, गोमाता |
चौफेर |
भोवताली, सर्वत्र |
ठेकेदार |
मक्तेदार, कंत्राटदार |
छंद |
आवड, नाद |
जयघोष |
जयजयकार |
गौरव |
सत्कार |
तृष्णा |
तहान, लालसा |
छिद्र |
भोक |
दुजा |
दुसरा |
नजराणा |
भेट, उपहार |
नवनीत |
लोणी |
तारू |
जहाज, गलबत |
तरुण |
जवान, युवक |
थवा |
समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव |
टंचाई |
कमतरता |
झोका |
हिंदोळा |
नारळ |
श्रीफळ, जारियल |
निर्जन |
ओसाड |
नौदल |
आरमार |
पंक्ती |
ओळ, पतंग, रांग |
मत्सर |
व्देष, असूया |
मुलामा |
लेप |
ब्रीद |
बाणा, प्रतिज्ञा |
प्राप्त:काळ |
उषा, सकाळ, पहाट |
मकरंद |
मध |
मलूल |
निस्तेज |
रुक्ष |
नीरज, कोरडे |
बैल |
वृषभ, खोंड, |
मोहिनी |
भुरळ |
प्रपंच |
संसार |
शिकस्त |
पराकाष्ठा |
शव |
प्रेत |
विषण्ण |
कष्टी |
स्वेद |
घाम, धर्म |
क्षुधा |
भूक |
सुरेल |
गोड |
विनय |
नम्रता |
विवंचना |
चिंता, काळजी |
क्षीण |
अशक्त |
शेज |
शय्या, बिछाना, अंथरूण |
शिक्षक |
मास्तर, गुरु, गुरुजी |
साथ |
सोबत, संगत |
काही महत्वाचे शब्द व अर्थ
शब्द |
अर्थ |
अकालिन |
एकाएकी घडणारे |
आकालिन |
अयोग्य वेळेचे |
आकांडतांडव |
रागाने केलेला थरथराट |
अखंडित |
सतत चालणारे |
अगत्य |
आस्था |
अगम्य |
समजू न शकणारे |
अग्रज |
वडील भाऊ |
अग्रपूजा |
पहिला मान |
अज्रल |
अग्री |
अनिल |
वारा |
अहार |
ओठ, ओष्ट |
अनुग्रह |
कृपा |
अनुज |
धाकटा भाऊ |
अनृत |
खोटे |
अभ्युदय |
भरभराट |
अवतरण |
खाली येणे |
अध्वर्यू |
पुढारी |
अस्थिपंजर |
हाडांचा सापळा |
अंबूज |
कमळ |
अहर्निश |
रांत्रदिवस, सतत |
अक्षर |
शाश्वत |
आरोहण |
वर चढणे |
आत्मज |
मुलगा |
आत्मजा |
मुलगी |
अंडज |
पक्षी |
अर्भक |
मूल |
आयुध |
शस्त्र |
आर्य |
हट्टी |
इतराजी |
गैरमर्जी |
इंदिरा |
लक्ष्मी |
इंदू |
चंद्र |
इंद्रजाल |
मायामोह |
उधम |
उधोग |
उदार |
मोठ्या मनाचा |
उधुक्त |
प्रेरित |
कमल |
मुद्दा, अनुच्छेद |
तडाग |
तलाव, दार, दरवाजा |
उपवन |
बाग |
उपदव्याप |
खटाटोप |
दारा |
बायको |
नवखा |
नवीन |
नौका |
होडी |
उपनयन |
मुंज |
भयानह |
जोडे |
उपेक्षा |
दुर्लक्ष |
उबग |
विट |
ऐतधेशीय |
या देशाचा |
सुवास |
चांगला वास |
सुहास |
हसतमुख |
आंग |
तेज |
ओनामा |
प्रारंभ |
ओहळ |
ओढा |
अंकीत |
स्वाधीन, देश |
अंगणा |
स्त्री |
कणकं |
सोने |
कटी |
कमर |
कंदूक |
चेंडू |
कनव |
धा |
कंटू |
कंडू |
कमेठ |
सनातणी |
कर्मठ |
सनातनी |
कवडीचुंबक |
अतिशय कंजूस |
कसब |
कौशल्य |
कशिदा |
भरतकाम |
काक |
कावळा |
कवड |
घास |
कामिनी |
स्त्री |
काया |
शरीर |
कसार |
तला |
काष्ट |
लाकूड |
किंकर |
दास |
कांता |
पत्नी |
कुंजर |
हत्ती |
कुरंग |
हरिण |
कुठार |
कुर्हाकड |
चक्षू |
डोळा |
चारू |
मोहक |
चौपदरी |
झोळी |
छाकटा |
मवाली |
छांदिष्ट्य |
नादी, लहरी |
जर्जर |
क्षीण झालेली |
जरब |
दरारा |
जाया |
पत्नी |
जान्हवी |
गंगा नदी |
ठोंब्या |
मूर्ख |
तटाक |
तलाव |
तटिनी |
नदी |
तडीत |
वीज |
तात |
वडील |
क्षुरंग (तुरग) |
घोडा |
त्रागा |
डोक्यात राग घालणे |
त्रेधा |
धांदल |
ददात |
उणीव |
दाहक |
जाळणारा |
दिनकर |
सूर्य |
दुर्धर |
कठीण |
दुर्भिक्ष्य |
कमतरता |
धी |
बुद्धी |
नग |
पर्वत |
नंदन |
मुलगा |
निढळ |
कमाल |
निर्जन |
ओसाड |
नीरज |
कमळ (पंकज) |
पेय |
पाणी, दूध |
प्राची |
पूर्व दिशा |
पियुष |
अमृत |
भुजंग |
सर्प |
भाऊगर्दी |
विलक्षण गर्दी |
मख |
यज्ञ |
मज्जाव |
निर्बंध, हटकाव |
मल्लीनाथी |
टीका |
मुरुत |
वारा |
मानभावी |
लबाड (ढोंगी) |
यती |
संन्याशी |
यादवी |
भाऊबंदकी |
यातायात |
त्रास |
युती |
संयोग |
रण |
युद्ध |
रथी |
योद्धा |
रमा |
लक्ष्मी |
सजीव |
कमळ |
रिता |
रिकामा |
रामबाण |
अमोघ (अचूक) |
ललना |
स्त्री |
वसुंधरा |
पृथ्वी |
वहिम |
संशय |
वायस |
कावळा |
वामिका |
विहीर |
वारू |
घोडा |
वाली |
रक्षणकर्ता |
विवर |
छिद्र |
विपिन |
अरण्य |
विषाद |
खेद |
वंचना |
फसवणूक |
व्याळ |
सर्प |
वैनतेय |
गरुड |
सव्यापसव्य |
यातायात त्रास |
सरोज |
कमळ |
सलील |
पाणी |
स्कंद |
खांदा (झाडाची फांदी) |
स्वेदज |
किटक |
हाट |
बाजार |
हिरण्य |
सोने |
क्षणभंगुर |
थोडाकाळ टिकणारे |
क्षुधा |
भुक |
ज्ञाता |
जाणणारा |
अस्कारा |
प्रसिद्धी |
खुमारी |
लज्जात, स्वाद |
चर्वित, चर्वन |
कंटाळवाणा, कथ्याकूट |
चर्पटपंजरी |
कंटाळवाने संभाषण |
कृपमंडूक |
संकुचित वृत्ती |
अरण्यरुदन |
वृथा कथन, निष्फळ प्रश्न |
वन्हयापुत्र |
अश्यक्य गोष्ट |
अव्यापारेबु |
व्यापार नसती उठाठेव |
चंचूप्रवेश |
अल्पप्रवेश |
लांगूलचालन |
खुषामत |
अचल |
स्थिर, गतीरहित |
अचला |
पृथ्वी, हातरुमाल |
अनुभाव |
प्रभाव |
अप्रत्यक्ष/अपस्थ |
अपायकारक अन्न |
अरि |
शत्रू |
अरी |
टोचणी |
अविध |
अडाणी |
आजीव |
जन्मभर |
औस |
अमावस्या |
औसा |
पुजारी |
अंकन |
मोजणे |
अंकण |
धान्य |
अंबार |
धन्याचे कोठार |
कंगाळ |
अस्थिपंजर |
कचार |
काचकाम करणारा |
कच्च |
लहान खळगा |
कच्चा |
न खिळलेला |
कनक |
सोने |
कपुत्र |
कबुतर |
कानन |
अरण्य |
कुच |
प्रयाण |
खरूस |
खसखस |
गरका |
वाटोळा |
गोहा |
गाईचे वासरू |
घन |
दाट |
घटा |
समुदाय |
पाणि |
हात |
पाणी |
जल |
बाशा |
भीती |
बाशी |
शिळी |
भट |
ब्राम्हण |
नुपूर |
पैंजण |
नुपूर |
उणिव |
निबंद |
मोकाट |
भट्ट |
विव्दान |
भाव |
भक्ती |
भावा, माया |
ज्येष्ठ, दीर |
ध्वनिदर्शक शब्द
प्राणी/पक्षी |
शब्द |
|
वाघाची |
डरकाळी |
|
कोल्हयांची |
कोल्हेकुई |
|
गाईचे |
हंबरणे |
|
गाढवाचे |
ओरडणे |
|
घुबडाचा |
घूत्कार |
|
घोडयाचे |
किंचाळणे |
|
चिमणीची |
चिवचिव |
|
कबुतराचे/पारव्याचे |
घुमणे |
|
कावळ्याची |
कावकाव |
|
सापाचे |
फुसफुसने |
|
हत्तीचे |
चित्कारणे |
|
हंसाचा |
कलख |
|
भुंग्यांचा, मधमाश्यांचा |
गुंजारव |
|
माकडांचा |
भुभु:कार |
|
म्हशींचे |
रेकणे |
|
मोराचा |
केरकाव |
|
मोरांची |
कैकावली |
|
सिंहाची |
गर्जना |
|
पंखांचा |
फडफडाट |
|
पानांची |
सळसळ |
|
डासांची |
भुणभुण |
|
रक्ताची |
भळभळ |
समूहदर्शक शब्द
समूह |
शब्द |
आंब्याच्या झाडाची |
आमराई |
उतारुंची |
झुंबड |
उपकरणांचा |
संच |
उंटांचा, लमानांचा |
तांडा |
केसांचा |
पुंजका, झुबका |
करवंदाची |
जाळी |
केळ्यांचा |
घड, लोंगर |
काजूंची, माशांची |
गाथण |
किल्ल्यांचा |
जुडगा |
खेळाडूंचा |
संघ |
गाईगुरांचे |
खिल्लार |
गुरांचा |
कळप |
गवताचा |
भारा |
गवताची |
पेंडी, गंजी |
चोरांची, दरोडेखोरांची |
टोळी |
जहाजांचा |
काफिला |
तार्यांचा |
पुंजका |
तारकांचा |
पुंज |
द्राक्षांचा |
घड, घोस |
दूर्वाची |
जुडी |
धान्याची |
रास |
नोटांचे |
पुडके |
नाण्यांची |
चळत |
नारळांचा |
ढीग |
पक्ष्यांचा |
थवा |
प्रश्नप्रत्रिकांचा, पुस्तकांचा |
संच |
पालेभाजीची |
जुडी, गडडी |
वह्यांचा |
गठ्ठा |
पोत्यांची, नोटांची |
थप्पी |
पिकत घातलेल्या आंब्यांची |
अढी |
फळांचा |
घोस |
फुलझाडांचा |
ताडवा |
फुलांचा |
गुच्छ |
बांबूचे |
बेट |
भाकरीची |
चळड |
मडक्यांची |
उतररंड |
महिलांचे |
मंडळ |
लाकडांची, ऊसाची |
मोळी |
वाघाचा |
वृंद |
विटांचा, कालिंगडाचा |
ढीग |
विधार्थ्यांचा |
गट |
माणसांचा |
जमाव |
मुलांचा |
घोळका |
मुंग्यांची |
रांग |
मेंढयाचा |
कळप |
विमानांचा |
ताफा |
वेलींचा |
कुंज |
साधूंचा |
जथा |
हरणांचा, हत्तींचा |
कळप |
सैनिकांची/चे |
तुकडी, पलटण, पथक |
शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
· शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.
· शब्दांचे खालील प्रकार पडतात.
तत्सम शब्द :
· जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात.
· उदा.
· राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.
तदभव शब्द :
· जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.
· उदा.
· घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.
देशी/देशीज शब्द :
· महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.
· उदा.
· झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.
परभाषीय शब्द :
संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.
1) तुर्की शब्द
· कालगी, बंदूक, कजाग
2) इंग्रजी शब्द
· टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.
3) पोर्तुगीज शब्द
· बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.
4) फारशी शब्द
· रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.
5) अरबी शब्द
· अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.
6) कानडी शब्द
· हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.
7) गुजराती शब्द
· सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.
8) हिन्दी शब्द
· बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.
9) तेलगू शब्द
· ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.
10) तामिळ शब्द
· चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.
सिद्ध व सधीत शब्द :
1) सिद्ध शब्द
· भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना 'सिद्ध शब्द' असे म्हणतात.
· उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.
· सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात.
अ). तत्सम
ब). तदभव
क). देशी (यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे.)
2) साधीत शब्द
· सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.
· साधित शब्दांचे पुढील 4 प्रकार पडतात
अ)उपसर्गघटित
ब) प्रत्ययघटित
क) अभ्यस्त
ड) सामासिक
अ) उपसर्गघटित शब्द
·
शब्दाच्या
पूर्वी जी
अक्षरे जोडली
जातात त्यांना
उपसर्ग असे
म्हणतात. तसेच
अशी अक्षरे जोडून
जे शब्द तयार
होतात त्या
शब्दांना 'उपसर्ग
घटित शब्द' असे
म्हणतात.
उदा. अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण
अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार
इ.
· वरील शब्दांमध्ये अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.
ब) प्रत्ययघटित शब्द
· धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.
· उदा. जनन, जनक, जननी, जनता इ.
· वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.
क) अभ्यस्त शब्द
· एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना 'अभ्यस्त शब्द' असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.
· उदा. आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.
· अभ्यस्त शब्दांचे खलील 3 प्रकार पडतात.
i) पूर्णाभ्यस्त
ii) अंशाभ्यस्त
iii) अनुकरणवाचक
i) पूर्णाभ्यस्त शब्द
· एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.
· उदा. बारीक बारीक, कळाकाळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.
ii) अंशाभ्यस्त शब्द
· जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.
· उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ.
iii) अनुकरणवाचक शब्द
· ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.
· उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.
ड) सामासिक शब्द
· जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्या शब्दाला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.
· उदा. पोळपाट, देवघर, दारोदार इ.
समास व त्याचे प्रकार
Must Read (नक्की वाचा):
वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
· काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो.
· त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्यातचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.
· जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच 'समास' असे म्हणतात.
· अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.
· उदा.
1) वडापाव - वडाघालून तयार केलेला पाव.
2) पोळपाट - पोळी करण्यासाठी लागणारे पाट
3) कांदेपोहे - कांदे घालून तयार केलेले पोहे.
4) पंचवटी - पाच वडांचा समूह
· समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.
1. अव्ययीभाव समास
2. तत्पुरुष समास
3. व्दंव्द समास
4. बहुव्रीही समास
अव्ययीभाव समास :
ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारख केला जातो त्यास 'अव्ययीभवन समास' असे म्हणतात.
अव्ययीभाव समासात आपल्याला खलील भाषेतील उदाहरणे पाहावयास मिळतात.
अ) मराठी भाषेतील शब्द
उदा.
1. गोवोगाव - प्रत्येक गावात
2. गल्लोगल्ली - प्रत्येक गल्लीत
3. दारोदारी - प्रत्येक दारी
4. घरोघरी - प्रत्येक घरी
· मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
ब) संस्कृत भाषेतील शब्द
1. प्रती (प्रत्येक) - प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन
2. आ (पर्यत) - आमरण
3. आ (पासून) - आजन्म, आजीवन
4. यथा (प्रमाण) - यथाविधी, यथामती, यथाशक्ती.
· वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपसर्गाना अव्यय मानले जाते.
· वरील उदाहरणामध्ये हे उपसर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपसर्गाना सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे.
क) अरबी व फारसी भाषेतील शब्द
उदा.
1. दर (प्रत्येक) - दारसाल, दरडोई, दरमजल.
2. गैर (प्रत्येक) - गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त
3. हर (प्रत्येक) - हररोज, हरहमेशा
4. बे (विरुद्ध) - बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक
· वरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.
2 ) तत्पुरुष समास :
·
ज्या
समासात दुसरे
पद महत्वाचे
असून समासाचा विग्रह
करतांना
गाळलेल्या
शब्द, विभक्तीप्रत्यय
लिहावा लागतो, त्यास
तत्पुरुषसमास
असे म्हणतात.
थोडक्यात
ज्या समासात
दूसरा शब्द
प्रधान / महत्वाचा
असतो त्यास
तत्पुरुष
समास असे
म्हणतात.
· उदा.
1. महामानव - महान असलेला मानव
2. राजपुत्र - राजाचा पुत्र
3. तोंडपाठ - तोंडाने पाठ
4. गायरान - गाईसाठी रान
5. वनभोजन - वनातील भोजन
· वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
· तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.
i) विभक्ती तत्पुरुष
· ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्याग शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.
· वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.
· विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे:
ii) अलुक तत्पुरुष
· ज्या विभक्ती तत्पुरुष अमासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.
·
· अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.
· उदा.
1. तोंडी लावणे
2. पाठी घालणे
3. अग्रेसर
4. कर्तरीप्रयोग
5. कर्मणी प्रयोग
iii) उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष
· ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.
· उदा.
1. ग्रंथकार - ग्रंथ करणारा
2. शेतकरी - शेती करणारा
3. लाचखाऊ - लाच खाणारा
4. सुखद - सुख देणारा
5. जलद - जल देणारा
· वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.
· नंतर दुसर्याद पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.
· इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.
iv. नत्र तत्पुरुष समास
· ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात.
· म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.
· उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)
उदा.
1. अयोग्य - योग्य नसलेला
2. अज्ञान - ज्ञान नसलेला
3. अहिंसा - हिंसा नसलेला
4. निरोगी - रोग नसलेला
5. निर्दोष - दोषी नसलेला
v) कर्मधारय तत्पुरुष समास
· ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.
· उदा.
1. नील कमल - नील असे कमल
2. रक्तचंदन - रक्तासारखे चंदन
3. पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
4. महादेव - महान असा देव
5. पीतांबर - पीत असे अंब ज्याचेपीत (पिवळे,अंबरवस्त्र)
6. मेघशाम - मेघासारखा काळा
7. चरणकमळ - चरण हेच कमळ
8. खडीसाखर - खडयसारखी साखर
9. तपोबळ - तप हेच बळ
· कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात.
अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय
§ जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.
§ उदा.
1. महादेव - महान असा देव
2. लघुपट - लहान असा पट
3. रक्तचंदन - रक्तासारखे चंदन
आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय
§ जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारेय असे म्हणतात.
§ उदा.
1. पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
2. मुखकमल - मुख हेच कमल
3. वेशांतर - अन्य असा वेश
4. भाषांतर - अन्य अशी भाषा
इ) विशेषण उभयपद कर्मधारय
§ जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधाश्य असे म्हणतात.
§ उदा.
1. लालभडक - लाल भडक असा
2. श्यामसुंदर - श्याम सुंदर असा
3. काळाभोर - काळा भोर असा
4. पांढराशुभ्र - पांढरा शुभ्र असा
5. हिरवागार - हिरवागार असा
6. कृष्णधवल - कृष्ण धवल असा
ई) उपमान पूर्वपद कर्मधाराय
· जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते.
· उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.
§ उदा.
1. वज्रदेह - वज्रासारखे
2. चंद्रमुख - चंद्रासारखे मुख
3. राधेश्याम - राधेसारखा शाम
4. कामलनयन - कमळासारखे नयन
उ) उपमान उत्तरपद कर्मधारय
§ जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.
§ उदा.
1. मुखचंद्र - चंद्रासारखे मुख
2. नरसिंह - सिंहासारखा नर
3. चरणकमल - कमलासारखे चरण
4. हृदयसागर - सागरासारखे चरण
ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय
§ जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.
§ उदा.
1. सुयोग - सु (चांगला) असा योग
2. सुपुत्र - सु (चांगला) असा पुत्र
3. सुगंध - सु (चांगला) असा गंध
5. सुनयन - सु (चांगला) असा डोळे
5. कुयोग - कु (वाईट) असा योग
6. कुपुत्र - कु (वाईट) असा पुत्र
ए) रूपक कर्मधारय
§ जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.
§ उदा.
1. विधाधन - विधा हेच धन
2. यशोधन - यश हेच धन
3. तपोबल - ताप हेच बल
4. काव्यांमृत - काव्य हेच अमृत
5. ज्ञांनामृत - ज्ञान हेच अमृत
vi) व्दिगू समास
§ ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात.
§ या समासास संख्यापूर्वपद कर्मधारय कर्मधारय समास असेही म्हणतात.
§ उदा.
1. नवरात्र - नऊ रात्रींचा समूह
2. पंचवटी - पाच वडांचासमूह
3. चातुर्मास - चार मासांचा समूह
4. त्रिभुवन - तीन भुवनांचा समूह
5. तैलोक्य - तीन लोकांचा समूह
6. सप्ताह - सात दिवसांचा समूह
7. चौघडी - चार घडयांचा समुह
vii) मध्यमपदलोपी समास
§ ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसर्यासाठी पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात.
§ या समासास लुप्तपद कर्मधरय समास असेही म्हणतात.
§ उदा.
1. साखरभात - साखर घालून केलेला भात
2. पुरणपोळी - पुरण घालून केलेली पोळी
3. कांदेपोहे - कांदे घालून केलेले पोहे
4. घोडेस्वार - घोडयावर असलेला स्वार
5. बालमित्र - बालपणापासूनचा मित्र
6. चुलत सासरा - नवर्यानचा चुलता या नात्याने सासरा
7. लंगोटी मित्र - लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र
व्दंव्द समास :
§ ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास 'व्दंव्द समास' असे म्हणतात.
§ या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
§ उदा.
1. रामलक्ष्मण - राम आणि लक्ष्मण
2. विटीदांडू - विटी आणि दांडू
3. पापपुण्य - पाप आणि पुण्य
4. बहीणभाऊ - बहीण आणि भाऊ
5. आईवडील - आई आणि वडील
6. स्त्रीपुरुष - स्त्री आणि पुरुष
7. कृष्णार्जुन - कृष्ण आणि अर्जुन
8. ने-आपण - ने आणि आण
9. दक्षिणोत्तर - दक्षिण आणि उत्तर
§ व्दंव्द समासाचे खलील 3 प्रकार पडतात.
i). इतरेतर व्दंव्द समास
ii). वैकल्पिक व्दंव्द समास
iii). समाहार व्दंव्द समास
i) इतरेतर व्दंव्द समास
§ ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.
§ उदा.
1. आईबाप - आई आणि बाप
2. हरिहर - हरि आणि हर
3. स्त्रीपुरुष - स्त्री आणि पुरुष
4. कृष्णार्जुन - कृष्ण आणि अर्जुन
5. पशुपक्षी - पशू आणि पक्षी
6. बहीणभाऊ - बहीण आणि भाऊ
7. डोंगरदर्यान - डोंगर आणि दर्याक
ii) वैकल्पिक व्दंव्द समास
§ ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.
§ उदा.
1. खरेखोटे - खरे आणि खोटे
2. तीनचार - तीन किंवा चार
3. बरेवाईट - बरे किंवा वाईट
4. पासनापास - पास आणि नापास
5. मागेपुढे - मागे अथवा पुढे
6. चुकभूल - चूक अथवा भूल
7. न्यायान्याय - न्याय अथवा अन्याय
8. पापपुण्य - पाप किंवा पुण्य
9. सत्यासत्य - सत्य किंवा असत्य
iii) समाहार व्दंव्द समास
§ ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.
§ उदा.
1. मिठभाकर - मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी
2. चहापाणी - चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ
3. भाजीपाला - भाजी, पाला, मिरची, कोथंबीर यासारख्या इतर वस्तु
4. अंथरूणपांघरून - अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणार्या वस्तु व इतर कपडे
5. शेतीवाडी - शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता
6. केरकचरा - केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
7. पानसुपारी - पान, सुपारी व इतर पदार्थ
8. नदीनाले - नदी, नाले, ओढे व इतर
9. जीवजंतू - जीव, जंतू व इतर किटक
बहुव्रीही समास :
§ ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
§ उदा.
1. नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
2. वक्रतुंड - ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
3. दशमुख - ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)
§ बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.
i) विभक्ती बहुव्रीही समास
§ ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.
§ उदा.
1. प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
2. जितेंद्रिय - जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
3. जितशत्रू - जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
4. गतप्राण - गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती
5. पूर्णजल - पूर्ण आहेत जल ज्यात असे – सप्तमी विभक्ती
6. त्रिकोण - तीन आहेत कोन ज्याला तो – चतुर्थी विभक्ती
ii) नत्र बहुव्रीही समास
§ ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.
§ उदा.
1. अनंत - नाही अंत ज्याला तो
2. निर्धन - नाही धन ज्याकडे तो
3. नीरस - नाही रस ज्यात तो
4. अनिकेत - नाही निकेत ज्याला तो
5. अव्यय - नाही व्यय ज्याला तो
6. निरोगी - नाही रोग ज्याला तो
7. अनाथ - ज्याला नाथ नाही असा तो
8. अनियमित - नियमित नाही असे ते
9. अकर्मक - नाही कर्म ज्याला ते
10. अखंड - नाही खंड ज्या ते
iii) सहबहुव्रीही समास
§ ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.
§ उदा.
1. सहपरिवार - परिवारासहित असा जो
2. सबल - बलासहित आहे असा जो
3. सवर्ण - वर्णासहित असा तो
4. सफल - फलाने सहित असे तो
5. सानंद - आनंदाने सहित असा जो
iv) प्रादिबहुव्रीही समास
§ ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.
§ उदा.
1. सुमंगल - पवित्र आहे असे ते
2. सुनयना - सु-नयन असलेली स्त्री
3. दुर्गुण - वाईट गुण असलेली व्यक्ती
4. प्रबळ - अधिक बलवान असा तो
5. विख्यात - विशेष ख्याती असलेला
6. प्रज्ञावंत - बुद्धी असलेला.
वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
· पृथक म्हणजे वेगळे किंवा सुटे करणे असा होतो आणि वाक्यापृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे.
· वाक्य:
उद्देश विभाग (उद्देशांग) |
विधेय विभाग (विधेयांग) |
1) उद्देश (कर्ता) |
1) कर्म व कर्म विस्तार |
2) उद्देश विस्तार |
2) विधानपूरक |
|
3) विधेय विस्तार |
|
4) विधेय (क्रियापद) |
उद्देश विभाग/ उद्देशांग :
1 ) उद्देश (कर्ता)
· वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता येते.
उदा.
a. रामुचा शर्ट फाटला. (फाटणारे काय/कोण?)
b. रामरावांचा कुत्रा मेला. (मरणारे कोण/काय?)
c. मोगल साम्राज्याचा अंत झाला. (होणारे-कोण/काय?)
d. रामुच्या घराचा दरवाजा उघडला. (उघडणारे कोण/काय?)
· वरील वाक्यात शर्ट, कुत्रा, अंत, दरवाजा हे उद्देश (कर्ता) आहेत.
2) उद्देश विस्तार
· कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील. तर अशा शब्दांना उद्देश विस्तारात लिहावे.
उदा.
a. शेजारचा रामु धपकन पडला.
b. नियमित अभ्यास करणारे विधार्थी पास होतात.
विधेय विभाग/ विधेयांग :
· वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते.
उदा.
a. रामने
झडाचा पेरु
तोडला. (या
वाक्यात
तोडण्याची
क्रिया पेरु
वर झाली
म्हणून ते
कर्म).
b. गवळ्याने म्हशीची धार काढली. (या वाक्यात काढण्याची क्रिया धारेवर झाली म्हणून ते कर्म).
1) कर्म विस्तार
· कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे 'कर्म विस्तार' होय.
उदा.
a. रामने झाडाचा पेरु तोडला.
b. गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली.
2) विधान पूरक
· कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर ते 'विधानपूरक' असते.
उदा.
a. राम राजा झाला.
b. संदीप शिक्षक आहे.
c. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
· वरील वाक्यावरुन राजा, शिक्षक, मोहक ही शब्द कर्त्याविषयी अधिक महितीसांगत आहेत म्हणून त्यांना 'विधानपूरक' असे म्हणतात.
3) विधेय विस्तार
· क्रियापदास विधेय असे म्हणतात.
· वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्या शब्दांचा यात समावेश होतो.
· क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास 'विधेय विस्तार' उत्तर येते.
· ही सर्व क्रियाविशेषणे असतात.
उदा.
a. कुटुंबातील सर्व व्यक्ती रविवारी वनभोजनास गेले.
b. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
c. माझा जिवलग मित्र मनीष माझे पत्र पाहताच त्वरित आला.
4) विधेय/क्रियापद
· वाक्यातील क्रियापदाला 'विधेय' असे म्हणतात.
उदा.
a. रमेश खेळतो.
b. रमेश अभ्यास करतो.
c. रमेश चित्र काढतो.
काळ व त्याचे प्रकार
· वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला 'काळ'असे म्हणतात.
· काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.
1. वर्तमान काळ
2. भूतकाळ
3. भविष्यकाळ
वर्तमानकाळ :
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ 'वर्तमानकाळ' असतो.
उदा.
a. मी आंबा खातो.
b. मी क्रिकेट खेळतो.
c. ती गाणे गाते.
d. आम्ही अभ्यास करतो.
वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात.
i) साधा वर्तमान काळ
जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला 'साधा वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खातो.
b. कृष्णा क्रिकेट खेळतो.
c. प्रिया चहा पिते.
ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ
जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला 'अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ'म्हणतात.
उदा.
a. सुरेश पत्र लिहीत आहे.
b. दिपा अभ्यास करीत आहे.
c. आम्ही जेवण करीत आहोत.
iii) पूर्ण वर्तमान काळ
जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला 'पूर्ण वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खाल्ला आहे.
b. आम्ही पेपर सोडविला आहे.
c. विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.
iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ
वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला 'रीती वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी रोज फिरायला जातो.
b. प्रदीप रोज व्यायाम करतो.
c. कृष्णा दररोज अभ्यास करतो.
भूतकाळ :
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला 'भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. राम शाळेत गेला.
b. मी अभ्यास केला.
c. तिने जेवण केले.
भूतकाळचे 4 उपप्रकार पडतात.
i) साधा भूतकाळ
एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास 'साधा भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. रामने अभ्यास केला
b. मी पुस्तक वाचले.
c. सिताने नाटक पहिले.
ii) अपूर्ण/चालू भूतकाळ
एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला 'अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खात होतो.
b. दीपक गाणे गात होता.
c. ती सायकल चालवत होती.
iii) पूर्ण भूतकाळ
एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला 'पूर्ण भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. सिद्धीने गाणे गाईले होते.
b. मी अभ्यास केला होता.
c. त्यांनी पेपर लिहिला होता.
d. राम वनात गेला होता.
iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ
भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला 'चालू-पूर्ण भूतकाळ' किंवा 'रीती भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी रोज व्यायाम करीत होतो/असे.
b. ती दररोज मंदिरात जात होती/असे.
c. प्रसाद नियमित शाळेत जात होता/असे.
भविष्यकाळ :
क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला 'भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी सिनेमाला जाईल.
b. मी शिक्षक बनेल.
c. मी तुझ्याकडे येईन.
i) साधा भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी 'साधा भविष्यकाळ' असतो.
उदा.
a. उधा पाऊस पडेल.
b. उधा परीक्षा संपेल.
c. मी सिनेमाला जाईल.
ii) अपूर्ण / चालू भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला 'अपूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खात असेल.
b. मी गावाला जात असेल.
c. पूर्वी अभ्यास करत असेल.
d. दिप्ती गाणे गात असेल.
iii) पूर्ण भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला 'पूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खाल्ला असेल.
b. मी गावाला गेलो असेल.
c. पूर्वाने अभ्यास केला असेल.
d. दिप्तीने गाणे गायले असेल.
iv) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला 'रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी रोज व्यायाम करत जाईल.
b. पूर्वी रोज अभ्यास करत जाईल.
c. सुनील नियमित शाळेत जाईल.
उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार
· दोन शब्द किंवा दोन वाक्यात जोडणार्या शब्दांना 'उभयान्वयी अव्यय' म्हणतात.
· उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात.
1. समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयानव्यी अव्यय
2. असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयानव्यी अव्यय
समानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय/ प्रधानत्वसूचक :
· जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले दोन वाक्य हे समान दर्जाचे असतात म्हणजे ती वाक्य स्वतंत्र असतात ते एकमेकांवर असलंबून नसतात. अशी वाक्य म्हणून येतात.
· यांचे पुढील 4 प्रकार पडतात.
1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय -
· ही उभयान्वयी दोन स्वतंत्र वाक्यांना जोडतात तसेच पहिल्या विधानात/ वाक्यात आणखी भर टाकण्याचे काम करतात.
· उदा. व, अन्, आणि आणखी, न, शि, शिवाय, आणिक इत्यादी.
1. घरी पाहुणे आले आणि लाईट गेली.
2. राम शाळेत जाण्यासाठी निघाला व पाऊस आला.
3. आज डब्यात भाजी, पोळी आणली अन् लोनचेण आहे.
4. चिमणीने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला.
2. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय -
· ही उभयान्वयी अव्यये वाक्यातील दिलेल्या गोष्टीपैकी एकालाच पसंती दर्शवतात.
· उदा. अथवा, वा, की, किंवा, अगर इत्यादी.
1. तुला चहा हवा की कॉफी ?
2. करा किंवा मरा.
3. सिनेमाला येतोस की, घरी जातोस ?
3. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय -
· पहिल्या वाक्यातील कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात.
· उदा. परंतु, पण, बाकी, किंतु, परी इत्यादी.
1. मरावे, परी किर्तीरूपी उरावे.
2. लग्न छान झाले पण जेवण बरोबर नव्हते.
3. त्याने अभ्यास केला, परंतु नापास झाला.
4. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय -
· पहिल्या वाक्यातील एखाधा गोष्टीचा परिणाम हा समोरील वाक्यात दर्शवण्यासाठी परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात.
· उदा. म्हणून, याकरिता, सबब, यास्वत, तेव्हा, तस्मात इत्यादी.
1. तू गृहपाठ करीत नाहीस म्हणून तुला शिक्षक रागवतात.
2. ती नेहमी अभ्यास करते याकरिता ती नेहमी प्रथम येते.
3. गोडी येतांना बंद पडली, सबब मला उशीर झाला.
असमानत्वदर्शक किंवा गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :
· उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यांपैकी एक वाक्य प्रधान व त्याच्या तुलनेत दुसरे वाक्य गौण असते तेव्हा अशा अव्ययांना 'असमानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय' असे म्हणतात.
· यांचे पुढील 4 प्रकार पडतात.
1. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय -
· या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्याचे स्वरूप दुसर्या वाक्यात कळते.
· उदा. म्हणून, म्हणजे, की, जे इत्यादी.
1. एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर
2. तो म्हणाला, की मी हरलो.
3. मी मान्य करतो की, माझ्याकडून चुकी झाली.
2. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय -
· या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचा उद्देश/हेतु हा गौण वाक्यात कळतो.
· उदा. म्हणून, सबब, यास्तव, कारण,की इत्यादी.
1. चांगले उपचार मिळावेत, यास्तव तो मुंबईला गेला.
2. चांगले गुण मिळावेत, म्हणून ती खूप अभ्यास करते.
3. विजितेपद मिळावे यावस्त त्यांनी खूप प्रयत्न केले.
3. करणबोधक उभयान्वयी अव्यय -
· या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्याचे कारण हे दुसर्या वाक्यामध्ये कळते.
· उदा. कारण, का, की इत्यादी.
1. त्याला यश मिळाले कारण त्याने खूप मेहनत घेतली.
2. मला गृहशास्त्राची माहिती नाही, कारण की, माझ्या अभ्यासक्रमात तो विषय नव्हता.
4. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय -
· या उभयान्वयी अव्ययामुळे एखादी कृती घडण्यामागे विशिष्ट अट सूचित असते. गौण वाक्यात अट (संकेत) दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम झालेला दिसतो.
· उदा. जर-तर, जारी-तरी, म्हणजे, की, तर इत्यादी
1. जर दळण आणल तर स्वयंपाक होईल.
2. नोकरी मिळविली म्हणजे गाडी घेऊन देईल.
3. तू घरी आला की, आपण सिनेमाला जाऊ.
क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार
· क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात म्हणजे वाक्यातील लिंग, वचन, विभक्ती इत्यादीच्या बदलामुळे त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यांना 'क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
· क्रियाविशेषण अव्ययांचे प्रमुख 2 प्रकार घडतात.
1. अर्थावरून
2. स्वरूपावरून
अर्थावरून पडणारे प्रकार :
1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय -
कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे 3 प्रकार पडतात.
कालदर्शक -
· वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शविणार्याप शब्दांना 'कालदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
· उदा. आधी, आता, सधा, तूर्त, हल्ली, काल, उधा, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इत्यादि.
1. मी काल शाळेत गेलो होतो
2. मी उदया गावाला जाईन.
3. तुम्हा केव्हा आलात?
4. अपघात रात्री झाला.
सातत्यदर्शक -
· वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणार्या शब्दांना 'सातत्यदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
· उदा. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अधाप,
1. पाऊस सतत कोसळत होता.
2. सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही.
3. पोलिसांना अधाप चोर सापडला नाही.
आवृत्तीदर्शक -
· वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणार्या शब्दांना 'आवृत्तीदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
· उदा. फिरून, वारंवार दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इये.
1. आई दररोज मंदिरात जाते.
2. सीता वारंवार आजारी पडते.
3. फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात.
4. संजय क्षणोक्षणी चुकत होता.
2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय -
· वाक्यातील क्रियेचे स्थळ/ठिकाण दर्शविणार्याआ शब्दांना 'स्थलवाचक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
· याचे 2 प्रकार पडतात.
स्थितीदर्शक -
· उदा. येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे-तिकडे, समोवताल इत्यादि.
1. मी येथे उभा होतो.
2. जिकडे-तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे.
3. तो खाली बसला.
4. मी अलीकडेच थांबलो.
गतिदर्शक -
· उदा. इकडून, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालुन, लांबून, दुरून.
1. जंगलातून जातांना पुढून वाघ आला
2. चेंडू दूर गेला.
3. घरी जातांना इकडून ये.
3. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय -
· वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना 'रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
· याचे 3 प्रकार पडतात.
प्रकारदर्शक -
· उदा. असे, तसे जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद इत्यादी.
1. राहुल सावकाश चालतो.
2. तो जलद धावला.
3. सौरभ हळू बोलतो
अनुकरणदर्शक -
· उदा. झटकण, पटकण, पटापट, टपटप, चमचम, बदाबद, इत्यादी.
1. त्याने झटकण काम आटोपले.
2. दिपा पटापट फुले वेचते.
3. त्याने जेवण पटकण आटोपले.
निश्चयदर्शक -
· उदा. खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी.
1. राम नक्की प्रथम क्रमांक पटकावणार
2. तू खुशाल घरी जा.
3. तुम्ही खरोखर जाणार आहात?
4. संख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय -
· वाक्यातील शब्द जेव्हा क्रियेची संख्या किंवा परिमाण दाखवितो तेव्हा त्याला 'संख्यावाचक/ परिमाणवाचक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
· उदा. कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी.
1. मी क्वचित सिनेमाला जातो.
2. तुम्ही जरा शांत बसा.
3. राम अतिशय प्रामाणिक आहे.
4. तो मुळीच हुशार नाही.
5. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय -
वाक्यातील का/ना ही शब्द जेव्हा क्रियापदाला प्रश्नार्थक बनतात तेव्हा त्यांना 'प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
उदा.
1. तू गावाला जातो का?
2. तू आंबा खाणार का?
3. तुम्ही सिनेमाला याल ना?
4. तुम्ही अभ्यास कराल ना?
6. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय -
वाक्यातील न/ना ही शब्द जेव्हा क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शवतात तेव्हा त्याला 'निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
उदा.
1. मी न विसरता जाईन.
2. तो न चुकता आला.
3. त्याने खरे सांगितले तर ना !
4. मी न चुकता तुला भेटेल.
स्वरूपावरून पडणारे प्रकार :
1. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय
2. साधीत क्रियाविशेषण अव्यय
1. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय -
· काही शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात त्यांना 'सिद्ध क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
· उदा. मागे, पुढे, येथे, तेथे, आज इत्यादी.
1. तो मागे गेला.
2. तू पुढे पळ.
3. ती तेथे जाणार.
4. आम्ही येथे थांबतो.
2. साधीत क्रियाविशेषण अव्यय -
· नाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय यांच्यापासून झालेल्या क्रियाविशेषणांना 'साधित क्रियाविशेषण' असे म्हणतात.
· यांची 2 गटात विभागणी होते.
साधीत क्रियाविशेषण अव्यय -
1. नामसाधीत: रात्री, दिवसा, सकाळी, व्यक्तिश:, वस्तूत:
2. सर्वनामसाधीत: त्यामुळे, यावरून, कित्येकदा,
3. विशेषणसाधीत: मोठयाने, एकदा, इतक्यात, एकत्र.
4. धातुसाधीत: हसू, हसत, हसतांना, पळतांना, खेळतांना
5. अव्ययसाधीत: कोठून, इकडून, खालून, वरून.
6. प्रत्यय सधीत: शास्त्रदृष्ट्या, मन:पूर्वक, कालानुसार.
उदा.
1. तो रात्री आला.
2. मी त्यांना व्यक्तिश: भेटलो.
3. तिने सर्व रडून सांगितले.
4. त्याने हे काम मन:पूर्वक केले.
5. तु हसतांना छान दिसतेस.
6. धबधबा वरून कोसळत होता.
7. आम्ही एकत्र अभ्यास करतो.
8. तो कित्येकदा खोटे बोलतो.
सामासिक -
· काही जोडशब्द किंवा सामाजिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे काम करतात अशा दोन शब्दांना सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते.
· उदा. गावोगाव, गैरहजर, गैरकायदा, दररोज, प्रतिदिन, रात्रंदिवस, समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, आजन्म, हरघडी इत्यादी.
1. आज नीलेश वर्गात गैर हजर आहे.
2. चोराच्या शोधात पोलिस गोवोगाव फिरले.
3. पाऊस दररोज पडतो.
4. मी यथाशक्ती त्याची मदत करेन.
5. विधार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात.
विभक्ती व त्याचे प्रकार
Must Read (नक्की वाचा):
· नामे व सर्व नामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना 'विभक्ती' असे म्हणतात.
· नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना 'प्रत्यय' असे म्हणतात.
· नामांच्या किंवा सर्वनामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकाराचा असतो, म्हणून
· विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.
1. प्रथमा
2. व्दितीया
3. तृतीया
4. चतुर्थी
5. पंचमी
6. षष्टी
7. सप्तमी
8.
संबोधन
· यातील काही प्रत्यंयांचा उपयोग केवळ पधात होतो, नामांची किंवा सर्व नामांची विभक्ती प्रत्ययावरून ओळखतात.
विभक्तीचे अर्थ :
1. कारकार्थ/ कारकसंबंध
2. उपपदार्थ
· वाक्यातील नाम/सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना 'कारकार्थ' असे म्हणतात.
· क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना 'उपपदार्थ' असे म्हणतात.
· विभक्तीचे मुख्य कारकार्थ 6 आहेत
1. कर्ता
2. कर्म
3. करण
4. संप्रदान
5. अपादान (वियोग)
6. अधिकरण
कर्ता -
· क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा कोणीतरी असतो, त्यास 'कर्ता' असे म्हणतात. कर्त्यांची विभक्ती केव्हा-केव्हा प्रथमा असते.
· प्रथमेचा प्रमुख असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो.
· उदा. राम आंबा खातो.
कर्म -
· कर्त्यांने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली किंवा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे 'कर्म' होय.
· हे प्रत्यक्ष कर्म असते याची विभक्ती व्दितीया असते.
· व्दीतीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो.
· उदा. राम रावणास मारतो.
करण -
· वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला 'करण' असे म्हणतात.
· करण म्हणजे क्रियेच साधन.
· उदा. आई चाकूने भाजी कापते.
· या वाक्यात कापण्याची क्रिया चाकू या साधनाने होत आहे. म्हणून चाकूने या शब्दांची विभक्ती तृतीया असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण होय.
संप्रदान -
· जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान (कोणतीही वस्तू) ज्याला करण्यात येते त्या शब्दाला किंवा क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला 'संप्रदान' असे म्हणतात.
· दान देण्याची क्रिया ज्याच्यावर होते त्याला 'संप्रदान' असे म्हणतात.
· उदा. मी गुरुजींना दक्षिणा दिली.
· या वाक्यात दान देण्याची क्रिया गुरुजी या शब्दावर होत असून त्याची विभक्ती चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान होय.
1. आजीने नातीला गोष्ट सांगितली.
2. गुरुजी मुलांना व्याकरण शिकवतात.
आपदान (वियोग) -
· क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने त्याच्यापासून एखाधा वस्तूचा वियोग दाखविण्याचा असतो त्यास 'अपादान' म्हणतात.
· उदा. मी शाळेतून आताच घरी आलो.
· या वाक्यातील शाळेतून या शब्दातून अपादानाचा अर्थ व्यक्त होत असून त्याची विभक्ती पंचमी ही असून पंचमीचा मुख्य कारकार्थ अपादान हा होय.
अधिकरण (आश्रय/ स्थान) -
· वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियचे स्थान किंवा काळ दर्शविणार्या शब्दांच्या संबंधास 'अधिकरण' असे म्हणतात.
· उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो.
· या वाक्यातील सकाळी व शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व शाळेत हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवित असून त्यांची विभक्ती सप्तमी ही आहे व त्या सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकारण हे आहे.
उपपदार्थ :
· नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना 'उपपदार्थ' असे म्हणतात.
· उदा. आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले.
· वाक्यातील उद्देश: आमच्या वर्गातील मधुने.
· वाक्यातील विधेय: शाळेचे सुवर्णपदक जिकले.
· या वाक्यात अधोरेखित केलेले शब्द हे उपपदार्थ आहेत.
सामान्य रूप :
विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी तसेच शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ स्वरुपात जो बद्दल होतो त्याला 'सामान्य रूप' असे म्हणतात.
उदा.
1. घोडा: घोड्यास, घोड्याला, घोड्याने, घोड्याचा.- या सर्व शब्दांमध्ये 'घोड्या' हे सामान्यरूप.
2. पाणी: पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा – या सर्व शब्दांमध्ये ‘पाण्या’ हे सामान्यरूप.
पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप :
1. 'अ' कारान्त पुल्लिंगी नामाचे रूप 'आ' कारान्त होते.
उदा.
1. खांब-खांबास,
2. काळ-काळास
3. निर्णय-निर्णयास/निर्णयाने
4. दोर-दोरास/दोराने
5. बाक-बाकास/बाकाला.
2. 'आ' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप 'या' कारान्त होते.
उदा.
1. घोडा-घोड्यास, घोड्याला
2. दोरा- दोर्यास, दोर्याने
3. पंखा-पंख्याला, पंख्यास
· अपवाद: आजोबा, दादा, काका, मामा, राजा, यांचे सामान्यरूप होत नाही.
3. 'ई' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप 'या' कारान्त होते.
उदा.
1. धोबी-धोब्याला, धोब्यास
2. तेली-तेलीला, तेल्यास
3. माळी-माळीला, माळ्यास
· अपवाद: हत्ती, नंदी, पंतोती, मुनी, ऋषी, भटजी.
4. 'ऊ' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप 'वा' कारान्त होते.
उदा.
1. भाऊ-भावास, भावाचा
2. विंचू-विंचवास, विंचवाला
3. नातू-नातवाला, नातवास.
5. 'ए' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप 'या' कारान्त होते.
उदा.
1. फडके-फडक्यांचा
2. गोखले-गोखल्यांचा
· फुले-फुल्यांचा
6. 'ओ' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप 'ओ' कारान्त राहते.
उदा.
1. किलो-किलोस, किलोला
2. धनको-धनकोस, धनकोला
3. हीरो-हीरोला, हिरोस.
स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप :
1. 'अ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात 'ए' कारान्त होते व अनेकवचनात 'आ' कारान्त होते.
उदा.
1. वीट-विटेस, विटेला, विटांना, विटांचा.
2. जीभ-जीभेस, जिभेला, जिभांचा, जिभांना
3. सून-सुनेस, सुनेला, सुनांना, सुनेचा.
2. काही वेळा ‘अ’ कारान्त स्त्रीलिंग नामाचे सामान्यरूप ‘ई’ कारान्त होते.
उदा.
1. भिंत-भिंतीस, भिंतीला, भिंतीचा
2. विहीर-विहिरीस, विहिरीला
3. पाल-पालीस, पालीला
3. 'आ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ‘ए’ कारान्त होते.
उदा.
1. शाळा-शाळेत, शाळेस, शाळेला.
2. भाषा-भाषेत, भाषेस, भाषेचा.
3. विधा-विधेस, विधेला, विधेचे
4. 'ई' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात 'ई' कारान्त व अनेकवचनात ‘ई’ कारान्त किंवा ‘य’ कारान्त होते.
उदा.
1. भक्ती-भक्तीने
2. नदी-नदीस
3. स्त्रि-स्त्रिस, स्त्रिया, स्त्रियांचा
4. बी-बीस, बियांचा
5. दासी-दसींचा, दासीला
6. पेटी-पेटीस, पेटीला.
5. 'ऊ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप होत नाही. क्वचित ते 'वा' कारान्त होते.
उदा.
1. ऊ-ऊवास, उवाला
2. काकू-काकूस, काकूला.
3. सासू, सासुला, सासवांना.
6. 'ओ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही व अनेकवचनात 'आ' कारान्त होते.
उदा.
1. बायको-बायकांना, बायकांचा.
नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप:
1. 'अ' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप 'आ' कारान्त होते.
उदा.
1. मूल-मुलास, मुलाला, मुलांना
2. पान-पानास, पानाला, पानांना
2. 'ई' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.
उदा.
1. पाणी-पाण्यात, पाण्याचा
2. मोती- मोत्यात, मोत्याचा
3. लोणी-लोण्यात, मोण्याचा
3. 'ऊ' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप 'आ' कारान्त होते.
उदा.
1. लिंबू-लिंबास, लिंबाचे
2. कोकरू-कोकारास, कोकराचे
4. काही वेळा 'ऊ' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप 'वा' कारान्त होते.
उदा.
1. कुंकू-कुंकवास, कुंकवाचा
2. गडू-गडवास, गडवाचा
5. 'ए' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप 'या' कारान्त होते.
उदा.
1. तळे-तळ्यात, तळ्याला
2. केळे-केळ्याची, केळ्याचे
3. खोके-खोक्यात, खोक्याला
4. डोके-डोक्यात, डोक्याला
विशेषणाचे सामान्यरूप :
1. 'अ' कारान्त 'ई' कारान्त व 'ऊ' कारान्त विशेषणाचे सामान्यरूप होत नाही.
उदा.
1. जगात गरीब माणसांना कोणी विचारात नाही.
2. त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.
3. मला कडू कारल्याची भाजी आवडते.
2. 'आ' कारान्त विशेषणांचे सामान्यरूप 'या' कारान्त होते.
उदा.
1. भला माणूस-भल्या माणसास
2. हा मुलगा-ह्या मुलास
3. खरा माणूस-खर्याु माणसाला.
नाम व त्याचे प्रकार
· प्रत्यक्षात असणार्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.
· उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.
नामाचे प्रकार :
· नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.
सामान्य नाम -
· एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला 'सामान्य नाम' असे म्हणतात.
· उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.
· (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)
विशेष नाम -
· ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास 'विशेष नाम' असे म्हणतात.
· उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.
· (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही आल्यास सामान्य नाम समजावे.)
· उदा. या गावात बरेच नारद आहेत.
भाववाचक नाम -
· ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला 'भाववाचक नाम' असे म्हणतात.
· उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.
·
(पदार्थाच्या
गुणाबरोबरच
स्थिति किंवा
क्रिया
दाखविणार्यां
नामांना
भाववाचक नाम
असे म्हणतात.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य
ही क्रियेला
दिलेली नावे
आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण
हे शब्द
पदार्थाची
स्थिती
दाखवितात.)
भाववाचक नामे साधण्याचे प्रकार -
· सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, या यासारखे प्रत्यय लावून नामे तयार होतात ती खालीलप्रमाणे -
नामाचे कार्य करणारे इतर शब्द :
· नाम, सर्वनाम, विशेषण, ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात, ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात तीच गोष्ट येथेही लक्षात ठेवावयास हवी, सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत.
· अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे-
नियम -
1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.
उदा.
1. आत्ताच मी नगरहून आलो.
2. शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.
· वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.
2. केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.
उदा.
1. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.
2. आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.
· आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.
· वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत.
· पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.
3. केव्हा-केव्हा भाववाचक नामे विशेषनामांचे कार्य करते.
उदा.
1. शांती ही माझ्या बहिणीची मुलगी.
2. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
3. माधुरी उधा मुंबईला जाईल.
· वरील वाक्यात अधोरेखित केलेली शब्दे ही मुळची भाववाचक नामे आहेत. पण याठिकाणी त्यांचा वापर विशेषणामासारखा केला आहे.
4. विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.
उदा.
1. आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.
2. या गावात बरेच नारद आहेत.
3. माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.
· विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.
5. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.
उदा.
1. शहाण्याला शब्दांचा मार.
2. श्रीमंतांना गर्व असतो.
3. जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.
4. जगात गरीबांना मान मिळत नाही.
· वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.
6. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.
उदा.
1. आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.
2. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
3. नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.
· वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.
7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.
उदा.
1. ज्याला कर नाही त्याला डर कसली.
2. गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.
3. ते ध्यान पाहून मला हसू आले.
4. देणार्याने देत जावे.
· वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भाववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.
संधी व त्याचे प्रकार
Must Read (नक्की वाचा):
जोडाक्षरे:
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात.
उदा.
1. विधालय : धा : द + य + आ
2. पश्चिम : श्चि : श + च + इ
3. आम्ही : म्ही : म + ह + ई
4. शत्रू : त्रू : त + र + ऊ
संधी:
स्वरसंधी -
जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.
उदा.
1. ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा
2. सूर्यास्त = सूर्य + अस्त
3. सज्जन = सत् + जन
4. चिदानंद = चित् + आनंद
संधीचे प्रकार:
संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.
स्वर संधी -
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.
दिर्घत्व संधी -
1.
अ + अ = आ
2. आ + आ = आ
3. आ + अ = आ
4. इ + ई = ई
5. ई + ई = ई
6. इ + इ = ई
7. उ + ऊ = ऊ
8. उ + उ = ऊ
नियम -
(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.
उदा.
· ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा
· गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश
· उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश
· चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय
· महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी
· देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी
(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.
उदा.
· एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य
· सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव
· मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य
· प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य
· जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ
· गंगा+औघ (आ+औ=औ) गंगा+औ+घ= गंगौघ
(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.
उदा.
· प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ
· इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी
· अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम
· प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक
· मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर
· पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा
(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.
उदा.
· ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन
· गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन
· गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर
· नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक
व्यंजन संधी :
एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.
उदा.
1. सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)
2. चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)
नियम -
(1) पहिल्या 5 वर्गापैकी
अनुनासिकाशिवाय
कोणत्याही
व्यंजनापूढे
कठोर व्यंजन
आले असता त्या
पहिल्या
व्यंजनाच्या
जागी
त्याच्याच
वर्गातील
पहिले कठोर
व्यंजन येऊन संधी
होतो. यालाच 'प्रथम
व्यंजन संधी' असे
म्हणतात.
उदा.
· विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल
· वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती
· क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा
(2) पहिल्या
पाच वर्गातील
कठोर
व्यंजनापूढे
अनुनासिकाखेरीज
स्वर किंवा
मृदु व्यंजन
आल्यास त्याच्या
जागी त्याच
वर्गातील
तिसरे व्यंजन
येऊन संधी
होते त्याला 'तृतीय
व्यंजन संधी' असे
म्हणतात.
(3) पहिल्या
पाच वर्गातील
कोणत्याही
व्यंजनापुढे
अनुनासिक
आल्यास
पहिल्या व्यंजनाबद्दल
त्याच्यात
वर्गातील
व्यंजन येऊन
संधी होती.
यालाच 'अनुनासिक
संधी' असे
म्हणतात.
(4) याबाबतचा
नियम असा त्
या
व्यंजनापुढे
· च् छ् आल्यास त् बद्दल च् होतो.
· ज् झ् आल्यास त् बद्दल ज् होतो.
· ट् ठ् आल्यास त् बद्दल ट् होतो.
· ल् आल्यास त् बद्दल ल् होतो.
· श् आल्यास त् बद्दल च् होतो व श् बद्दल छ् होतो.
·
(5) 'म्' पुढे
स्वर आल्यास
तो स्वर तो
स्कर मागील 'म्' मध्ये
मिसळून जातो
व्यंजन
आल्यास 'म्' बद्दल
मागील
अक्षरांवर
अनुस्वार
किंवा बिंदू
येतो.
उदा.
· सम्+आचार=समाचार
· सम्+गती=संगती
(6) ‘छ’ पूर्वी र्हगस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये ‘च्’ हा वर्ण येतो.
उदा.
· रत्न+छाया =रत्नछाया
· शब्द+छल = शब्दछल
विसर्ग संधी:
· एकापाठोपाठ एक येणारे विसर्ग व स्वर किंवा विसर्ग व व्यंजन यांच्या एकत्र होणार्या क्रियेला 'विसर्ग संधी' असे म्हणतात.
· विसर्ग+स्वर = विसर्ग संधी
· विसर्ग+व्यंजन = विसर्ग संधी
नियम -
(1) विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर असून पुढे मृदु व्यंजन आल्यास विसर्गाचा ‘उ’ होतो व तो मागील ‘अ’ मध्ये मिळून त्याचा ‘ओ’ होतो यास 'उकार संधी' म्हणतात.
(2) विसर्गाच्या मागे ‘अ’,’आ’ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा ‘र’ होवून संधी होते.
(3) पदाच्या शेवटी ‘स’ येऊन त्यांच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास ‘स’ विसर्ग होतो.
उदा.
· मनस्+पटल= मन:पटल
· तेजस्+कण= तेज:कण
(4) पदाच्या शेवटी ‘र’ येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या ‘र’ चा विसर्ग होतो.
उदा.
· अंतर+करण= अंत:करण
· चतुर+सूत्री= चतु:सूत्री
(5) विसर्गाच्या ऐवजी येणार्या ‘र’ च्या मागे ‘अ’ व पुढे मृदु वर्ण आल्यास तो ‘र’ तसाच राहून संधी होते.
उदा.
· पुनर+जन्म= पुनर्जन्म
· अंतर+आत्मा= अंतरात्मा
(6) विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर असून पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.
उदा.
· प्राप्त:+काल= प्राप्त:काल
· तेज:+पुंज= तेज:पुंज
· इत:+उत्तर= इतउत्तर
· अत:+एव= अतएव
(7) विसर्गाच्या मागे ‘इ’ किंवा ‘ऊ’ असून पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ‘ष’ होतो.
उदा.
· नि:+कारण-निष्कारण
·
नि:+पाप=
निष्पाप
·
दु:+परिणाम=
दुष्परिणाम
· दु:+कृत्य – दुष्कृत्य
· दु:+कीर्ती = दुष्कीर्ती
· बहि:+कृत = बहिष्कृत
(8) विसर्गाच्या पुढे च्, छ् आल्यास विसर्गाचा ‘श’ होतो. त्, थ्, आल्यास ‘स’ होतो.
उदा.
· नि:+चल = निश्चल
· दु:+चिन्ह = दुश्चिन्ह
· मन:+ताप = मनस्ताप
· नि:+तेज = निस्तेज
(9) विसर्गाच्या पुढे श्.स् आल्यास विसर्ग विकल्पाचे कायम राहतो किंवा लोप पावतो.
उदा.
· दु:+शासन = दु:शासन / दुश्शासन
· नि:+संदेश = नि:संदेश / निरुसंदेश
· पुर:+सर = पुर:सर / पुरस्कार
1. पुरुषवाचक सर्वनाम :
याचे तीन उपप्रकार पडतात.
1. प्रथम पुरुष : मी, आम्ही, आपण, स्वत: इ
उदा. 1. मी गावाला जाणार.
2. आपण खेळायला जावू.
2 .व्दितीय पुरुष : तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
उदा. 1. आपण कोठून आलात?
2. तुम्ही घरी कधी येणार?
3. तृतीय पुरुष : तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
उदा. 1. त्याने माला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
2. त्या सर्वजण इथेच येत होत्या.
2. दर्शक सर्वनाम :
कोणतीही जवळची किंवा वा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.
उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
उदा. 1. ही माझी वही आहे
2. हा माझा भाऊ आहे.
3. ते माझे घर आहे.
4. तो आमचा बंगला आहे.
3. संबंधी सर्वनाम :
वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
उदा. जो, जी, जे, ज्या
ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
उदा .1. जे चकाकते ते सारेच सोने नसते.
2. जो तळे राखील तो पाणी चाखील.
4. प्रश्नार्थक सर्वनाम :
ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.
उदा. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला
उदा. 1. तुझे नाव काय?
2. तुला कोणी संगितले.
3. कोण आहे तिकडे.
5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम :
कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.
उदा. 1. त्या पेटीत काय आहे ते सांग.
2. कोणी कोणास हसू नये.
3. कोण ही गर्दी !
6. आत्मवाचक सर्वनाम :
आपण व स्वतःह्यांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरवातीला कधीच येत नाही.
उदा. 1. मी स्वतःत्याला पहीले.
2. तू स्वतः मोटर चालवशील का?
3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
4. तुम्ही स्वतःला काय समजतात.
मराठीत मूळ 9 सर्वनाम
मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत - तो, हा, जो.
1. तो- तो, ती, ते
2. हा- हा, ही, हे
3. जो-जो, जी, जे
वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे :
मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. - मी, तू, तो, हा, जो इ
1. मी- आम्ही
2. तू- तुम्ही
3. तो- तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
4. हा- हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
5. जो- जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)
केवल प्रयोगी अव्यय
आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांच्या केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.
1. हर्षदर्शक :
अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
- उदा. अहाहा!
किती सुंदर
दृश्य आहे.
2. शोकदर्शक :
आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे
- उदा. अरेरे!
खूप वाईट
झाले.
3. आश्चर्यदर्शक :
ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या
- उदा. अबब!
केवढा मोठा
साप
4. प्रशंसादर्शक :
छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड
खाशी
- उदा. शाब्बास!
तू दिलेले काम
पूर्ण केलेस.
5. संमतीदर्शक :
ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा
- उदा. अछा!
जा मग
6. विरोधदर्शक :
छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च
- उदा. छे-छे!
असे करू नकोस.
7. तिरस्कारदर्शक :
शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी
- उदा. छी!
ते मला नको
8. संबोधनदर्शक :
अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे
- उदा. अहो!
एकलत का ?
9. मौनदर्शक :
चुप, चुपचाप, गप, गुपचुप
- उदा. चुप!
जास्त बोलू
नको
विशेषण :
नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
उदा. चांगली मुले, काळा कुत्रा, पाच टोप्या
विशेषण - चांगली, काळा, पाच
विशेष्य - पिशवी, कुत्रा, टोप्या
विशेषणाचे प्रकार :
1. गुणवाचक विशेषण
2. संख्यावाचक विशेषण
3. सार्वनामिक विशेषण
1. गुणवाचक विशेषण :
ज्या विशेषणांच्या योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण किवा विशेष दाखविला जातो, त्यास गुण विशेषण असे म्हणतात.
उदा. हिरवे रान, शुभ्र ससा, निळे आकाश
2. संख्या विशेषण :
ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.
संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.
1. गणना वाचक संख्या विशेषण
2. क्रम वाचक संख्या विशेषण
3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण
4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण
5. अनिश्चित संख्या विशेषण
1. गणना वाचक संख्या विशेषण :
ज्या विशेषनाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्यास गणना वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा. 1. दहा मुले, तेरा भाषा, एक तास, पन्नास रुपये
गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात
1. पूर्णाक वाचक - पाच, सहा, अठरा, बारा.
2. अपूर्णाक वाचक - पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.
3. साकल्य वाचक - पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.
2. क्रमवाचक संख्या विशेषण :
जी विशेषणे वस्तूचा क्रम दाखवितात त्यांना क्रमवार संख्या विशेषणे असे म्हणतात.
उदा. पहिल दुकान, सातवा बंगला, पाचवे वर्ष.
3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :
जी विशेषणे संख्याची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवतात त्यांना त्यांना आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा. तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग
4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :
जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा. मुलींनी पाच-पाच चा गट करा, प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा.
5. अनिश्चित संख्या विशेषण :
जी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात.
उदा. काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी
3. सार्वनामिक विशेषण :
सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
उदा. हे झाड, ती मुलगी, तो पक्षी.
सर्वनाम :
नामऐवजी वापरल्या जाणार्या शब्दांला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामचे मुख्य प्रकार सहा आहेत.
· 1. पुरुषवाचक सर्वनाम
· 2. दर्शक सर्वनाम
· 3. संबंधी सर्वनाम
· 4. प्रश्नार्थक सर्वनाम
· 5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
· 6. आत्मवाचक सर्वनाम
1. पुरुषवाचक सर्वनाम :
याचे तीन उपप्रकार पडतात.
1. प्रथम पुरुष : मी, आम्ही, आपण, स्वत: इ
उदा. 1. मी गावाला जाणार.
2. आपण खेळायला जावू.
2 .व्दितीय पुरुष : तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
उदा. 1. आपण कोठून आलात?
2. तुम्ही घरी कधी येणार?
3. तृतीय पुरुष : तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
उदा. 1. त्याने माला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
2. त्या सर्वजण इथेच येत होत्या.
2. दर्शक सर्वनाम :
कोणतीही जवळची किंवा वा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.
उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
उदा. 1. ही माझी वही आहे
2. हा माझा भाऊ आहे.
3. ते माझे घर आहे.
4. तो आमचा बंगला आहे.
3. संबंधी सर्वनाम :
वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
उदा. जो, जी, जे, ज्या
ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
उदा .1. जे चकाकते ते सारेच सोने नसते.
2. जो तळे राखील तो पाणी चाखील.
4. प्रश्नार्थक सर्वनाम :
ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.
उदा. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला
उदा. 1. तुझे नाव काय?
2. तुला कोणी संगितले.
3. कोण आहे तिकडे.
5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम :
कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.
उदा. 1. त्या पेटीत काय आहे ते सांग.
2. कोणी कोणास हसू नये.
3. कोण ही गर्दी !
6. आत्मवाचक सर्वनाम :
आपण व स्वतःह्यांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरवातीला कधीच येत नाही.
उदा. 1. मी स्वतःत्याला पहीले.
2. तू स्वतः मोटर चालवशील का?
3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
4. तुम्ही स्वतःला काय समजतात.
मराठीत मूळ 9 सर्वनाम
मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत - तो, हा, जो.
1. तो- तो, ती, ते
2. हा- हा, ही, हे
3. जो-जो, जी, जे
वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे :
मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. - मी, तू, तो, हा, जो इ
1. मी- आम्ही
2. तू- तुम्ही
3. तो- तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
4. हा- हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
5. जो- जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)
वाक्याचे प्रकार
मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. अर्थावरून पडणारे प्रकार
2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्या विधांनांच्या संखेवरून पडणारे प्रकार
1. अर्थावरून पडणारे प्रकार :
1. विधांनार्थी वाक्य – ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते अशा वाक्यास विधांनार्थी वाक्य म्हणतात .
उदा .1. मी आंबा खातो.
2. गोपाल खूप काम करतो.
3. ती पुस्तक वाचत
2. प्रश्नार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून प्रश्न विचारला जातो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. तू आंबा खल्लास का ?
2. तू कोणते पुस्तक वाचतोस ?
3. कोण आहे तिकडे ?
3. उद्गारार्थी वाक्य – ज्या वाक्यातून मनातील उत्कट भावना व्यक्त केल्या जातात त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. अबब ! केवढा मोठा हा साप
2. कोण ही गर्दी !
3. शाब्बास ! UPSC पास झालास
4. होकारार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .
उदा . 1. माला अभ्यास करायला आवडते.
2. रमेश जेवण करत आहे.
3. माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.
5. नकारर्थी वाक्य – ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारर्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. मी क्रिकेट खेळत नाही.
2. माला कंटाळा आवडत नाही.
6. स्वार्थी वाक्य – ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. मी चहा पितो.
2. मी चहा पिला.
3. मी चहा पिनार.
7. आज्ञार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. तो दरवाजा बंद कर (आज्ञा)
2. देव तुझे भले करो (आशीर्वाद)
3. कृपया शांत बसा (विनंती)
4. देवा माला पास कर (प्रार्थना)
5. प्राणिमात्रांवर द्या करा (उपदेश)
8. विधार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून कर्तव्या, शक्यता, योग्यता,इच्छा ई. गोष्टीचा बोध होतो त्या वाक्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. आई वडिलांची सेवा करावी (कर्तव्य)
2. तू पास होशील असे वाटते (शक्यता)
3. ते काम फक्त सचिनच करू शकतो (योग्यता)
4. तू माझा सोबत यायला हवे असे माला वाटते (इच्छा)
9. संकेतार्थी वाक्य – जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतर्थी वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.
2. पाऊस पडला तर पीक चांगले येईल.
3. गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता.
4. जर काळे ढग झाले असते तर जोरदार पाऊस झाला असता.
2. स्वरूपा वरुण पडणारे प्रकार :
1. केवळ वाक्य – ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.
उदा. 1. राम आंबा खातो.
2. संदीप क्रिकेट खेळतो.
2. संयुक्त वाक्य – जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदा. 1.विजा चमकू लागल्या आणि पावसाळा सुरवात झाली.
2.भारतात कला पैसा आला आणि बेकरी वाढली.
3. मिश्र वाक्य – जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.
उदा.1. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला.
2. तो शहरात गेला मम्हणून त्याला नोकरी मिळाली.
3. रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला.
वचन विचार
नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते.
नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात.
मराठीत दोन वचणे आहेत.
1. एकवचन 2. अनेकवचन
अ. पुल्लिंगी नामाचे अनेक वचन
नियम : 1. 'आ' कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन 'ए' कारान्त होते.
उदा : 1. मुलगा - मुलगे 2. घोडा - घोडे
3. ससा - ससे 4. आंबा - आंबे
5. कोंबडा - कोंबडे 6. कुत्रा - कुत्रे
7. रस्ता - रस्ते 8. बगळा - बगळे
नियम : 2. 'आ' कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात.
उदा : 1. देव - देव2. कवी - कवी
3. न्हावी - न्हावी 4. लाडू - लाडू
5. उंदीर - उंदीर 6. तेली - तेली
ब . स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन
नियम : 1. 'अ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हा 'आ' कारान्त तर केव्हा 'ई' कारान्त होते.
उदा : 1. वेळ - वेळा 2. चूक - चुका
3. केळ - केळी 4. चूल - चुली
5. वीट - वीटा 6. सून - सुना
7. गाय - गायी 8. वात - वाती
नियम : 2. 'आ' कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेकवचन एक वचनासारखेच असते.
उदा : 1. भाषा - भाषा 2. दिशा - दिशा
3. सभा -सभा 4. विध्या - विध्या
नियम : 3. 'ई' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते.
उदा : 1. नदी - नद्या 2. स्त्री - स्त्रीया
3. काठी - काठ्या 4. टोपी - टोप्या
5. पाती - पाट्या 6. वही - वह्या
7. बी - बीय8. गाडी - गाड्या
9. भाकरी - भाकर्या 10. वाटी - वाट्या
नियम : 4. 'ऊ' कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन 'वा' कारान्त होते.
उदा : 1. ऊ - ऊवा 2. जाऊ - जावा
3. पीसु - पीसवा 4. सासू - सासवा
5. जळू - जळवा
अपवाद : 1. वस्तु - वस्तु 2. बाजू - बाजू 3. वाळू - वाळू
नियम : 5. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. त्यांचे एकवचन होत नाही.
उदा : 1. कांजीन्या 2. डोहाळे
3. कोरा 4. क्लेश
5. हाल 6. रोमांच
लिंग विचार
नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.
मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.
1. पुल्लिंगी 2. स्त्रीलिंगी 3. नपुसकलिंगी
1. पुल्लिंगी : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.
2. स्त्रीलिंगी : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.
3. नपुंसकलिंगी : पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.
लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल
नियम : 1
'अ' कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी 'ए' कारान्त होते.
उदा : 1. मुलगा - मुलगी - मूलगे
2. पोरगा - पोरगी - पोरगे
3. कुत्रा - कुत्री - कुत्रे
नियम : 2
काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात.
उदा : 1. सुतार - सुतरीन 2. माळी - माळीन
3. तेली - तेलीन 4. वाघ - वाघीन
नियम : 3
काही प्राणीवाचक 'अ' कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे 'ई' कारान्त होतात.
उदा : 1. हंस - हंसी 2. वानर - वानरी
3. बेडूक - बेडकी 4. तरुण - तरुणी
नियम : 4
काही आ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात.
उदा : 1. लोटा - लोटी 2. खडा - खाडी
3. दांडा - दांडी 4. आरसा - आरशी
5. भाकरा - भाकरी
नियम : 5
संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात.
उदा : 1. युवा - युवती 2. श्रीमान - श्रीमती
3. ग्रंथकर्ता - ग्रंथकर्ती
नियम : 6
काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररीतीने होतात.
उदा : 1. वर - वधू 2. पिता - माता
3. राजा - रानी 4. पाती - पत्नी
5. दीर - जाऊ 6. सासरा - सासू
7. बोकड - शेळी 8. मोर - लांडोर
नियम : 7
मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.
उदा : 1. वेळ - वेळ 2. बाग - बाग
3. वीणा - वीणा 4. मजा - मजा
5. टेकर - टेकर 6. तंबाखू - तंबाखू
नियम : 8
परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात.
उदा : 1. बुट(जोडा) - पुल्लिंगी 2. क्लास(वर्ग) - पुल्लिंगी
3. पेन्सिल (लेखनी) - स्त्रीलिंगी 4. कंपनी(मंडळी) - स्त्रीलिंगी
5. बूक(पुस्तक) - नपुसकलिंगी
नियम : 9
सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते.
उदा : 1. साखरभात - पुल्लिंगी 2. मिठभाकरी - स्त्रीलिंगी
3. भाजीपाला - पुल्लिंगी 4. भावूबहीन - स्त्रीलिंगी
5. देवघर - नपुसकलिंगी
नियम : 10
काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख पुल्लिंगीच करतात.
उदा .1. गरुड 2. मासा 3. सुरवड
4. साप 5. होळ 6. उंदीर
नियम : 11
काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी करतात.
उदा 1. घुस 2. पिसू 3. माशी
4. ऊ 5. सुसर 6. खार
7. घार 8. पाल
प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types):
वाक्यातील
कर्ता, कर्म, व
क्रियापद
यांच्या
परस्पर
संबंधाला प्रयोग असे
म्हणतात.
मराठीत
प्रयोगाचे
तीन प्रकार
पडतात.
1. कर्तरी
प्रयोग
2. कर्मणी
प्रयोग
3. भावे
प्रयोग
1. कर्तरी
प्रयोग (Active Voice) : जेव्हा
क्रियापदाचे
रूप हे
कर्त्याच्या
लिंग किवा
वाचनानुसार
बदलत असेल तर
त्या प्रयोगास कर्तरी
प्रयोग (Active
Voice) असे
म्हणतात.
उदा . तो
चित्रा काढतो.
(कर्ता-
पुल्लिंगी)
ती
चित्र काढते.
(कर्ता- लिंग)
ते
चित्र काढतात.
(कर्ता- वचन)
कर्तरी
प्रयोगाचे
दोन उपप्रकार
पडतात.
1. सकर्मक
कर्तरी
प्रयोग
2. अकर्मक
कर्तरी
प्रयोग
1. सकर्मक
कर्तरी
प्रयोग : ज्या
कर्तरी
प्रयोगाच्या
वाक्यात कर्म
आलेले असेल
तेव्हा त्यास सकर्मक
कर्तरी
प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
राम आंबा
खातो.
सीता
आंबा खाते.
(लिंग)
ते
आंबा खातात.
(वचन)
2. अकर्मक
कर्तरी
प्रयोग : ज्या
कर्तरी
प्रयोगाच्या
वाक्यात
जेव्हा कर्म
आलेले नसते
तेव्हा त्यास अकर्मक
कर्तरी प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
राम पडला
सिता
पडली (लिंग)
ते
पडले (वचन)
2. कर्मणी
प्रयोग (Passive Voice) : क्रियापदाचे
रूप
कर्माच्या
लिंग किवा
वचनानुसार
बदलते तर
त्यास कर्मणी
प्रयोग (Passive
Voice) असे
म्हणतात.
उदा .
राजाने
राजवाडा
बांधला. (कर्म-
पुल्लिंगी)
राजाने
कोठी बांधली.
(कर्म- लिंग)
राजाने
राजवाडे
बांधले. (कर्म-
वचन)
कर्मणी
प्रयोगाचे
पाच उपप्रकार
पडतात.
1. प्राचीन
कर्मणी
प्रयोग /
पुराण कर्मणी
प्रयोग
2. नवीन
कर्मणी
प्रयोग
3. समापन
कर्मणी
प्रयोग
4. शक्य
कर्मणी
प्रयोग
5. प्रधान
कर्तुक
कर्मणी
प्रयोग
1. प्राचीन
कर्मणी
प्रयोग /
पुराण कर्मणी
प्रयोग : हा
प्रयोग मूल
संस्कृत
कर्मणी
प्रयोगापासून
तयार झालेला
आहे तसेच या
कर्माच्या
उदाहरनातील
वाक्य
संस्कृत मधील
कवीरूपी
आढळतात.
उदा.
नळे इंद्रास
असे बोलीले.
जो
- जो किजो
परमार्थ लाहो.
2. नवीन
कर्मणी
प्रयोग : ह्या
प्रयोगात
इंग्लिश मधील Passive
Voice प्रमाणे
वाक्याची
रचना आढळते.
तसेच वाक्याच्या
सुरवातीला
कर्म येते व
कर्त्या कडून
प्रत्यय
लागतात.
उदा .
रावण रमाकडून
मारला गेला.
चोर
पोलिसांकडून
पकडला गेला.
3. समापण
कर्मणी
प्रयोग : जेव्हा
कर्मणी
प्रयोगाच्या
वाक्याच्या
क्रियापदाचा
अर्थ क्रिया
समाप्त
झाल्यासारखा
असतो तेव्हा
त्यास समापण
कर्मणी
प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
त्याचा पेरु
खाऊन झाला.
रामाची
गोष्ट सांगून
झाली.
4. शक्य
कर्मणी
प्रयोग : जेव्हा
कर्मणी प्रयोगतील
वाक्याच्या
क्रियापदाचा
अर्थ कर्त्यामध्ये
ती क्रिया
करण्याची
शक्यता असल्यासारखा
असतो, दिसतो
तेव्हा त्या
प्रयोगास शक्य
कर्मणी
प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
आई कडून काम
करविते.
बाबांकडून
जिना चढविता.
5. प्रधान
कर्तुत
कर्मणी
प्रयोग : कर्मणी
प्रयोगाच्या
वाक्यात
जेव्हा कर्ता
प्रथम मानला
जातो तेव्हा
त्या
प्रयोगास प्रधान
कर्तुक
कर्मणी
प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
त्याने काम
केले.
तिने
पत्र लिहिले.
3. भावे
प्रयोग : जेव्हा
कर्त्याच्या
किवा
कर्माच्या
लिंग किवा
वाचनात बदल
करूनही
क्रियापद
बदलत नाही तेव्हा
त्या
प्रयोगास भावे
प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
सुरेशने
बैलाला पकडले.
सिमाने
मुलांना
मारले.
भावे
प्रयोगाचे
तीन उपप्रकर
पडतात.
1. सकर्मक
भावे प्रयोग :
2. अकर्मक
भावे प्रयोग :
3. अकर्तुक
भावे प्रयोग :
1. सकर्मक
भावे प्रयोग : ज्या
भावे प्रयोगाच्या
वाक्यात कर्म
आलेले
असल्यास
त्यास सकर्मक
भावे प्रयोग म्हणतात.
उदा.
शिक्षकाने
विद्यार्थ्यांना
शिकविले.
रामाने
रावणास मारले.
2. अकर्मक
भावे प्रयोग : ज्या
भावे
प्रयोगाच्या
वाक्यात कर्म
आलेले नसल्यास
त्यास अकर्मक
भावे प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
मुलांनी
खेळावे.
विद्यार्थांनी
जावे.
3. अकर्तुक
भावे प्रयोग : भावे
प्रयोगाच्या
वाक्यात
कर्ता आलेला
नसेल तेव्हा
त्यास अकर्तुक
भावे प्रयोग असे
म्हणतात.
उदा .
आता उजाडले.
शांत
बसावे.
आज
सारखे उकडते.
No comments:
Post a Comment