▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Monday, June 7, 2021

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर 

डायनामोमीटर

इंजिनाची विशिष्ट शक्ती मोजण्याचे उपकरणे

हॉट एअर ओव्हम

अधिक तापमान वाढविणारे उपकरण

कॉम्युटर

क्षणात प्रचंड आकडेमोड करणारे यंत्र

रेफ्रीजरेटर

तापमान 4 से. पेक्षा कमी राखणारे उपकरण

स्पिडोमीटर

गोलकार चाके असलेल्या वाहनाने काटलेले अंतर मोजण्याचे उपकरण

हायड्रोफोन

पाण्याखाली ध्वनीचे आंदोलन मोजणारे उपकरण

टेलेस्टार

तारांच्या सहाय्याशिवाय अवकाशातून ध्वनीलहरी प्रक्षेपीत करणारे उपकरण.

टाईपराईटर

टंकलेखनाच्या सहाय्याने कागदावर मजकूर लिहणारे उपकरण

टेलीग्राफ

सूर्य किरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या सहाय्याने संदेश वाहनासाठी वापरले जाणारे उपकरण.

अल्टीमीटर

समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

ऑक्टोक्लेव्ह

दाब देऊन वस्तू निर्जंतुक करण्याचे उपकरण.

सिस्मोग्राफ

भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र

अॅमीटर

अॅम्पीयरमध्ये विद्युतप्रवाह मोजण्यासाठी.

अॅनिमोमीटर

वार्‍याचा वेग व दाब मोजण्यासाठी

गायग्रोस्कोप

वर्तुळाकार भ्रमण करणार्‍या वस्तूची गती मोजणारे उपकरण.

पायरोमीटर

उच्च तापमान मोजण्यासाठीचे उपकरण

बॅरोमीटर

हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण

टेलिप्रिंटर

तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण.

मायक्रोस्कोप

सुक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

क्रोनीमीटर

जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ.

लॅक्टोमीटर

दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.

कार्डिओग्राफ

हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.

सायक्लोस्टायलिंग

छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.

कार्बोरेटर

पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.

मॅनोमीटर

वायुचा दाब मोजणारे उपकरण

ऑडिओमीटर

ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी

मायक्रोफोन

ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.

रडार

रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.

हायड्रोमीटर

द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

मायक्रोमीटर

अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी बी.ओ.डी. इंक्यूबेटर - 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण

थर्मोस्टेट

ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.

थिअडोलाईट

उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी.

 

शास्त्रीय उपकरणे व त्यांची नियमन कार्य

   उपकरणाचे नाव -  कार्य

 

·         व्होल्टमापी - विजेचा दाब 

·         प्रकाशमापी - प्रकाशाची तीव्रता 

·         पर्जन्यमापी - पर्जन्यमान 

·         ज्वरमापी - शरीराचे तापमान 

·         आर्द्रतामापक - आर्द्रता 

·         तापमान लेखक - तापमानातील बदलाची नोंद 

·         स्टेथेस्कोप - हृदयाचे ठोके मोजणे 

·         होकायंत्र - उत्तर व इतर दिशा दाखविणे

·          

·         उंचीमापी - उंचातील विषमता व संबंध 

·         तरकांटा - द्रव पदार्थाची सापेक्ष घनता 

·         सुक्ष्ममापी - सुक्ष्मअंतरे व कोन मोजणे 

·         वातकूक्कुट - वार्‍याची दिशा 

·         विद्युत जनित्र - विद्युत प्रवाहाची शक्ती 

·         वकृतामापी - गोलाकार वस्तूची वक्रता 

·         सेक्सटंट - दोन वस्तुतील कोणात्मक अंतर 

·         वर्णमापी - रंगाच्या तीव्रतेतील फरक 

·         परिगणक - गणिती आकडेवारी 

·         श्रवणमापक - श्रवणशक्तीतील फरक 

·         दूरमुद्रक - संदेश दूरवर पाठवणे, येणारे संदेश घेणे व मुद्रित करणे 

·         गणकयंत्र - प्रचंड गुंतागुंतीचे हिशोब व परिगणना क्षणार्धात सोडविणे 

·         कॅलरीमापी - उष्णतेचे प्रमाण 

·         विस्थरीमापी - द्रव्यपदार्थाचा चिकटपणा 

·         किरण लेखन यंत्र - सौर उत्सर्जन मोजणे व नोंदणे 

·         सुक्ष्मदर्शक - सुक्ष्म पदार्थ मोठे करून पाहणे 

·         समतलमापी - क्षितीज समांतर पातळी मोजणे 

·         विद्युत भारमापी - विद्युतभाराचे अस्तित्व 

·         वायुवेग मापक - वार्‍याची दिशा आणि भार 

·         दुग्धता मापी - दुधांची सापेक्ष घनता

·         शास्त्रीय नियमांचे संशोधक

शास्त्रज्ञाचे नाव

एकक

देश

जेम्स वॅट

वॅट

स्कॉटलँड

जॉर्ज सायमन ओहम

ओहम

जर्मनी

माईकेल फॅरेडे

फॅरेडे

ब्रिटिश

सी.व्ही. रमन

रामन इफेक्ट

भारतीय

विल्टेन इडूअर्ड वेबर

वेबर

जर्मनी

ब्लॅक पास्कल

पास्कल

फ्रान्स

लॉर्ड केल्विन

केल्विन

ब्रिटिश

हेंरीच रुडॉल्फ हार्टज

हार्टज

जर्मनी

एंड्रीमेरी अॅम्पीअर

अॅम्पीअर

फ्रान्स

सर आयझेक न्यूटन

न्यूटन

ब्रिटिश

एलेस्स्लैड्रो होल्ट

होल्ट

इटालियन

जेम्स प्रेसकॉट ज्युल

ज्युल

ब्रिटिश

 

 काही महत्वाची एकके

एककाचे नाव

वापर

मापन

नॉट 

सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक

1 नॉटिकल मैल=6076 फुट

फॅदम

समुद्राची खोली मोजण्याचे एकक

1 फॅदम=6 फुट

प्रकाशवर्ष

तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक

1 प्रकाशवर्ष=9.46x10१२ मीटर

अँगस्ट्रॉंम

प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक

1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर

बार  

वायुदाब मोजण्याचे एकक

1 बार=10 डाईन्स दाब/चौ

पौंड

वजन मोजण्याचे एकक

2000 पौंड=1 टन

कॅलरी

उष्णता मोजण्याचे एकक

1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा

अॅम्पीअर

विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक

1 अॅम्पीअर=6.3x10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद

मायक्रोन

लांबीचे वैज्ञानिक एकक

1 मायक्रोन=0.001 मिमी

हँड

घोड्याची उंची मोजण्याचे एकक

1 हँड=4 इंच

गाठ

कापूस गाठी मोजण्याचे एकक

1 गाठ=500 पौंड

रोएंटजेन

क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक

वॅट

शक्तीचे एकक

1 हॉर्सपॉवर=746 वॅट

हॉर्सपॉवर

स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक

1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन    उचलणे.

दस्ता

कागदसंख्या मोजण्याचे एकक

1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते

एकर

जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक

1 एकर = 43560 चौ.फुट

मैल

अंतर मोजण्याचे एकक

1 मैल=1609.35 मीटर

हर्टझ -  -

विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक

1 हर्टझ=प्रतिसेकंद होणार्‍या आवृत्तींची संख्या

 

 काही महत्वाची एकके

एककाचे नाव

वापर

मापन

नॉट 

सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक

1 नॉटिकल मैल=6076 फुट

फॅदम

समुद्राची खोली मोजण्याचे एकक

1 फॅदम=6 फुट

प्रकाशवर्ष

तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक

1 प्रकाशवर्ष=9.46x10१२ मीटर

अँगस्ट्रॉंम

प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक

1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर

बार  

वायुदाब मोजण्याचे एकक

1 बार=10 डाईन्स दाब/चौ

पौंड

वजन मोजण्याचे एकक

2000 पौंड=1 टन

कॅलरी

उष्णता मोजण्याचे एकक

1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा

अॅम्पीअर

विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक

1 अॅम्पीअर=6.3x10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद

मायक्रोन

लांबीचे वैज्ञानिक एकक

1 मायक्रोन=0.001 मिमी

हँड

घोड्याची उंची मोजण्याचे एकक

1 हँड=4 इंच

गाठ

कापूस गाठी मोजण्याचे एकक

1 गाठ=500 पौंड

रोएंटजेन

क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक

वॅट

शक्तीचे एकक

1 हॉर्सपॉवर=746 वॅट

हॉर्सपॉवर

स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक

1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन    उचलणे.

दस्ता

कागदसंख्या मोजण्याचे एकक

1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते

एकर

जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक

1 एकर = 43560 चौ.फुट

मैल

अंतर मोजण्याचे एकक

1 मैल=1609.35 मीटर

हर्टझ -  -

विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक

1 हर्टझ=प्रतिसेकंद होणार्‍या आवृत्तींची संख्या

 

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

·         सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला. 

·         सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे. 

·         आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते. 

1. सत्व - अ  

·         शास्त्रीय नांव - रेटीनॉल  

·         उपयोग - डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता 

·         अभावी होणारे आजार - त्वचा, रोग व रात आंधळेपणा 

·         स्त्रोत - टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

2. सत्व - ब1

·         शास्त्रीय नांव - थायमिन  

·         उपयोग - चेतासंस्थेचे आरोग्य 

·         अभावी होणारे आजार - बेरीबेरी 

·         स्त्रोत - धन्य, यीस्ट, यकृत

3. सत्व - ब2

·         शास्त्रीय नांव - रायबोफ्लेविन  

·         उपयोग - चयापचय क्रियेकरिता 

·         अभावी होणारे आजार - पेलाग्रा 

·         स्त्रोत - अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे 

4. सत्व - ब3

·         शास्त्रीय नांव - नायसीन 

·         उपयोग - त्वचा व केस 

·         अभावी होणारे आजार - त्वचारोग व केस पांढरे 

·         स्त्रोत - दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी 

5. सत्व - ब6  

·         शास्त्रीय नांव - पिरीडॉक्सीन  

·         उपयोग - रक्त संवर्धनाकरिता 

·         अभावी होणारे आजार - अॅनामिया

·          

·         स्त्रोत - यकृत व पालेभाज्या 

6. सत्व - ब10  

·         शास्त्रीय नांव - फॉलीक  

·         उपयोग - अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे 

·         अभावी होणारे आजार - अॅनामिया 

·         स्त्रोत - यकृत 

7. सत्व - क  

·         शास्त्रीय नांव - अॅस्कार्बिक, अॅसीड  

·         उपयोग -  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

·         अभावी होणारे आजार - स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

·         स्त्रोत - लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि 

8. सत्व - ड  

·         शास्त्रीय नांव - कॅल्सिफेरॉल  

·         उपयोग - दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य 

·         अभावी होणारे आजार - अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

·          

·         स्त्रोत - मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे 

9. सत्व - इ  

·         शास्त्रीय नांव - टोकोफेरॉल 

·         उपयोग - योग्य प्रजननासाठी  

·         अभावी होणारे आजार - वांझपणा 

·         स्त्रोत - अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या 

10. सत्व - के  

·         शास्त्रीय नांव - नॅप्थोक्विनान  

·         उपयोग - रक्त गोठण्यास मदत 

·         अभावी होणारे आजार - रक्त गोठत नाही 

·         स्त्रोत - पालेभाज्या व कोबी

खनिजद्रव्य व त्याचे उपयोग 

·         शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत. 

·         खनिज - फॉस्फरस  

·         उपयोग - हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मितीकरण्याकरिता 

·         अभावी होणारे परिणाम - हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात 

·         स्त्रोत - अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या 

·         खनिज - पोटॅशियम

·         उपयोग - चेतापेशीच्या पोषणाकरिता 

·         अभावी होणारे परिणाम - चेतापेशीवर परिणाम होतो 

·         स्त्रोत - सुकी फळे 

·         खनिज - कॅल्शियम

·         उपयोग - हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता 

·         अभावी होणारे परिणाम - हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो. 

·         स्त्रोत - तीळ व पालेभाज्या 

·         खनिज - लोह

·         उपयोग - रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते. 

·         अभावी होणारे परिणाम - लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  

·         स्त्रोत - हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी 

·         खनिज - तांबे

·         उपयोग - हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे 

·         अभावी होणारे परिणाम - तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही. 

·         स्त्रोत - पालेभाज्या 

·         खनिज - सल्फर

·         उपयोग - प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य 

·         अभावी होणारे परिणाम - केस, हाडे कमकूवत होतात 

·         खनिज - फ्लोरिन

·         उपयोग - दातांचे रक्षण करण्याकरिता

·         अभावी होणारे परिणाम - याच्या अभावी दंतक्षय होतो. 

·         खनिज - सोडीयम

·         उपयोग - रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.

·         अभावी होणारे परिणाम - रक्तदाबावर परिणाम होतो.  

·         खनिज - आयोडीन  

·         उपयोग - थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता 

·         अभावी होणारे परिणाम - गलगंड नावाचा आजार होतो.

अन्नपचन प्रक्रिया

·         सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात. 

·         अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात. 

·         या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.

·         या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते. 

·         खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.  

1. अंग पदार्थ - मुख व गुहा

·         स्त्राव - लाळ  

·         विकर - टायलिन 

·         माध्यम - अल्पांशाने 

·         मूळ अन्न पदार्थ - पिष्टमय पदार्थ  

·         क्रिया आणि अंतिम - शर्करा (माल्टोज) 

2. अंग पदार्थ - जठर

·         स्त्राव - हायड्रोक्लोरिक

·         माध्यम - आम्ल, अॅसिड  

·         मूळ अन्न पदार्थ - प्रथिने  

·         क्रिया आणि अंतिम - जंतुनाशक 

3. अंग पदार्थ - जठररस  

·         स्त्राव - पेप्सीन,रेनीन 

·         माध्यम - आम्ल

·         मूळ अन्न पदार्थ - प्रथिने, दूध

·         क्रिया आणि अंतिम - सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर  

4. अंग पदार्थ - लहान आतडे

·         स्त्राव - पित्तरस

·         माध्यम - अल्कली 

·         मूळ अन्न पदार्थ - प्रथिने व मेद 

·         क्रिया आणि अंतिम - मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.

5. अंग पदार्थ - स्वादुपिंडरस  

·         विकर - ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ 

·         माध्यम - अल्कली, अल्कली

·         मूळ अन्न पदार्थ - प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद 

·         क्रिया आणि अंतिम - अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल 

6. अंग पदार्थ - आंत्ररस

·         विकर - इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ 

·         माध्यम - अल्कली 

·         मूळ अन्न पदार्थ - प्रथिने, शर्करा, मेद  

·         क्रिया आणि अंतिम - अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

मिश्रणे व त्याचे प्रकार

·         जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता कोणत्याही प्रमाणात मिसळली जातात.

·         तेव्हा त्या तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात. मिश्रणामध्ये खालील गुणधर्म आढळते. 

1. मिश्रणातील पदार्थावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता ते मिसळले जातात.

2. मिश्रणातील असलेल्या मूलद्रव्याचे किंवा संयुगाचे मूळ गुणधर्म कायम असतात.

3. मिश्रणातील मूळ घटक साध्या व सोप्या पद्धतीने वेगळे करता येते.

4. मिश्रण तयार होतांना कोणतीही रासायनिक प्रक्रिया न घडल्यामुळे कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही.

 

·         मिश्रणाचे समंग मिश्रणे आणि विषमांग मिश्रन असे दोन प्रकार आढळतात. 

·         मिश्रणाचे प्रकार - 

1.    समांग मिश्रण

2.    विषमांग मिश्रण

·         स्थायूमध्ये स्थायू - पितळ, कासे आणि ब्रोंझ इत्यादि - साखर व रेती, गनपावडर इत्यादि 

·         द्रवामध्ये स्थायू - पाण्यात मीठ किंवा साखर ते विरघळते - माती किंवा रेती मिश्रीत पाणी 

·         वायुमध्ये स्थायू - कापूर आणि डांबराच्या गोळ्यांची वाफ - हवेत मिसळलेला धूर होऊन हवेत मिसळते

·         द्रवामध्ये स्थायू - कार्बन डायऑक्साइडचे पाण्यातील द्रावण - समुद्रकाठावरील बाष्पमिश्रीत हवा व सोडावॉटर

·         वायुमध्ये वायु - हवा हे सर्व वायूंचे मिश्रण आहे. 

·         द्रवामध्ये द्रव - अल्कोहोलचे पाण्यातील द्रावण - पाण्यामध्ये रॉकेल

पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती

·         ज्या पदार्थामध्ये एकच द्रव्य असतो तो पदार्थ शुद्ध स्थितीत असतो. परंतु ज्या पदार्थात एकापेक्षा जास्त पदार्थ मिसळलेले असतात. तो पदार्थ अशुद्ध स्थितीत असतो.

·         उदा. अशुद्ध पाण्यात पाण्याबरोबर मातीसुद्धा असते. अशा पदार्थाला शुद्ध स्थितीत मिळविण्याकरिता त्यातील इतर घटक वेगळे करणे आवश्यक आहे.

·         त्या प्रक्रियेला पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती म्हणतात. यामध्ये खालील पद्धतीचा समावेश होतो.

1. घनपदार्थ शुद्ध करण्याच्या पद्धती :-

·         यामध्ये खालील पद्धतीचा वापर केला जातो. 

·         मळणी करणे :- शेतात पीक तयार झाल्यानंतर त्या पिकाची कापणी करतात. पिकातील कणसाचे दाणे वेगळे करण्याकरिता त्याची मळणी केली जाते. 

·         पाखडणे किंवा उफनणे :- मळणी केलेल्या धान्यात दाण्याबरोबर कचराही असतो. धान्यातील हा कचरा उफनणी करून किंवा सुफामध्ये पाखूडन वेगळा केला जातो आणि स्वच्छ धान्य मिळविले जाते. 

·         चाळणे :- अन्नधान्य किंवा खनिजे दळल्यानंतर त्यातील जाड पदार्थ वेगळे करण्याकरिता छिद्राच्या चाळणीव्दारे ते चाळले जातात. त्यामुळे अनावश्यक पदार्थ वेगळे करता येते. 

2. द्रव पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती :-

·         द्रव पदार्थाचे शुद्धीकरणासाठी खालील पद्धतीचा उपयोग केला जातो. 

·         निवळणे :- एखाद्या द्रवातून त्यात मिसळलेले जड व अविद्राव्य पदार्थ वेगळे करून स्वच्छ द्रव मिळविण्याच्या पद्धतीला निवळणे असे म्हणतात. 

·         उदा. गढूळ पाण्यात मातीचे कण मिसळले असता ते काही वेळानंतर तळाशी बसतात आणि शुद्ध पाणी वेगळे होते. काही वेळा पानी शुद्ध करण्याकरिता गढूळ पाण्यात तुरटीचा खडा फिरवितात. त्यामुळे पाण्यातील मातीचे कण जड होतात आणि ते पाण्याच्या पात्राच्या तळाशी जमतात. 

·         शुद्धीकरणाची ही पद्धत फक्त जड आणि अविद्राव्य कण वेगळे करण्याकरिताच उपयोगात आणता येते. 

·         गाळणे :- ज्या पद्धतीने द्रवातील जड व हलके अविद्राव्य कण द्रवातून वेगळे केले जातात, त्या पद्धतीला गाळणे असे म्हणतात. 

·         उदा. निवळले पानी चाळणी किंवा गाळण कागदामधून गाळल्यास पाण्यातील अविद्राव्य कण गाळण कागदात शिल्लक राहतात आणि द्रव्य भांड्यात जमा होतो. 

·         उर्ध्वपातन :- द्रवाला उष्णता दिली असता त्याचे वाफेत रूपांतर होते व वाफा थंड केल्या असता मूळ स्वरुपातील शुद्ध द्रव प्राप्त होता या प्रक्रियेला उर्ध्वपातन प्रक्रिया असे म्हणतात. 

·         उदा. मीठ आणि पाण्याचे संतृप्त द्रावण तयार करून ते तापविल्यास त्या द्रावण्यातील पाण्याची मीठ शिल्लक राहते. 

·         भागश: उर्ध्वपातन :- या पद्धतीमध्ये परस्परामध्ये मिसळणारे आणि भिन्न उत्कलन बिंदु असणारे दोन किंवा अधिक द्रव, उर्ध्वपातन पद्धतीने वेगळे करता येते. त्या पद्धतीला भागश: उर्ध्वपातन असे म्हणतात. 

·         उदा. कच्चा खनिज तेलापसून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, व डांबर इत्यादि पदार्थ वेगळे करण्याकरिता या पद्धतीचा उपयोग केला जातो.

भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा

·         अॅम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका संकेदाला वाहणारा 6x10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.

·         बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय. 

·         कॅलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. मे वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात. 

·         ओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर 

·         अश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय. 

·         ज्यूल :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलतून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय. 

·         व्होल्ट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्‍या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय. 

·         वॅट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट. 

·         नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण. हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात. 

·         सौर-दिन :- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्‍या दोन मध्यान्हीमधील कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण वर्षातील सौर-दिनांच्या कलावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन सर्वसाधारणपणे 24 तासांचा असतो. 

·         प्रकाश वर्ष :- प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3x10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46x10)12 किमी

·         विस्थापन :- एखाद्या वस्तूने आपल्या स्थानात केलेल्या स्थानात केलेल्या बदलाला विस्थापन असे म्हणतात. 

·         गती/चाल :- एकक काळात वस्तूने आक्रमिलेल्या अंतराला त्या वस्तूची गती/चाल असे म्हणतात. 

·         वेग :- एकक काळात एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. वेगाचे एकक मीटर/सेकंद हे आहे. 

·         त्वरण :- एकक काळामध्ये वस्तूच्या वेगांत झालेल्या बदलास त्वरण असे म्हणतात.

·         संवेग :- संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार आघातापूर्वी व नंतर संवेग समान असतो. अनेक वस्तूंचा वेग कायम असेल आणि वस्तुमान भिन्न असेल तर संवेग कायम नसतो. वस्तुमान = वेग x संवेग 

·         कार्य :- वस्तूवर बलाची क्रिया केली असता त्या वस्तूचे बलाच्या सेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही सादिश राशी असून कार्य = बल x वस्तूने आक्रमिलेले अंतर

·         ऊर्जा :- पदार्थामध्ये असलेल्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. 

·         स्थितीज ऊर्जा :- एखाद्या पदार्थात त्याच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे जी ऊर्जा सामाविली जाते. त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात, पदार्थातील स्थितीज ऊर्जा त्याचे भूपृष्ठापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. PE=mgh येथे PE म्हणजे स्थितीजन्य ऊर्जा, = mg म्हणजे वस्तुमान, म्हणजे गुरुत्वाकर्षनीय प्रवेग, =h म्हणजे पदार्थाची उंची.

·         गतीज ऊर्जा :- पदार्थाला मिळालेल्या गतीमुळे त्याच्या अंगी जी कार्यशक्ती प्राप्त होते तिला गतीजन्य ऊर्जा म्हणतात. KE=1/2 mv², या ठिकाणी KE म्हणजे गतीजन्य ऊर्जा, m म्हणजे वस्तुमान, v² म्हणजे वेग गती जेवढी जास्त तेवढी गतीज ऊर्जा जास्त असते. 

·         शक्ती :- एक प्रकारच्या ऊर्जेचे दुसर्‍या प्रकारच्या उर्जामध्ये रूपांतरित झाल्यामुळे जे कार्य घडते त्या कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. वॅट हे शक्ती मोजण्याचे एकक आहे. CGS पद्धतीत कार्य शक्तीचे एकक वॅट आहे. दर सेकंदास एक ज्यूल कार्य करण्यास आवश्यक असणार्‍या शक्तीला एक वॅट शक्ती असे म्हणतात. MKS पद्धतीत शक्तीचे एकक किलोवॅट आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात वापरण्यात येणार्‍या यांत्रिक उपकरणात शक्तीचे एकक हॉर्स पॉवर वापरतात. हॉर्स पॉवर याचा अर्थ एका घोडयाची शक्ती होय. हॉर्स पॉवर = 746 वॅट. 

·         प्रकाशाची तीव्रता :- प्रकाशाची तीव्रता, पदार्थाचे उद्गमापासून असणार्‍या अंतरावर अवलंबून असते. प्रकाशाची तीव्रता दीपनावरुन समजते. दीपन उद्गमाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. दीपन 1÷ (अंतर) दीपनाचे एकक-लक्स (मीटर-कॅडंल) आहे. 

·         प्रकाशाची अनूदीप्त तीव्रता :- प्रकाश देण्याच्या उद्गमाच्या क्षमतेला प्रकाशाची अनुदिप्त तीव्रता असे म्हणतात. येथे C अनुदिप तीव्रता, I दीपन, d म्हणजे पृष्ठभागाचे अंतर.

·         प्रकाशाची चाल :- प्रकाशाच्या वहनाच्या वेगाला प्रकाशाची चाल असे म्हणतात. दर सेकंदाला प्रकाशाचा वेग (3x10)8 मी./सेकंदआहे. 

·         भिंगाची शक्ती :- नाभीय अंतराचा (मीटरमध्ये) व्यस्तांक भिंगाची शक्ती दर्शवितो. एकक-डायप्टोर. बहिर्वक्र भिंगाची शक्ती ऋण व अंतर्वक्राची शक्ती धन असते. चष्मे बनविणार्‍याच्या संकेतानुसार बहिर्वक्र भिंगाची शक्ती धन व अंतर्वक्र भिंगाची शक्ती ऋण असते. 

·         प्रतीध्वनी :- ध्वनीचा आघात मानवाच्या कानावर फक्त 1/10 सेकंद टिकतो. 1/10 सेकंदानंतर आपल्या कानावर ध्वनीचा दूसरा ठसा उमटतो. मूळ ध्वनीचा प्रतीध्वनी ऐकू येण्यासाठी दोन ध्वनीच्या मध्ये कमीत कमी कालावधी 1/10 सेकंद असावा लागतो. ध्वनीचा हवेतील वेग 340 मी./सेकंद असल्याने तो 1/10 सेकंदात 34 मीटर जातो. म्हणून मूळ ठिकाण व परावर्तन पृष्ठभाग यांतील कमीत कमी अंतर 17 मीटर असणे आवश्यक आहे.

मेट्रिक पद्धती (दशमान पद्धती)

·         ही पद्धती पुर्णपणे शास्त्रोत असून यास आंतरराष्ट्रीय मान्यता असल्यामुळे या पद्धतीस प्रमाणित पद्धती (च) असेही म्हणतात. 

·         भारताने 1959 पासून या पद्धतीचा स्विकार केला. 

1. लांबी : लांबी खालील एककामध्ये मोजली जाते.

·         10 मि.मी. = सेंटीमीटर 

·         100 से.मी. = 1 मीटर 

·         1000 मी. = 1 किलोमीटर 

2. क्षेत्रफळ : क्षेत्रफळ खालील एककामध्ये मोजले जाते.

·         100 चौ.मि.मी. = 1 चौ.से.मी. 

·         10,000 चौ.से.मी. = 1 चौ. मीटर 

·         10,000 चौ. मीटर = 1 हेक्टर 

3. वजन : वजन खालील एककामध्ये मोजले जाते.

·         1000 ग्रॅम = 1 किलो 

·         100 किलो = 1 क्विंटल 

·         10 क्विंटल = 1 मेट्रिक टन

प्रमाणित एकके व मापनपद्धती

·         लांबी, वस्तुमान, काळ या तीन भौतिक राशी मूलभूत राशी समजल्या जातात. या मूलभूत राशीच्या मापनाच्या दोन पद्धती आहेत. 

·         सुरूवातीस जगभर ब्रिटिश मापन पद्धती व मेट्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमणात केला जाई. त्यानंतर 1790 पासून फ्रान्समध्ये मेट्रिक पद्धतीस सुरुवात झाली. 

·         1960 सालापासून मेट्रिक पद्धतीचा जगभर वापर करण्यास सुरुवात झाली. या पद्धतीलाच सिस्टिम इंटरनॅशनल (IS) असे नाव देण्यात आले. 

1. एकक पद्धती - ब्रिटिश (FPS)

·         लांबी - फूट 

·         वस्तुमान - पौंड  

·         काळ - सेकंद 

2. एकक पद्धती - सी.जी.एस (CGS)

·         लांबी - सेंटीमीटर 

·         वस्तुमान - ग्रॅम 

·         काळ - सेकंद 

3. एकक पद्धती - एम.के. एस (MKS)

·         लांबी - मीटर 

·         वस्तुमान - किलोग्रॅम 

·         काळ - सेकंद 

4. एकक पद्धती - आंतरराष्ट्रीय (IS)

·         लांबी - मीटर 

·         वस्तुमान - किलोग्रॅम 

·         काळ - सेकंद

·         किरणोत्सारी समस्थानके व उपचार

समस्थानके

उपचार

फॉस्परस 32

ब्लड कॅन्सर (ब्ल्युकेमिया) वरील उपचारासाठी 

कोबाल्ट 60

कॅन्सरवरील उपचारासाठी

आयोडीन 131

कंठस्थ ग्रथीतील विकृती ओळखण्यासाठी

आयोडीन व आर्सेनिक

मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी

सोडीयम - 24

रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी

 

टक त्यांचे व्यावहारिक नाव व शास्त्रीय नाव

व्यावहारिक नाव                    शास्त्रीय नाव

1.    मार्श गॅस                         मिथेन              

2.    खाण्याचा                         सोडीयम बाय कार्बोनेट

3.    धुण्याचा सोडा                    सोडीयम कार्बोनेट

4.    मीठ                              सोडीयम क्लोराइड

5.    व्हाईट व्हिट्रीऑल                झिंक सल्फेट

6.    ब्ल्युव्हिट्रीऑल                   कॉपर सल्फेट

7.    ग्रीन व्हिट्रीऑल                  फेरस सल्फेट

8.    जलकाच                         सोडीयम सिलिकेट

9.    फॉस्जीन                         कार्बोनिल क्लोराइड

10. जिप्सम सॉल्ट                 मॅग्नेशियम सल्फेट

11. ग्लोबर्स सॉल्ट                 सोडीयम सल्फेट

12. बेकिंग सोडा                   सोडीयम बाय कार्बोनेट

13. फेरस अमोनियम सल्फेट     मोहर सॉल्ट

14. ल्युनर कॉस्टीक               सिल्व्हर नायट्रेट

15. संगमवर                       कॅल्शियम कार्बोनेट

16. मोरचूद-                       कॉपर सल्फेट

 

 महत्वाच्या संज्ञा

काचेचा रंग

वापरावयाची धातूसंयुगे

लाल

क्युप्रस ऑक्साइड

निळा

कोबाल्ट ऑक्साइड

हिरवा

क्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड

जांभळा 

मॅगनीज डाय ऑक्साइड

पिवळा

अॅटीमनी सल्फाइड

दुधी

टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट

 

कार्य बद्दल संपूर्ण माहिती

·         'कार्य' म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय.

·         w = f × s 

·         कार्य व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण सांगितले तरी पुरेसे आहे. दिशा सांगण्याची गरज नाही. म्हणून कार्य ही 'आदिश राशी' आहे.

·         SI पद्धतीला बलाचे एकक न्यूटन आहे व विस्थापनाचे एकक मीटर आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन मीटर म्हणजेच ज्यूल हे आहे. 

·         CGS पद्धतीत डाईन-सेंटीमीटर किंवा अर्ग आहे.

·         1 ज्यूल = 1 न्यूटन × 1 मीटर 

·         1 अर्ग  = 1 डाईन  × 1 सें.मी.

·         1 ज्यूल = 107 अर्ग  

·          

 घन, ऋण व शून्य कार्य :

·         ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा त्या बालाने केलेले कार्य घन असते.

·         बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. त्या बलाने केलेले कार्य ऋण असते.

·         ज्या वेळी बाल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा बलाने केलेले कार्य शून्य असते.

·         उदाहरणे :-

1.    बंद बस ढकलणे धन कार्य 

2.    चेंडूचा झेल घेणे ऋण कार्य 

3.    दोरीला बांधलेला दगड फिरवणे शून्य कार्य 

·         पृथ्वी व सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो.

·         यामध्ये केंद्रकीय बलाने केलेले कार्य शून्य आहे. 

·         सरल दोलक विराम अवस्थेत असतो तेव्हा त्याचे वजन अधोगामी दिशेने कार्य करते, तर दोरीवरील ताण त्याच्या वजनाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात. 

·         त्यामुळे सरल दोलक विराम अवस्थेत असतो. त्यावरील बलाने केलेले कार्य शून्य असते.

शक्ती बद्दल संपूर्ण माहिती

·         कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे 'शक्तीहोय.

·         कार्य करण्याच्या दरास 'शक्ती' म्हणतात.

·         केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते. 

·         गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.

·         शक्ती (P) = कार्य/काल = w/t 

 शक्तीचे एकक :

·         SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

·         1 वॅट = 1 ज्युल/सेकंद

·         1 किलोवॅट = 1000 वॅट 

·         औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.

·         1 अश्वशक्ती = 746 वॅट 

·         व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे. 

·         1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.

·         1 Kwhr = 1 Kw × 1 hr 

   = 1000w × 3600 s

 

   = 3.6 × 106 Joules

·         घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.

उष्णता बद्दल संपूर्ण माहिती

·         उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.

·         थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.

·         जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.

·         वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.

 पाण्याचे असंगत आचरण :

·         सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.

·         परंतु पाण्याचे तापमान 40C पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.

·         00 C तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 40C तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. 

·         40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 40C च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.

·         पाण्याचे 00C पासून 40C पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.

·         40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 40C ला उच्चतम (Maximum) असते.

·         पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.

·         बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 00C तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.

·         थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 00C पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 40C होईपर्यंत चालू राहते. 

तापमान 40C पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते. परिणामी त्याची घनता कमी होऊन ते पृष्ठभागावरच राहते. 

पृष्ठभावरील तापमान कमी होत होत 00C तापमानास त्याचे बर्फ होते. बर्फाखालील पाण्याचे तापमान 40C च राहाते.

·         बर्फ उष्णतेचा विसंवाहक (Bad Conductor) आहे. त्यामुळे बर्फाखालील पाण्याची उष्णता वाटवरणात जाऊ शकत नाही.

·         अशाप्रकारे 40C तापमानास जलीय वनस्पति व जलचर प्राणी जीवंत राहू शकतात. 

·         तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास नळातील पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते. 00C तापमानाला पाण्याचे बर्फ होते. नळाच्या आतील बाजूवर मोठा दाब निर्माण होऊन नळ फुटतात. 

·         कधीकधी खडकाच्या फटीमध्ये पाणी शिरते आणि तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रसरण पावते. मोठा दाब निर्माण होऊन खडक फुटून त्याचे तुकडे होतात. 

 दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity) :

·         तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.

·         वातावरणात असणार्‍या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.

·         जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात. 

·         ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास 'दवबिंदू तापमान' म्हणतात. हवेमध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते.

·         हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच 'आर्द्रता' म्हणतात. 

·         ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.

·         एकक आकारामानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास 'निरपेक्ष आर्द्रता' असे म्हणतात. 

·         सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.

·         हवा संतृप्त होण्यासाठी लागणार्‍या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून आहे.

·         हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावले असेल तर ती हवा 'असंतृप्त' आहे असे म्हटतात.

·         जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्यात बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते.

·         याउलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्याव बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते.

·         हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.

·         हवेमध्ये ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुमान व तेच आकारमान त्याच तापमानास संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणार्याआ पाण्याचे वस्तुमान याच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. 

·         सापेक्ष आर्द्रता शेकडेवारीत सांगतात.

·         दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते.

·         जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.

·         थंड जमीन तिच्या सान्निध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संघनन (condensation) होते तेव्हा धुके (Fog) तयार होते.

·         जेव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हा सुद्धा धुके तयार होते. सागरी धुके (Sea Fog) यामुळे तयार होते.

·         उंचावरून जाणार्‍या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा(त्राईल) दिसते. विमान उडत असताना इंजीनापासून निघणार्‍या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होतात. 

जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर तेजोरेखा लांबच लांब दिसते.

·         जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान तेजोरेखा तयार होते किंवा तयार सुद्धा होत नाही.

 उष्णतेची एकके (Units of Heat)  :

·         CGS आणि MKS पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात.

·         MKS पद्धतीमध्ये उष्णता तापमान 14.50C ते 15.50C ने वाढविण्यासाठी लागणार्‍या उष्णतेस 1 Kcal उष्णता म्हणतात.

·         CGS पद्धतीमध्ये उष्णता कॅलरीमध्ये मोजतात.

·         एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.50C ते 15.50C पर्यंत 10C ने वाढविण्यासाठी लागणार्‍या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात. 

·         1 कॅलरी = 4.18 ज्यूल. 

 विशिष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity) :

·         विशिष्ट उष्माधारकता 'C' या चिन्हाने दर्शवितात.

·         विशिष्ट उष्माधारकतेचे MKS पद्धतीत एकक Kcal/kg0C हे आहे.

·         CGS पद्धतीत त्याचे एकक Cal/g0 हे आहे.

·         एक ग्रॅम वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थातील वाढणारे तापमान समान नसते.

·         एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 10C ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची 'विशिष्ट उष्माधारकता' होय.

·         काही पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकता पुढीलप्रमाणे आहेत.

·         पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक म्हणजे 1 Kcal/Kg0C आहे. म्हणून पाण्याच्या दिलेल्या वस्तुमानाचे विशिष्ट तापखंडातील 
तापमान वाढवण्यासाठी लागणारी उष्णता इतरांपेक्षा जास्त असते.

·         पाण्याची विशिष्ट उष्माधारकता तापमानानुसार बदलते. म्हणून पाण्याचा वापर तापमापीमध्ये केला जात नाही.

·         पार्‍याची विशिष्ट उष्माधारकता पाण्यापेक्षा खूपच कमी असल्याने पारा पाण्यापासून कमी उष्णता शोषून घेतो. म्हणून पाण्याचे तापमान पार्यााच्या तापमापीने मोजतात.

·         पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे. म्हणून गरम शेक घेण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रबरी पिशवीमध्ये गरम पाणी भरतात.

दाब बद्दल संपूर्ण माहिती

·         अणकुचीदार खिळा हातोडीने लाकडामध्ये ठोकल्यास सहज ठोकला जातो. परंतु खिळा बोथट असेल तर तो लाकडात सहज जात नाही.

·         खिळ्याच्या डोक्यावर हतोड्याच्या सहाय्याने लावलेले बल खिळ्याच्या टोकाकडे संक्रमित होते. अणकुचीदार खिळ्याच्या टोकाजवळचे क्षेत्रफळ किमान असल्यामुळे टोकाकडे बलाचा परिणाम सर्वाधिक होते व खिळा लवकर लाकडात ठोकला जातो.

·         बोथट खिळ्याच्या टोकाकडील क्षेत्रफळ विभागले जाऊन त्याचा टोकाकडील परिणाम कमी होतो. म्हणून तो लवकर लाकडात जात नाही.

·         यावरून दोन्ही खिळ्यावरचे बल समान असले तरीही त्याचा परिणाम टोकाकडील क्षेत्रफळानुसार भिन्न असतो.

·         लाकडी चौकटीमध्ये स्क्रू बसवताना पेचकस स्क्रुला लंब ठेवून पेचकसवर बल लावले जाते. पेचकस स्क्रुला लंब नसल्यास लावलेल्या बलाच्या मानाने कमी परिणाम दिसतो.

·         पेचकस स्क्रुला लंब असल्यास लावलेले बल स्क्रुच्या टोकाकडे सर्वाधिक संक्रमित होते. 

·         यावरून असे स्पष्ट होते की वस्तूवर लावलेल्या बलाची दिशा वस्तूच्या पृष्ठभागाला लंब असेल तर त्या बलाचा वस्तूवर होणारा परिणाम सर्वाधिक असतो.

·         एखाधा पृष्ठभागावर लावलेल्या बलाचा परिणाम किती होतो हे लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि बल लावलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यावर अवलंबून असते. बलाच्या अशा एकत्रित परिणामाला दाब म्हणतात. 

·         दाब म्हणजेच एकक क्षेत्रफळावर असणारे लंबरूप बल होय.

·         दाब = लंबरूप बल / क्षेत्रफळ 

·         लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता (thrust) असे म्हणतात. एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय.

·         दाब = उत्प्लाविता / क्षेत्रफळ 

·         SI पद्धतीमध्ये दाब N/m२ मध्ये मोजतात. त्यालाच ब्लेस पास्कल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ पास्कल’ (Pa) असेही म्हणतात.

·         बल वाढल्यास दाब वाढतो.

·         बल ग्रहण करणारे क्षेत्रफळ कमी झाल्यास दाब वाढतो.

·         फळे कापायच्या सुरीला धार लावल्यामुळे सूरीवर लावलेले बल किमान क्षेत्रफळावर कार्य करते अन फळ चटकन कापले जाते.

 प्लावक बल (Buoyant Force)  :

·         बोटांनी दाबून पाण्याच्या तळाशी नेलेला लाकडी ठोकळा बोट काढताच उसळी मारून पाण्याच्या पृष्ठभागाशी येतो.

·         पाण्यात बुडलेला असल्याने ठोकळ्यावर कार्य करणारे पाण्याचे बल ठोकळ्याला वर ढकलते.

·         द्रवात बुडलेल्या वस्तूला वर ढकलणार्यार बलाला प्लावी बल असे म्हणतात. प्लावी बलालाच प्लावक बल किंवा उत्प्रनोद असेही म्हणतात.

·         द्रवात बूडालेल्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.

·         द्र्वाची घनता जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.

·         द्र्वामध्ये एखादा पदार्थ तरंगणार की बुडणार हे प्लावाकबल ठरविते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तु तरंगते. 

प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तु बुडते. प्लावक बल वस्तूच्या वजना इतके असल्यास वस्तु द्रवाच्या आतमध्ये तरंगते.

 आर्किमिडीजचे तत्व :    

·         घन पदार्थ द्र्वात अंशत: किंवा पूर्णत: बुडाल्यास तो त्याच द्रवात बुडलेल्या आकारमानाएवढे द्रव बाजूला सारतो. यावेळी पदार्थाच्या वजनात घट होते. ही घट पदार्थाने बाजूला सारलेल्या द्र्वाच्या वजनाएवढी असते.

·         हा निष्कर्ष आर्किमिडीज या विख्यात शास्त्रज्ञाने इ.स.पूर्व 332 मध्ये प्रस्थापित केला. याला 'आर्किमिडीज तत्व' असे म्हणतात.

·         आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ व गणिती होते. बाथटबमध्ये उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना हा शोध लागला. 'युरेका'असे म्हणजेच 'मला मिळाले' असे म्हणत ते बाहेर आले होते.

·         आर्किमिडीजचे तत्व जहाजे व पाणबुड्यांच्या रचनेसाठी उपयोगी पडते.

·         दुग्धतामापी (Lactometer), आद्रतामापी (Hydrometer), यासारखी विविध उपकरणे याच तत्वावर आधारीत आहेत.

 तरंगण्याचा नियम :

·         पाण्याहून कमी घनता असलेला पदार्थ पाण्यावर तरंगतो.

·         लाकडाचा ठोकळा पाण्यावर तरंगतो. पाण्यात जातांना तो पाणी बाजूला सारतो. सारलेल्या पाण्याचे वजन ठोकळ्याच्या वजनाएवढे होते. 

या वेळी ठोकळ्याचे वजन आणि ठोकळ्यावर कार्य करणारे प्लावी बल समान असते.

·         एक लोखंडी जाड पत्रा पाण्यात पडला की तो बुडतो. तथापि तोच पत्रा ठोकून घमेले केले तर ते पाण्यात तरंगते.

·         अॅल्युमिनियमची फॉईल पाण्यावर तरंगते पण त्याचीच चुरगळून बनविलेली गोळी मात्र पाण्यात बुडते आणि पार्यांवर तरंगते. यांचे कारण घनतेतील बदल होय. 

·         पदार्थाची घनता म्हणजे त्याचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय. त्याचे SI पद्धतीतील एकक किलोग्रॅम/मीटर3 असे आहे.

·         जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा अधिक असेल तर ती पाण्यात बुडते. मात्र जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा कमी असेल तर ती पाण्यावर तरंगते.

·         पदार्थाची सापेक्षा घनता म्हणजे त्याच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असणारे गुणोत्तर होय.

·         सापेक्ष घनता = पदार्थाची घनता / पाण्याची घनता 

·         यालाच पदार्थाचे 'विशिष्ट गुरुत्व' म्हणतात.

 वातावरणीय दाब :

·         पृथ्वीभोवती हवेचे एक जाड आवरण आहे. त्यालाच वातावरण असे म्हणतात. 

·         पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील सर्व पदार्थांवर हवेचा दाब असतो. त्याला 'वातावरणीय दाब' असे म्हणतात. 

·         पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर पडणार्यार हवेच्या स्तंभाच्या वजनाला त्या ठिकाणचा वातावरणीय दाब म्हणतात.

·         हवेचा दाब दर्शविणार्याव उपकरणाला साधा हवा दाबमापी म्हणतात.

·         समुद्रसपाटीवर हवादाबमापीच्या नळीमधील पार्या ची उंची 760 मीमी. असते. म्हणजेच समुद्रसपाटीवर हवेचा दाब 760 मीमी. 

·         समुद्रसपाटीवरील हवेचा दाब प्रमाणदाब मानला जातो. तो 1 वातावरणदाब म्हणून गणला जातो.

·         760 मी मी. पार्यारच्या स्तंभाच्या वजनावरून समुद्रसपाटीवरील हवेचा दाब 101400 N/m2 एवढा भरतो.

·         समुद्रसपाटीवरून जसजसे वर जावे तसतसे त्या जागेवरील हवेच्या स्तंभाची उंची कमी होते. त्यामुळे हवेचा दाब कमी होतो.

·         खूप उंचावर गेले की हवेचा दाब कमी झाल्याने दोन दाबातील फरक वाढतो. त्यामुळे नाकातील रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

·         ढोबळमानाने पाहिल्यास समुद्रसपाटीवरील हवेत समान दाबाचे आडवे पट्टेच तयार झाल्याचे दिसून येते.

·         समुद्रसपाटीवर विषुववृत्ताजवळचा प्रदेश हा कमी वातावरणीय दाबाचा पट्टा आहे. 

·         300 उत्तर आणि 300 दक्षिण या अक्षवृत्ताजवळ अधिक दाबाचे, तर आर्क्टिक आणि अंटार्क्टिक ध्रुवाजवळ कमी दाबाचे पट्टे आहेत.

·         उत्तर दक्षिण ध्रुवाजवळ अधिक दाबाचे प्रदेश आहेत.

·         तापमान बदलाबरोबरच हवेचा दाबही कमी जास्त होतो. जमीन सूर्याच्या उष्णतेने तापली की तेथील हवा तापून प्रसरण पावते. ती वरवर जाते. आजूबाजूला पसरते. तेथे हवेचा दाब कमी होतो. याउलट रात्री जमीन थंड झाल्यावर हवेचा दाब पारत वाढतो.

·         दुपारी जमीनीवरील हवेचा दाब पाण्यावरच्या हवेच्या दाबापेक्षा कमी होतो. त्यामुळे समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहतात.

·         सूर्यास्तानंतर जमीन लवकर थंड होतो. त्यामानाने समुद्रावरील हवा उष्ण राहते. म्हणून रात्री जमीनीवरील हवेचा दाब अधिक होतो. त्यामुळे मतलई वारे जमीनिकडून समुद्राकडे वाहतात.

बल व बलाचे वर्गीकरण

·         निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.

1.    गुरुत्व बाल 

2.    विधुत चुंबकीय बाल 

3.    केंद्रकीय बल 

4.    क्षीण बल 

 गुरुत्वबल (Gravitational Force) :

·         सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.

·         न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या  वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात. 

·         हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते. 

·         एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.

·         गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते. 

·         न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.

·         F=G m1 m2 /r2  G = विश्वगुरुत्व स्थिरांक 

·         SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2 

·         CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2 

पृथ्वीचे गुरुत्व त्वरण -

·         एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.

·         पिसा येथील झुलत्या मनोर्यातवरून एकाच वेळी वेगवेगळ्या वस्तूमानाचे दगड गॅलिलियोने खाली सोडले व असा निष्कर्ष काढला की गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानवर अवलंबून नसते.

·         गुरुत्वत्वरण हे फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर व वस्तूच्या उंचीवर अवलंबून आहे, पण वस्तूच्या व्स्तुमानावर नाही.

·         गुरुत्व त्वरण g = 9.8 m/s2 (सरासरी) 

·         पृथ्वीच्या त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आहे. तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. 

·         g चे मूल्य ध्रुवावर_ 9.83m/s2 आहे.

·         g चे मूल्य विषुववृत्तावर_ 9.78m/s2 आहे.

वस्तुमान (Mass)-

·         कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असणारा द्रव्यसंचय होय. वस्तुमान हो अदिश राशि असून SI एकक kg आहे.

·         वस्तुमान सगळीकडे सारखेच आहे. ते कधीही बदलत नाही. वस्तुमान कधीही शून्य होत नाही.

·         जितके वस्तुमान जास्त, तितके जडत्वही जास्त असते. दुकानामधील तराजू फक्त वस्तुमानांची तुलना करू शकतो.

वजन (Weight-

·         एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.

·         वस्तूचे वजन हे वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्वबल होय.

·         वजन ही सदिश राशी आहे. (w=mg)

·          

·         g ची किंमत सगळीकडे सारखी नाही. त्यामुळे वजनसुद्धा सगळीकडे सारखे नाही.

·         वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुवृत्तावर सर्वात कमी राहील.

·         गुरुत्व बलाच्या प्रभावापासून मुक्त अवकाशयानात अंतराळवीरांना वजनरहित अवस्थेचा प्रत्यय येतो. तो वजनदार वस्तु सहज उचलू शकतो. कारण तेथे प्रत्येक वस्तूचे वजन w शून्य असते.

मुक्तपतन-

·         झाडाचे वाळलेले पान, पिकलेले फळ हे केवळ गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात. त्याला आपण मुक्तपतन असे म्हणतो.

·         मुक्तपतनाच्या वेळी हवा या वस्तूला विरोध करते. कारण वस्तूचे आणि हवेचे घर्षण होते. खर्यात अर्थाने मुक्त पतन हे फक्त निर्वातातच शक्य आहे. 

 विद्युत चुंबकीय बल (Electromagnetic Force) :

·         सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणार्याप बलास 'विद्युत चुंबकीय बल' असे म्हणतात.

·         विधूतचुंबकीय बल गुरुत्वबलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. उदा. हायड्रोजनच्या अनुमधील इलेक्ट्रॉन व प्रोटॉनमधील विधुत चुंबकीय बल जवळजवळ 10-7N असते. 

इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्यावर प्रयुक्त गुरुत्वबल क्रमश: जवळपास 10-41N आणि 10-34N एवढे असते.

·         विधुतचुंबकीय बलामुळेच नुकत्याच वापरलेल्या कंगव्याने कागदाचे बारीक कपटे ओढले जातात.

·         लोखंडी खिळ्यावर लोहचुंबकामुळे प्रयुक्त झालेले बल हा विधुतचुंबकीय बलाचा प्रकार आहे. 

·         आपण निसर्गातील जी बहुतांश बले अनुभवतो, ती विधुत चुंबकीय बलेच असतात. 

·         धनप्रभारीत आणि ऋणप्रभारीत असे दोन प्रकारचे कण विधूतचुंबकीय बलात भाग घेतात.

·         स्थिर विधुतकण गतीमान असतील तरच चुंबकीयबल प्रयुक्त होते. विधुतचुंबकीय बल आकर्षणबल किंवा प्रतिकर्षणबल असे शकते. 

·         अनुमधील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यातील परस्पर आकर्षणाला कारणीभूत बल हे विधूतचुंबकीय बलच असते. त्यामुळे अणूंचे अस्तित्व टिकून असते.

·         गुरुत्वबल आणि विधुतचुंबकीय बल ही दोन्ही बले दोन वस्तु बऱ्याच अंतरावर असतानासुद्धा कार्यरत असतात. या दोन्ही बलांना दीर्घमर्यादा क्षेत्र असलेली किंवा लांब पल्ल्याची बले असे म्हणतात.    

 केंद्रकीय बल (Nuclear Force) :

·         अणूचे जवळजवळ सर्व वस्तूमान केंद्रकात साठवलेले असते.

·         अणूच्या केंद्रकात असणाऱ्या वेगवेगळ्या कणांवर कार्यरत गुरुत्व किंवा विधुत चुंबकीय या दोन बलाव्यतिरिक्त वेगळे बल केंद्रकात कार्यरत असते. या बलाला केंद्रकीय बल असे म्हणतात.

·         या बलाची व्याप्ती केंद्रकापुरतीच मर्यादित असते. केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.

·         केंद्रकीय बल अगदी लहान मर्यादा क्षेत्र असणारे बल आहे.

·         दोन कनांमधील अंतर 10-15m पेक्षा कमी असल्यासच केंद्रकीय बल क्रिया करते.

·         केंद्रकीय बलाचे परिमाण विधुत चुंबकीय बलाच्या 100 पट असते.

 क्षीण बल (Weak Force) :

·         इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्यात होणार्याअ अन्योन्यक्रियामध्ये प्रयुक्त होणारे बल हे चौथ्या प्रकारचे आहे. याला क्षीण बल म्हणतात.

·         हे बल अत्यंत लहान मर्यादा क्षेत्र असलेले बल आहे.

·         निसर्गात सापडणार्‍या किरणोत्सर्गी पदार्थांमध्ये हे बल प्रथम आढळले.

प्रकाश (Light) बद्दल संपूर्ण माहिती

 महत्वाचे मुद्दे:

·         सभोवतालचा रंगबेरंगी देखावा आणि प्रकृतीक सौंदर्य पाहण्याचा आनंद आपल्याला डोळ्याच्या विशिस्ट संवेदना आणि प्रकाश यामुळे होतो.

·         विद्युत चुंबाकीय प्रारण या नावाने ऊर्जेचे रूप म्हणजे प्रकाश. प्रकाशामुळे डोळ्याला दृष्टी प्राप्त होते.

·         क्ष-किरण, दृश्य प्रकाश, रेडियो लहरी, हे सर्व विद्युत चुंबकीय वर्णपटलाचे भाग आहेत.

·         प्रकाश किरणांची तरंग लांबी 4×10-7 m ते 7×10-7 m च्या दरम्यान असते.

·         प्रकाशाच्या प्रसारणाच्या मार्गाला प्रकाश किरण म्हणतात.

·         अनेक प्रकाश किरण एकत्र येऊन शलाका तयार होतात.

·         प्रकाश किरण त्यांच्या उगमस्थांनापासून सरळ रेषेत प्रवास करतात.

·         जर प्रकाशाच्या प्रसारणाच्या दिशेने एखादी वस्तु आली तर तिची छाया तयार होते.

 आरसा :

·         आपण दररोज वापरतो त्यापैकी सपाट आरशाशी आपला जास्त संबंध आहे.

·         आरसा हा परवर्तंनशील पृस्ठभाग आहे.

·         सपाट आरसा म्हणजे सपाट काच असून तिच्या एका पृस्ठभागावर परावर्तक पातळ लेप देऊन त्यावर लाल रंग दिल्याने परावर्तक थराचे संरक्षण केलेले असते.

·         आरशाचा दूसरा प्रकार म्हणजे वक्र गोलाकार आरसा होय.

·         तो गोलाकार परवर्तनशील पृष्ठभागाचा एक भाग असतो. त्याचा काटछेद हा वर्तुळपाकळी असतो. काचेच्या एका पृष्ठभागावर परावर्तक लेप देऊन दूसरा पृष्ठभाग चकचकीत केलेला असतो.

अंतर्वक्र आरसा -

·         जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात.

·         आतल्या पृष्ठभागावरून परावर्तन होते. त्यालाच अभिसारी आरसा म्हणतात.

·         कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर एका बिंदुजवळ अभिसारीत होतात.

बहिर्वक्र आरसा -

·         जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा म्हणतात.

·         बाहेरचा पृष्ठभागावरून परावर्तन होते. 

·         मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर अपसारीत होत असल्याने या आरशाला आपसरी आरसा असे म्हणतात.

 

 गोलाकार आरशाशी संबंधित संज्ञा :

वक्रता मध्य - (C) Centre of Curvature

·         गोलाकार आरसा ज्या गोलचा भाग आहे त्याच्या केंद्रबिंदूला वक्रता मध्य किंवा वक्रता केंद्र म्हणतात.

ध्रुव - (p) Pole

·         गोलीय आरशाच्या मध्यबिंदूला ध्रुव किंवा गुरुत्व मध्य म्हणतात.

मुख्य अक्ष - Principal Axis

·         आरशाचा ध्रुव आणि वक्रतामध्य यामधून जाणार्‍या सरळ रेषेला मुख्य अक्ष म्हणतात.

वक्रता त्रिज्या - (R) Radius of Curvature

·         आरशाचा वक्रता मध्य व ध्रुव यांच्यामधील अंतराला 'वक्रता त्रिज्या' म्हणतात.

अंतर्वक्र आरशाची नाभी - (F) Focus

·         अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर एका बिंदुजवळ येतात. त्यालाच 'अंतर्वक्र आरशाची नाभी' म्हणतात.

नाभीय अंतर - (F) Focal Length

·         आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यामधील अंतराला आरशाचे 'नाभीय अंतर' म्हणतात.

 प्रकाशाचे अभिसरण :

·         जेव्हा प्रकाशकिरण एका बिंदुजवळ एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे अभिसरण होते.

·         आपल्याला ज्यावेळी प्रकाश एका बिंदुजवळ आणायचा असतो तेव्हा अभिसारीत प्रकाश झोत वापरतात.

·         अशा प्रकारचा प्रकाश झोत वापरुन डॉक्टर दात, कान, डोळे, ईत्यादींवर प्रकाश झोत एकत्र करतात.

·         अभिसारीत प्रकाशझोताचा उपयोग सौर उपकरणामध्ये देखील केला जातो.

प्रकाशाचे अपसरण :

·         जेव्हा एकाच बिंदूस्त्रोतापासून प्रकाश पसरणे अपेक्षित असते त्यावेळी आपसारीत प्रकाशझोत वापरतात. उदा. टेबल लॅम्प , रस्त्यावरील दिवे इत्यादीं.

आरशाचे सूत्र :

·         जेव्हा आपण चिन्हाच्या संकेतांनुसार अंतरे मोजतो तेव्हा आपल्याला वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर आणि नाभीय अंतर यांच्या योग्य किमती मिळतात.

·         वस्तूचे अंतर (u) म्हणजे वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर होय.

·         प्रतिमेचे अंतर (v) म्हणजे ध्रुवापासूनचे प्रतिमेचे अंतर होय.

·         नाभीय अंतर हे मुख्य नाभीचे ध्रुवापासूनचे अंतर होय.

·         वस्तूचे अंतर , प्रतिमेचे अंतर, नाभीय अंतर यांच्यातील संबंध म्हणजे आरशाचे सूत्र होय.

·         सूत्र -  1/v+ 1/u = 1/f

 विशालन (Magnification) :

·         गोलीय अरशमुळे विशालन प्रतिमेच्या उंचीशी असणार्‍या वस्तूच्या उंचीच्या गुणोत्ततराने दर्शवितात.

·         या माध्यमातून वस्तूच्या आकाराच्या मानाने संबधित प्रतिमा किती मोठी आहे हे समजते.

 प्रकाशाचे अपवर्तन :

·         एका पारदर्शक माध्यमातून दुसर्‍या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस 'प्रकाशाचे अपवर्तन' असे म्हणतात.

·         वेगवेगळ्या मध्यमामध्ये  प्रकाशाचा वेग वेगवेगळा असल्याने प्रकाश किरण एका माध्यमातून जाताना त्यांची दिशा बदलते.

·         काचेच्या चिपेतून प्रकाशाचे दोन वेळा अपवर्तन होते. दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरिता , आपती कोण व अपवर्तीत कोन यांचे गुणोत्तर स्थिरांक असते.

·         जर आपती कोन i आणि अपवर्तीत कोन r असेल तर sin i/ sin r = स्थिरांक

·         या स्थिरांकास माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात. तो n ने दर्शवितात.

 प्रकाशाचे अपस्करण :

·         प्रशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात.

·         सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या प्रिझमचा उपयोग केला.

·         शुभ्र प्रकाशाचे प्रिझमद्वारे सात रंगात अपस्करण होते. यावेळी आपती किरणाच्या मानाने वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोणातून वळतात.

·         लाल रंग सर्वात कमी वळतो. तर जांभळा रंग सर्वाधिक वळतो. त्यामुळे प्रत्येक रंगाचे वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात आणि विभक्त होतात व सात रंगाची वर्णपंक्ती मिळते.

प्रकाशाचे विकिरण :

·         जेव्हा प्रकाशकिरण अगदी लहान कणावर पडतो तेव्हा ते कण वेगवेगळ्या दिशांना प्रकाश विक्षेपित करतात. या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे विकिरण म्हणतात.

·         वातावरण हे धूळ, धूर , लहान पाण्याचे थेंब व हवेचे रेणु यासारख्या अतिसूक्ष्म कणांचे एकजिनसी मिश्रण असल्यामुळे वातावरणातून प्रकाशाचे विकिरण होते.

·         ज्यावेळी सूर्यप्रकाश घनदाट अरण्यातील वातावरणाच्या छतमधून जातो त्यावेळी प्रकाशाचे विकिरण निरीक्षणास येते.

·         आकाशाचा निळारंग वाटवरणातून विकिरण होणार्‍या प्रकाशाशी संबधित आहे.

·         सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी आकाश लालसर किंवा नारंगी दिसते. हा बादल देखील प्रकाशाच्या विकिरणाशी संबधित आहे.

·         डॉ. चंद्रशेखर वेंकट रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाशाचे अपस्करण या विषयाचे संशोधन प्रशित केले. त्याबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल परितोषिक मिळाले.

·         नोबेल परितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती

 (भाग 1) :

·         सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला 'द्रव्य' म्हणतात.

·         द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.

·         अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.

·         अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.

·         ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येयात.

·         स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.

·         द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.

·         अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी पदार्थहा शब्द प्रयोग करतात.

·         आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.

·         दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ म्हणजे संयुग.

·         लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.

·         लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.

·         दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.

·         मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.

·         सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

·         सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

·         एक द्रव व एक अथवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला 'निलंबन' असे म्हणतात.

·         विषमांगी मिश्रणांना कलीले म्हणतात.

·         पचन विकारांवर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया हेही एक कलिल आहे.

·         द्रावणाच्या एक एकक एवढ्या आकारमानात विरघळलेल्या द्रव्याच्या वस्तुमानाला द्रावणाची संहती असे म्हणतात.

·         इ.स. 1808 मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन याने त्याचा प्रसिद्ध अणूसिद्धांत मांडला.

·         द्रव्य हे अणूंचे बनलेले असते. अणू म्हणजे द्रव्याचे अविभाजनीय असे लहानात लहान कण होत.

·         अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात.

·         इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून 1800 पट हलक्या कणांचा शोध लावला.

·         सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप मांडले.

·         सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले.

·         सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्‍या पद्धतीने करण्यात आले.

·         अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत.

·         केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.

·         केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो.

·         पूर्वी अणूत्रिज्येसाठी अॅगस्ट्रोम (A० = 10 -8 cm) हे एकक वापरात होते. आता अॅगस्ट्रोमच्या जागी पिकोमीटर (pm) हे एकक वापरात आहे.
(1 pm = 10 -12 m)

·         अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खास असे अणूवस्तुमान एकक डाल्टन वापरले जाते. (u)

·         इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश e असा करतात.

·          

·         इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859 u आहे.

·         प्रोटॉन हा धनप्राभरित मूलकण असून त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात.

·         न्युट्रॉन हे विधूतप्रभारदृष्टया तटस्थ असलेले मूलकण आहेत.

·         भ्रमणकक्षा (कवच) मध्ये सामावणार्याल इलेक्ट्रॉनची अधिकतम संख्या

·         KLMN या या कावचांमध्ये 2, 8, 18, 32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत नाहीत. मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू शकतात.

·         K कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी असते.

·         हेलियम, निऑन यांसारखी काही थोडी मूलद्रव्ये कोणत्याही अणुबरोबर संयोग न पावता मुक्त अशा अनुस्थिती मध्येच अस्तित्वात असतात.

·         अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा असे म्हणतात.

·         संयुजा हा अणूचा मूलभूत रसायनिक गुणधर्म आहे.

·         अणूच्या बाहयतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात.

·         ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूची संयुजा शून्य असते.

·         बारा न्यूक्लिऑन असलेल्या कार्बन अणूचे जे वस्तुमान त्याच्या 1/12 एवढे वस्तुमान म्हणजे एक अणुवस्तुमान एकक (a.m.u.) होय.

·         अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शविला जातो.

·         एखाद्या अणुमधील एकूण प्रोटॉनच्या संखेला अणुअंक म्हणतात व तो Z या संज्ञेने दर्शविला जातो.

·         सारखाच अणुअंक परंतु वेगळा वस्तूमानांक असणार्या  अणूंना असस्थानिक असे म्हणतात.

·         हायड्रोजन च्या इतर दोन समस्थानिकांना स्वतंत्र नावे असून ती ड्युटेरियम व ट्रिटियम अशी आहेत.

·         क्लोरीनचे सरासरी अणुवस्तुमान 35.5 एवढे आहे.

·         रेणूवस्तुमानालाच पूर्वी रेणुभार म्हणत. एकक u

·         अणु व रेणूंची सापेक्ष संख्या समजण्यासाठी वैज्ञानिकांनी ग्रॅम मोल ही संकल्पना विकसित केली.

·         पदार्थाच्या एक ग्रॅम मोल एवढ्या राशीत असणार्यार रेणूंच्या संख्येसाठी N ही संज्ञा वापरतात. या वैशिष्ट्यपूर्ण संख्येला 'अॅव्होगड्रोअंक' असे म्हणतात.

·         आजपर्यंत माहीत असलेली एकूण मूलद्रव्ये जवळपास 116 आहेत.

·         मूलद्रव्याच्या व्यवस्थितरीत्या केलेल्या मांडणीलाच 'वर्गीकरण' म्हणतात.

·         मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुभारांकांचे आवर्तीफल असतात.

·         गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्थानांतरणीय गती, घर्णून गती, दोलन गती.

·         स्थानांतरणीय गती एकरेषीय असू शकते किवा तिचा मार्ग वक्राकारही असू शकतो.

·         अंतर ही अदिश राशि आहे तर विस्थापन ही सदिश राशि आहे.

·         ज्या भौतिक राशींचे मापन दुसर्याप राशींवर अवलंबून नसते त्यांना मूलभूत राशि असे म्हणतात. उदा. लांबी, वस्तुमान, वेळ, इ.

·         एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास त्या वस्तूची चालकिंवा 'सरासरी चाल' असे म्हणतात.

·         एखाधा वस्तूने एकक काळात एखाधा विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास त्या वस्तूचा वेग अथवा सरासरी वेग म्हणतात.

·         वेगामधील बदलाचा दर म्हणजे त्वरण होय.

·         जर वस्तूच्या वेगात वाढ होत असेल तर त्या वस्तूचे त्वरण धन (+ve) असते. जर वस्तूचा वेग कमी होत असेल तर त्वरण (-ve) ऋण असते.

·         जी भौतिकराशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्ण व्यक्त करता येते तिला अदिश राशीकिवा 'अदिश' असे म्हणतात.

·         अदिश राशींची बेरीज-वजाबाकी अंकगणिताचे नियम वापरुन करता येते.

·         अदिश राशी-व्स्तुमान, चाल, कार्य, आकारमान, घनता, वेळ, अंतर, ऊर्जा.

·         जी भौतिक राशी पुर्णपणे व्यक्त करण्यासाठी तिचे परिणाम व दिशा या दोन्हींची आवश्यकता असते तिला सदिश राशीकिंवा 'सदिश'असे म्हणतात.

·         सदिश राशी विस्थापन, वेग, त्वरण, बल, गती, वजन

·         सदिश राशी दर्शविण्यासाठी डोक्यावर बाण काढलेल्या चिन्हाचा वापर केला जातो.

·         गतीविषयक तीन समीकरणे     

1.    v = u + at          
           

2.    s = ut + ½ at2       
                

3.    v2 = u2 + 2as

·         एखाधा वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असलेली भौतिक राशी म्हणजे 'बल'होय.

·         प्रत्येक वस्तू तिच्या गतिमान अवस्थेतील बदलाला म्हणजेच त्वरणाला विरोध करते. विरोध करणार्यााच्या या वृत्तीला 'जडत्व' असे म्हणतात.

·         वस्तूमान आणिवेग यांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात.

·         संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशीने होते.

·         एकक वस्तुमानात एकक त्वरण निर्माण करणार्याी बलास एकक बल असे म्हणतात.

·         MKS पद्धतीने 1kg वस्तूमान 1 m/s2 त्वरण निर्माण करणार्याह बलास एक न्यूटन बल असे म्हणतात.

·         एखाधा वस्तुमानावरील कार्यरत बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानास व तिच्यावरील परिणामी त्वरण सामानुपाती असते.

·         प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदा. रॉकेट किंवा अग्निबाण.

·         दोन वस्तूंची टक्कर झाली तर या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो.

·         निसर्गात आढळणार्यां आणि परस्परांपासून भिन्न असणार्याए सर्व बलांचे चार मुख्य प्रकार आहेत.

1) गुरुत्वबल,

 

2) विधूत चुंबकीय बल,

 

3) केंद्राकीय बल,

 

4) क्षीण बल,

 

·         सर्वांसाठी न्यूटन (N) हे एकक वापरले जाते.

·         न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.

·         प्रयुक्त आकर्षणबलास गुरुत्वबलम्हणतात.

·         पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते.

·         विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कोठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. 

हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानूपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या वस्तानुपाती असते.

·         G चे मूल्य सर्व वस्तूंसाठी सारखेच आहे. म्हणून G ला 'विश्वगुरुत्व स्थिरांक' म्हणतात.

·         G चे मूल्य 6.67×10-11 Nm2/kg2 आहे.

·         पृथ्वीचे वस्तुमान M=6×1024kg आहे. सरासरी त्रिज्या R=6400 km आहे.

·         एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.

·         वस्तूचे वजन हे तिच्यावर कार्यरत पृथ्वीचे गुरुत्वबल होय.

·         एखाधा वस्तूचे वस्तूमान म्हणजे त्या वस्तूत सामावलेल्या एकंदर द्रव्याची राशी होय.

·         कोणत्याही वस्तूंवर कार्यरत गुरुत्वत्वरण किंवा गुरुत्वबल विषुववृत्तापेक्षा ध्रुवावर जास्त असते.

·         गुरुत्व त्वरणचे मूल्य ध्रुवावर 9.83m/s2 तर विषुववृत्तावर 9.78 m/s2 आहे.

·         सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवण्यार्‍या/ बलास विधूतचुंबकीय बल असे म्हणतात.

·         विधुत चुंबकीय बल गुरुत्व बलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे.

·         विधुत चुंबकीय बलाचे परिणाम साधारणपणे गुरुत्वाबलाच्या 1039 पट आहे.

·         केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.

·         इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन यांच्या होणार्याध अन्योन्य क्रियांमध्ये प्रयुक्त होणारे बल क्षीण बल म्हणून ओळखले जाते.

·         एखाधा वस्तूवर क्रिया करणार्याॉ बलामुळे त्या वस्तूचे बलाच्या दिशेने विस्थापन झाले तरच कार्य झाले असे म्हणतात.

·         SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन तर विस्थापनाचे एकक मीटर व कार्याचे एकक ज्यूल (Joule) आहे.

·         CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर तर कार्याचे एकक अर्ग आहे.

·         1 Joule = 107 अर्ग.

·         एखाधा पदार्थात असलेली कार्यकरण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा.

·         ऊर्जेची विविध रुपे यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विधुत चुंबकीय, रासायनिक, औष्णिक, सौर, इ.

·         पदार्थाच्या गतीमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या उर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात.

·         KE = ½ mv2

·         पदार्थाच्या विशिष्ठ स्थितीमुळे किंवा आकारामुळे त्यात जी ऊर्जा समावलेली असते, तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. उदा. डोंगरावरील दगड, धरणातील साठविलेले पाणी.

·         दोर्याेची लांबी जास्त असेल तर दोलनकाल जास्त असतो आणि वारंवारता कमी असते.

·         ज्या सरल दोलकाचा दोलनकाल 2 सेकंद असतो त्याला सेकंद दोलक असे म्हणतात.

·         दोलनकाल T = 2π √e/g या समीकरणाने काढता येतो.

·         सूर्याच्या केंद्रकाचे तापमान 107 k(Kelvin) आहे असे अनुमान आहे.

·         एखाधा पदार्थात उष्णतेची असलेली पातळी म्हणजेच तापमान.

·         वैधकीय तापमापीवर सेल्सियस अशांमध्ये 35 ते 42 पर्यंत खुणा असतात.

·         केवल मापनश्रेणीची सुरुवात सर्वात कमी तापबिंदुपासून होते. या तापमानाला रेणूंची गती थांबते, म्हणून या बिंदुला केवल शून्य असे म्हणतात. त्याचे मुल्य – 2730 K एवढे असते.

·         केवल मापनश्रेणी म्हणजेच केलव्हीन मापन श्रेणी होय. या मापन श्रेणीवर पाण्याचा गोठणबिंदु हा 273 k व उत्कलनांक असे म्हणतात.

·         ज्या स्थिर तापमानाला द्र्वपदार्थाचे वायुरूपस्थितीत रूपांतर होते, त्या तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात.

·         द्र्वावरील दाब कमी केला की उत्कलनांक कमी होतो व दाब वाढविला की उत्कलनांक वाढतो.

·         विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण जास्त असेल तर त्या पदार्थाच्या द्रवनांक कमी होतो.

·         अमोनियम नायट्रेट व सोडीयम सल्फेट यांचे मिश्रण 5:6 या प्रमाणात घेतल्यास मिश्रणाचे तापमान – 100C पर्यंत खाली येते.

·         बर्फ व मीठ यांच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाचे तापमान – 230 से. पर्यंत खाली येते.

·         द्र्वामध्ये विद्राव्य क्षार विरघळला असेल तर त्याचा उत्कलनांक वाढतो.

·         बाष्पीभवनाचा दर हा द्र्वाच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाशी समप्रमाणात असतो.

·         अभिसरणामुळे खारे वारे व मतलई वारे निर्माण होतात.

·         विधुत चुंबकीय तरंगाच्या स्वरुपात व द्रव्य माध्यमाच्या शिवाय होणार्‍या उष्णतेच्या स्थानांतरणास प्रारण असे म्हणतात.

·         गोलीय आरसा ज्या गोलापासून बनविला आहे, त्या गोलाच्या केंद्रबिंदूला (C) आरशाचे वक्रता केंद्र म्हणतात.

·         बहिर्वक्र आरशाला अपसारी आरसा असेही म्हणतात.

·         ज्या प्रतिमेतून प्रकाशाचे वास्तव अभिक्रमन होते व तेथून पुढे प्रकाश अपसृत होतो ती वास्तव प्रतिमा तर ज्या प्रतिमेतून प्रकाश अपसृत होण्याचा भास होतो ती आभासी प्रतिमा.

·         वाहनाच्या चालकासाठी बहिर्वक्र आरसा असतो.

·         बहिर्वक्र आरशाने वस्तूपेक्षा लहान व सुलट प्रतिमा तयार होतात.

·         दाढी करताना वापरावयाचा आरसा हा अंतर्वक्र आरसा असतो.

·         या आरशामध्ये सुलट आणि मोठी प्रतिमा दिसते आणि दाढी करणे सोयीचे होते.

·         प्रकाशाच्या आपतन दिशेतील सर्व अंतरे धन तर विरुद्ध दिशेतील अंतरे ऋण मोजली जातात.

·         वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या असतात. म्हणजे प्रकाशाची अपतनाची दिशा डावीकडून उजवीकडे असेल.

·         आरशापासून वस्तूचे अंतर u आणि प्रतिमेचे अंतर v यांचे आरशाचे नाभीय अंतर व वक्रता त्रिजेशी संबंध दर्शविणारे सूत्र म्हणजेच आरशाचे सूत्र होय.

·         सूत्र : 1/u + 1/v = 1/f =2/R

·         बहिर्वक्र आरशाने नेहमीच सुलट आणि आभासी प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा लहान असते.

·         अंतर्वक्र आरशासमोर त्याच्या नाभीय अंतरापेक्षा कमी अंतरावर वस्तू ठेवल्यास तिची आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा मोठ्या आकाराची प्रतिमा दिसते.

·         जर वस्तूचे आरशापासूनचे अंतर नाभीय अंतरापेक्षा जास्त असेल तर मात्र आंतरर्वक्र आरशाने वास्तव व उलटी प्रतिमा तयार होते.

·         रशियाचा युरी गागरीनहा अवकाशात जाणारा पहिला मानव होता, तर अमेरिकेचा नील आर्मस्ट्रॉगयाने चंद्रावर सर्वप्रथम पाय ठेवला.

·         स्वादुपिंड इन्सुलिनची निर्मिती करते.

·         अब्जांशी तंत्रज्ञान म्हणजे एक किंवा अधिक अणू किंवा रेणू यांची रचना, मांडणी वापरुन अत्यंत सूक्ष्म असे नवीन पदार्थ, आकार किंवा उपकरणे तयार करणे.

·         एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा अब्जावा भाग होय.             

·         1 nm = 1 m अब्जावा.

 (भाग 2) :

·         हेलिअम (He), नियॅान (Ne), आरगॅान (Ar) यांच्या सारखे निष्क्रिय वायू किंवा राजवायू मुक्त अवस्थेत आढळून येतात.

·         हायड्रोजन(H), ऑक्सिजन(O), क्लोरीन(CI), सोडियम (Na), मॅग्नेशिअम (Mg) इ. मूलद्रव्ये रेणू किंवा संयुगाच्या रुपात आढळतात.

·         राजवायूंच्या बाहयतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असून त्यांच्या बाहयतम कक्षा पुर्णपणे भरलेल्या आहेत. त्या कक्षांना अष्टक म्हणतात.

·         राजवायूंव्यतिरिक्त इतर सर्व मूलद्रव्यांच्या बाहयतम कक्षा अपूर्ण असतात.

·         रासायनिक बदलात धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची तर आधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची अथवा भागीदारी करण्याची प्रवृत्ती असते.

·         ऋणभारीत इलेक्ट्रॉन दिल्यामुळे धनप्रभारीत आयन तयार होतो. त्याला कॅटायन असे म्हणतात.

·         इलेक्ट्रॉन दिल्यानंतर सोडीयमच्या इलेक्ट्रॉनी संरूपणात बदल होऊन तो निऑन (Ne) या निकटतम निष्क्रिय वायूंचे स्थायी इलेक्ट्रॉनी संरूपन प्राप्त करतो.

·         ऋणप्रभारित आयनास अॅनायन (Anion) असे म्हणतात.

·         रेणूंमध्ये अणूंना एकत्र धरून ठेवण्यास जी आकर्षण शक्ती जबाबदार असते त्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध म्हणतात.

·         एका अणूपासून दुसर्‍या अणुकडे इलेक्ट्रॉनच्या स्थानांतरणामुळे तयार होणार्‍या) रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विधुत संयुज बंध म्हणतात.

·         Na C1 स्वतंत्रपणे धोकादायक असले तरी त्यांचे संयुग मीठ (NaC1) सुरक्षित आहे.

·         सारख्याच किंवा एका मूलद्रव्यापासून तयार होणारी संयुगे दोन आणूमधील देवघेवीमुळे तयार होत नाहीत, तर संयोग पावणार्याद अणूमध्ये होणार्‍या N इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तयार होतात. या बांधाला 'सहसंयुज बंध' असे म्हणतात.

·         जेव्हा रेणुमधील दोन अणूमध्ये एकाच इलेक्ट्रॉन जोडीची भागीदारी होऊन बंध तयार होतो. त्या बांधाला एकेरी बंध असे म्हणतात.

·         मिथेन रेणुमध्ये C-H असे चार एकेरी बंध असतात.

·         जेव्हा रेणूंच्या दोन अणूमध्ये दोन इलेक्ट्रॉनच्या जोडयाची भागीदारी होते, तेव्हा ते दोन अणू दुहेरी बंधने बांधले जातात. उदा. इथिलीन (C2H4)

·         जेव्हा दोन अणूमध्ये तीन इलेक्ट्रॉनच्या जोड्यांची भागीदारी होऊन तीन बंध तयार होतात त्याला 'तिहेरी बंध' म्हणतात. उदा. अॅसीटिलीन (C2H2) H-C     

·         सामाईक इलेक्ट्रॉनना स्वत:कडे आकर्षित करण्याच्या अणूच्या क्षमतेला या मूलद्रव्याची विधुतऋणता म्हणतात.

·         आयनिक संयुगे पाण्यात विरघळल्याने आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला विचरण असे म्हणतात.

·         शुद्ध पाणी विजेचे दुर्वाहक असते.

·         रेणूपासून आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला आयनीभवण असे म्हणतात.

·         अणुने किंवा अणूंच्या गटाने एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन दिले असता किंवा घेतले असता तयार होणार्याय आयनांना 'मुलक' असे म्हणतात.

·         धन आयन किंवा मुलके यांनाच कॅटायन (cation) किंवा आम्लारिधर्मी मुलके असे देखील म्हणतात. उदा. Na+, k+, Mg2+, A13+, NH4+

·         ऋण आयन किंवा मुलके यांनाच अॅनायन किंवा आम्लधर्मी मुलके असे देखील म्हणतात. उदा. C1-, S2-, SO42-, CO32-

·         साधे मुलक एका अणूपासून बनलेले असते व ते धनप्रभारीत किंवा ऋण प्रभारित असते. उदा. K+, Ca2+, A13+, C1-, O2-, N3- इ.  

·         संयुक्त मुलकांमध्ये अणूंचा गट असतो व तो गट दोन किंवा अधिक प्रकारच्या अणूपासून तयार झालेला असतो ते धन प्रभारित व ऋण प्रभारित व ऋण प्रभारित असतात उदा. CO23-, NH4+

·         पदार्थामध्ये होणार्‍यात ज्या बदलात त्याचे फक्त भौतिक गुणधर्म बदलतात कोणताही नवा पदार्थ तयार होत नाही आणि मूळ पदार्थ सहजासहजी परत मिळतो अशा बदलास भौतिक बदल म्हणतात.     

·         उदाहरणे- मीठ पाण्यात विरघळते, पाण्याचे बर्फात रूपांतर होणे, पाण्याचे वाफेत रूपांतर होणे, इ.

·         ज्या बदलामध्ये भाग घेणार्या् पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते व नवीन तयार झालेल्या पदार्थाचे गुणधर्म हे मूल पदार्थांपेक्षा पुर्णपणे वेगळे असतात, अशा बदलाला रासायनिक बदल म्हणतात.

·         उदाहरणे स्वयंपाकाचा गॅस जळणे, केरोसिन जळणे, दुधापासून दही होणे, अन्नपदार्थ आंबणे, अन्नपदार्थाचे पचन होणे.

·         ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता मुक्त होते त्यांना उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात.

·         ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता शोषली जाते तिला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात.

·         रासायनिक अभिक्रिया म्हणजे अभिक्रियांचे तपशीलवार विवेचन होय.

·         समीकरणाच्या डाव्या बाजूस अभिक्रियाकारके व उजव्या बाजूस उत्पादिते लिहावीत.

·         संतुलित समीकरणामध्ये अभिक्रिया कारके व उत्पादिते यांच्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या दोन्ही बाजूला सारखी असते.

·         ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून फक्त एकच उत्पादित मिळते अशा अभिक्रियांना 'संयोग अभिक्रिया' म्हणतात.

·         ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच संयुगापासून दोन किंवा अधिक साधे पदार्थ मिळतात त्या अभिक्रियेला 'अपघटण अभिक्रिया' म्हणतात.

·         एखाधा पदार्थातील अणू किंवा अनुगट, दुसर्‍या पदार्थातील अणू किंवा अनुगट यांची जागा घेऊन नवीन पदार्थ तयार करत असतील, तर अशा अभिक्रियांना 'विस्थापन अभिक्रिया' असे म्हणतात.

·         ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन संयुगांच्या घटकाची आपापसात अदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे तयार होतात अशा अभिक्रियांना 'दुहेरी अपघटण' अभिक्रिया म्हणतात.

·         ज्या रासायनिक अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी जास्त कालावधी लागतो अशा अभिक्रियांना 'मंद अभिक्रिया' म्हणतात. उदा. भाजीपाला कुजणे, लोखंड गंजणे, दही होणे.

·         ज्या रासायनिक अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी खूपच कमी कालावधी लागतो. त्यांना शीघ्र अभिक्रिया म्हणतात. उदा. ब्लिचिंग पावडरची प्रक्रिया.

·         रासायनिक अभिक्रियेत, अभिक्रियाकारकांच्या उत्पादित संहतीमध्ये एकक कालावधीत घडून येणारा बदल म्हणजेच रासायनिक अभिक्रियेचा वेगहोय.

·         अभिक्रिया कारकांचे  स्वरूप किंवा क्रियाशीलता रासायनिक अभिक्रियांच्या वेगावर परिणाम करते.

·         रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार्यां अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा वेग जास्त असतो.

·         अभिक्रियेचे तापमान वाढविल्यास अभिक्रियेचा वेगदेखील वाढतो.

·         ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो/बदलतो परंतु त्या पदार्थांमध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थांना उत्प्रेरक असे म्हणतात.

·         उत्प्रेरकामुळे रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढतो किंवा ती प्रक्रिया कमी तापमानाला होते.

·         अपमार्जकांमध्ये (Detergent) विकारांचा (Enzymes) उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात.

·         आपले स्नायू, त्वचा, केस यांची जडणघडण करणारे प्रोटीन म्हणजे कार्बणी संयुगे असतात.

·         आपला अनुवंशिकीय वारसा ठरविणारी RNA DNA ही न्यूक्लिइक आम्ले कार्बन संयुगे असतात.

·         आपण खातो ते अन्न घटक म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन मेदयुक्त पदार्थ व जीवनसत्वे ही कार्बन संयुगे असतात.

·         सुगंधी द्रव्ये, जीवाश्म इंधने, औषधे व कीटकनाशके, प्लॅस्टिक व रंजकद्रव्ये अशा विविध प्रकारच्या द्र्व्यामध्ये कार्बनसंयुगे असतात.

·         कापूस, रेशीम, लोकर, पॉलिस्टर, टेरिलीन, नायलॉन यांसारखे आपल्या वस्त्रांचे धागे हे कार्बन संयुगांचेच बनलेले असतात.

·         आपले जीवन कार्बनया मूलद्रव्यावर आधारलेले आहे.

·         कार्बन संयुगांची विविधता प्रचंड आहे. त्यांचा विस्तार एकच कार्बन अणू असलेल्या मिथेनपासून ते अब्जावधी कार्बन अणू असलेल्या डी.एन.ए. पर्यंत पसरलेला आहे.

·         कार्बनचा अणूअंक 6 असून त्यातील इलेक्ट्रॉनचे कवचनिहाय वितरण 2, 4 असे आहे.

·         कार्बनची संयुजा 4 आहे.

·         कार्बनकडे मालिका बंधन शक्ति असून त्याच्या खूप लांब साखळ्या बनू शकतात.

·         म्हणून कार्बनची संयुगे मोठया प्रमाणावर तयार होतात व त्यामुळे कार्बन हे अव्दितीय मूलद्रव्य ठरते.

·         बहुसंख्य कार्बन संयुगामध्ये सर्वसाधारणपणे आढळणारे मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन. सर्वात साध्या कार्बन संयुगामध्ये फक्त कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात. 

त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात.

·         कार्बनच्या चार संयुंजांचे समाधान चार स्वतंत्र अनुंशी एकेरी बंध करून झालेले असते. अशा हायड्रोकार्बनना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात.

·         दुसर्‍या प्रकारात हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणू एकमेकांशी बहुबंधाने जोडलेले असतात.

·         बहुबंधामधील कार्बन अणू हे त्या रेणुमधील इतर कार्बन अणूंपेक्षा वेगळे असतात.

·         मिथेन हा सर्वात साधी संरचना असलेला हायड्रोकार्बन असून त्याच्या रेणूत केवळ एकच कार्बन अणू असतो.

·         इंधन खाणी, कोळसा खाणी, गोबर गॅस व बायोगॅस मध्ये दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन असतो.

·         ज्वलनशीलतेमुळे मिथेनचा इंधन म्हणून वापर केला जातो.

·         हायड्रोजन व अॅसिटिलीन वायूंचे औधोगिक उत्पादन मिथेनपासून मिळते.

·         इथेन हा संतृप्त हायड्रोकार्बन आहे.

·         इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटाच्या किन्वण प्रक्रियेने मिळविले जाते.

·         इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटांच्या किन्वन प्रक्रियेने मिळविले जाते.

·         पॉलिथिन हे इथिलीन पासून बनविले जाते.

·         अॅसीटिलीन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे.

·         ऑक्सिअॅसिटिलीन च्या ज्योतीचे तापमान नैसर्गिक वायू किंवा हायड्रोजन वायूंच्या जोतीपेक्षा जास्त असते.

·         PVC या बहुवारिकाच्या उत्पादनासाठी लागणार्याग कार्बन संयुगाच्या आधौगिक उत्पादनासाठी अॅसिटीलीन वापरला जातो.

·         सजीवांमधील रुपिकीय आणि कार्यरूपी विचरणास जीवनसृष्टीची विविधताअसे म्हणतात.

·         वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समुहांना वर्गेकक (Taxa) असे म्हणतात.

·         वर्गीकरणामधील पदानुक्रमात वर्गेककांचा स्तर पुढील प्रमाणे असतो. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, विभाग, संघ.

·         वनस्पतीमधील सर्वात उच्च स्तरीय वर्गेककास विभागम्हणतात. तर प्राण्यातील सर्वोच्च स्तरास संघ (phylum) म्हणतात.

·         सर्वात उच्चस्तरीय वर्गेकक म्हणजे सृष्टी’(Kingdom).

·         सर्व सजीवांची नावे दोन शब्दांच्या समूहाने दर्शवितात. प्रथम नावास प्रजाती नाम तर दुसर्‍या नावास जाती नाम म्हणतात.

·         मनुष्यप्राण्याचे वैज्ञानिक नाव 'होमो-सेपियन्स' असे आहे.

·         ही व्दींनामसूत्रीय नामकरण पद्धती कॅरोलस लिनियास ने शोधली.

·         अॅरिस्टॉटल आणि त्याच्या शिष्य थिओफ्रस्टस यांनी प्रथमच व्दिसृष्टी पद्धतीने वनस्पति व प्राणी यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयन्त केला.

·         आर.एच.व्हीटावर यांनी पंचसृष्टी पद्धती अस्तित्वात आणली.

·         चयापचयी क्रिया अभ्यासणारी शाखा म्हणजे 'शरीरक्रिया शास्त्र'.

·         सस्तन प्राण्याच्या शरीरामध्ये आढळणारे हिमोग्लोबिन हे एक प्रथिन आहे.

·         मानव आणि गोरीला यांच्या हिमोग्लोबिनच्या रेणुच्या संरचनेत फक्त एका अमिनो आम्लाचा फरक असतो.

·         मानव व र्हीसस माकड यांच्या हिमोग्लोबीन रेणुच्या संरचनेत चार अमिनो आम्ले असतात.

·         एखाधा सजीवाच्या भ्रूणापासूनच्या विकासाच्या अभ्यासास 'भ्रोणिकी' (Embroyology) असे म्हणतात.

·         मासा, कासव, पक्षी, डुक्कर, मानव यांचे भ्रूण प्रारंभिक अवस्थेत समान असतात.

·         स्वसंरक्षण यंत्रणेशी निगडीत रक्त गुणधर्माचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा म्हणजे रक्तद्रव्यशास्त्र होय.

·         वर्गीकरणाची अत्याधुनिक पद्धती डी.एन.ए., आर.एन.ए. आणि प्रथिने या जैवरेणूच्या अभ्यासवर आधारित आहे.

·         तंतुरूपी कवकांना बुरशीम्हणतात. उदा. पेनिसिलियम, म्युकर

·         एकपेशीय कवकांना किन्वअसे म्हणतात. उदा. सॅकरोमायासिस.

·         ज्या संरचनेत निलहरित जीवाणू आणि शैवाल यांपैकी एक सजीव कवकाबरोबर सहजीवन जगतो, त्यांना शैवाक असे म्हणतात.   
 

·         उस्निया या शैवकाचा उपयोग मसाल्यात केला जातो. (Lichens)

·         जीवाणू हे सूक्ष्मदर्शीकीय एकपेशीय सजीव आहेत. त्यांना आदिकेंद्रकी सजीव असे म्हणतात.

·         हरिता (Mass) या वनस्पतीमद्धे संवहनी संस्थेचे कार्य करणारे संवहनी पट्ट असतात.

·         बीजाणुधानींच्या समुहास 'शंकू' असे म्हणतात. उदा. इक्किसेटम.

·         फिलिसिनी हा वनस्पतींचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वनस्पतींना 'नेचे' असे म्हणतात.

·         निलवर्णीय देवमाशामध्ये प्राणी हे सुमारे ३५ मी. लांबी एवढे प्रचंड असतात.

·         संघ प्रोटोझुआ अमिबा, एंटामिबा, प्लाझामोडियम, पॅरॅमेशिअम, युग्लिना, इ.

·         प्लाझामोडियम हा परजीवी आदिजीवी मानवाच्या तांबडया पेशीमध्ये आढळतो.

·         प्लासमोडियममुळे मलेरिया हा रोग होतो. माध्यम अॅनाफेलीस डासाची मादी.

·         संघ पोरीफेराची उदाहरणे- सायकोण, युस्पांजिया (आंघोळीचा स्पंज), हायलोनिमा.

·         हायड्रा हा दंडाकृती आकाराचा गोडया पाण्यात आढळणारा सिलेंटरेट आहे.

·         चपटे कृमी उभयलिंगी असतात.

 प्राणी सृष्टी

·         पेशींच्या संघटित समुच्चयाला उती असे म्हणतात.

·         वनस्पतीमध्ये उतीचे दोन प्रकार आढळतात. विभाजी उती आणि स्थायी उती.

·         संयोजी उती या इंद्रिये आणि इतर उतींना एकत्र बांधून ठेवतात.

·         स्नायू उती हालचालीसाठी असतात.

·         फुलांचे निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग असे चार भाग असतात.

·         दृश्य केंद्रकी पेशींमध्ये सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक असतो तर आदि केंद्रकी पेशीमध्ये मात्र सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक नसतो.

·         जिवाणू पेशी ही आदिकेंद्रकी पेशी आहे.

·         सर्वे शैवाले, कवके, प्रोटोझुआ, वनस्पती आणि प्राणी ही दृश्य केंद्रकी पेशींची उदाहरणे आहेत.

·         डी.एन.ए. हा एकरेषीय व्दिसपीर्ल मोठया आकाराचा रेणू असून तो दोन बहुन्यू क्लिओटाइडसच्या धाग्यापासून तयार होतो.

·         डी.एन.ए. चे मुख्य कार्य म्हणजे जननिक माहितीचे जणूकाच्या रूपात संग्रहण करणे होय.

·         आर.एन.ए. हा सुद्धा बहुन्यूक्लिओटाइडसचा रेषीय रेणू असतो.

·         कुठल्याही जातीसाठी गुणसुत्रांची संख्या कायम असते.

·         मानवमध्ये 46 गुणसत्रे असतता.

·         तंतुकनिकेची लांबी साधारणपणे 1.5 ते 10 um तर रुंदी 0.25 ते 1.00 um यांच्या दरम्यान असते.

·         तंतुकनिकेची मुख्य कार्य म्हणजे ऊर्जानिर्मिती करून ती ए.टी.पी. रूपात साठवून ठेवणे.

·         तंतुकनिकांना पेशींचे ऊर्जाकेंद्र असे म्हणतात.

·         केंद्रकाच्या आधारद्र्व्यास केंद्रक द्रव्य म्हणतात. यामध्ये क्रोमॅटिन असते.

·         ज्या पोषणपद्धतीमध्ये प्रकाशाचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो, त्यास प्रकाश संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात.

·         वरील उदाहरणे सर्व वनस्पती, शैवाले, युग्लिना, काही जीवाणू.

·         प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत रेन्विय प्राणवायूची मुक्तता होते.

·         ज्या पोषणपद्धतीत अकार्बनी रसायानांचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो त्यास रसायन संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात.

·         उदा. नायट्रोफाईंग जीवाणू, लोह उपचयनी जीवाणू, गंधक उपचयनी जीवाणू

·         पिचर प्लँट, निपेंथस, सनड्यू (ड्रोसेरा) यासारख्या किटकाहारी वनस्पती त्याच्या नत्रयुक्त आणि प्रथिन गरजांसाठी कीटक व इतर सूक्ष्म प्राण्यांवर अवलंबून असतात.

·         आपल्या अन्न गरजपूर्तीसाठी दुसर्यार सजीवांवर अवलंबून असणारे सजीव परपोषी म्हणून ओळखले जातात. उदा. प्राणी, कवके, बहुकेत जीवाणू.

·         विकरे ही विविध प्रकारची प्रथिने असून पचनसंस्थेच्या विविध अंगांव्दारे त्यांची निर्मिती व स्त्रवण होते.

·         मृतोपजीवी पोषण गट अनेक कवके (किन्व, बुरशी आणि छत्रकवके) जीवाणू.

·         बाह्यपरजीवी गोचिड, डास, ढेकूण, उवा किंवा जळू अमरवेल, बांडगुळ.     

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती 

·         सृष्टी -प्राणी

·         उपसृष्टी - मेटाझुआ

विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी

संघ

1.    प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.

2.    पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा

3.    सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन

4.    प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

5.    नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म

6.    अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस

7.    आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी

8.    मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय

9.    इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर

10. हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी

संघ - कॉर्डाटा

उपसंघ -

1.    युरोकॉर्डाटा - अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा

2.    सेफॅलोकॉर्डाटा - अॅम्फीऑक्सस

3.    व्हर्टीब्रेटा -

·         वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा - पेट्रोमायझॉन , मिक्झीन

·         वर्ग 2- पायसेस - डॉगफिश. रोहू

·         वर्ग 3- अम्फिबिया - बेडूक , टोड

·         वर्ग 4- रेप्टीलीया - कासव , पाल

·         वर्ग 5- एवज - पोपट , बदक

·         वर्ग 6- मॅमॅलिया - वटवाघूळ, खार, मानव

विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी

संघ : प्रोटोझुआ -

·         हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.

·         पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.

·         प्रजनन - व्दिविभाजन, बहुविभाजन

·         उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम

अमिबा -

·         गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात.

·         आकार अनियमित असतो.

प्लाझमोडीयम -

·         अंत:पेशीय रक्तशोषी परजीव

·         मानवाच्या पांढऱ्या पेशीत

·         मालेरीयास कारणीभूत असतो.

·         अॅनाफेलीस मादिकडून प्रसार होतो.

संघ : पोरीफेरा -

·         शरीरावर असंख्य छिद्रे असतात.

·         त्यांना ऑस्टिया म्हणतात.

·         सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.

·         प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी

·         उदा. सायकॅन , युस्पॉजिया

संघ : सिलेंटराटा -

·         समुद्रात आढळतात.

·         अरिय सममित व व्दिस्तरिय

·         देह गुहा असते.

·         शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.

·         प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.

·         उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश

संघ : प्लॅटीहेल्मिन्थीस -

·         शरीर रिबीन प्रमाणे चपटे , त्रिस्तरीय , व्दिपार्श्व सममित असते.

·         पोशिंद्याला चिकटून राहण्यासाठी अधरचूशक

·         अन्नद्रव्ये शोषून घेण्यासाठी मुखचुषक असतात.

·         बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात.

·         उदा. प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

संघ : नेमॅटहेल्मिन्थीस -

·         शरीर लांबट , बारीक आणि दंडाकृती असते.

·         त्यांना गोलाकृमी म्हणतात.

·         अंत:परजीवी व एकलिंगी असतात.

·         माणसात रोगानिर्मिती करतात.

·         उदा.  अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म , पिनवर्म

संघ : अॅनिलीडा -

·         लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात.

·         त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.

·         लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा. गांडूळ , लीच , नेरीस

संघ : आथ्रोपोडा -

·         प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ

·         प्रचालानासाठी संधीयुक्त उपांगे असतात.

·         त्रिस्तरीय व्दिपार्श्व, सममित

·         शरीर खंडीभूत ,त्यावर कायातीन युक्त आवरण असते.

·         एकलिंगी असून लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा. खेकडा , झुरळ , कोळी , मधमाशी , डास, विंचू , गोम

संघ : मोलुस्का -

·         प्राण्यातील दुसरा मोठा संघ

·         बहुसंख्य जलचर असून शरीर अखंडित , मृदू , कवचाने , अच्छादलेले , त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित/ असममीत असते.

·         हे प्राणी एकलिंगी असतात.

·         उदा. शंख , शिंपला , गोगलगाय

संघ : इकायानोडर्माटा -

·         फक्त समुद्रातच आढळतात.

·         त्रिस्तरी , एकलिंगी

·         कॅल्शीयम कार्बोनेटचे कठीण कवच असते.

·         पुनरुदभवन क्षमता असते.

·         उदा . तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर

संघ : हेमिकॉर्डाटा -

·         प्रामुख्याने सागरनिवासी

·         शरीर मृदू , अखंडित ,त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित

·         फक्त भृणवस्थेत पृष्ठरज्जूंचे अस्तित्त्व असते.

·         शरीराचे तीन भाग - सोंड , कॉलर , प्रकांड

·         श्वसनासाठी कल्लाविदरे असतात.

·         लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा . बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी

संघ - कॉर्डाटा

·         शरीरास आधार देणारा पृष्ठरज्जू असतो.

·         विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत पृष्ठरज्जू असतो.

·         चेतारज्जू एकच असून पृष्ठबाजूस नालीसारखा पोकळ असतो.

·         ह्दय अधर बाजूस असते.

उपसंघ : युरोकॉर्डाटा -

·         कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी

·         सागरनिवासी.

·         उभयलिंगी.

·         उदा. अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा

सेफॅलोकॉर्डाटा -

·         पृष्ठरज्जू संबध शरीराच्या लांबीइतका असतो.

·         ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदरे असतात.

·         एकलिंगी.

·         उदा. अॅम्फीऑक्सस

व्हर्टीब्रेटा -

·         पृष्ठराज्जुचे रुपांतर पाठीच्या कण्यात झालेले असते.

·         शीर पूर्णपणे विकसित

·         मेंदू कवटीत संरक्षित

·         अंत:कंकाल अस्थिमय

·         6 वर्गात विभागणी पुढीलप्रमाणे

   वर्ग 1 : सायक्लोस्टोमाटा -

·         जबडे विरहित चुशिमुख

·         त्वचा मृदू व खवलेविरहित

·         अयुग्मीत पर असतात.

·         बहुतेक बाह्यपरजीवी

·         उदा . पेट्रोमायझॉन , मिक्झीन

   वर्ग 2 : पायसेस -

·         शीतरक्ती व पाण्यात राहणारे असतात.

·         शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते.

·         श्वसन कल्ल्याद्वारे होते.

·         डोळ्यांना पापण्या नसतात.

·         असंख्य अंडी घालतात.

·         उदा. डॉगफिश. रोहू

वर्ग 3 : अम्फिबिया -

·         पाण्यात तसेच जमिनीवर आढळतात.

·         शरीरावर खवले नसतात.

·         त्वचा मृदू ,श्लेष्मल असते.

·         ह्रदयाला तीन कप्पे असतात.

·         एकलिंगी , अंडज असतात.

·         बह्याकर्ण असतो.

·         उदा. बेडूक , टोड

वर्ग 4 : रेप्टीलीया -

·         सरपटणारे प्राणी

·         पहिले कशेरूस्तंभ युक्त प्राणी

·         त्वचा कोरडी , खवलेयुक्त असते .

·         अंगुलीना नखे असतात.

·         उदा. - कासव , पाल

वर्ग 5 : एवज -

·         कशेरूस्तंभ युक्त प्राणी

·         कोष्णरक्ती प्राणी

·         पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकुलीत झालेले आहेत.

·         उदा .-पोपट , बदक

·         एकलिंगी , अंडज

·         पोकळ हाडे असतात.

·         ह्रदयाला चार कप्पे असतात.

·         बह्यामुखाचे चोचीत रुपांतर झालेले असते.

·         पुढच्या पायाचे पंखात रुपांतर झालेले असते.

वर्ग 6 : मॅमॅलिया -

·         अतिशय उत्क्रांत

·         उष्णरक्त प्राणी

·         दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात.

·         शरीरावर केसांचे आच्छादन असते.

·         एक्लिंगी जरायुज

·         प्लॅटीपस व एकीडना अंडी घालतात.

·         फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात.

·         ध्वनीनिर्मिती करतात.

·         उदा : वटवाघूळ, खार, मानव , सिंह, माकड

वनस्पतीचे वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती

 सजीवांच्या वर्गीकरणाचा आधार :

·         आपल्या सभोवती वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य प्रकार आहेत.

·         प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे जमिनीवर किंवा पाण्यात आणि हवेतसुद्धा आढळतात.

·         प्रारंभीक अवस्थेतील जीवन एका सरल जिवाणूपेशीच्या रूपात होते. या पेशीला पटलपरीबद्धीत केंद्रक नव्हते.ही पेशी म्हणजे आदिकेंद्रकी पेशी होय.

·         उत्क्रांतीच्या ओघात आदिकेंद्रकी पेशीपासून सुस्पष्ट पटल असलेल्या केंद्रकयुक्त प्शिची उत्पत्ती झाली. 

·         ही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली.

·         प्रत्येक सजीव रूप, जीवनपद्धती अशा लक्षणात दुसर्‍यापासून भिन्न असतो. स्वत:ची वेगळी ओळख जपतो. यालाच जैवविविधता म्हणतात.

·         सजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यामुळे त्यांचेही पधतशीर गत पाडणे आवश्यक ठरते.

·         सजीवांमधील फरक ओळखून साधारणत: समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात.

·         वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समूहाना 'वर्गेकक' म्हणतात. 

·         सर्वात उच्च स्थरिय वर्गेकक म्हणजे 'सृष्टी' होय.

·         वनस्पतीमध्ये सर्वात उच्च स्तरिय वर्गेककास 'विभाग' म्हणतात.

·         प्राणांमध्ये सर्वात उच्चस्तरिय वर्गेककास 'संघ' म्हणतात.

·         जवळचे संबध दर्शविणार्‍या प्रजातींच्या समुहास 'कुल' म्हणतात.

·         एकमेकांशी संबंध दर्शविणार्‍या, जातीपेक्षा उच्च दर्जाचा वर्गेकक म्हणजे 'प्रजाती' होय.

·         अगदी जवळचे संबध दर्शविणारे जीव एकाच वर्गेकक मध्ये गटबद्ध करतात. अशा वर्गेककास 'जाती' असे म्हणतात.

·         जाती हे सर्वात लहान एकक आहे. 

 वर्गीकरण पदानुक्रम :

1.    सृष्टी 

2.    विभाग / संघ 

3.    वर्ग 

4.    गण 

5.    कुल 

6.    प्रजाती 

7.    जाती

 वर्गीकरणाच्या पद्धती :

1. पारंपरिक दृष्टिकोन -

व्दिसृष्टी/ व्दिनाम पद्धती -

·         अँरिस्टॉटालने प्राण्याचे वर्गीकरण जलचर, भूचर, खेचर व उभयचर या गटात केले. 

·         त्याचा शिष्य थिओफ्रँस्टसने वनस्पतीचे वर्गीकरण वृक्ष झोडपे व शाक अशा गटात केले. 

·         व्दिनाम पद्धतीचा जनक कार्ल व्हॉन लिनी हा शास्त्रज्ञ आहे.

·         याच पद्धतीने त्याने ताचे नाव 'कारोलस लिनियस' असे ठेवले.

·         त्यालाच वर्गीकरण शास्त्राचा जनक म्हणतात.

·         व्दिनाम पद्धतीची काही उदाहरणे :

प्राणी

प्रजाती 

जाती

वैद्यानिक नाव

सिंह

पँथेरा

लिओ

पँथेरा लिओ

वाघ

पँथेरा

टायग्रिस

पँथेरा टायग्रिस

बिबट्या

पँथेरा

पारडस्

पँथेरा पारडस्

 

वनस्पती

प्रजाती

जाती

वैद्यानिक नाव

आंबा

मँजिफेरा

इंडिका

मँजिफेरा इंडिका

गुलाब

रोझा

गॅलिका

रोझा गॅलिका

तुळस

ओसिमम 

सँक्टम

ओसिमम सँक्टम

2. आधुनिक दृष्टीकोन -

1. पंचसृष्टी पद्धती -

 

·         सृष्टी मोनेरा - एकपेशीय आदिकेंद्रकी 

·         सृष्टी प्रोटीस्टा - एकपेशीय व दृश्यकेंद्रकी - प्रोटोझुआ, शैवाल

·         सृष्टी कवक - एकपेशीय व दृश्यकेंद्रकी - किन्व, बुरशी , भूछत्र

2. शरीर क्रीयाशास्त्र विषयक

 

3. जैवरासायनिक

 

4. भ्रौनिकीय

 

5. रक्तद्रव्यशास्त्रीय

 

5. अत्याधुनिक पद्धती

 

 वनस्पतीचे वर्गीकरण :

उपसृष्टी : 1 अबीजपत्री - अपुष्प वनस्पती

विभाग - 1 :  थॅलोफायटा

·         शरीर साधे , मऊ ,तंतुमय 

·         मूळ , खोड , पान, नसते.

·         पाण्यात आढळतात .

·         स्वयंपोषी असतात.

·         लैगिक जननांग - युग्माकधानी

  वर्ग - 1 : शैवाल

·         वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी 

·         उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा 

·         प्रकाश स्वयंपोषी 

   वर्ग - 2 : कवक

·         परपोशी पोषण पद्धती 

·         इतरांच्या शरीरात, शरीरावर किंवा मृतोपाजीवी असतात. 

·         शरीर तंतुजालरूपी असते.

·         तंतुरूपी कवकाना बुरशी म्हणतात.

·         उदा. पेनिसिलीयम , म्युकर

·         जननांगे मोठी आणि छत्रिसारखी असणाऱ्यांना 'छत्रकवके' म्हणतात.

·         उदा . अगॅरिकस 

·         एकपेशीय कवकाना 'किन्व' म्हणतात .

·         उदा . सॅकरोमायसिस

शैवाक -

·         शैवाल व कवक एकत्र वाढ 

·         परस्परपूरक सहजीवन 

·         उदा . उस्निया (दगडफूल)

    जीवाणू -

·         एकपेशीय आदिकेंद्रकी सजीव. 

·         निरनिराळ्या पोषण पद्धती. 

·         प्रजजन साध्या स्वरूपाचे. 

विभाग -२ : ब्रायोफायटा

·         निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी, सावलीत राहण्याऱ्या उभयचर वनस्पती आहेत.

·         बीजाणू निर्मितीचे प्रजनन करतात.

·         शरीर चपटे , रीबिनसारखे व मऊ. 

·         मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात.

·         उदा. मॉस, रिक्सिया , मार्केंशिया , अॅन्थॉसिरॉस, फ्युनारीया 

विभाग -3 : टेरीडोफायटा

·         पाणी व खनिज वहनासाठी सुस्पष्ट संवहनी संस्था असते.

·         मूळ, खोड, पाने असतात.

·         सहसा लहान पर्णिका असतात.

·         सावलीत व दमट वातावरणात वाढतात. 

·         अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होते.

·         3 उपवर्गात विभाजन होते.

वर्ग -1 : लायाकोपोडीनी

·         या वनस्पती नेच्यासारख्या असतात.

·         उदा. लायाकोपोडीयम, सीलॅजीनेला 

    वर्ग -2 : इक्वीसेटीनी

·         नेच्यासारख्याच असतात.

·         बिजानुधानीच्या समूहास शंकू म्हणतात.

·         उदा. इक्वीसेटम 

   वर्ग -3 : फिलीसिनी

·         वनस्पतीचा सर्वात मोठा वर्ग आहे.

·         या वनस्पतींना 'नेचे' म्हणतात.

·         बिजानुधानीपुंज पानावर तयार होतात.

·         उदा. नेफ्रोलीपीस, अॅडीएन्टम, किलॅन्थेस, टेरिस

उपसृष्टी : 2 बिजपत्री - सपुष्प वनस्पती

विभाग -1 : अनावृत्तबीजी वनस्पती

·         यांना उच्चकुलीन वनस्पती असे म्हणतात. 

·         या वनस्पतीच्या बिजांवर आवरण नसते. त्यांची मोठया आकाराची बीजे बृहद्बीजाणू पत्रांवर तयार होतात.

·         काही वृक्ष मोठे व पुरातन असतात.

·         उदा . सायकस, सूचीपर्णी (पायनस), देवदार (सेडस)

·         सदाहरित, बहुवार्षिक 

·         खोडाला फांद्या नसतात.

·         नर व मादी फुले वेगवेगळया बिजानुपत्रावर येतात.

·         फळे येत नाहीत.

विभाग -2 : आवृत्तबिजी वनस्पती

·         या वनस्पतीची बीजे संरक्षक आवरणात असतात.

·         फुले हीच प्रजननांगे असतात.

·         अतिसूक्ष्म जलीय वनस्पती वुल्फिया टे प्रचंड आकाराच्या ऑस्ट्रेलीयन अकॅशिया किंवा युकॅलिप्टस् यांचा समावेश होतो.

·         2 वर्गात विभागणी होते.

    वर्ग -व्दिबिजपत्री वनस्पती

·         बियांच्या भ्रुनात दोन बिजपत्रे असतात.

·         मूळ हे सोटमूळ प्रकारचे असते.

·         पानाचा शिराविण्यास जालीकीय असतो.

·         उदा. सुर्यफुल, सदाफुली, जास्वंद, लिंबू ,पेरू, आंबा, वाटणा, वाल, हरभरा, टोमॅटो, मिरची, वांगी ,कोथिंबीर, कापूस,तुळस 

वर्ग -एकबिजपत्री वनस्पती :

·         बियांच्या भृणात फक्त एकच बिजपत्र असते.

·         मुले तंतुसारखी , अपस्थानिक मुळे 

·         पानांचा शिराविण्यास समांतर असतो.

·         फुल त्रीभागी.

·         उदा. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, ऊस, गवत, बांबू , कांदा,लसून, कर्दळी, केली, पाम, ऑर्कीड

 

No comments:

Post a Comment

Post Top Ad