▪️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

Topics

ads

Saturday, June 5, 2021

इतर महत्त्वाचे प्रश्न

इतर महत्त्वाचे प्रश्न  

 रोगपसाराचे प्रमुख मार्ग :

·         H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध.

·         H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास. (रक्त संक्रमण).

·         H.I.V. बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निर्जतुक न करता परत वापरल्यास.

·         H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्‍या बाळाला (नाळेमार्फत) (H.I.V. बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोगाचा प्रसार होत नाही).

 सर्वसामान्य लक्षणे :

·         अकारण वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.

·         सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे. (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी)

·         सतत जुलाब होणे व कोणत्याही औषधाने ते बरे न होणे.

·         तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.

·         3 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी 'लसिका ग्रंथाची' (लिम्फ ग्लॅंड) सूज, गंभीर 

 इतर लक्षणे :

1.    नुमोनिया 

2.    मेंदूज्वर 

3.    हरपीस 

4.    विविध प्रकारचे कर्करोग 

5.    क्षयरोग

·         आधिशयन काळ – 5 ते 8 वर्षे/सर्वसाधारण: (कधी-कधी 8 ते 10 वर्षे)

 एड्स निदानाच्या चाचण्या :

·         इलायझा चाचणी (ELISA Test) H.I.V. संसर्गाचे प्राथमिक निदान होते. 

·         गवाक्ष काळात (3 ते 5 महीने) निगेटिव्ह (नकारात्मक) येऊ शकते. म्हणून ही चाचणी परत 3 महिन्यांनी करावी लागते.

·         वेस्टर्न ब्लॉट (Westrn Blot) हमखास 100% खात्रीशीर चाचणी. इलायझा चाचणी होकारात्मक आल्यास H.I.V. संसर्गाची खात्री या चाचणीने करता येते.

·         पी.सी.आर. (P.C.R. Test) – जगात सर्वांची सुधारित / प्रगत चाचणी. डी.एन.ए. ची तपासणी करतात. लागण झाल्यास तिसर्‍याच दिवशी निदान होऊ शकते.

·         मार्च 1985 – एलयाझा तपासणीची उपलब्धता.

·         जुलै 1987 – 'झिडोव्ह्युडीन' हे औषध एड्स उपचारासाठी उपलब्ध. 

·         एड्सवरील औषधे झिडोव्ह्युडीन (Zidovudine), (नेव्हरॅपिन) ही सर्व औषधे फक्त विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णाचे आयुष्मान वाढवितात.

·         H.I.V. बाधित गर्भवतीकडून होणार्याु बाळाला H.I.V. च संसर्ग टाळण्यासाठी सध्या ग्रामीन रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार करण्यात येतो, त्यास 'अॅंटी रिट्रोव्हायरला थेरपी' असे म्हणतात. (Anti Retroviral Therapy Treatment) 

·         एड्स प्रतिबंधाकत्मक लस अध्याप उपलब्ध नाही.(संशोधन चालू)   

·         एड्सच्या बाबतीत प्रतिबंध हाच खरा उपचार ठरतो.

आहारशास्त्राविषयी संपूर्ण माहिती

 समतोल आहार :

·         शरीरांची कार्यक्षमता व आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात आणि परिमाणात वेगवेगळ्या अन्नपदार्थ्यांचा समावेश की ज्यातून स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिने, क्षार आणि जीवनसत्वे मिळतील असा आहार म्हणजे 'समतोल आहार' होय.

 अन्नातील पोषक तत्वे/घटक :

1.    स्थूल पोषक तत्वे  शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार्थ)

2.    सूक्ष्म पोषक तत्वे  अत्यंत कमी प्रमाणात (अल्प) आवश्यकता. उदा. जीवनसत्वे, क्षार.

 अन्नपदार्थांचे वर्गीकरण :

1.    प्राणीज (प्राण्यांपासून मिळणारे अंडी, मांस, दुध)

2.    वनस्पती (वनस्पतीपासून मिळणारे धान्य, फळे, भाज्या)

रासायनिक रचनेवरून -

1.    प्रथिने 

2.    मेद पदार्थ 

3.    कर्बोदके

4.    क्षार

5.    जीवनसत्वे

प्रमुख कार्यावरून -

1.    उर्जा / शक्तीचा पुरवठा करणारे अन्न 

2.    शारीरिक वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक अन्न 

3.    संरक्षण.

अन्नपोषक मुल्यांवरून -

1.    एकदल धान्य 

2.    व्दिदल धान्य

3.    हिरव्या पालेभाज्या 

4.    फळे

5.    तेल/मेद

6.    साखर गूळ

7.    मसाले व तिखट 

8.    तेलबिया 

9.    इतर 

 प्रथिने (प्रोटीन्स) :

·         प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.

·         शरीराला '24' अमिनो आम्लांची गरज असते.

·         त्यापैकी '9' अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना 'आवश्यक अमिनो आम्ले' असे म्हणतात.

·         (लायसीन, ल्युसीन, आयासोल्युसीन, व्हॅलिन, हिस्टीजीन, थ्रिओनिन, टिप्ट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाईल, अॅलॅनिन)

·         अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

 प्रथिनांची कार्ये :

·         शरीराची वाढ आणि विकास करणे.

·         ऊतींच्या डागडुजीसाठी / दुरुस्तीसाठी. 

·         प्रतिपिंडे (अॅंटीबॉडीज), विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके (हामोन्स) यांच्या निर्मितीमध्ये. 

·         रक्तनिर्मितीमध्ये. 

·         कधी-कधी प्रथिनांपासून उर्जादेखील मिळते.

 प्रथिनांची साधने :

·         प्राणीज साधने – दूध, अंडी, मांस, मासे.

·         वनस्पतीज साधने

1.    डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन  
                

2.    धान्ये ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.

3.    तेलबिया शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.

·         डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 20-25% असते.

·         सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 43.2% (सर्वाधिक)

·         दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%

·         अंडी प्रथिनांचे प्रमाण - 13%

·         मासे प्रथिनांचे प्रमाण - 15-23%

·         मांस प्रथिनांचे प्रमाण - 18-26%

·         प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा 'उच्च दर्जाचे'असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.

·         वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

शास्त्रीय नाव

मराठी नाव  

उपयोग

रेडीमीटर

रेडीमीटर

उत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण

टॅकोमीटर

विमानगतीमापक 

विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण

सॅलिंनोमीटर

क्षारमापक

क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण

डायनॅमो

जनित्र 

विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण

अॅमीटर

वीजमापी  

विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण

कॅलोरीमीटर

उष्मांक मापक   

उष्मांक मोजणारे उपकरण

हायड्रोमीटर    

जलध्वनी मापक

पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन

फोटोमीटर

प्रकाशतीव्रता मापी

प्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण

मायक्रोफोन

मायक्रोफोन

आवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण

रडार

रडार

विमानतळाकडे येणार्‍या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण

पायरो मीटर

उष्णतामापक

500' सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण

कार्डिओग्राफ

हृदयतपासणी

हृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण

बॅरोमीटर

वायुभारमापन

वातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र

लॅक्टोमीटर

दूधकाटा  

दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण

स्फिरोमीटर

गोलाकारमापी 

पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण

फोनोग्राफ

फोनोग्राफ

आवाज लहरी निर्माण करणारे यंत्र

मॅनोमीटर

वायुदाबमापक  

वायुदाब मोजू शकणारे उपकरण

सॅकरीमिटर

शर्करामापी

रासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजणारे उपकरण

ऑडिओमीटर

ध्वनीमापक    

आवाजाची तीव्रता मोजणारे उपकरण

क्रोनोमीटर

वेळदर्शक

आगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ

टेलिस्कोप

दूरदर्शक  

आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त

कार्ब्युरेटर

कार्ब्युरेटर  

वाहनात पेट्रोल, वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण

अॅनिओमीटर

वायुमापक

वार्‍याचा वेग व दिशामापक उपकरण

स्टेथोस्कोप

स्टेथोस्कोप

हृदयातील व फुफ्फुसाची माहिती पुरविणे

अल्टिमीटर

विमान उंचीमापक

विमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र

स्पेक्ट्रोमीटर

वर्णपटमापक

एका पदार्थातून दुसर्‍या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारे उपकरण

टेलिप्रिंटर

टेलिप्रिंटर

संदेश टाईपरायटरवर टाईप करू शकणारे स्वयंचलित यंत्र

सिस्मोग्राफ

भूकंपमापी

भूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र

थर्मामीटर

तापमापक

उष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण

कॅलक्युलेटर

गणकयंत्र

अगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र

युडीऑमीटर

युडीऑमीटर

रासायनिक क्रिया होत असताना वायूच्या घनफळात होणारा बदल मोजू शकणारे यंत्र

होल्टमीटर

होल्टमीटर

विजेचा दाब मोजणारे यंत्र

बायनॉक्युलर

व्दिनेत्री दुर्बिण

एकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दूरची वस्तु स्पष्ट व मोठ्या आकारात पाहण्यास उपयुक्त दुर्बिण

विंडव्हेन पेरीस्कोप

वातकुक्कुट परीदर्शक

वार्‍याची दिशा दाखवणारे यंत्र दृष्टी रेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तु पहाण्यासाठी

थिओडोलाइट

थिओडोलाइट

भ्रूपृष्ठाची मोजणी, वक्रता, कोन मोजणारे यंत्र

रेनगेज

पर्जन्य मापक

पावसाच्या प्रमाणाची मोजणी करणारे यंत्र

स्प्रिंगबॅलन्स

तानकाटा

वजन, शक्ति व बल यांची जलद पण स्थूलमानाने मापन

गॅल्व्होनोमीटर व्काड्रन्ट

सूक्ष्मवीजमापी

ऊंची व कोन मापक सूक्ष्म वीज प्रवाह मोजू शकणारे उपकरण नवीन खगोलशास्त्रीय

 

वनस्पती व प्राण्यांमधील ऊती

वनस्पती ऊती :

शरीरांच्या भागांना अवयव म्हणतात. अवयव हे ऊती पासून बनलेले असतात. ऊती या पेशिसमुहापासून बनलील्या असतात. सजीवांच्या विविध अवयवांची कार्य भिन्न असल्यामुळे यांच्या  रचनेतही फरक दिसून येतो.

वनस्पतींची वाढ हि त्यांच्या मुळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे  कारण म्हणजे अग्रभागासी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशींच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती उतीचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते.

हि एकाच वनस्पती ऊती अशाप्रकारची ऊती आहे, ज्यात पेशिविभाजानाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते.

यातील पेशींच्या भित्तिका पटल असतात. यामध्ये ठळक केंद्रक असते. त्याचे झपाट्याने विभाजन होते.

या विभाजी ऊती कोणत्या विभागामध्ये आढळतात यावरून त्यांचे प्ररोह विभाजी(Apical meristem)आणि पार्श्व विभाजी ऊती (lateal meristem)असे प्रकार आहेत.

अंतरीय विभाजी ऊती हा सुद्धा एक प्रकार आहे.(Entercalary Meristem).

प्ररोह विभाजी ऊती हि खोडाच्या व मुलाचा अग्रक़्भगि असते.

खोड किंवा मुळचा घेर व्रुंडी पार्श्व विभाजी उतीमुळे होते.

अंतर विभाजी ऊती हि पानांच्या तळासी व  फांदीच्या तळासी असते. त्या अतिक्रियाशील असतात.

विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर विभाजी उतीच्या पेशी विबाह्जानामुळे तयार झालेल्या पेशींची विभाजनाची प्रक्रिया थांबते.

स्थायी ऊती :

यामुळे स्थायी ऊती तयार होतात . स्थायी आकार , आकृती व कार्य घडवण्याच्या या प्रक्रियेस 'विभेदन' (differentiation) असे म्हणतात.

स्थायी ऊती या सरळ स्थायु किंवा जातील स्थायू ऊती असतात.

सरल स्थायी ऊती :

या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असून या उतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.

मुल ऊती:

यातील पेशी जिवंत असतात. यात केंद्रक असून याची भित्तिका पातळ असते.

या पेशींमध्ये मोकळी जागा असते. या पेशी बटाटा व बिट यासारख्या वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात .

हरित ऊती:

वनस्पतींच्या पानामधील ऊतींना हरित ऊती म्हणतात.

वायू ऊती:

जलीय वनस्पतीमध्ये अंतरपेशिय पोकळ्यामुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात . त्यांना वायू ऊती असे म्हणतात.

स्थूलकोन ऊती :

या ऊती प्रामुख्याने पानाच्या डेठात आढळतात . त्या पाने,खोड व फांद्या यांना लवचिकता देतात .

दृढ ऊती :

दृढ ऊती मधील पेशी मृत असतात . त्यांच्या भिंती जाड असतात . या ऊती खोड संवाहणी पूल . शिरा व बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात .

विशिष्ट रचणे मुळे वनस्पती टणक व ताठ बनतात.

मलमलचे कापड अंबाडीच्या दृढ ऊतीपासून  बनवले जाते .

पृष्ठभागीय ऊती :

वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय  उतींच्या थराने बनतो .

या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.

हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.

निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.

बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.

वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे  असे म्हणतात.

पर्णरंध्रा भोवती घेवड्याच्या आकाराच्या दोन रक्षक पेशी असतात. त्या पर्णरंध्राची उगढझाप नियंत्रित करतात.

पर्णरंध्रा मधून बाष्पउत्सर्जन होते.

झाडाच्या सालातील पेशी या मृत पेशी असतात. त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात.त्यांच्या भित्तीकांवर सुबेरींन नावाचे रसायन असते.या रसायनामुळे सालीतून वायू व पाणी यांची देवाण घेवाण होऊ शकत नाही.

जटील स्थायी या एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात.

यापूर्वी बघितलेल्या उरती फक्त एकाच प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या होत्या.

जटील स्थायी ऊती :

जटील स्थायी ऊती मधील पेशींमध्ये एकमेकांत समन्वय असतो.

संवहणी ऊती हि जटील ऊती आहे . मुले, खोड , पाने यामध्ये हि असते . ती पाणी व अन्न यांचे वहन करते.

मूळ,खोड व पानातील संवाहणी ऊती एकमेकांशी जोडलेल्या असतात. संवाहणी ऊती हे उच्च स्तरीय वनस्पतींचे महत्त्वाचे कार्य आहे.

जलवाहिनी व रसवहिनि  हि संवाहिनी ऊती ची उदाहरणे आहेत.

जलवाहिनी :

पेशीभित्तिका जाड असून बहुतेक पेशी मृत असतात.

त्यांचे मुखेत्वे खालील प्रकार पडतात.

वाहिनिका: या पेशी मृत झाल्यावर त्यांच्यातील पेशिद्रव्याचे विघटन होते. त्यानंतर तयार झालेल्या पोकळ जाळ्यातून पाण्याचे वहन होऊ शकते.

वाहिन्या : वाहिनिका पेक्षा रुंद असतात. पाणी व क्षार यांचे वहन  होते.

जलवाहिनी : ऊती अन्न साठवते.

जलवाहिनी तंतू : मजबुती देतात.

रसवहिनी : या चार प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या आहेत.

चलन नलिका : सच्छिद्र  पटल असते.

सहपेशी : या चाळण नलिके भोवती असतात .तिच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.

रसवाहिनी तंतू :मुखेत्वे खोडात असून वनस्पतींना मजबुती देतात.

रसवाहिनी मुलऊती : इतर सर्व प्रकारच्या पेशींना एकत्र ठेवण्यचे काम या पेशी करतात.रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात.पानाकडून शर्करा व अमिनोम्लाचे वनस्पतींच्य खोड व मुळाकडे वहन करतात.

प्राणी ऊती :

अभिस्तर ऊती :

प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अवयव समन्वयाने काम करीत असतात.

स्नायूपेशी या तंतूरुपात असतात.त्या त्यांची लांबी बदलू शकतात.स्नायू हे उतीचे उदाहरण आहे.

ऑक्सिजन आणि पोषद्राव्याचे सर्व पेशींकडे वाहन करणारे रक्त सुद्धा उतीचे उदाहरण आहे.

प्राणी उतीची अभिस्तर ऊती , संयोजी ऊती , स्नायू ऊती ,चेता ऊती, या प्रमाणे वर्गीकरण केले आहे.

प्राणी शरीरातील बाह्य आणि संरक्षक आवरण अभिस्तर ऊती पासून बनलेले असतात.

शरीरातील इंद्रियसंस्था वेगवेगळी ठेवण्याचे कार्य अभिस्तर ऊती करते.

रक्तवाहिन्या मधील स्तर , फुफुसातील वायुकोश , अन्ननलिका व तोंडातील आतील स्र्तारात सरल पट्टकि अभिस्तर ऊती आढळतात.

आतड्यातील आतील स्तरात स्तंभीय अभिस्तर ऊती असतात .त्यांच्यामार्फत पाचक रस स्त्रवले जातात.

श्वसन मार्गामध्ये रोमक स्तंभीय अभिस्तर असते.

वृक्कनालीकांचाआतील सतार, लाळग्रंथींच्या नलिका यामध्ये घनाभरूप अभिस्तर ऊती असतात.

त्वाचे मधून घाम , तैलद्रव्य , श्लेष्मल पदार्थ इ.स्त्रावण्याचे कार्य ग्रंथील अभिस्तर ऊती मार्फत केले जाते.

संयोजी ऊती :

संयोजी ऊतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारकामध्ये पेशी रुतलेल्या असतात . अधारक हे जेली सारखे द्रवरूप दाट किंवा दृढ असते.

संयोजी उतींचे प्रकार पुढीलप्रमाणे :

अस्थी: स्नायूंना घट्ट धरून ठेवतात.मुख्य अवयवांना आधार देतात.

रक्त: हे द्रवरूप संयोजी ऊती आहे. यामध्ये लोहित रक्त कणिका , श्वेतरक्तकणिका आणि रक्तपट्टीका,असतात.रक्तद्रवात प्रथिने , क्षार , संप्रेरके असून शरीराच्या विविध भागाकडे वायू , पोषकद्रव्य व संप्रेरके यांचे वहन केले जाते.

अस्थीबंध: यामुळे दोन हाडे जोडली जातात. लवचिक आणि मजबूत असतो.

स्नायुरज्जू: यांच्याद्वारे स्नायू हाडांशी जोडले जातात. तंतुमय ,मजबूत परंतु कमी लवचिक असतात. नेत्रागोलास त्याच्या भोवतालच्या हाडासी जोडतात.

कास्थी: कास्थीमुळे हाडाच्या संध्याच्या ठिकाणी नरमपणा येतो. या पेशी नाक , कान, श्वास नलिका , स्वरयंत्रातील पोकळी यामध्ये आढळतात.

विरळ ऊती: त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान, रक्तवाहिनिच्या भोवताली , चेतातंतू व अस्थिमज्जेत आढळतात.

चरबीयुक्त ऊती : त्वचेखाली , वृक्काच्या सभोवताली व अंतरीन्द्रीयांमध्ये आढळतात . या ऊती मधील पेशी मेद्पिंदाने भरलेल्या असतात . मेद्संचायामुळे हि ऊती उष्णतारोधक म्हणून काम करते.

स्नायू ऊती :

स्नायू ऊती या स्नायूतंतुच्या लांब पेशी पासून बनलेल्या असतात.

स्नायूंमध्ये असणारे 'संकोची प्रथिन' द्वारे स्नायूंची हालचाल होते.

ज्या स्नायुद्वारे आपल्या शरीराच्या हालचालीवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्यास ऐच्छिक स्नायू असे म्हणतात.

या पेशी मधील पेशी लांब,दंडगोलाकार,अशाखीय ,बहुकेंद्रकीय असतात.

ऐच्छिक स्नायुंना कंकाल स्नायू किंवा पट्टकि स्नायू असे देखील म्हणतात.

काही स्नायूंची हालचाल आपण आपल्या मनाप्रमाणे करू शकत नाही .त्यांना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात.

डोळ्यांची परीतारिका मुत्रावाहिनी व स्वसनी,इ .ठिकाणी अनैच्छिक स्नायू असतात.

हृदयाच्या भित्तीमध्ये आढळणारे 'परीहृद स्नायू ' हे सुद्धा अनैच्छिक स्नायू आहेत.

चेताऊती :

मेंदू,चेतारज्जू,चेतातंतू हे सर्व चेता उतींनी बनलेले असतात.

या उतीतील पेशींना चेतापेशी  असे म्हणतात. चेतापेशीमध्ये केंद्रक व पेशीद्र्व्य असते.पेशीद्रव्यातून लांब , केसासारखे बारीक तंतू निघतात त्यास अक्षतंतू  म्हणतात.

एखाद्या चेतापेशीची लांबी एक मीटर इतकीही असू शकते.

अनेक चेता तंतू संयोजी उतीद्वारे एकत्र येऊन चेता तयार करतात.

या ऊती चेतना ग्रहण करतात आणि या चेतना अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करतात.

क्षयरोग त्याची लक्षणे व उपचार

·         हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो.

·         या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी 24 मार्च 1882 रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.

·         जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

·         क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो.

·         क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

क्षयरोगाचे प्रकार : 1. फुप्फुसाचा 2. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)

क्षयरोगाची लक्षणे :

1.    तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,

2.    हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप

3.    वजन कमी होणे

4.    थुंकीतून रक्त पडणे

5.    भूक मंदावणे इ.

क्षयरोगाचे निदान : लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.

1.    थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.

2.    'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.

प्रतिबंधक लस -

0 ते 1 वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात.

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर

होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन 1992-93 मध्ये सुरू करण्यात आला.

क्षयरोग औषधोपचार :

सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.

1. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.

2. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)

हिवताप व त्याची लक्षणे

हिवताप :

हिवताप हा जगातील एक सर्वात जुना रोग आहे.

हिवताप हा 'प्लाझमोडिअम' नामक 'परजीवी जंतू' मुळे होतो.

हिवताप हा 'अॅनॉफिलीस' प्रकारच्या डासामार्फत (मादी) पसरतो.

डासांमधील नर डास चावत नाही. अंडी घालण्यासाठी मदांना रक्ताची गरज असल्याने फक्त मदांचा दंश करून रक्त शोषून घेतात. तर नर डास हा पानांच्या रसावर (तृणरस) जगतो.

हिवताप रुग्णास अॅनाफिलीस जातीची मादी चावल्यास व दुसर्‍या निरोगी माणसास चावल्यास प्रसार होतो.

'हिवताप जंतूचा शोध1880 मध्ये सर डॉ. अल्फ्रेंड लॅव्हेरॉन यांनी लावला.

सन 1897 मध्ये सर रोनॉल्ड रॉस यांनी हा रोग अॅनाफिलीस जातीची मादी डासांमुळे मानवामध्ये पसरत जातो हे सिद्ध केले व हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा शोध लावला.

हिवतापाची लक्षणे :

थंडी वाजून ताप येणे आणि घाम आल्यावर ताप ओसरतो.

प्लीहेची वाढ होते.

रक्तक्षय होतो.

 

कर्करोगाचे कारणे व प्रकार

कर्करोग :

या रोगात पेशीची अनियंत्रित व अमर्याद वाढ होते.

कर्करोग, फुप्फुस, तोंड, जीभ, रक्त, स्तन, गर्भाशय इ. कोणत्याही अवयवाला होतो.

पुरुषांमध्ये फुप्फुसाचा व स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कारणे :

तंबाखू, धूम्रपान, रंजके, किरणोत्सार, अल्ट्रा व्हायोलेट किरणे, क्ष-किरणे इ. मुळे होतो.

या रोगाच्या निदानपद्धतीला बायोस्पी (गाठीचा तुकडा काढून तपासणे) म्हणतात.

कर्करोगाचे प्रकार :

ल्युकेमिया - पांढर्‍या पेशींचा कर्करोग

लिम्फोमिया - तांबड्या पेशींचा कर्करोग

सार्कोमा - संयुजी उतींचा कर्करोग

कार्सींनोमा - अभिस्तर पेशींचा कर्करोग

स्वाईन फ्ल्यू चे लक्षणे व उपचार

स्वाइन फ्ल्यू :

'स्वाईन फ्ल्यू' एन्फ्लुएंझा-ए (एच-1 एन-1) पॅनडेमिक

एन्फ्लुएंझा-ए (एच-1 एन-1) या साथीचा ताप येण्याला 'स्वाईन फ्ल्यू' असे म्हणतात.

पक्षी, डुक्कर आणि माणूस यांच्यातील विषाणूंच्या एकत्रीकरणातून एच-1 एन-1 हा नवीन विषाणू तयार झाला आहे.

जगातील आरोग्य संघटनेने 'महासाथ' हा आजार जाहीर केला आहे.

रोगाची लक्षणे :

1. धाप लागणे.

2. जीभ व ओठ काळेनीळे पडणे.

3. खूप चिडचिड होणे.

4. खोकला व शिंक येणे.

5. शरीर दुखणे.

6. घसा खवखवणे.

7. चक्कर येणे.

8. थंडी वाजून येणे.

9. डोके दुखणे.

10. थकवा जाणवणे.

11. छाती व पोट दुखणे.

उपचार :

'टॅंमिफ्लू' 'रेलेन्झा' ही औषधे वापरली जातात.

मेक्सिको, अमेरिका, कॅनडा व भारत या देशांमध्ये 'स्वाईन फ्ल्यू' एच-1 एन-1 या विषाणूंमुळे डुकरापासून मानवाला लागण झाली आहे.

महाराष्ट्रातील पुणे शहरातील रिदा शेख या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून ती देशातील स्वाईन फ्ल्यूची पहिली बळी आहे.

गतीविषयक नियम :

गती :

·         जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात.

·         आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो.

·         गती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही.

बल :

·         स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.

·         वस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो.

·         बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.

·         बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.

·         बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.

·         वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.

संतुलित बल :

·         जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणार्‍या दोन बलांचे परिणाम सारखे आणि दिशा विरुद्ध असतात, तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे एकूण बल शून्य असते.

·         दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.

·         संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.

असंतुलित बल :

·         असंतुलित बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो किंवा गतीची दिशा बदलते.

·         वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.

·         जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.

जडत्व :

वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.

जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.

जडत्वाचे प्रकार :

1. विराम अवस्थेतील जडत्व :

वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात.

उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.

2. गतीचे जडत्व :

वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होवू शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात.

उदा. चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी पुढच्या दिशेने पडतो.

3. दिशेचे जडत्व :

वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात.

उदा. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात.

न्यूटनचे गतीविषयक नियम :

पहिला नियम :

'जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते'.

यालाच 'जडत्वाचा नियम' असे म्हणतात.

उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.

दूसरा नियम :

'संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते'.

उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.

संवेग - वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.

p=mv

संवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ

=mv-mu/t

=m(v-u)/t

तिसरा नियम :

'प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात'.

उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.

सामान्य विज्ञान (इयत्ता 8 वी) संपूर्ण माहिती

 आकाशगंगा :

·         सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.

·         चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

·         प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.

·         चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.

·         एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.

·         एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

·          

·         प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

·         प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

·         बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.

·         बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे. 

·         पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला 'पहाटतारा' म्हणतात.

·         पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना 'अंतर्ग्रह', तर कक्षेबाहेरील ग्रहांना 'बाह्यग्रह' म्हणतात.

·         'मंगळ' हा पहिला बाह्यग्रह आहे.

·         सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे 'गुरु'

·         गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.

·         शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

·         शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

·         धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

·         हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

·         भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

·         त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

·         इस्त्रोया संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले. 

·         GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

·         टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

·         आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

·         जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

 चुंबकत्व :

·         5 मार्च 1872 रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

·         चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

·         मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 अणूंची संरचना :

·         इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अणूतील मूलकण आहेत. 

·         अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.

·         प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.

·         अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.

·         अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.

·         मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.

·         मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला 'संयुजा' म्हणतात.

 महत्वाचे मुद्दे :

·         विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.

·         जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

·         स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात. 

·         पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

·         साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.

·         संसर्गजन्य रोग  क्षय, इन्फ्लुएंझा, इ.

·         संपर्कजन्य रोग  खरूज, इसब, गजकर्ण, इ. 

·         पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

·         रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

·         WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र काढली आहेत. (Directly Observed Treatment)

·         मनुष्यप्राणी 'व्हीब्रिओ कॉलरा' या कॉलर्याचचा जिवाणू वाहक आहे. 

·         लसीकरण बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.

·         त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.

इयत्ता 7 वी संपूर्ण माहिती

महत्वाचे मुद्दे :

·         अनविकरणीय हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते).

·         हवा प्रदूषणाचे हवेतील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तपमानवाढीचे उदभवले आहे.

·         इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते.

·         समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशिअम क्लोराईड, सोडीयम क्लोराईड हे क्षार असतात.

·         तारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते यालाच 'नालाबंर्डिंग' असे म्हणतात.

·         20 ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो.

·         वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जणूके दुसर्याह वनस्पतीत व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोग शाळेत निर्माण करता येऊ शकते त्याला जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात.

·         डोडो व भारतीय चित्ता यांची जणूके आपण कायमची हरवून बसलो आहोत.

·         संयुक्त राष्ट्रसंघाने दरडोई 50 ली. पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे.

·         पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे.

·         22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

·         जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटील अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते.

·         वनस्पतीच्या पानातील हरितद्रव हे प्रकाश उर्जेचे रूपांतर रसायनिक उर्जेत करते.

·         अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे.

·         वायूंचे प्रसारण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसारणापेक्षा अधिक असते. 

·         भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तापमापीला 'पायरोमीटर' म्हणतात.

·         आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहेत.

·         अमीबा,पॅरमॅशिअम, क्लोरेल्ला हे एकपेशीय सजीव आहेत.

·         सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत आहेत.

·         समान कार्य करणार्‍या पेशीच्या समूहाला 'उती' असे म्हणतात.

·         उती पातळीवर संघटन असणारे सजीव मॉस, शैवाल, जलव्याल.

·         ठराविक काम एकत्रितपणे करण्यासाठी इंद्रिय समूहाला 'इंद्रिय संस्था' म्हणतात.

·         प्राण्यांच्या किंवा वनस्पतींचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्या जागेस 'अधिवास' म्हणतात.

·         एकपेशीय जीवामध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. उदा. जिवाणू, क्लोरेल्ला.

·         कालिका पासून होणार्याा प्रजननास कलिकयन म्हणतात. उदा. किन्व (यीस्ट)

·         पुमंग हा नर घटक तर जयांग हा स्त्री घटक असतो.

·         पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास ते रुजतात. याला 'परागण' असे म्हणतात.

·         अंड्यात वाढणार्याज जीवांना अंडज म्हणतात. तर गर्भाशयातून जन्मणारे जरायूज.

·         सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे चार कप्पे असतात.

·         हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणार्यान रक्तवाहिन्यांना 'धमण्या' म्हणतात.

·         शरीराच्या भागाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यांना 'शिरा' म्हणतात.

·         धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात. त्यांना 'केशिका' म्हणतात.

·         अॅनेमिया, थालेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा केला जातो.

·         अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होतो.

·         अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात.

·         मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला 'अणू' म्हणतात.

·         पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात- ऑक्सीजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन.

·         रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम, मॅग्नेशिअम हे धातू आणि नायलोन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात.

·         20 Hz ते 20000 Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो. त्याला 'श्राव्य ध्वनी' म्हणतात.

·         अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वाटवाघळला समोरच्या वस्तूची जाणीव होते.

·         20 C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 340 m/s असतो.

·         अँबरला ग्रीक भाषेत 'इलेक्ट्रॉन' म्हणतात.

·         काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो.

·         एबोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो.

·         आकाशातील विजेचा धोका टळण्यासाठी उंच इमारतीवर तडीतवाहक बसवतात.

·         छ्दमपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो.

·         स्वादूपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो.

·         शर्करांचे प्रकार  फ्रूक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, लॅक्टोज, इ.

·         प्रथिने ही मूलत: नट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत.

·         प्रथिने शरीर बांधणीच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात.

·         आनुवांशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डी ऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल (DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.

·         '' जीवनसत्वाच्या अभावी रातआंधळेपणा होतो.

·         '' जीवनसत्वाच्या अभावी जीभ लाल, त्वचा रखरखीत, बेरीबेरी 

·         '' जीवनसत्वाच्या अभावी हिरड्यातून रक्त येणे, स्कव्ह्री 

·         '' जीवनसत्वाच्या अभावी मुडदुस पाठीला बाक येणे, पायाची हाडे वाकणे.

·         कॅल्शिअमच्या अभावी हाडे ठिसूळ बनतात. दातांची झीज होते.

·         फॉस्फरसच्या त्रुटिमुळे वजनात घट होते व वाढ खुंटते.

·         लोहाच्या अभावामुळे पंडूरोग, रक्तक्षय (अॅनेमिया) हा विकार होतो.

·         आयोडीनच्या अभावामुळे गलगंड (गॉयटर) हा रोग होतो.

·         आपल्या मानेत असणार्यां अवटू ग्रंथीमधून थायरोस्झिन संप्रेरक स्त्रवते.

·         प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणार्याप रासायनिक पदार्थांना 'संप्रेरके' म्हणतात.

·         जणूके पेशीच्या केंद्रकामध्ये समवलेली असतात. उंची वाढण्यास करणीभूत असलेले वृद्धी संप्रेरके मेंदू मधील पियुषिकेत तयार होते.

·         किटकभक्षी वनस्पती दवबिंदू (ड्रोसेरा), घटपर्णी या आहेत.

·         जहाजावर किती माल भरावा याचा निर्देश करण्यासाठी जहाजाच्या खालच्या भागावर रेषा आखलेल्या असतात. त्यांना प्लीम सोल रेषा म्हणतात.

·         लोलकातून गेल्यावर सूर्यचा प्रकाश सात रंगात विभागतो. त्यामध्ये तांबडा रंग वर असतो तर जांभळा रंग सर्वात खाली असतो.

·         रंगाचा क्रम तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा

·         उष्णतेचे स्थलांतर तीन प्रकारे होते वहन, अभिसरण, प्रारण.

·         थर्मासफ्लास्क मध्ये गरम किंवा थंड वस्तू तापमानामध्ये फरक न होता दीर्घकाळ त्याच तापमानावर गरम किंवा थंडच राहते.

·         गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी जी भांडी वापरतात त्यांना 'थर्मोवेयर' म्हणतात.

·         उष्णतेचे सुवाहक तांबे, लोह, अल्युमिनिअम, इ.

उष्णतेचे दुर्वाहक माती, लाकूड, काच, इ.

·         रक्त देण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तदान तर रक्त घेण्याची प्रक्रिया 'रक्त पराधन' होय.

·         रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यास चक्कर येते.

·         प्रजनन मुख्यत्वे पुढील दोन प्रकारे होते

 अलैंगिक प्रजनन :

वनस्पती -

1.    शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)

2.    विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल 

3.    कलिकायन -    किन्व यीस्ट 

4.    बिजाणूजन्य - बुरेशी 

5.    खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा 

 लैंगिक प्रजनन:

वनस्पती -

·         सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो.

प्राणी -

·         नर आणि मादीच्या संयोगातून गर्भोशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतून नवीन जीव तयार होतो.

·         वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला 'डायलेसिस (व्याष्लेषण)' म्हणतात.

·         बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

·         आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

·         कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

·         परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

·         जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

·         विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

·         हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

·         आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.

 पिष्टमय पदार्थ :

·         पिष्ट, विविध शर्केरा, तंतुमय पदार्थ यांचा समावेश येतो.  
  

·         तांदूळ, गहू, मका, बाजारी, ज्वारी या तृणधान्यांमद्धे पिष्ट भरपूर असते.  
          

·         पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते.   
     

·         जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन यकृतात साठवले जाते.  
                        

·         पिष्टमय पदार्थापासून उर्जा मिळते. 

प्रथिने

·         तूर, हरभरा, मटकी, सोयाबीन या डाळी तसेच दूध अंडी, मासे, मांस यांपासून प्रथिने मिळतात. 
                            

·         विविध जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत.

स्निग्ध पदार्थ -    

·         तेल, तूप, लोणी, मेद, मेदाम्ले ही उदाहरणे.   
            

·         स्निग्धपदार्थांच्या विघटनामुळे उर्जा प्राप्त होते.

·         पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो.

 चेतासंस्था :

·         मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात.

·         चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था असे दोन गट पडतात. 

·         मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो.

·         चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो.

·         चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात.

·         शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात.

·         चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.

·         काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.

·         अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क,पाईनी,हृदोधिष्ठ. 

 आम्ल आणि आम्लारी :

·         सामन्यात: धातूंची ऑक्साइड्स आम्लारीधर्मी असतात.

·         पाण्यात विरघळणार्‍या आम्लारिंना 'अल्कली' म्हणतात.

·         सर्व अल्कली आम्लारी असतात, परंतु सगळे आम्लारी अल्कली नसतात.

·         उदासीनिकरणात क्षार आणि पाणी तयार होतात.

·         जेव्हा दाहक आम्ल आणि दाहक आम्लारी यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा मिळणारे क्षार उदासिन असतात. उदा. मीठ, सोडीयम नायट्रेट.
           

·         दाहक आम्ल आणि सौम्य आम्लारीच्या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारे क्षार आम्लधर्मी असतात. 

·         अॅल्युमिनिअम क्लोराईड, अमोनिअम सल्फेट क्षार आम्लधर्मी असतात.

·         दाहक आम्लारी आणि सौम्य आम्ल यातून मिळणारे क्षार हे आम्लारिधर्मी असतात. 

·         धुण्याचा सोडा (सोडीयम कार्बोनेट), बेकिंग सोडा (सोडीयम बायकार्बोनेट) हे क्षार आम्लारिधर्मी आहेत.

·         प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात.

·         लोणची, मुरांबा टिकविण्यासाठी अॅसेटीक आम्ल किंवा बेंझोईक आम्ल वापरतात.

·         आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते. त्यामुळे अन्नपचन सुलभ होते.

·         गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते. त्यावर उपाय म्हणून मॅग्नेशियम हायड्रोक्साइड सारखी आम्लारिधर्मी औषधे दिली जातात.

·         कला रंग जास्त उष्णता शोषून घेतो म्हणून सौरचुलीतील भाड्यांना बाहेरून काळा रंग असतो.

·         तापमापीमध्ये पार्‍याऐवजी अल्कोहोल वापरता येईल.

·         पाण्याची विशिष्ट उष्मा सर्वाधिक असल्यामुळे शीतक म्हणून मोटारीमध्ये आणि यंत्रामध्ये त्याचा उपयोग होतो.

·         लघवीमधील साखरेमुळे मधुमेह या रोगाचे निदान होते.

·         आरसा पुसल्याने त्यावर विधूतभार तयार होतो म्हणून त्यावर लगेच धूळ बसते.

·         शीतपेयातील सोडा आम्लारी वर्गात मोडतो.

विज्ञान व विषयशाखा

1.

मीटिअरॉलॉजी

हवामानाचा अभ्यास

2.

अॅकॉस्टिक्स

ध्वनीचे शास्त्र

3.

अॅस्ट्रोनॉमी

ग्रहतार्‍यांचा अभ्यास

4.

जिऑलॉजी

भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास

5.

मिनरॉलॉजी

भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास

6.

पेडॉगाजी

शिक्षणविषयक अभ्यास

7.

क्रायोजेनिक्स

अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र

8.

क्रिस्टलोग्राफी

स्फटिकांचा अभ्यास

9.

मेटॅलर्जी

धातूंचा अभ्यास

10.

न्यूरॉलॉजी

मज्जसंस्थेचा अभ्यास

11.

जेनेटिक्स

अनुवंशिकतेचा अभ्यास

12.

सायकॉलॉजी

मानवी मनाचा अभ्यास

13.

बॅक्टेरिऑलॉजी

जिवाणूंचा अभ्यास

14.

व्हायरॉलॉजी

विषाणूंचा अभ्यास

15.

सायटोलॉजी

पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र

16.

हिस्टोलॉजी

उतींचा अभ्यास

17.

फायकोलॉजी

शैवालांचा अभ्यास

18.

मायकोलॉजी

कवकांचा अभ्यास

19.

डर्मटोलॉजी

त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र

20.

मायक्रोबायोलॉजी

सूक्ष्मजीवांचा अभ्यास

21.

इकॉलॉजी

परिस्थितिकी शास्त्र (सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास)

22.

हॉर्टीकल्चर

उद्यानविद्या

23.

अर्निथॉलॉजी

पक्षिजीवनाचा अभ्यास

24.

अँन्थ्रोपोलॉजी

मानववंश शास्त्र

25.

एअरनॉटिक्स

हवाई उड्डाण शास्त्र

26.

एण्टॉमॉलॉजी

कीटक जीवनाचा अभ्यास

 

विज्ञानातील संशोधक व त्यांनी लावलेले शोध

क्र.

संशोधक

शोध

1.

सापेक्षता सिद्धांत

आईन्स्टाईन

2.

गुरुत्वाकर्षण

न्यूटन

3.

फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट

आईन्स्टाईन

4.

किरणोत्सारिता

हेन्री बेक्वेरेल

5.

क्ष-किरण

विल्यम रॉटजेन

6.

डायनामाईट

अल्फ्रेड नोबेल

7.

अणुबॉम्ब

ऑटो हान

8.

प्ंजा सिद्धांत

मॅक्स प्लॅक

9.

विशिष्टगुरुत्व

आर्किमिडीज

10.

लेसऱ

टी.एच.मॅमन

11.

रेडिअम

मेरी क्युरी व पेरी क्यूरी

12.

न्युट्रॉन

जेम्स चॅड्विक

13.

इलेक्ट्रॉन

थॉम्पसन

14.

प्रोटॉन

रुदरफोर्ड

15.

ऑक्सीजन

लॅव्हासिए

16.

नायट्रोजन

डॅनियल रुदरफोर्ड

17.

कार्बनडाय ऑक्साइड

रॉन हेलमॉड

18.

हायड्रोजन

हेन्री कॅव्हेंडिश

19.

विमान

राईट बंधू

20.

रेडिओ

जी.मार्कोनी

21.

टेलिव्हिजन

जॉन बेअर्ड

22.

विजेचा दिवा,ग्रामोफोन

थॉमस एडिसन

23.

सेफ्टी लॅम्प

हंप्रे डेव्ही

24.

डायनामो

मायकेल फॅराडे

25.

मशीनगन

रिचर्ड गॅटलिंग

26.

वाफेचे इंजिन

जेम्स वॅट

27.

टेलिफोन

अलेक्झांडर ग्राहम बेल

28.

थर्मामीटर

गॅलिलिओ

29.

सायकल

मॅक मिलन

30.

अणू भट्टी

एन्रीको फर्मी

31.

निसर्ग निवडीचा सिद्धांत

चार्ल्स डार्विन

32.

अनुवंशिकता सिद्धांत

ग्रेगल मेंडेल

33.

पेनिसिलीन

अलेक्झांडर फ्लेमिंग

34.

इन्शुलीन

फ्रेडरिक बेंटिंग

35.

पोलिओची लस

साल्क

36.

देवीची लस

एडवर्ड जेन्नर

37.

अॅंटीरॅबिज

लस लुई पाश्चर

38.

जीवाणू

लिवेनहाँक

39.

रक्तगट

कार्ल लँन्डस्टँनर

40.

मलेरियाचे जंतू

रोनाल्ड रॉस

41.

क्षयाचे जंतू

रॉबर्ट कॉक

42.

रक्ताभिसरण

विल्यम हार्वे

43.

हृदयरोपण

डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड

44.

डी.एन.ए.जीवनसत्वे

वॅटसन व क्रीक

45.

जंतूविरहित शस्त्रक्रिया

जोसेफ लिस्टर

46.

होमिओपॅथी

हायेमान

 

भौतिक राशी व त्यांची परिमाणे/एकके 

क्र

भौतिक राशी

परिमाणे/एकक

1.

विद्युतरोध

ओहम

2.

विद्युतधारा

कुलोम

3.

विद्युतभार

होल्ट

4.

विद्युत ऊर्जा

ज्युल

5.

वेग

m/s

6.

त्वरण

m/s2

7.

संवेग

kg/ms

8.

कार्य

ज्यूल

9.

शक्ती

ज्यूल/सेकंद

10.

बल

Newton

11.

घनता

kg/m3

12.

दाब

पास्कल

 

No comments:

Post a Comment

Post Top Ad