प्राचीन इतिहास
सिंधु संस्कृतीचा शोध -
· सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या.
· सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय.
· ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते.
· आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे.
· आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.
सिंधु संस्कृतीचे वैशिष्टे
· जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे.
· रस्ते, घरे, सांडपाण्याची व्यवस्था याची सुनियोजित रचना.
· पुरापसून संरक्षण करण्याकरिता उंच जोत्यावर घरे बांधण्यात आली होती.
· आरोग्य व स्वच्छता यांच्या दृष्टीने बंद गटारे निर्माण करण्यात आली होती.
· मोहेंजदडो येथे 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंचीचे स्नानगृह मिळाले आहे.
· मोहेंजदडो हे शहर नदीच्या पुरामुळे सात वेळा नष्ट होवून पुन्हा वसविल्या गेल्याचे येथील पुराव्यावरून सिद्ध होते.
स्थानिक प्रसाशन -
· मोहेंजदडो येथे करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून येथील लोक आरोग्य आणि स्वच्छता विषयक सोईच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसून येते.
· नगररचना योजनाबद्ध होती.
· यावरून या ठिकाणी आजच्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असाव्यात आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपीवण्यात आल्याचे दिसून येते.
हडप्पाकालीन लोकजीवन -
· सिंधु आणि रावी नद्यांच्या परीसरात करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे येथील लोकजीवनाबाबत खालील माहिती मिळते.
दैनंदिन जीवनप्रणाली -
· अन्न : येथील लोक आपल्या आहारामध्ये तांदूळ, गहू, सातू, खजूर, मांस, मासे भाज्या व फळे यांचा वापर करीत असल्याचे दिसून येते.
· वस्त्र व प्रावरणे : येथील उत्खनात मिळालेल्या पुराव्यावरून या लोकांना कापड विणण्याची कला अवगत असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरुषांच्या पोशाखात कंबरेपर्यंतचे वस्त्र व उपरण्याचा वापर करीत असे.
· अलंकार : हे लोक सोने, चांदी, तांबे, रत्ने, शिंपले कवडया, बिया इत्यादींचा वापर दागिने तयार करण्याकरिता करीत असे. यामध्ये बाजूबंद, अंगठ्या, दंडापर्यंत बांगड्या कमरपट्टा इत्यादी अंलकाराचा समावेश होता.
· करमणुकीची साधने : हे लोक करमणुकीकरिता, नृत्य, संगीत व सोंगट्या व फासे यांचा खेळ खेळत.
धार्मिक संकल्पना -
· पुजा अर्चना : हडप्पाकालीन उत्खननात मिळालेल्या मातृदेवतेची मूर्ति आणि अग्नीचे अवशेष यावरून लोक निसर्गपूजक व मातृपूजक होते स्पष्ट होते.
· अंत्यविधी : हडप्पा कालीनलोक मृतदेहांना जाळित असे किंवा शवपेटीत घालून पुरले जात आसवेत असे या स्पष्ट होते. त्याचबरोबर मृतदेह पुरतांना सोबत अन्न, अंलकार व आयुधे सुद्धा पुरवण्यात येत असे.
· उद्योग व व्यवसाय : हडप्पाकालीन लोकांचा शेती आणि व्यापार हे प्रमुख व्यवसाय होते.
· शेती : शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. ते शेतीमध्ये गहू, तांदूळ, कापूस, सातू, कडधान्ये इत्यादी पिकांचे उत्पादन घेत असे.
· भांडी : भांडी तयार करणे आणि त्यावरच चित्रकला काढणे हा येथील लोकांचा दूसरा व्यवसाय असल्याचे दिसून येते.
· कापड : कापूस व लोकरीपासून धागा तयार करणे आणि कापड तयार करणे हा येथील लोकांचा एक व्यवसाय होता.
· व्यापर : हडप्पा येथे तयार होणार्या मालाचे अवशेष सुमेरियन संस्कृतीमध्ये मिळाल्यामुळे आणि गुजरात मधील लोथल येथे मिळालेल्या बंदरच्या अवशेषावरून हे लोक व्यापारामध्ये प्रविण असल्याचे दिसून येते.हडप्पा येथील लोकांचा व्यापार जलमार्गाने इतर देशांशी चालत असल्याचे स्पष्ट होते.
वैदिक संस्कृतीबद्दल माहिती
वैदिक संस्कृतीचा उदय :
· सुमारे चार हजार वर्षापूर्वी वायव्यकडील खैबर खिंडीमधून अनेक टोळ्या भारतात सप्तसिंधुच्या प्रदेशात आल्या. या टोळ्या आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वतच्या भागातून भारतात आल्या असाव्यात असे म्हटले जाते. या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात असे. या लोकांना गुरांना चारण्याकरिता मोठमोठी कुरणे हवी असत. गुरे ही त्यांची संपत्ती होती.
· सप्तसिंधुच्या भूमी ही त्याच्या ईच्छेला पूरक अशी होती म्हणून त्यांनी तेथेच वसाहत स्थापन केली. त्यानंतरच्या काळात आलेल्या टोळ्या गंगा-यमुनेच्या परिसरात स्थिर झाल्या.
· अशाप्रकारे आर्य लोकांनी उत्तर भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या. हे लोक निसर्गप्रेमी होते. त्यांनी वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्याकरिता अनेक कवणे रचली. या कवनाचा संग्रह म्हणजे वेद होय.
· आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते.
· वैदिक वाड्मय जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून ओळखले जाते.
वैदिक संस्कृतीची वैशिष्टे :
· आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला.
· गुरे ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची सोईमुळे हे लोक सप्तसिंधुच्या खोर्यात स्थायिक झाले.
· हे टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे. यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.
· सप्तसिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली. या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.
वैदिक वाड्मयाची रचना :
· आर्य लोक निसर्गप्रेमी आणि अनेक देव-देवतांचे पूजक होते.
· सूर्य, अग्नी, पर्जन्य, मरुत आणि इंद्र या त्यांच्या प्रमुख देवता होत्या. या देवतांना प्रत्यांना प्रसन्न करण्यासाठी ते प्रार्थना करीत व स्तुति करण्याकरीता मंत्र म्हणीत असे.
· या मंत्राना सूक्त म्हणतात या मंत्राचा समूह म्हणजे वेद होय. यामधून आर्यांनी खालील ग्रथसंपदेची रचना केली.
· वेद : आर्यानी निर्माण केलेली पहिली ग्रंथरचना म्हणजे वेद होय. वेद चार प्रकारचे आहेत.
· ऋवेद : हा आर्यांचा पहिला ग्रंथ असून यामध्ये देवतांना प्रसन्न करण्याकरीता रचलेल्या ऋचांचा समावेश आहे.
· यजुर्वेद : हा ग्रंथ यज्ञाविषयी माहिती देणारा आहे.
· सामवेद : या ग्रंथामध्ये ऋचांचे तालासुरात कसे गायन करावे याबाबतची माहिती आहे.
· अर्थवेद : या ग्रंथामध्ये दैनंदिन जीवनातील संकटे निवारण करण्याकरीता आणि उत्तम आरोग्य कराव्या लागणार्या उपायाची माहिती आहे.
इतर ग्रंथसंपदा :
· ब्राम्हण्यके : यामध्ये यज्ञवेदीमध्ये वेदांचा वापर कसा करावा याबाबतची माहीती आहे.
· आरण्यके : वानप्रस्थाश्रम घेतल्यानंतर अरण्यात जावून रचलेल्या ग्रंथाचा समावेश होतो.
· उपनिषदे : उपनिषधे यांचा अर्थ गुरुजवळ बसून मिळविलेले ज्ञान होय. यामध्ये अनेक प्रश्नावर जीवनातील अनेक प्रश्नावर सखोल चिंतन करण्यात आलेले आहे.
वैदिक कालीन राज्यव्यवस्था :
· वैदिक कालीन राज्यव्यवस्था एक प्रकारे ग्रामीण व्यवस्थेची होती.
· राजा : राजा हा राज्याचा प्रमुख असून प्रजेचे रक्षण करणे ही त्याची प्रमुख जबाबदारी असे. राज्याचा कारभार चालविण्याकरीता त्यास पूरोहित, सेनापती आणि कर गोळा करणारा भागदुध मदत करीत असे.
· सभा व समिती : राज्य सत्तेवर नियंत्रण ठेवण्याकरिता सभा व समिती अशा दोन संस्था होत्या.
· सभा : ही ज्येष्ठ लोकांचे मंडळ होते.
· समिती : लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती म्हटले जात असे.
इतर शासन व्यवस्था :
· ग्रामणी : गावाच्या प्रमुखास ग्रामणी असे म्हटले जात असे व ग्रामवादी हा ग्रामणीच्या मदतीने गावाची न्यायविषयक जाबबदारी सांभाळत असे.
· विशपती : गावाच्या समूहाला विश आणि त्याच्या प्रमुखास विश्पती म्हटले जात असे.
दैनंदिन जिवनप्रणाली :
· अन्न : वैदिक काळातील लोकांच्या आहारात दूध व दुधापासून बनलेल्या पदार्थाचा वापर असे. त्याचबरोबर मांस, फळे, तांदूळ आणि सातू इत्यादी धान्याचा उपयोग होत असे.
· वस्त्र व प्रावरणे : वैदिक काळातील लोक स्तुती आणि लोकरीच्या कापडाचा वापर करीत असे.
· घरे : वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. आर्य लोक झोपडी वजा मातीच्या घरात राहत असे.
· अलंकार : वैदिक काळातील लोक फुलांच्या माळा, सोन्याचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे मणी व त्यांच्या माळा अलंकार म्हणून वापरीत असे. निष्क हा त्यांचा आवडता दागिना होता.
वैदिक कालीन सामाजिक व्यवस्था :
· वर्णव्यवस्था : वर्णव्यवस्था ही भारतीय जाती व्यवस्थेचा उगमस्थान आहे. सुरुवातीच्या काळात व्यवसायावरून ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शूद्र असे वर्ण निर्माण झाले. उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था संपुष्टात येवून जन्मावरून जात ठरू लागली.
· कुटुंबव्यवस्था : भारतात पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचा जन्म वैदिक काळामध्ये झाला. समाजव्यवस्थेत स्त्रीयांचे स्थान दुय्यम असले तरी स्त्रियांना वेदाभ्यास करण्याचा अधिकार होता. गार्गी, लोपमुद्रा व मेत्रेयी या विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक काळातील वाड्मयात आढळतो. नंतरच्या काळात स्त्रियांवर कडक बंधने लादली गेली.
· आश्रमव्यवस्था : जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या काळात मानवाला जीवनाचे शंभर वर्षे आयुष्य कल्पून त्याचे चार भागात विभाजन करण्यात आले. या प्रत्येक भागाला खालीलप्रमाणे कर्तव्य सोपविण्यात आले. ही जीवनाची आखणी म्हणजे आश्रमव्यवस्था होय.
· ब्रम्हचर्याश्रम : आयुष्याच्या पहिल्या भागात व्यक्तीकडे गुरुच्या सानिध्यात अभ्यास करून ज्ञान ग्रहण करून विद्या संपादन करण्याचे कर्तव्य त्याच्यावर सोपविण्यात आले.
· गृहस्थाश्रम : या काळात व्यक्तीने विवाह करून त्याचेकडे कुटुंबाचे पालन व पोषण करण्याची आणि आपली संसारीक जाबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य त्याच्यावर सोपविण्यात आले आहे.
· वानप्रस्थाश्रम : या काळात व्यक्तीने आपल्या मुलांकडे जबाबदारी सोपवून संसाराच्या सर्व कर्तव्यातून मुक्त होणे म्हणजे वानप्रस्थाश्रम होय.
· संन्यासाश्रम : यात व्यक्तीने वनात जावून ईश्वर चिंतनात आपला उर्वरित काळ कंठावा असे मानले जाई.
धार्मिक संकल्पना :
· वैदिक काळातील लोक निसर्गपूजक होते.
· सूर्य, वारा व पानी या शक्ति प्रसन्न राहाव्यात म्हणून आर्य लोक त्यांची प्रार्थना करीत असे. अशा देवतांना नैवैद्य प्रदान करण्यात येत असे आणि हा नैवैद्य शक्तिपर्यंत पोहचविण्याचे कार्य अग्नी करतो अशी त्याची संकल्पना होती.
· अग्नीस प्रसन्न करण्याकरीता यज्ञ ही संकल्पना उदयास आली.
नवीन धार्मिक प्रवाहाबद्दल माहिती
जैन धर्माचा उदय :
· उत्तर वैदिक काळामध्ये यज्ञयागाच्या कर्मकांडामध्ये पूरोहित लोकांचे वर्चस्व वाढले आणि ज्ञानदानाचे हक्क मोजक्या लोकांच्या हातात आले.
· जातीव्यवस्था कठीण होत जावून उच्च-नीच्च भेदभाव सुरू झाला.
· व्यक्तीचा दर्जा हा कर्तव्यावर नसून जन्मावर असल्याची संकल्पना रूढ झाली. या कारणामुळे समाजव्यवस्थेतील बहुतांशी वर्ग हा ज्ञानापासून दूर ढकलला गेला.
· या वर्गाला अंधकारातून वर काढण्याचा पहिला प्रयत्न जैन धर्माने केला.
भगवान वर्धमान महावीर (इ.स.पूर्व 599 ते 527) :
· भगवान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तिर्थकर असून, त्याचा जन्म बिहारमधील कुंडग्राम येथे झाला.
· त्यांनी सर्व इंद्रियांवर ताबा मिळविला म्हणून त्यांना लोक जिन म्हणू लागले. ते स्थानिक अर्धमाधवी भाषेमध्ये धर्मप्रचार करू लागले.
· महावीरांना जातीभेदभाव मान्य नव्हता. यामुळे धर्मज्ञानापासुन दूर राहिलेले लोक त्याच्याकडे आकृष्ट होवून त्यांचे अनुयायी झाले.
जैन धर्माची शिकवण :
· पंचमहाव्रते (अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य) आणि त्रिरत्न (सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र) ही भगवान माहावीराच्या प्रवचनाची मुख्य तत्वे होती.
· या सर्वामध्ये त्यांनी अहिंसेला सर्वात जास्त महत्व दिले.
· आपले सर्व आयुष्य महावीरांनी सामान्य जनतेला उपदेश करण्यात घालविले त्याचे वयाच्या बहात्तराव्या वर्षी पावापुरी येथे निधन झाले.
गौतम बुद्ध (इ.स.पूर्व 533 ते 483) :
· बहुजन समाजाला यज्ञयागाच्या कर्मकांडापासून दूर नेणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. बौद्ध धर्माची स्थापना भगवान गौतम बुद्धाने केली.
· भगवान गौतम बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ आहे. त्यांचा जन्म आजच्या नेपाळमध्ये असलेल्या लुंबिनी येथील राजघराण्यात झाला.
· संसारातील दुख:बघून त्यांनी राजघराण्याचा त्याग केला आणि ज्ञान प्राप्तीकरिता बाहेर पडले.
· बिहारमधील गया या ठिकाणी एका बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले. तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखल्या जावू लागले.
धम्मचक्रप्रवर्तन :
· ज्ञान प्राप्तीनंतर भगवान गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसीजवळील सारनाथ येथे दिले. त्यांचे हे प्रवचन धम्मचक्रप्रवर्तन म्हणून ओळखले जाते.
· आपला उपदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावा म्हणून त्यांना सामान्य लोकांना समजेल अशा पाली भाषेमध्ये प्रवचन दिले.
· सोपी भाषा आणि कर्मकांडाचा व जातीभेत नसल्यामुळे बहुजन समाज गौतम बुद्धाकडे आकर्षिला गेला.
बौद्ध धर्माची शिकवण :
·
गौतम
बूद्धांनी
निर्मानाच्या
प्राप्तीकरिता
अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय
संयम आणि मादक
पदार्थाचे
सेवन करू नयेत
या पंचशिलाचे पालन
करण्यास
संगितले.
गौतम
बूद्धांनी
दुख:
निवारण्याकरिता
अष्टांग
मार्गाचे
महत्व
सांगितले.
बौद्ध संघ :
· जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला उपदेश पोहचावा म्हणून गौतम बूद्धांनी बौद्ध संघाची स्थापना केली. त्यांनी आपल्या बौद्ध संघामध्ये महिलांनाही सहभागी करून घेतले. यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.
· बहुजन समाजाच्या हिताकरिता आयुष्य खर्च करणार्या या महान व्यक्तीचे इसनपूर्व 483 मध्ये निर्वाण झाले.
भारतातील महाजनपदे
संघटीत राज्यव्यवस्थेचा उद्य :
· आर्य लोकांनी भारतात टोळ्यांच्या रूपांने प्रवेश केला. कालांतराने त्यांच्या संघर्ष सुरू झाला. प्रराक्रमी टोळ्यांच्या नेत्यांनी राज्यव्यवस्था निर्माण केली. ही राज्ये जनपदे आणि महाजनपदे म्हणून ओळखली जात असे.
· भारतीय वेद, पुराण, रामायण, महाभारत जैन आणि बौद्ध ग्रंथाच्या अभ्यासावरून इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतात अंग (उत्तर बिहार), मगध (दक्षिण बिहार), कोसी (बनारस), कोसल (आयोध्या), विदेह (उत्तर बिहार), मल्य (गोरखपूर), चेंदी (बुंदेलखंड), वस्त (अलाहाबाद), कुरू (दिल्ली व मीरत), पांचाल (बरेली), मस्त्य (जयपूर), अश्मक (गोदावरीचा भाग), अवंती (माळवा), गांधार (अफगाणिस्थान), सुरसेन (मथुरा), कुंभोज (दक्षिण पश्चिम क्षेत्र) असे एकूण सोळा महाजनपदे होती असा उल्लेख मिळतो.
महाजपदकालीन राज्यव्यवस्था :
· महाजनपदकालीन राज्य व्यवस्था ही राजेशाही पद्धतीची होती. राज्यकारभाराच्या प्रक्रियेत राजा हा सर्वात वरच्या स्थानी असला तरी, बहुतांशी निर्णय खालील संस्थांमार्फत घेतले जात असे.
· गणपरिषद - ही राज्यातील ज्येष्ठ लोकांची परिषद असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार व राज्यकारभाराचे अधिकार गणपरिषदेकडे असे.
· कार्यकारी मंडळ - राज्याचा दैनंदिन कारभार चालविण्याकरिता कार्यकारी मंडळ असे.
· सभासद कार्यकारी मंडळामध्ये प्रस्ताव मांडीत आणि त्यावर बहुमताने निर्णय घेतला जात असे.
पराक्रमी राज्ये :
· कालांतराने गणपरिषदेचे महत्व कमी होवून राजेशाहीला महत्व प्राप्त झाले.
· या राजेलोकांच्या विस्तारवादी धोरणामुळे काही महाजनपदे विशेष प्रसिद्धीला आली. त्यामध्ये कोसल, वत्स, अवंती आणि मगध विशेष नावारूपास आली.
· कोशल - हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तरप्रदेश यामधील भाग म्हणजे कोसल होय.
· साकेत ही या राज्याची राजधानी होती.
· कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. या राजाचा मगध साम्राज्याचे पराभव करून कोसल आपल्या राज्यात समाविष्ट केले.
· वत्स - अलाहाबाद जवळील प्रदेश हा वत्स राज्याची राजधानी कौशांबी म्हणून ओळखला जात असे. हे शहर त्या काळात तलम रेशमी कापडाकरिता जगप्रसिद्ध होते.
· अवंती - आजचे उज्जैन शहर हे अवंतीची राजधानी होती. हे शहर त्या काळात व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीला आले होते.
· मगध - गंगा व शोण नदीच्या खोर्यातील परीसरात मगध राज्य पसरले होते.
· बिहारमधील राजगृह हे या राज्याची राजधानी होती. या ठिकाणी होवून गेलेल्या पराक्रमी राजे लोकांनी मगध साम्राज्य नावारूपास आणले.
बिंबिसार :
· बिंबिसार हा मगध राज्याचा पहिला पराक्रमी राजा होवून गेला.
· त्याने आपल्या विस्तारवादी धोरणामुळे काशी, अंग, मंद्र, अवंती आणि कोसल राजांचा पराभव करून ती राज्ये मगध साम्राज्यात सामील केली.
अजातशत्रू :
· हा राजा गौतम बुद्धाच्या समकालीन, असून त्याने अनेक गणराज्य आपल्या साम्राज्यात सामील करून घेतली.
· या राजाने जैन व बौद्ध धर्माला राजाश्रय दिला.
· पहिली धर्मपरिषद अजातशत्रूने राजगृह येथे बोलाविली होती.
शिशुनाग :
· या राजाने उत्तर भारतातील सर्व गणराज्ये एकत्र करून समर्थशाली मगध साम्राज्य निर्माण केले.
नंद राजे (इसवी सनपर्व 364 ते 324) :
· या काळात मगध राज्यात पराक्रमी नंद घराने नावारूपास आले. या घराण्यातील राजे लोकांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार तक्षशिला ते हिमालय आणि कर्नाटक पर्यंत केला होता.
· या काळात मगध साम्राज्य प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य म्हणून ओळखले जाते.
· या घराण्यातील शेवटचा राजा म्हणजे धनानंद होय.
· नंद राजांच्या काळातच भारतात परकीयांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली होती.
परकीय आक्रमणे :
· भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकूण बर्याच परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतातील संपत्ती लुटून नेली.
· प्राचीन काळापासून संपत्तीच्या परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आहे.
· भारतात पहीले परकीय आक्रमण मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात झाले.
इराणचा राजा डार्युश राजाचे आक्रमण :
· मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात इराणचा सम्राट दार्युश ने वायव्यकडील गांधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून ते प्रदेश जिंकले.
· भारतावर आक्रमण करणारा तो पहिला परकीय होता.
· या घटनेमुळे भारत व इराण यांच्यात राजनेतिक संबंध प्रस्तापित होवून व्यापर व कलेच्या क्षेत्रात देवाण घेवाण सुरू झाली.
अलेक्झांडर उर्फ सिकंदरचे आक्रमण (इसवीसन पूर्व 326) :
· ग्रीक राजा सिकंदरने इराणच्या राजाचा पराभव केला. त्यानंतर त्याने भारतावर आक्रमण केले.
· सिकंदरने सिंधु नदी ओलांडून गांधार प्रांतात प्रवेश केला. त्यांच्या सेनेने रावी नदीच्या तीरावर असलेल्या पुरू राजाचा पराभव केला.
· मगध पर्यत मात्र तो येवू शकला नाही.
· भारतातून माघारी जात असतांना इसवी सन पूर्व 323 मध्ये बॉबिलान येथे मरण पावला.
· सिकंदरच्या स्वारीमुळे भारत व ग्रीक यांच्या राजनैतिक संबंध प्रस्तापित झाले.
· ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून त्यामधून गांधार शिल्पकला शैली उदयास आली.
मौर्यकालीन भारत
मौर्य साम्राज्याची स्थापना :
· नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा अत्यंत जुलमी होता. त्याने चाणक्य नावाच्या ब्राम्हण व्यक्तीचा भर दरबारात अपमान केला.
· त्याचा बदला म्हणून आर्य चाणक्यने चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली राजे लोकांना एकत्र करून धनानंदाचा पराभव केला आणि चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याची स्थापना केली.
चंद्रगुप्त मौर्य :
· चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक असून भारताचा पहिला सम्राट होय. त्याने आपल्या राज्याचा विस्तार काबूल, कंदाहार, हेरात ते पश्चिमेकडील सौराष्ट्रपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.
· बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा) ही त्याच्या राज्याची राजधानी होती.
· ग्रीकचा राजा सेल्युकस निकोटरने आपला राजदूत म्हणून मेगॉस्थनिस यास राजदूत म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठविले होते. त्यांने मेगॉथिसने तत्कालीन परिस्थितिचे वर्णन इंडिका नावाच्या ग्रथांत केले होते.
· चंद्रगुप्ताने आपला मुलगा बिंदुसार याचेकडे राज्य सोपवून संन्यास घेतला. त्याचे श्रवणबेळगोळा येथे निधन झाले.
· बिंदुसार नंतर मौर्य वंशात सम्राट अशोक हा पराक्रमी राजा आला.
सम्राट अशोक :
· चंद्रगुप्तानंतर मौर्य साम्राज्यातील सम्राट अशोक हा दूसरा पराक्रमी राजा होय.
· त्याने पूर्वेस बंगालचा उपसागर ते पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदीपर्यंत आणि उत्तरेस नेपाळ ते दक्षिणेस कावेरी नदीपर्यंत मगध साम्राजाच्या विस्तार केला होता.
· कलिंगच्या युद्धाच्या घटनेमुळे सम्राट अशोकाच्या जिवनास वेगळेच वळण लागले.
कलिंग युद्ध (इसवी सन पूर्व 261) :
· सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराच्या उद्देशाने कलिंगवर स्वारी केली.
· या युद्धात भयंकर रक्तपातानंतर अशोकाला विजय मिळाला.
· या घटनेमुळे व्यथित होवून अशोकाने पुढे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्विकार केला.
बौद्ध धर्माचा प्रसार :
· बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.
· बौद्ध धर्माच्या प्रसारातील पाटलीपुत्र येथे बौद्धधर्म परिषद बोलविण्यात आली होती.
· जागोजागी शिलालेख आणि स्तंभ उभे केले सांची बौद्ध स्तूप व अशोक स्तंभ याच काळात उभारले गेले.
· आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यास श्रीलंकेस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पाठविले होते.
मौर्यकालीन राज्य व्यवस्था :
· मौर्य कालामध्ये राजाला सल्ला देण्याकरिता मंत्रीपरिषद निर्माण करण्यात आली होती.
· जिल्ह्याचा प्रमुख रज्जुक, तालुक्याचा प्रमुख गोप व गावा प्रमुख ग्रामणी म्हणून ओळखला जात असे.
मौर्य कालीन लोकजीवन :
· मौर्य काळातील लोकजीवन कृषिप्रधान होते. त्याचबरोबर चकाकी असलेली भांडी तयार करणे, नौकाबांधणी, कापड तयार करणे, व्यापार इत्यादी उद्योग भरभराटीस आले होते.
· विविध व्यापार्यांचे संघ स्थापन करण्यात आले होते, त्यांना श्रेणी असे म्हणत.
मौर्यकालीन कला व साहित्य :
· सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर शिल्पकलेस राजाश्रय दिला.
· यामुळे सारनाथ येथील स्तंब व सांची येथील बौद्ध सतूपासारखे स्मारके बांधली गेली. मौर्य काळामध्ये संस्कृत भाषेबरोबर पाली आणि अर्धमागधी भाषेत बरेच साहित्य लिहिले गेले.
· चाणक्याचे अर्थशास्त्र, पाणिणीचे व्याकरण आणि बौद्ध धर्मातील त्रिपिटक याच काळात लिहिले गेले
प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास
साहित्य व शास्त्रचा इतिहास :
· वैदिक काळापासून भारतात प्राचीन साहित्याची रचना झाली. यामध्ये खालील साहित्य महत्वपूर्ण आहे.
वेदकालीन साहित्य -
· यामध्ये वेद, वेदांगे दर्शनशास्त्रे, आरण्यके उपनिषिदे आणि भगवतगीतेसारखा तत्वचिंतक ग्रंथाचा समावेश होतो.
महाकाव्ये -
· यामध्ये रामायण व महाभारत यांचा समावेश होतो.
· राज्यशास्त्रावर मार्गदर्शन करणारा चाणक्यचा अर्थशास्त्र हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे.
वैधकशास्त्र -
· यामध्ये चिकित्सातंत्राचा समावेश असलेला महर्षी चरक यांनी लिहिलेला चरकसहिता, शस्त्रक्रियेची माहिती देणारा सुश्रूतसंहिता आणि निरनिराळ्या आजारावर उपचारपदी ठरविणारा वाग्भट संहिता प्रसिद्ध आहे.
गणित व भूमिती -
· यामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर आणि शून्याचा शोध लावणारे ब्रम्हगुप्त यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.
कला व स्थापत्य :
· प्राचीन भारत कला व साहित्य क्षेत्रात प्रगतीशील होता.
· आजही संची येथील स्थूप आणि दिल्लीच्या मेहरोळी येथील लोहस्तंभ भारताच्या प्राचीन कलेची साक्ष देतो
भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना
1. महंमद गझनवी :-
· अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्या करून पंजापर्यंत प्रांत आपल्या राज्याला जोडला होता.
· सन 998 मध्ये त्याचा मुलगा महंमद हा गझनचा सुलतान झाला.
·
त्याने सन 1001
ते 1027 पर्यंत
भारतावर सतरा
स्वार्या
केल्या. या
स्वार्या
करतांना
राज्य
स्थापनेऐवजी
भारतातील संपत्ती
लुटून नेणे हा
त्यांचा
मुख्य हेतु
होता.
त्याने
मथुरा व
सोमनाथचे
मंदिर लुटून
अमाप संपत्ती
गझनीला नेली.
2. महंमद घुरी :-
· महंमद घुरी हा अफगाणिस्तानमधील एक सुलतान होता. महंमद गझनवी स्वार्यानंतर दीडशे वर्षांनी त्याने भारतावर आक्रमण केले.
· सन 1992 मध्ये तराईनच्या सुद्धा दिल्लीचा राजा पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली त्यानंतर कनोजचा राजा जयचंदचा पराभव करून त्याचे राज्य आपल्या ताब्यात घेतले पुढे त्याने बंगाल व बिहारवर आक्रमण करून सत्ता स्थापित केली.
· त्याने जिंकलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार बघण्याकरिता आपला विश्वासू सरदार कुतूबुद्दीन ऐबकची नियुक्ती केली.
· अशाप्रकारे भारतात मुस्लिम साम्राज्य प्रस्तापित झाले. त्यानंतरच्या काळात दिल्लीच्या गादिवर खालील सत्ताधीश आले.
कुतूबुद्दीन ऐबक (सन 1206 ते 1210) :
· सन 1206 मध्ये महंमद घुरी मरण पावला. त्यानंतर कुतूबुद्दीन ऐबकने स्वत:ला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले.
· याच काळात ऐबकने दिल्लीच्या कुतुबमिनारच्या बांधकामास सुरवात केली.
· सन 1210 मध्ये तो मरण पावला.
· त्याच्या ठिकाणी त्याचा बदायुनचा सुभेदार आणि कुतूबुद्दीन ऐबकचा जावई अल्तमश सत्तेत आला.
शमशूद्दीन अल्तमश (सन 1210 ते 1226) :
· कुतूबुद्दीन ऐबकच्या मुत्यूनंतर काही सरदारांनी अल्तमशविरुद्ध बंडखोरी केली होती. ती ऐबकने मोडून काढली आणि स्थिरता प्रस्थापित केली.
· बगदादच्या खलीपाने त्यास भारताचा सुलतान म्हणून मान्यता दिली.
· अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो.
· अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्याने टका नावाचे नाणे सुरू केले होते. त्याने आपल्या हयातीमध्ये कुतूबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.
रझिया सुलतान (सन 1226 ते 1240) :
· अल्तमशच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रझिया सुलतान दिल्लीच्या राजगादिवर आली. ती प्रजादक्ष आणि कर्तबगार स्त्री होती.
· परंतु, दिल्लीच्या सिंहासनावर एक स्त्री असने हे सरदारांना खपत नव्हते.
· दिल्लीचे सुलतान पद भूषविणारी ती एकमेव पहिली महिला होती.
· सन 1240 मध्ये तिचा वध करण्यात आला.
गियासुद्दून बल्बन (सन 1266 ते 1287) :
· रझिया सुलतानच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर काही प्रमाणात अस्थिरता आली होती. सन 1266 मध्ये गियासुद्दीन बल्बन हा दिल्लीचा सुलतान झाला.
· त्याने आपल्या विरोधकाचा बंदोबस्त करून आपली सत्ता मजबूत केली.
· तात्काळ युद्ध करता यावे म्हणून त्याने खडे सैन्य ठेवण्याची प्रथा सुरू केली. यामुळे तास वायव्य सीमेवर मंगोलाचा बंदोबस्त करता आला.
· उर्दू भाषेचा रचयिता आणि प्रसिद्ध कवि या राजाचा दरबारी होता.
जलालूद्दीन खिलजी (सन 1290 ते 1296) :
· गियासुद्दीन बल्बनच्या मृत्यूनंतर त्याचे वारस कमकुवत निघाले. याचा फायदा घेवून पंजाबचा प्रांधिकारी जलालूद्दीन खिलजीने दिल्लीच्या गादीवर आपला हक्क प्रस्तापित करून खिलजी वंशाची स्थापना केली.
· त्याचा पुतण्या अल्लाऊद्दीन खिलजी हा पराक्रमी आणि महत्वाकांक्षी होता.
· त्याने सन 1296 मध्ये देवगिरीवर आक्रमण करून अमाप संपत्ती लुटली.
· ही बातमी ऐकून जलालूद्दीन खिलजी आपल्या पुतण्याला भेटावयास कडा येथे गेला असता.
· अल्लाऊद्दीनने त्याचा वध केला आणि दिल्लीची सत्ता हस्तगत केली.
अल्लाऊदीन खिलजी (सन 1296 ते 1316) :
· अल्लाऊद्दीन खिलजी हा महत्वाकांक्षी होता. त्याने अल्पावधीतच संपूर्ण भारत आपल्या नियंत्रणाखाली आणला.
· सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्तापित करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा दूसरा राजा होय.
अल्लाउद्दीन खिळजीचा साम्राज्य विस्तार :-
· सन 1299 मध्ये त्याने गुजरातवर आक्रमण करून गुजरातवर सत्ता प्रस्तापित केली.
· त्यानंतरच्या काळात राजपुताना, मेवाड, माळवा व राजस्थानवर ताबा मिळविला.
· सन 1306 मध्ये त्याचा सेनापती मलिक कफुरने दक्षिणेकडे मोहीम काढून दिवगिरी, तेलंगणा, मुदराईवर ताबा मिळविला.
· अशाप्रकारे अल्पावधीतच संपूर्ण भारत नियंत्रणाखाली आणला.
अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील सुधारणा :-
महसूल व्यवस्थेत सुधारणा :-
· अल्लाउद्दीन खिलजीने जमिनीची मोजणी करून जमिनीच्या उत्पादकेनुसार शेतसारा निश्चित केला.
बाजार नियंत्रण व्यवस्था :-
· सैन्यास खाद्यन्न आणि आवश्यक गरजेच्या वस्तु योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याने नियंत्रित बाजार व्यवस्था सुरू केली.
· या मालाचे भाव सरकारमार्फत निश्चित केले जात असे.
· त्याकरिता त्याने स्वतंत्र विभाग सुरू केला होता.
गियासुद्दीन तूघलक (सन 1320 ते 1325) :
· अल्लाउद्दीन खिलजीच्या मुत्यूनंतर त्याचा मुलगा ख्रुस्त्रो खान सत्तेत आला.
· वायव्य सरहद्द प्रांताचा प्रांधिकारी गियासुद्दीन तुघलकने ख्रुस्त्रोखानचा खून करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली आणि तुघलक वंशाची स्थापना केली.
· हे सुख त्याला फार दिवस उपभोगता आले नाही.
· त्याचा मुलगा महंमदबिन तुघलकने कपटाने त्याला ठार करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली.
महंमदबिन तुघलक (सन 1325 ते 1351) :-
· महंमदबिन तुघलक हा उतावीळ्या स्वभावाचा आणि व्याहारकी दृष्टीकोणाच्या अभावामुळे त्या राबवितांना त्यास अपयश आले.
दूआबमध्ये करवृद्धी (सन1326) :-
· दूआब भारतातील सर्वात सुपीक प्रदेश आहे. या प्रांतातील शेतकर्यांवर कराची वाढ केली.
· ही योजना लागू करतांना दूआबमध्ये दुष्काळ पडला आणि अधिकार्यांनी जबरदस्तीने कराची वसूली केली. यामुळे दूआबमध्ये बंड झाले.
देवगिरी भारताची राजधानी (1326) :-
· दिल्लीचा बादशहा महंमदबिन तुघलकने आपल्या राज्याच्या केंद्रवरती ठिकाण म्हणून देवगिरीची तुघलक साम्राज्याची राजधानी म्हणून निवड केली.
· सन 1326 मध्ये त्याने दिल्लीच्या जनतेसह दिवगिरी येथे आगमन केले. यावेळी देवगिरीचे नांव दौलताबाद असे करण्यात आले.
· परंतु, दौलताबाद येथे साधंनाचा अभाव असल्यामुळे पुन्हा त्याने दिल्लीला प्रस्थान केले.
· या काळात देवगिरीला भारताच्या राजधानीच सन्मान प्राप्त झाला होता.
चलन व्यवस्थेत सुधारणा (सन 1329) :-
· महंमदबिन तुघलकने मुद्रापद्धतीत सुधारणा करून तांब्याची मुद्रा प्रचारात आणली आणि सोन्याच्या मुद्रेच्या मोबदल्यात तांब्याची नाणे चलनात आली.
· लोकांनी घरीच टाकसाळ सुरू केला.
· बाजारात तांब्याच्या चलनाचा सुळसूळाट होवून सोन्याची नाणी गायब झाली.
फिरोझशहा तुघलक (सन 1351 ते 1388) :-
· महंमदबिन तुघलक नंतर त्याचा मुलगा फिरोझशहा तुघलक सुलतान झाला. हा उत्तमप्रशासक होता. त्याने लोककल्याणाची काम सुरू केली यामुळे तो विशेष प्रसिद्धीला आला होता.
· त्याने लोकांना जाचक असलेले कर रद्द करून फिरोझपूर, जौनपूर, हिस्सार व फिरोझाबाद ही नवीन शहरे बसविली सतलज आणि यमुना नदीवर कालवे काढले.
· फिरोजशहा तुघलक नंतर सत्तेत आलेले तुघलक घराण्याचे वारस कमकुवत निघाले.
· सन 1398 मध्ये मध्य आशियाचा सरदार तैमुलंगने भारतावर स्वारी करून प्रचंड लूट केली. या लुटीमधून दिल्ली महंमदबिन तूघलकने सुद्धा सुटली नाही.
· त्यानंतर सन 1414 मध्ये तूघलक घराण्याची सत्ता संपूष्ठात आली.
विजयनगर व बहमनी राज्ये
1. विजयनगरचे साम्राज्य :-
· दिल्लीच्या सुलतान महंमद तुघलकच्या संशयित स्वभावामुळे प्रांताधिकारी नाराज झाले. या घटनेमुळे तुघलक साम्राज्याचा विघटनास सुरवात झाली.
· या विघटनामधूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली.
· सन 1336 मध्ये हरीहर आणि बुक्का या दोन भावांनी दक्षिणेत विजयनगरचे साम्राज्य स्थापित केले. हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.
विजयनगर साम्राज्याचे राजे :-
· विजयनगर साम्राज्यात खालील पराक्रमी राजे होवून गेले.
हरीहर व बुक्का :-
· हे दोन्ही बंधु पराक्रमी होते. त्यांनी दक्षिणेत तुंगभद्रा नदीपासून तेकेरळपर्यंतचा भाग आपल्या अधिकाराखाली आणला.
· त्यानंतर आलेल्या बुक्काने रामेश्वरपर्यंत विजयनगर साम्राज्याचा विस्तार केला.
· त्यानंतरच्या काळात त्यांना बरीचशी वर्षे बहमनी साम्राज्यासोबत संघर्ष कारअवी लागली.
कृष्णदेवराय :-
· कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात पराक्रमी राजा होवून गेला.
· त्याने ओडिशाच्या राजाचा पराभव करून विजयवाडा आणि राजमेहंद्रीचा प्रदेश आपल्या राज्यात सामील केला.
· या राज्याच्या काळात विजयनगरचे साम्राज्य दक्षिणेस हिंद महासागरापर्यंत आणि उत्तरेस रायचूर पर्यंत पसरले होते.
विजयनगर साम्राज्याच्या सांस्कृतिक विकास :-
· विजयनगरचे राजे कला व साहित्याचे भोक्ते होते. तेलंगू भाषेतील साहित्याचा विकास यांच्याच काळात झाला.
· आमुक्तमाल्यदा हा तेलंगू ग्रथ यांच्याच काळात निर्माण झाला.
· विजयनगरमधील हजार राम मंदिर आणि पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर याच काळात बांधल्या गेले.
तालिकोटची लढाई (सन 1565) :-
· कृष्णदेवरायनंतर विजयनगरच्या साम्राज्याला उतरली कळा लागली. सन 1565 मध्ये कर्नाटकच्या तालीकोट येथे विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निझामशाही, गोवळकोंड्यांची कुतूबशाही आणि बिरुदची बिरुदशाही या चारही सत्तेने एकत्र येवून विजयनगरच्या राजा रामरामराचा पराभव केला आणि हंपी शहराचा विध्वंस केला.
· आजही हंपी येथे असलेले उध्वस्त अवशेष विजयनगरच्या प्राचीन वैभवाची साक्ष देते.
2. बहमनी साम्राज्याची स्थापना -
महमंद-बिन-
· तुघलकच्या संशयी स्वभावामुळे त्याच्या बर्यास सुभेदारांनी त्याच्या विरूद्ध बंड केले. त्यापैकी हसन गंगू बहमनशाह एक होता. त्याचे सन 1347 मध्ये स्वत:ला दौलताबाद येथे स्वत:चा राज्याभिषेक करून राजा म्हणून घोषित केले बहमनी वंशाची स्थापना केली.
· हसन गंगूने सत्ता स्थापित केल्याबरोबर दौलताबादची राजधानी गुलबर्गा येथे नेली.
· बहमनी वंशात खालील राजे होवून गेले.
हसन गंगू (1347 ते 1358) -
· गंगू हसन या राजाने बहमनी वंशाची स्थापना केली.
मुहंमदशहा पहिला (1358 ते 1373) -
· हा राजा कलेचा चाहता होता. गुलबर्गामधील शाही मशीद, व उस्मानाबादमधील शमशूद्दिनची कबर बांधली व प्रशासकीय सुधारणा केल्या.
· या राजाला इजिप्तच्या खलिफाने दक्षिण भारताचा सुलतान अशी मान्यता दिली होती.
मुहंमदशहा दूसरा (1377 ते 1997) -
· सन 1377 मध्ये महंमदशाह दूसरा सत्ताधीश झाला.
· त्याला दक्षिणेचा ऑरिस्टॉटल असे म्हणतात आणि प्रसिद्ध इराणचा कवी हाफिज त्याच्या दरबारात होता.
फिरोजशहा (सन 1397 ते 1422) -
· या काळात विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये सतत लढाया होत असे.
· यानंतरच्या काळात बहमनी वंशामध्ये अहमदशहा (1422 ते 1435), अल्लाउद्दीन दुसरा (1435 ते 57) इत्यादि सुलतान होवून गेले.
· याचा कार्यकाल विजयनगर साम्राज्याचा संघर्षात गेला.
हुमायू (1457 ते 1461) -
· सन 1457 मध्ये महमुद गवान नावाचा वजीर बहमनी वंशामध्ये आला. त्यास हुमायूने आपला वजीर म्हणून नेमले. यानंतरच्या काळात सन 1481 पर्यंत बहमनी वंशाची राज्यकारभाराची सूत्रे महंमद गवानच्या हातात होती.
· बहमनी राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रामध्ये विजापूर(आदिलशाही), अहमदनगरची (निझामशाही), गोवळकोडयांची (कुतुबशाही), बिदरची (बिदरशाही) आणि वर्हाडची (इमानशाही) ही पाच स्वतंत्र राज्ये उदयास आली.
मुघल साम्राज्याचा उदय
1. बाबर (सन 1526 ते 1530) :
· बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होय. दिल्लीमध्ये रब्राहीम लोदी सत्तेत असतांना पंजाबच्या प्रांताधिकारी दौलतखान लोदीने बाबरला भारतात आक्रमण करण्यास पाचारण केले.
· बाबरने सन 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहीम लोदीचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या साम्राज्याला राजपुतान्यातील राजपूतांनी आव्हान दिले.
· सन 1527 मध्ये खुनव्याच्या लढाईत बाबरने संघटीत राजपुतांचा पराभव केला आणि आपली दिल्लीची सत्ता मजबूत केली.
2. हुमायूम (सन 1530 ते 1555) :
· बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायूम सत्तेत आला.
· बिहारमधील अफगाणचा प्रमुख शेरशहा सुरीने चौसाच्या लढाईत हुमायूमचा पराभव केला.
· यामुळे हुमायूमला पळून जावे लागले चौसाच्या दुसर्या लढाईत (सन 1540) हुमायूचा दुसर्यांदा पराभव करून मुघलांची सत्ता संपूष्ठात आणली.
· पुढे हुमायूमला सत्तेविना भटकंती करावी लागली.
3. शेरशहा सूरी (सन 1540 ते 1554) :-
· सन 1540 मध्ये चौसाच्या लढाईत शेरशहा सुरीने हुमायूमचा करून सूरी वंशाची स्थापना केली. शेरशहाने जनतेच्या हितार्थ अनेक योजना सुरू केल्या.
जमीन महसूल सुधारणा: -
· शेतीची प्रत निश्चित करून उत्पादनानुसार शेतसारा निश्चित केला.
रस्ते बांधणी :-
· राजधानीला जोडणार्या रस्त्याचे बांधकाम हाती घेतले. दिल्ली अमृतसर राजमार्ग त्याच्याच काळात पूर्ण झाला.
चलन व्यवस्था :-
· त्याने रुपया हे नाणे सुरू केले.
टपाल व्यवस्था :-
· राजधानी मध्ये टपाल व्यवस्था सुरू केली.
4. हुमायूम (सन 1555 ते 1556) :
· हुमायूमला शेरशहा सूरी सत्तेत असेपर्यंत काहीही करता आले नाही.
· शेरशहा सूरीच्या मृत्यूनंतर मुहम्मद आदिलशहा सत्तेत आला. हा विलासी राजा होता.
· सन 1555 मध्ये सिकंदर सूरी चा पराभव करून सूरी वंशाची सत्ता संपुष्टात आणली आणि दिल्लीवर पुन्हा आपला ताबा मिळविला. परंतु, त्यास ही सत्ता फार दिवस उपभोगता आली नाही.
· सन 1556 मध्ये जिन्यावरुन घसरून मरण पावला.
5. अकबर (1556 ते 1606) :
· सम्राट अकबराने अल्पावधीमध्येच अर्ध्या भारतावर आपली सत्ता स्थापित केली.
· राणा प्रतापच्या प्रखर विरोधामुळे मेवाड मात्र त्यास आपल्या साम्राज्यात सामील करता आले नाही.
· अकबर हा सहष्णू राजा होता.
· सर्व धर्माच्या लोकांना विश्वासात घेवून त्याने आपला साम्राज्य विस्तार केला. यामुळे तो सर्व लोकांमध्ये प्रसिद्धीला आला होता.
महत्वाच्या सुधारणा :-
· त्याने युद्धकैद्यांना गुलाम बनविण्याची प्रथा बंद केली.
· सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.
· हिंदूवर लादण्यात आलेला झिझिया कर रद्द केला.
· बालहत्या प्रथा बंद केली.
· सर्व धर्माची तत्वे एकत्र करून दिन-ए-रलाही धर्माची स्थापना केली.
कला व विद्याप्रेमी :-
· अकबराच्या काळात आगर्याचा किशाल किल्याचे व फत्तेपूर शिक्रीचा किल्ला बांधला.
· अकबराच्या काळातच तानसेन व बैजू बाबरा सारखे गायक प्रसिद्धीला आले.
· अकबराच्या काळात अथर्ववेद, पंचतंत्र, रामायण व महाभारताचे फारसी भाषेत रूपांतर करण्यात आले.
· तुलसीदासचे रामचरितमानस याच काळात रचले गेले.
· अकबराच्या नवरत्न दरबार प्रसिद्ध होता.
6. जहांगीर (1606 ते 1627) :
· अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर सत्तेमध्ये आला. त्याने अकबराचे राज्य विस्तारचे धोरणपुढे चालू ठेवले.
· त्याने पूर्व बंगाल व पंजाबमधील कांगडा प्रांत राज्यास जोडले. हा राजा कलाप्रेमी होता.
· मुघल चित्रकलाशैली याच राज्याच्या काळात प्रसिद्धीला आली.
· काश्मिरमधील प्रसिद्ध निशांत बाग व शालिमार बाग जहांगीर राजनेच बांधली.
· जाहांगीरच्या कारभारावर नूरजहांचे नियंत्रण होते.
7. शहाजहान (सन 1627 ते 1658) :
· जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान गादिवर आला. त्याने दक्षिणकडे आपला राज्यविस्तार केला.
· त्याने दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतूबशाहींना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि त्याच्या मदतीने निझामशाही संपुष्टात आणली.
· अशाप्रकारे दक्षिणेकडे आपली सत्ता प्रस्तापित केली.
· शहाजहान हा कलाप्रेमी राजा होता. त्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तु बांधली. दिल्ली जामा मशीद आली लाल किल्ला हे याच राज्याच्या काळात बांधले गेले.
8. औरंगजेब (सन 1658 ते 1707) :
· सन 1657 मध्ये शहाजहान आजारी पडला असता त्याने शहाजहानला नजरकैदेत टाकून स्वत:ला सम्राट घोषित केले.
· औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघल साम्राज्याची सत्ता संपूर्ण भारतभर पसरली होती. औरंगजेब हा सुन्नी विचाराचा असल्यामुळे व संशयी स्वाभावामुळे बरेचशे सरदार व अधिकारी दुखावल्या गेले. याच काळात पंजाब प्रांतात शिखांविरुद्ध संघर्ष सुरू झाला होता आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.
· औरंगजेबास आपली 21 वर्षे मराठ्यांसोबत संघर्ष करण्यात खर्च करावी लागली. परंतु, त्यास यश आले नाही.
· शेवटच्या क्षणी सन 1707 मध्ये खुल्ताबाद येथे त्याचे निधन झाले. औरंजेबानंतरचे मुघल सम्राट कमकुवत निघाल्यामुळे प्रांतिक नवाबांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले.
· सन 1857 च्या ऊठावात शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर-दूसरा यास इंग्रजांनी अटक करून ब्रम्हदेशातील रंगून येथे ठेवले आणि तेथेच त्याचे निधन झाले. अशाप्रकारे मुघल साम्राज्य संपूष्ठात आले.
महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास
1. देवगिरीचे यादव घराणे -
o देवगिरीचे यादव घराणे महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासातील सोनेरी पान म्हणून ओळखले जाते.
o यादव घराण्याच्या काळामध्ये मराठी भाषेला राजभाषा म्हणून दर्जा मिळाला.
o देवगिरीचे यादव हे भगवान श्रीकृष्णाच्या वंशातील असून या घराण्यातील राजा पाचवा भिल्लमने (सन 1178 ते 1193) देवगिरी येथे आपले राज्ये स्थापन केले. त्यानंतरच्या काळात देवगिरी येथे खालील पराक्रमी राजे होवून गेले.
o भिल्लम पाचवा (सन 1178 ते 1193) - या राजाने दिवगिरी येथे यादव घराण्याची सत्ता स्थापन केली.
o जतुनी उर्फ जैत्रपाल (सन 1193 ते 1210) हा पाचव्या भिल्लमचा मुलगा असून त्याने गुजरातमधील परमार आणि दक्षिणेतील चोळ राजाचा पराभव केला.
o सिंघम(सन 1210 ते 1247) - सिंघम या यादव घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा म्हणून ओळखला जातो. सिंघमने नर्मदा ते तुंगभद्रेपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.
o महादेव (सन 1260 ते 1271) - महादेव हा कृष्ण याचा सर्वात लहान मुलगा होता.
o रामदेवराय (सन 1271 ते 1310) - महादेवाच्या निधनांतर त्यांचा मोठा भाऊ रामदेवराय सत्तेत आला. रामदेवरायने राज्यसत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्या राज्याचा विस्तार अर्ध्या भारतावर केला होता.
o शंकरदेव (सन 1310 ते 1312) - सन 1310 मध्ये रामदेवराय मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा शकरदेव सत्तेमध्ये आला. शंकरदेवने अल्लाउद्दिनला खंडणी पाठविणे बंद केले. यामुळे अल्लाउद्दीनचा सेनापती मालिक काफुरने सन 1312 मध्ये शंकरदेवचा पराभव करून देवगिरीचे राज्य खिलजी साम्राज्यात केले. त्यानंतर शिवाजी महाराजाची राज्यसत्ता स्थापन होईपर्यंत महाराष्ट्रात मुस्लिमांची सत्ता होती.
o अल्लाउद्दीन नंतरचे राजे - अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापासून महाराष्ट्रावर मुस्लिमांच्या सत्तेला सुरुवात झाली. अल्लाउद्दीन खिलजीनंतर दिल्लीच्या तख्तावर मालिककाफुर, मुबारक खिलजी, गियासुद्दीन तुघलक व शेवटी महमंद-बिन-तुघलक इत्यादि सत्ताधीश आले.
o देवगिरी भारताची राजधानी (1326) - दिल्लीचा बादशहा महमंद-बिन-तुघलकने आपल्या राज्याच्या केंद्रवर्ती ठिकाण म्हणून देवगिरीची तुघलक साम्राज्याची राजधानी म्हणून निवड केली. सन 1326 मध्ये त्याने दिल्लीच्या जनतेसह देवगिरी येथे आगमन केले. यावेळी देवगिरीचे नांव दौलताबाद असे करण्यात आले. परंतु, दौलताबाद येथे साधनांचा अभाव असल्यामुळे पुन्हा त्याने दिल्लीला प्रस्थान केले. या काळात देवगिरीला भारताचा राजधानीचा सन्मान प्राप्त झाला होता.
2. बहमनी साम्राज्याची स्थापना -
o महमंद-बिन-तुघलकच्या संशयी स्वभावामुळे त्याच्या बर्यास सुभेदारांनी त्याच्या विरूद्ध बंड केले. त्यापैकी हसन गंगू बहमनशाह एक होता.
o त्याचे सन 1347 मध्ये स्वत:ला दौलताबाद येथे स्वत:चा राज्याभिषेक करून राजा म्हणून घोषित केले बहमनी वंशाची स्थापना केली.
o हसन गंगूने सत्ता स्थापित केल्याबरोबर दौलताबादची राजधानी गुलबर्गा येथे नेली. बहमनी वंशात खालील राजे होवून गेले.
o हसन गंगू (1347 ते 1358) - गंगू हसन या राजाने बहमनी वंशाची स्थापना केली.
o मुहंमदशहा पहिला (1358 ते 1373) - हा राजा कलेचा चाहता होता. गुलबर्गामधील शाही मशीद, व उस्मानाबादमधील शमशूद्दिनची कबर बांधली व प्रशासकीय सुधारणा केल्या. या राजाला इजिप्तच्या खलिफाने दक्षिण भारताचा सुलतान अशी मान्यता दिली होती.
o मुहंमदशहा दूसरा (1377 ते 1997) - सन 1377 मध्ये महंमदशाह दूसरा सत्ताधीश झाला. त्याला दक्षिणेचा ऑरिस्टॉटल असे म्हणतात आणि प्रसिद्ध इराणचा कवी हाफिज त्याच्या दरबारात होता.
o फिरोजशहा (सन 1397 ते 1422) - या काळात विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये सतत लढाया होत असे. यानंतरच्या काळात बहमनी वंशामध्ये अहमदशहा (1422 ते 1435), अल्लाउद्दीन दुसरा (1435 ते 57) इत्यादि सुलतान होवून गेले. याचा कार्यकाल विजयनगर साम्राज्याचा संघर्षात गेला.
o हुमायू (1457 ते 1461) - सन 1457 मध्ये महमुद गवान नावाचा वजीर बहमनी वंशामध्ये आला. त्यास हुमायूने आपला वजीर म्हणून नेमले. यानंतरच्या काळात सन 1481 पर्यंत बहमनी वंशाची राज्यकारभाराची सूत्रे महंमद गवानच्या हातात होती.
3. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र -
o बहमनी राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रामध्ये विजापूर(आदिलशाही), अहमदनगरची (निझामशाही), गोवळकोडयांची (कुतुबशाही), बिदरची (बिदरशाही) आणि वर्हाडची (इमानशाही) ही पाच स्वतंत्र राज्ये उदयास आली. हे राजे सत्तासंघर्षांकरिता आपआपसात लढाया करीत असे.
o या कामाकरिता हे राजे लोक मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेत असे. यामुळे महाराष्ट्रात अनेक पराक्रमी घराने उदयास आली.
o त्यात सिंधखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले पराक्रमी घराने होते. या सर्वामध्ये भोसले घराण्याचा विशेष दबदबा होता.
o कोणताही मराठा सरदार सुलतानकडे गेला की, सुलतान त्यास चाकरीत ठेवत असे व त्यास सरदारकी व जहागिरी देत असे.
o हे सरदार जहागिरीवर खुश असे आणि स्वत:ला राज्यासारखे समजत असे.
o शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी भोसले घराण्यात खालील व्यक्ति प्रसिद्धीस आल्या.
o बाबाजीराजे भोसले - बाबाजी भोसले हे भोसले घराण्याचा मूळ पुरुष मनाला जातो. त्यांच्याकडे वेरूळ गावची पाटिलकी होती. त्यांना मालोजीराजे व विठोजीराजे असे दोन मुले होती.
o मालोजीराजे भोसले - मालोजीराजे भोसले घराण्यातील पहिला पराक्रमी पुरुष मनाला जातो. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. त्यांना शहाजीराजे व शरीफजी असे दोन मुले होती. शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले.
o शहाजीराजे भोसले - भोसले घराण्यातील सर्वात पराक्रमी व्यक्ति म्हणून शहाजीराजे ओळखले जातात. निजामाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांच्या नावे करून दिली. सन 1664 मध्ये शिकारीच्या प्रसंगी शहाजीराजेंचे निधन झाले.
o
4. हिंदवी स्वराज्याची स्थापना -
o हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्यावर झाला.
o शिवनेरी किल्यातील शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
o शहाजी महाराजांनी जिजामाता व शिवाजीराजे यांचेकडे पुण्याच्या जहागिरीची जबाबदारी सोपविली. त्यापूर्वी ही जबाबदारी दादाजी कोंडदेव यांच्या कडे होती.
o ते कोढाण्याचे सुभेदार होते व शहाजीराजांचे इनामी सेवक होते.
o शहाजीराजे व जिजामातेवर त्याची निष्ठा होती.
o पुण्यातील जहागिरीचा कारभार - पुण्यात शिवाजी महाराज व जिजामाता यांना राहण्याकरिता लाल महाल बांधण्यात आला.
o स्वराज्याची स्थापना (सन 1645) - जिजामातेने शिवाजी राजांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. सन 1645 मध्ये शिवाजी महाराज व दादाजी नरसप्रभू, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, कान्होजी जेधे इत्यादि सवंगड्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
o राजधानीची स्थापना - स्वराज्याच्या स्थापनेनंतर शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा व रोहिंडा हे किल्ले ताब्यात घेतले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी निवडली.
o प्रतापगडची लढाई (सन 1659) - शिवाजी महाराजांचा हा प्रताप पाहून आदिलशहाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला व या कामगिरीवर वाईचा सुभेदार अफजलखानास पाठविण्यात आले. नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज व अफजलखान यांच्यात झालेल्या भेटीमध्ये शिवाजी महाराजांकडून खान मारला गेला. या भेटीत वेडा सय्यदच्या हल्यापासून जिवा महालने महाराजांना वाचविले.
o सिद्दी जौहरची स्वारी (सन 1660) - सन 1660 मध्ये आदिलशाहाने कर्नुल प्रांताचा सरदार सिद्दी जौहर याच महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. आदिलशहाने त्यास सलाबतखान हा किताब दिला होता. यावेळी शिवाजी महाराज पन्हाळयावर होते म्हणून सिद्दीने प्रचंड फौजेनिशी पन्हाळ्यात वेढा घातला. सिद्दी जौहरची नजर चुकवून शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन निसटले. विशालगडाकडे कूच केले. 14 जुलै 1660 रोजी महाराज आपल्या सवगंड्यासहित विशालगडावर जात असतांना बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या निवडक सहकार्यांना सोबत्यासह गजापुरजवळील घोडखिंडीमध्ये सिद्दी जौहरच्या सेनेसोबत झुंज दिली व या लढाईत ते धारातीर्थी पडले. आज ही खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते.
o मुघलांशी संघर्ष -
o शाहीस्तेखानची स्वारी (सन 1660) - याच काळात औरंजेबाने प्रचंड फौजेनिशी शहिस्तेखानास स्वराज्यावर आक्रमण करण्यास पाठविले. तीन वर्षे त्याचा मुक्काम पुण्याच्या लाल महालमध्ये होता. शिवाजी महाराजांनी एप्रिल 1663 मध्ये आपल्या सवंगड्यासह रात्री लाल महालात प्रवेश करून शहिस्तेखानाची बोटे छाटली.
o मिर्झाराजे जयसिंग (सन 1665) - शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याकरिता औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांना महाराष्ट्रात पाठविले. मिर्झाराजे जयसिंगने महाराष्ट्रात आल्यानंतर सेनेनिशी पुरंदरला वेढा दिला.
o आग्रावरून सुटका (सन 1666) - तहानुसार महाराजांनी औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आग्रास भेट देण्याचे काबुल केले आणि आग्र्यात महाराजांच्या संरक्षणाची जाबाबदारी मिर्झाराजे यांचा मुलगा रामसिंगने स्वीकारली. 5 मार्च 1666 रोजी शिवाजी महाराज राजपुत्र संभाजी, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, हिरोजी फर्दर, मदारी मेहतर, प्रतापराव गुर्जर व बर्हीजी नाईक इत्यादिस सहकार्यांना घेवून ते आग्रास पोहचले. 18 ऑगस्ट 1666 रोजी महाराज बादशाच्या हातावर तुरी देवून महाराष्ट्रात परतले. सन 1670 मध्ये तानाजी मालसरेंनी प्राणाची बाजी लावून कोंढाणा जिंकला.
5. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक (सन 1674) -
o स्वराज्य स्थापन करण्यात आले हे जगजाहीर व्हावे म्हणून शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर आपला राज्यशिषेक करवून घेतला.
o काशीचे पंडित गागाभट्ट यांनी राज्यशिषेक समारंभाचे पौरोहित्य केले. या दिवसापासून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली.
o सोन्याचा होन व तांब्याची शिवराई नाणे सुरू करण्यात आले.
o शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार केला.
o अष्टप्रधान मंडळ - राज्यभिषेकच्या निमित्ताने स्वराज्याच्या राज्यकारभार चालविण्याकरिता अष्टप्रधान मंडळ स्थापन करण्यात आले आणि प्रत्येकावर स्वतंत्र जाबबदारी सोपविण्यात आली.
o मुलकी व्यवस्था - शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बारा सुभ्यामध्ये राज्याची विभागणी केली आणि प्रत्येक सुभ्यावर सुभेदार नावाचा अंमलदार नेमला.
o सैन्य व्यवस्था - स्वराज्याच्या संरक्षणार्थ महाराजांनी घोळदळ व पायदळ हे सैन्य विभाग तयार केले आणि सागरी किनार्याच्या संरक्षणाकरिता आरमार उभारले.
o किल्याची व्यवस्था - शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्याकडे 300 च्यावर किल्ले होते. त्या किल्याच्या संरक्षणाकरिता किल्लेदार, सबनीस व कारखानीस इत्यादि अधिकारी नेमले.
6. दक्षिणेची मोहीम (1677) -
o राज्यभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी राज्यविस्ताराच्या उद्देशाने दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली.
o यामोहिमेत त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशासोबत मैत्रीचा तह केला.
o कर्नाटकाच्या मोहिमेत त्यांनी जिंजी व वेल्लोर जिंकले.
o उत्तरेकडील हिंदी कवि भूषण यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर शिवराज भूषण या नावाने काव्य लिहिले.
o दक्षिणेच्या मोहिमेत दगदग झाल्याने ज्वराने आजारी पडून 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे निधन झाले.
भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन
1. यूरोपियन - कोलंबस
· राष्ट्र - स्पेन
· वर्ष - 1493
· वखारी - त्याने वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावला.
2. यूरोपियन - वास्को-डी-गामा
· राष्ट्र - पोर्तुगल
· वर्ष - 1498
· वखारी - कलिकत (भारतात येणारा पहिला यूरोपियन)
3. यूरोपियन - कॅप्टन हॉकीन्स
· राष्ट्र - ब्रिटिश
· वर्ष - 1607
· कंपनी - ईस्ट इंडिया कंपनी
· वखारी - पहिली वखार सूरत येथे स्थापन केली.
4. यूरोपियन - हृहृ
· राष्ट्र - डच
· वर्ष - 1602
· कंपनी - युनायटेड ईस्ट इंडिया
· वखारी - सूरत, मच्छलीपट्टणम, नागपट्टणम, वेगूर्ला
5. यूरोपियन - हृहृ
· राष्ट्र - फ्रेंच
· वर्ष - 1664
· कंपनी - फ्रेंच ईस्ट इंडिया
· वखारी - सूरत, मच्छलीपट्टणम, पोंडेचेरी, चंद्रनगर, कोरोमंडल इत्यादि ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या.
कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल
1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-
· भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना.
· प्लासिचे युद्ध :- जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.
· बक्सरची लढाई :- बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.
· अलाहाबादचा तह :- बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.
2. सर वॉरन हेस्टिंग (सन 1772 ते 1773) :-
·
सर वॉरन
हेस्टिंगने
बंगाल
प्रांतात न्यायविषयक
सुधारणा
केल्या व
विल्यम जोन्सच्या
सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक
सोसायटी ऑफ
बंगालच्या
संस्थेची स्थापना
केली.
भारतातील पहिले
वृत्तपत्र
बंगाल गॅझेट (1781)
याच काळात
सुरू झाले.
3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-
· लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.
4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-
· लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.
· तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.
· सन 1802 मध्ये दुसर्या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला.
5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-
· मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.
· जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली.
6. लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-
· लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला.
· भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
· इंग्रज अधिकारी सर अॅलन ह्युम यांनी सन 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. या संघटनेची पहिली बैठक डिसेंबर 1885 मुंबई येथे बोलाविण्यात आली.
· राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे 28 डिसेंबर 1885 रोजी गवालिया टॅंक जवळील गोकूळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले होते.
· कलकत्याचे प्रसिद्ध वकील ओमेशचंद्र बॅनर्जी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
· या अधिवेशनाला देशाच्या कानाकोपर्यातून एकूण 72 प्रतीनिधी हजर होते.
राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :
· 1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन
· 1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी
· 1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष
· 1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष
·
· 1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष
·
· 1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.
· 1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.
· 1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.
· 1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.
· 1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.
· 1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.
· 1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.
· 1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
· 1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
· 1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.
· 1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
· 1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.
· 1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.
· 1928 - कलकत्ता - मोतीलाल नेहरू - नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.
· 1929 - लाहो - पं. जवाहरलाल नेहरू - संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
· 1931 - कराची - सरदार पटेल - मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.
· 1936 - फैजपूर - जवाहरलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.
· 1938 - हरिपुरा - सुभाषचंद्र बोस -
· 1939 - त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस -
· 1940 - रामगढ - अब्दुल कलाम आझाद - वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.
· 1940 - मुंबई - मौ. अब्दुल आझाद - चलेजाव आंदोलनाची घोषणा.
· 1946 - मिरत - जे. बी. कृपालानी -
· 1947 - दिल्ली - डॉ. राजेंद्रप्रसाद - भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन
टिळक युगातील महत्वाच्या घटना
1. प्लेगची साथ व टिळकांना झालेली अटक :
· सन 1896 ते 1899 या काळात पुण्यात ब्युबानिक प्लेगची भयंकर साथ आली होती.
· शासनाने प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता रॅंड या इंग्रज अधिकार्याची नियुक्ती केली.
· रॅंडने उपाय योजनेच्या नावाखाली जनतेवर आतोनात अत्याचार केले. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅंड व आयर्स्ट यांचा गोळ्या घालून वध केला.
· ब्रिटिश शासनाने टिळकांचा रॅंडच्या खुनाशी संबंध जोडून त्यांना अटक केली.
· न्यायालयाने टिळकांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावली.
· भारतीय जनतेने टिळकांच्या शिक्षेविरुद्ध संपूर्ण भारत बंद पाळला. हा भारतीय जनतेने पाळलेला पहिला बंद होय.
2. बंगालची फाळणी (1905) :
· लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
· बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले.
· बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.
· आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली.
· टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले.
· सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.
3. टिळकांना शिक्षा :
· ब्रिटिश सरकारच्या विरोधात केसरीमध्ये जनतेच्या भावना भडकविणारे लेखन केल्याचा आरोप लोकमान्य टिळकांवर ठेवण्यात आला व त्यांना 6 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावून मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले.
4. होमरूल लीग चळवळ :
· डॉ. अॅनी. बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली.
· थिऑसॉफीकल सोसायटीच्या माध्यमातून ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली.
· सन 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेहून शिक्षा भोगून परत आले.
· लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरू केली.
· बॅरिस्टर जोसेफ बाप्टिस्टा हे या चळवळीचे अध्यक्ष होते. न.ची. केळकर हे सचिव होते.
5. टिळकांचे निधन :
· लोकमान्य टिळकांनी. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याचा स्विकार करण्याच्या उद्देशाने प्रतीयोगिता सहकारिता हे धोरण जाहीर केले. ॰
· या कायद्यानुसार घेण्यात येणार्या निवदणुकीत काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली होती.
· एप्रिल 1920 मध्ये निवडणुकीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला. परंतु दुर्दैवाने लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले.
· भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर गांधी युगाचा उदय झाला.
गांधी युगातील महत्वाच्या घटना
गांधी युगाचा उदय :
· सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.
· आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
· जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.
· जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.
1. भारतातील चळवळी :
· भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.
चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -
· चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.
साराबंधी चळवळ (सन 1918) -
· 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.
· गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.
· शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
· हा गांधीजीचा दूसरा विजय होता.
रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -
· भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.
· या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.
· या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
· हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.
· 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.
· या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.
2. असहकार आंदोलन :
· डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
· सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.
· फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली.
· या आगीत पोलिस अधिकार्यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.
· या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
3. स्वराज्य पक्षाची स्थापना :
· सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या.
· असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
· काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.
4. सायमन कमिशन (1928) :
· भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले.
· या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते.
· या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते.
· या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.
5. नेहरू रिपोर्ट (1928) :
· भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले.
· राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.
· नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.
6. सविनय कायदेभंग आंदोलन :
· 1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते.
· या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
· 26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :
· सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला.
· 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली.
· 385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली.
· यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले.
· महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.
· सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली.
· 6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले.
· आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.
8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :
· सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली.
· महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली.
· विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.
9. भारत छोडो आंदोलन (1942) :
· क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला.
· 14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला.
· 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली.
प्रति सरकारे -
· इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले.
· प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.
·
· चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले.
· महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली.
सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -
· सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.
· या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले.
भारतीय सैनिकाचा उठाव -
· चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.
· या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला.
· नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला.
· सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.
10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :
· सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता.
· मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली.
त्रिमंत्री योजना (सन 1946) -
· या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले.
· या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे मांडली. ही योजना त्रिमंत्री योजनाम्हणून प्रसिद्ध आहे.
हंगामी सरकार -
· त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली.
माऊंट बॅटन योजना -
· 24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले.
· भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली.
· 3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली.
· मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.
सायमन कमिशन बद्दल माहिती
· 1919 च्या सुधारणा कायद्यात येणार्या अडचणी व निर्माण होणारे दोष यांचा विचार करण्यासाठी सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये समिती नेमली होती.
· नोव्हें. 1927 मध्ये कमिशन नेमले गेले
· सात सदस्यीय या कमिशनात एकही भारतीय व्यक्ती नसल्यामुळे काँग्रेससह इतर पक्षांनी कमिशनवर बहिष्कार घातला.
· 3 फेब्रुवारी 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले.
· पंजाब मध्ये सायमन कमिशनला विरोध लाला लजपतराय यांनी केला.
· 1930 रोजी सायमन कमिशनचा अहवाल जाहीर.
गोलमेज परिषद बद्दल माहिती
· सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.
· वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.
· नेहरू आहवालातील तत्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्वीन या दिली. (23 डिसेंबर 1929), आयर्वीन यांचा प्रतिसाद नाही.
· 1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष - पं. जवाहरलाल नेहरू.
· सविनय कायदेभंग (12 मार्ग 1930 ते 5 मार्च 1931)
· 12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.
· साबरमती ते दांडी अंतर - 385 कि.मी.
· 6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला.
· धारासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (21 मे 1930)
· याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.
· या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (1930)
· पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.
· काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
· गांधी आयर्वीन करार - 5 मार्च 1931, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसर्या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.
· दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1931 मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास
· सविनय कायदेभंगाच्या दुसर्या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932
· सविनय कायदेभंगाची समाप्ती - 1934
· 17 ऑगस्ट 1932 रोजी रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. या व्दारे अश्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देऊ केले.
· विधीमंडळातील विभक्त मतदार संघाविषयी गांधीजीचे प्राणांतीक उपोषण.
· 24 सप्टेंबर 1932 या दिवशी म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार (येरवडा करार) झाला. त्यान्वये अश्पृश्यांना विभक्त मतदार संघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचे मान्य केले गेले.
· तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये भरली.
· सविनय कायदेभंगावेळी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खितमतगार नावाची लाल शर्ट वाल्यांची संघटना सुरू केली.
ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
· ऑगस्ट 1940 मध्ये दुसर्या महायुद्धात काँग्रेसचे सहकार्य मिळविण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी एक घोषणा केली. त्यानुसार गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदी प्रतिनिधींचा समावेश व कार्यकारी मंडळाचा विस्तार करण्याची आश्वासने दिली होती.
· ऑगस्ट घोषणेत-युद्धानंतर स्वातंत्र्य देणे, गव्हर्नर जनरलच्या अनिर्बंध सत्तेवर नियंत्रणे घालणे, वसाहतीच्या स्वराज्याचे स्पष्ट आश्वासन देणे इ. गोष्टीचा समावेश नसल्याने काँग्रेसने हि योजना फेटाळली.
· ऑक्टोबर 1940 मध्ये म.गांधीजीच्या आदेशानुसार वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू झाली.
· वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही-विनोबा भावे, दुसरे पं. नेहरू होते.
क्रिप्स योजना :
· मार्च 1942 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांनी भारतमंत्री सर स्ट्रफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन भारतात पाठविले.
· 21 मार्च 1942 रोजी क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली.
· युद्ध संपल्यानंतर भारताला वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा देण्याची तरतूद या योजनेत होती.
· क्रिप्स योजना काँग्रेससह सर्वच पक्षांनी फेटाळून लावली.
· गांधीजीनी क्रिप्स योजनेला 'बुडत्या बॅकेचा पुढील तारखेचा चेक' अशी उपाधी दिली.
लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920)
· जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी
· 1881 - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे
· 1880 - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
· 1884 - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
· 1893 - सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ
· 1895 - शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.
· 1908 - कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल 'राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा' - मंडाले येथे रवानगी - तेथेच 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लिखान.
· 1914 - मंडालेल्या तुरंगातून सुटका
· 1916 - लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
· 1920 - काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस लोकशाही पक्ष' टिळकांनी स्थापन केला.
· 1920 - 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.
म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948)
· जन्म 2 ऑक्टोबर 1869 - पोरबंदर (गुजरात)
· इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.
· 1893 ते 1914 - दक्षिण आफ्रिकेत कार्ये
· गांधीजीचे राजकीय गुरु - गोपाळ कृष्ण गोखले.
· गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.
· 1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.
· पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.
· 1917 - चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)
· 1918 - खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)
· 1918 - अहमदाबाद गिरणीतील संप
· 1920 - असहकार चळवळीस प्रारंभ केला.
· 1924 - बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
· 1930 - सविनय कायदेभंगाची चळवळ
· 1933 - 'हरिजन सेवक संघाची' स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.
· 1933 - 'हरिजन' हे दैनिक सुरू केले.
· 1940 - वैयक्तिक सत्याग्रह
· 1942 - 'चलेजाव' ची घोषणा
· 1948 - 30 जानेवारी गांधीजीची हत्या
· दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र काढले.
सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना
· सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897, बंगाल प्रांतात झाला.
· सुभाषबाबू 1920 मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.
· सुभाषबाबू 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.
· नेताजींनी 1940 मध्ये 'फॉरवर्ड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली.
· डिसेंबर 1940 मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.
· जानेवारी 1941 मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.
· नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.
· नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे 'स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार' स्थापन केले.
· सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.
· आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.
· सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.
· आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील 'अंदमान व निकोबार' ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे 'शहीद व स्वराज्य' असे केले.
· आझाद हिंद सेनेने 18 मार्च 1944 रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.
· 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.
विनायक दामोदर सावरकरांची कामगिरी (1883-1966)
· जन्म 1883, भगूर (जि. नाशिक)
· प्रभाव - इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी
· विचार - ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.
· 1900 - पुण्यात 'मित्रमेळा संघटना' स्थापना केली.
· 1904 - मित्रमेळ्याचे रूपांतर 'अभिनव भारत' संघटनेत.
· 1906 - 'शिवाजी स्कॉलरशिप' मिळवून इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.
· वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.
· सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.
· 1908 - सावरकरांच्या घरावर धाड. गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास 'नाशिक खटला' असे म्हणतात.
· अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.
· न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.
· 1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.
· वि.दा. सावरकरांनी 'भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने', हिंदू पदपादशाही, 'माझी जन्मठेप', 'हिंदुत्व' '1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध' इत्यादीचे लिखान केले.
वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी
· यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.
· वासुदेव फडक्यांनी 1879 मध्ये रामोशी, कोळी, ठाकर अशा जमतीच्या लोकांना हाताशी धरून इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
· सार्वजनिक काकांनी फडक्याचे वकीलपत्र घेतले होते.
· जानेवारी 1880 मध्ये वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
· 17 फेब्रुवारी 1883 रोजी फडक्यांचे क्षय रोगाने एडनच्या तुरुंगात निधन झाले.
चाफेकर बंधु
· 1896-97 मध्ये दामोदर हरी चाफेकर व बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी पुण्यात व्यायाम मंडळाची स्थापना केली.
· 1897 मध्ये पुण्यात ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती.
· 22 जून 1897 रोजी दामोदर व बाळकृष्ण चाफेकर या बंधूनी जुलमी प्लेग कमिशनर रॅड व इंग्रज अधिकारी आर्यहस्ट यांची हत्या केली.
· द्रवीड बंधूनी रॅड हत्या कटाची माहिती सरकारला दिली.
· चाफेकर बंधूना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
· वासुदेव चाफेकर व महादेव आपटे यांनी द्रवीड बंधूची हत्या केली.
दहशतवादाच्या उदयाची कारणे :
1. इ.स. 1857 ची प्रेरणा
2. प्रबोधन चळवळ
3. युरोपातील घटना
4. बंगालची फाळणी
5. रशिया जपान युद्ध
6. प्रखर राष्ट्रवाद
7. राष्ट्रसभेची नेमस्त वाटचाल
8. इंग्रजी भाषा
9. इंग्रज अधिकार्यांचे उद्दात वर्तन
10. अहिंसात्मक तत्वज्ञान
11. क्रांतीकारकांचे आदर्श
12. जहालाची कार्यप्रणाली
ईस्ट इंडिया कंपनीवर भारताची सत्ता
· मुंबईतील उद्योगपती संजीव मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीची खरेदी केली आहे.
· तसेच यात त्यांनी कंपनीचे समभाग खरेदी करून 15 दशलक्ष डॉलर एवढी मोठी रक्कम देऊन ते आता कंपनीचे मालक झाले आहेत.
· संजीव मेहता यांनी 'ईस्ट इंडिया कंपनी' चे मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी केले आहेत.
· संजीव यांनी 40 भागधारकांकडून ही हिस्सेदारी खरेदी केली आहे.
· ईस्ट इंडिया कंपनी आता नवीन व्यवसायांना सुरुवात करणार आहे.
· ई-कॉमर्स माध्यमातून देखील विक्री सुरू केली जाणार आहे.
· इ.स. 1600 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली.
· 1757 च्या प्लासीच्या लढाईचे ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सत्तेचा पाया घातला, तर 1764 बक्सारच्या लढाईने सत्तेचा पाया भक्कम केला होता.
· 1 नोव्हेंबर 1858 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची भारतावरील सत्ता संपुष्टात आली.
आधुनिक भारत (1885-1905) बद्दल माहिती
· माजी सनदी अधिकारी अॅलन ओक्टिव्हि हयूम यांनी तत्कालीन व्हाईसरॉय डफरीन यांच्या सहकार्याने 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची (काँग्रेसची) स्थापना केली.
· मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजच्या सभागृहात पहिले अधिवेशन भरले. देशाच्या विविध भागातून या अधिवेशनास 72प्रतिनिधी उपस्थित राहिले.
· डिसेंबर 1885 साली पुण्यात कॉलर्याची साथ आल्यामुळे नियोजित पुणे अधिवेशन मुंबईला भरले.
· राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी
· राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये न्या. महादेव गोविंद रानडे, पितामह दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, बेहरामजी मलबारी, रहिमतुल्ला सयानी, सर नारायण चंदावरकर, इ. महाराष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घेतला होता.
· 1888 साली 'ब्रिटिश समितीची' स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने 'इंडिया' नावाचे मासिक चालवून हिंदी लोकांच्या परिस्थितीचे सत्य वर्णन केले गेले.
· 1882 मध्ये दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स' या सभागृहासाठी निवडून आले.
· 1895 मध्ये हिंदूस्थानातील खर्चाची चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशनची नेमणूक करण्यात आली.
· 1897 मध्ये पुण्यात चाफेकर बंधुनी प्लेग अधिकारी रॅड व आयर्स्ट यांची हत्या केली.
· 1899 मध्ये साम्राज्यवादी वृत्तीच्या लॉर्ड कर्झन याची 'भारताचा व्हॉईसरॉय' म्हणून नेमणूक झाली.
· कर्झनने 1901 मध्ये 'पंजाब लँड डेव्हलपमेंट कायदा' पास करून कर्जबाजारी शेतकर्यांची कर्जे माफ केली.
· 1904 मध्ये 'सहकारी पतपेढी कायदा' करून शेतकर्यांना कर्जे मिळवण्याची सोय केली.
· कृषी मार्गदर्शनासाठी 1901 मध्ये कर्झनने 'इन्स्पेक्टर जनरल ऑफ अॅग्रीकल्चर' नेमले.
· 1899 मध्ये पुसा येथे कर्झनने कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.
· 1903 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली.
· पोलीस व गुन्हेगरांचे संबंध तपासण्यासाठी कर्झनने अँड्रु फ्रेझर समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार कर्झनने संपूर्ण पोलीस खात्याचे पुनर्जीवन केले.
· 1901 मध्ये 'Imperial cadet core' ची स्थापना कर्झनने केली - (संस्थानिकांच्या राजपुत्रांकरिता)
· कोलकत्ता येथे व्हिक्टोरिया राणीच्या स्मृती प्रित्यर्थ 'व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल' कर्झनने बांधला.
· 1900 मध्ये कोलकत्ता नगरपालिका कायदा करण्यात आला.
· 1904 मध्ये कर्झनने पुराणवस्तू संरक्षण खाते निर्माण करून भारताच्या संस्कृतीची जपवणूक केली.
आधुनिक भारत (1885-1905) बद्दल माहिती
· माजी सनदी अधिकारी अॅलन ओक्टिव्हि हयूम यांनी तत्कालीन व्हाईसरॉय डफरीन यांच्या सहकार्याने 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची (काँग्रेसची) स्थापना केली.
· मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजच्या सभागृहात पहिले अधिवेशन भरले. देशाच्या विविध भागातून या अधिवेशनास 72प्रतिनिधी उपस्थित राहिले.
· डिसेंबर 1885 साली पुण्यात कॉलर्याची साथ आल्यामुळे नियोजित पुणे अधिवेशन मुंबईला भरले.
· राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी
· राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये न्या. महादेव गोविंद रानडे, पितामह दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, बेहरामजी मलबारी, रहिमतुल्ला सयानी, सर नारायण चंदावरकर, इ. महाराष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घेतला होता.
· 1888 साली 'ब्रिटिश समितीची' स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने 'इंडिया' नावाचे मासिक चालवून हिंदी लोकांच्या परिस्थितीचे सत्य वर्णन केले गेले.
· 1882 मध्ये दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स' या सभागृहासाठी निवडून आले.
· 1895 मध्ये हिंदूस्थानातील खर्चाची चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशनची नेमणूक करण्यात आली.
· 1897 मध्ये पुण्यात चाफेकर बंधुनी प्लेग अधिकारी रॅड व आयर्स्ट यांची हत्या केली.
· 1899 मध्ये साम्राज्यवादी वृत्तीच्या लॉर्ड कर्झन याची 'भारताचा व्हॉईसरॉय' म्हणून नेमणूक झाली.
· कर्झनने 1901 मध्ये 'पंजाब लँड डेव्हलपमेंट कायदा' पास करून कर्जबाजारी शेतकर्यांची कर्जे माफ केली.
· 1904 मध्ये 'सहकारी पतपेढी कायदा' करून शेतकर्यांना कर्जे मिळवण्याची सोय केली.
· कृषी मार्गदर्शनासाठी 1901 मध्ये कर्झनने 'इन्स्पेक्टर जनरल ऑफ अॅग्रीकल्चर' नेमले.
· 1899 मध्ये पुसा येथे कर्झनने कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.
· 1903 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली.
· पोलीस व गुन्हेगरांचे संबंध तपासण्यासाठी कर्झनने अँड्रु फ्रेझर समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार कर्झनने संपूर्ण पोलीस खात्याचे पुनर्जीवन केले.
· 1901 मध्ये 'Imperial cadet core' ची स्थापना कर्झनने केली - (संस्थानिकांच्या राजपुत्रांकरिता)
· कोलकत्ता येथे व्हिक्टोरिया राणीच्या स्मृती प्रित्यर्थ 'व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल' कर्झनने बांधला.
· 1900 मध्ये कोलकत्ता नगरपालिका कायदा करण्यात आला.
· 1904 मध्ये कर्झनने पुराणवस्तू संरक्षण खाते निर्माण करून भारताच्या संस्कृतीची जपवणूक केली.
इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्रे भाग 1
· वृत्तपत्रे व मासिके - संपादकाचे नाव
· तत्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
· व्हाईस ऑफ इंडिया, रास्तगोप्तार - दादाभाई नौरोजी
· न्यू इंडिया - विपीनचंद्र पाल
· न्यू इंडिया, इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
· नवजीवन समाचार - महात्मा गांधी
· इंडियन मिरर - डी.डी. सेन
· द ईस्ट इंडियन - हेरी डेरोझिओ
· इंडियन सोशलॉजीस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा
· नॅशनल हेरोल्ड - पंडित नेहरू
· इंडिपेडन्स - मोतीलाल नेहरू
· अल-हिलाल, अल-बलाध - मौलाना आझाद
· भारतमाता - अजित सिंग
· हिंदू - श्री सुब्रम्हण्यम अय्यर
· सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
· सोमप्रकाश - ईश्वरचंद विद्यासागर
· वंदे मातरम, पंजाबी पिपल - लाला लजपत रॉय
· वंदे मातरम - मादाम कामा
· संवाद कौमुदी - राजा राममोहन रॉय
· मिरात-उल-अखबार - राजा राममोहन रॉय
· बॉम्बे क्रोनिकल - फिरोजशहा मेहता
· युगांतर - भूपेंद्र दत्त, बारीन्द्र घोष
· संध्या - भूपेंद्र दत्त आणि बंडोपाध्याय
इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्रे भाग 2
· वृत्तपत्रे व मासिके - व्यक्तीचे नाव
· अमृतबझार पत्रिका - शिरीष कुमार घोष व एम.एल. घोष
· वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
· बंगाली - सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
· हिंदुस्थान व्हयू - एस.पी. सिन्हा
· अकबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
· हिंदूस्थान वकील - जी.पी. वर्मा
· कॉम्रेड, हमदर्द - मोहम्मद अली
· गदर - लाला हरदयाल
· व्हॅनगार्ड - एम.एन. रॉय
· उद्बोधन - स्वामी विवेकानंद
· प्रबुद्ध भारत - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
· रिव्हॅल्युशनरी - सच्चिंद्रनाथ सन्याल
· ब्रम्हबोधिली - उमेशचंद्र दत्त
· सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
· बंग्लारकथा - सुभाषचंद्र बोस
· इंडिया - सुब्रमण्यम भारती
· लिडर - पंडीत मदन मोहन मालवीय
· द इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
· इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
· अबला बांधव - व्दारकानाथ गांगुली
· फ्री हिंदुस्थान - तारकानाथ दास
·
· जन्मभूमी - पट्टाभी सितारामय्या
· मुंबई समाचार - फरदुनजी मर्झाबान
इतिहासातील महत्वाची पुस्तके भाग 1
· पुस्तके - लेखक
· होली संगम - विजयलक्ष्मी पंडीत
· द इंडियन स्ट्रगल - आचार्य कृपालानी
· इंडियन विन्स फ्रिडम - मौलाना आझाद
· पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया - मौलाना आझाद
· गुबारे खातीर (पत्रसंग्रह) - मौलाना आझाद
· अ नेशन इन द मेकींग - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
· आय. एम.ए. सोशलिस्ट - विवेकानंद
· व्हिलेजिअस प्रोब्लम इन इंडिया - अॅनी बेझंट
· इंडिया ए नेशन, हाऊ इंडिया फॉट फॉर इट्स फ्रिडम - अॅनी बेझंट
· द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स - अॅनी बेझंट
· इंडिया अँड दी एम्पायर - अॅनी बेझंट
· ग्लिम्पसेस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी - पं. जवाहरलाल नेहरू
· हू लिव्हज, इफ इंडिया डाइज - पं. जवाहरलाल नेहरू
· अॅट द फिट ऑफ महात्मा गांधी - डॉ. राजेंद्र प्रसाद
· आनंदमठ, दुर्गेश नंदिनी - बकीमचंद्र चटर्जी
· व्हाय. आय. एम. अॅन अॅथीस्ट - भगतसिंग
· प्रिझन डायरी, समाजवादच का? - जयप्रकाश नारायण
· अस्वाब-ए-बगावत - सय्यद अहमद खान
· प्रेझेंट स्टेट ऑफ इंडियन पॉलिटिक्स - सय्यद अहमद खान
· लॉयल मॉहमेडन्स ऑफ इंडिया - सय्यद अहमद खान
इतिहासातील महत्वाची पुस्तके भाग 2
·
तहजीब-अल-अखलाक
- सय्यद
अहमद खान
· राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास - पट्टाभिसितारामय्या
· द व्हील ऑफ हिस्टरी - राम मनोहर लोहिया
· पाव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया - दादाभाई नौरोजी
· बंदीजीवन - सचिन्द्रनाथ संन्याल
· ब्रोकन विंग्ज, बर्ड ऑफ टाइम, गोल्डन थ्रेशहोल्ड - सरोजिनी नायडू
· नील दर्पण - दीनबंधू मित्र
· भारत दुर्दशा - भारतेन्द्रू हरिश्चंद्र
· माय एक्सपेरीमेंट विथ टूथ, हिंद स्वराज - महात्मा गांधी
· साऊथ आफ्रिकाज फ्रिडम स्ट्रगल - युसूफ मोहम्मद दादु
· अनहॅपी इंडिया, इंडियन इन्फोर्मेशन ब्युरो, यंग इंडिया, इंग्ल ड्ज डेट टू इंडिया - लाला लजपतराय
· द स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन - लाला लजपतराय
· द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया - लाला लजपतराय
· भवानी मंदिर - बारिन्द्र घोष
· गीतांजली - रविंद्रनाथ टागोर
· आय फॉलो द महात्मा - के.एस. मुन्शी
· विधवा विवाह (विडो मॅरेज) - ईश्वरचंद्र विद्यासागर
· इंडियन पॉलिटिक्स सिन्स म्युटिनी - सी.वाय. चिंतामणी
· आय.एन.ए. अँड इट्स नेताजी - शहानवाज खान
· रिव्हाव्हायिंग अवर डायिंग प्लॅनेट - सरला बेन
इतिहासातील महत्वाची पुस्तके भाग 3
· माय इंडियन इयर्स - लॉर्ड हर्डिंग्ज
· अखंड हिंदुस्थान - कन्हैयालाल मुन्शी
· निहिलीस्ट रहस्य स्वदेशी रंग - रामप्रसाद बिस्मील
· वर्तमान रणनीती - अविनाश भट्टाचार्य
· बॉम्ब पोथी - सेनापती बापट
· गांधीइझम:अॅन अॅनालिसिस - फिलीप स्प्रेट
· द अवेकनिंग ऑफ इंडिया - रॅम्से मॅकडोनाल्ड
· काँग्रेस मिनिस्ट्रीज अॅट वर्क - आचार्य जुगलकिशोर
· दी वे आऊट, 1943 - सी. राजगोपालाचारी
· इंट्रोडक्शन टू इंडियन पॉलिटिक्स - डब्ल्यू. सी. बॅनर्जी
· मेमॉयर्स ऑफ माय लाईफ अँड टाइम - बी.सी. पाल
· गव्हर्नमेंट ऑफ इंडिया - सी.पी. इल्बर्ट
· इंडियन अनरेस्ट - व्हॅलंटीन चिरोल
· इंडिया अॅज आय नो इट - मायकेल ओडवायर
· भारतीय मुसलमान, इंडिया अंडर ड क्वीन - विल्यम हंटर
· हू वेअर दी शुद्रास?, बुद्ध अँड हिस धम्म - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जगातील महत्वाच्या संस्था बद्दल माहिती
जगातील महत्वाच्या संस्था, आयोग व त्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे :
· संयुक्त राष्ट्र संघाचे सेक्रेटरी जनरल - बॉन की मुन
· संयुक्त राष्ट्र संघाचे उपसेक्रेटरी जनरल - आशा रोझ निगिरो
· जागतिक बँकेचे अध्यक्ष - जॉन यंग किम
· आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष - ख्रिश्टेन लिग्रेड
· यूनेस्कोचे कार्यकारी संचालक - इरिना बोकोव्हा
· जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक - मार्गरेट चान
· जागतिक अन्न व कृषी संघटनेचे कार्यकारी संचालक - जोज गाझियानो सिल्व्हा
· आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे कार्यकारी संचालक - जुआन सोमाविया
· युनिसेफचे कार्यकारी संचालक - अॅन्टोनी लेक
· संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाचे प्रशासक - हेलन कार्क
· अनकाड संघटनेच्या सेक्रेटरी जनरल - डॉ. सुछाई पंतचापकडी
· आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष - एऑनी अब्राहम
· आशियन विकास बँकेचे अध्यक्ष - ताकेहितो नाकोवा
· कॉमनवेल्थचे सेक्रेटरी जनरल - कमलेश शर्मा
· आफ्रिकन विकास बँकेचे अध्यक्ष - डोनॉलडो कुरोडा
महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 1
· व्यक्तीचे नाव - प्रचलित नाव
· ज्ञानेश्वर - माऊली
· ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी - ज्ञानेश्वर
· माणिक बंडोजी ठाकूर (ब्राम्हभट्ट) - तुकडोजी महाराज
· तुकाराम बोल्होबा आंबिले - तुकाराम
· नामदेव दामाजी शिंपी - संत नामदेव
· नारायण सूर्याजी ठोसर - समर्थ रामदास स्वामी
· डेबुजी झिंगरोजी जाणोरकर - गाडगेबाबा
· महात्मा गांधी - बापू, राष्ट्रपिता, महात्मा
· पंडित जवाहरलाल नेहरू - चाचा
· रविंद्रनाथ टागोर - गुरुदेव
· सुभाषचंद्र बोस - नेताजी
· इंदिरा गांधी - प्रियदर्शनी, आर्यन लेडी
· टिपू सुलतान - म्हैसूरचा वाघ
· भाऊराव पायगोंडा पाटील - कर्मवीर
· धोंडो केशव कर्वे - महर्षि
· विठ्ठल रामाजी शिंदे - महर्षि
· देवेन्द्रनाथ टागोर - महर्षि
· पांडुरंग महादेव बापट - सेनापती बापट
· शिवराम महादेव परांजपे - काळकर्ते
· नरेंद्र दत्त - स्वामी विवेकानंद
महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 2
· व्यक्तीचे नाव - प्रचलित नाव
· चक्रवर्ती राजगोपालाचारी - सी.आर., आधुनिक चाणक्य
· मुरलीधर देविदास आमटे - बाबा आमटे
· अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर - ठक्करबाप्पा
· राम मोहन - राजा/रॉय
· शेख मुजीबूर रेहमान - वंग बंधु
· बापूसाहेब अणे - लोकनायक
· विनायक हरहर भावे - लोकनायक
· धुंडीराज गोविंद फाळके - दादासाहेब फाळके
· मुळशंकर दयाळजी - दयानंद सरस्वती
· गदाधर चट्टोपाध्याय - रामकृष्ण परमहंस
· पंडित मदन मोहन मालवीय - महामान्य
· सरोजिनी नायडू - भारत कोकिळा
· लाला लजपतराय - पंजाबचा सिंह
· बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य
· लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल - लाल, बाल, पाल
· ज्योतिबा फुले - महात्मा
· दादा धर्माधिकारी - आचार्य
· बाळशास्त्री जांभेकर - आचार्य
· प्र.के. अत्रे - आचार्य
महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 3
· व्यक्तीचे नाव - प्रचलित नाव
· वल्लभभाई पटेल - सरदार
· नाना पाटील - क्रांतिसिंह
· वि.दा. सावरकर - स्वातंत्र्यवीर
· डॉ. भिमराव रामजी आंबेडकर - बाबासाहेब
· गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
· दादाभाई नौरोजी - भारताचे पितामह
· शांताराम राजाराम वणकुद्रे - व्ही. शांताराम
· मंसूर अलीखान पतौडी - टायगर
· डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - मिसाईल मॅन
· सी.आर. दास - देशबंधू
· लालबहादूर शास्त्री - मॅन ऑफ पीस
· सरदार पटेल - पोलादी पुरुष
· दिलीप वेंगसकर - कर्नल
· सुनील गावस्कर - सनी, लिट्ल मास्टर
· पी.टी. उषा - भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन
· नारायण श्रीपाद राजहंस - बालगंधर्व
· नरसिंह चिंतामण केळकर - साहित्यसम्राट
· लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी - तर्क तीर्थ
· आचार्य रजनीश - ओशो
· लता मंगेशकर - स्वरसम्राज्ञी
नेहरू रिपोर्ट विषयी माहिती
· भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असता व त्याचे सारखे निषेध होत असता भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड त्या कमिशनचे समर्थन करीत होते. असेच समर्थन करीत असता त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की, भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी याविषयी एकमताने मसुदा तयार करून सरकारकडे द्यावा. सरकार तो पार्लमेंटकडे पाठवेल.
· लॉर्ड बर्कनहेड यांची अशी कल्पना होती की, भारतीय राजकीय संघटनांत व नेत्यांत एकमत होणे केवळ अशक्य आहे; परंतु त्याची कल्पना चुकीची ठरली. भारताने ते आव्हान स्वीकारले व काँग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा इत्यादि राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद मुंबईत डॉ. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी भरविण्यात आली.
· भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरविण्यासाठी परिषदेने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीत सर तेजबदूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादि व्यक्ती घेण्यात आल्या.
· समितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास व चर्चा करून आपला अहवाल तयार केला. समितीने मध्यबिंदू गाठला. साम्राज्यांतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्यांची असावी असे समितीने निश्चित केले.
· नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली (डिसेंबर 1928). मुस्लीम लीगच्या वतीने बॅ. जीनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या, जवळ-जवळ त्या सर्व फेटाळण्यात आल्या. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर पानी सोडण्यास मुस्लीम लीग तयार नव्हती.
· केंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधीत्व जातीय पायावर हवे होते. मार्च 1929 मध्ये लीगने अधिवेशन भरवून त्यात काही अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला. पं. जवाहरलाल व सुभाषचंद्र बोस यांनी 'संपूर्ण स्वातंत्र्य' या ताबडतोबीच्या ध्येयाचा आग्रह धरला.
· महात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्टचा स्वीकार करावयास लावला आणि त्याची अंमलबजावणी सरकारने 1929 हे वर्ष संपण्यापूर्वी करावी, असा ठराव पास करून घेतला. त्यामुळे जवाहरलाल व बोस यांच्या सारखे तरुण नेते थोडे शांत झाले. गांधीजी पुन्हा आता राजकारणाकडे वळले. एका वर्षाच्या अवधीत साम्राज्यांतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वातंत्र्य आंदोलन उभारणार होते.
नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी विषयी माहिती
· भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.
· भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.
· भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल. अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.
· सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.
· जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)
· इंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.
·
आता
सध्या भारतीय
संस्थानांवर
ब्रिटिश सरकारचे
जसे अधिकार
चालतात तसेच
भारतीय
पार्लमेंटचे
अधिकार
त्यांच्यावर
चालतील. काही
संघर्ष पैदा
झाल्यास गव्हर्नर
जनरल सुप्रीम
कोर्टाकडे तो
तंटा सोपवेल.
· गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.
· प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. प्रांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.
· गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.
· प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.
भारताचे व्हाईसरॉय यांची कामगिरी
अलिगड येथे सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेल्या 'मुस्लिम अॅग्लो-ओरीएंट' कॉलेजला सक्रीय प्रोत्साहन व्हाईसरॉय नार्थब्रुकने दिले.
सतत पडणार्या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी लॉर्ड लिटनने सर रिचर्ड स्टॅची यांच्या अध्यक्षतेखाली एक खास 'दुष्काळ समिती' नेमली होती. याच समितीच्या शिफारशीन्वये 1883 मध्ये 'दुष्काळ संहिता' तयार करण्यात आली.
लॉर्ड लिटनने इ.स. 1877 मध्ये दिल्ली येथे दरबार भरवून राणी व्हिक्टोरियाला 'भारताची सम्राज्ञी' किंवा 'कैसर-ए-हिंद' हा किताब दिला.
लॉर्ड लिटनने मार्च 1878 मध्ये 'व्हरनेक्यूलर प्रेस अॅक्ट' (देशी वृत्तपत्र कायदा) पास करून देशी वृत्तपत्रावर अनेक बंधने लादली.
भारतीयांनी वरील कायद्याची 'मुस्कटदाबी कायदा' (The Gagging Act) अशी संभावना केली.
1879 मध्ये लॉर्ड लिटनने 'स्टॅट्युटरी सिव्हील अॅक्ट' पास करून सनदी सेवेचे वय 21 वर्षावरून 18 वर्षावर आणले.
लॉर्ड लिटनने अलिगड येथे स्थापन झालेल्या मुस्लिम विद्यापीठास प्रोत्साहन दिले.
लॉर्ड रिपन या उदारमतवादी व्हाईसरॉयची नियुक्ती लॉर्ड लिटननंतर झाली.
इ.स. 1881 मध्ये लॉर्ड रिपनने इंग्लंडप्रमाणे भारतात 'फॅक्टरी अॅक्ट' पास केला.
लॉर्ड लिटनने केलेला देशीवृत्तपत्रबंदी कायदा लॉर्ड रिपनने 19 जाने. 1881 रोजी रद्द करून मुद्रण स्वातंत्र्य दिले.
इ.स. 1854 मध्ये 'वुड समितीने' केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे पाहण्यासाठी लॉर्ड रिपनने 1882 मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 'हंटर समिती' नेमली.
लॉर्ड रिपनने 18 मे 1882 रोजी प्रत्येक प्रांतात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी एक ठराव पास केला. त्यामुळे त्यास 'स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक' असे म्हटले जाते.
'इलबर्ट बिल' पास करून रिपनने मोठेच धाडस केले परंतु युरोपियनांच्या सामुहिक प्रतिकारामुळे ते अस्तित्वात येऊ शकले नाही.
लॉर्ड डफरिनच्या कारकिरर्दितील महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली.
लॉर्ड डफरिनच्या काळात लोकसेवा आयोगाची स्थापना 1886 मध्ये करण्यात आली.
1857 चा उठावाचे स्वरूप
स्वातंत्र्य युद्ध - म्हणणारे व्यक्ती
वि.दा. सावरकर -
· स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय.
संतोषकुमार रे -
· हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता.
कर्नल मानसयन -
· 'परिस्थितीने दाखवून दिले की, हिंदी समाजात व्देष भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती हि कारणे वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती'.
डॉ. एस.एन. सेन -
· 'धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धरण केले.'
बंड म्हणणारे व्यक्ती
सर जॉन लॉरेन्स -
· 'बंडाचे मुळ लष्करात होते. त्यांचे मूळ कारण काडतूस प्रकरण होते दुसरे तिसरे कोणतेच करण नव्हते'
सर जॉन सिले -
· 'उठाव पूर्णत:देशप्रेम भावनारहित आणि स्वार्थाने प्रेरित शिपायांचे बंड होते ज्याचा कोणी नेता आणि जनपाठींबा नसणारे होते.'
न.र. फाटक -
· 'शिपायांची भाऊगर्दी'
आर.सी. मुजूमदार -
· इ.स. 1857 च्या उठावास राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने अपरिचित असलेले दिसतात.
डॉ. ईश्वरी प्रसाद -
· 'उत्तरेतील बंड'
1857 च्या उठावानंतरचा काळ
· भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
· राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.
· इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.
· इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.
· 1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या 'इंडियन पिनल कोड' ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.
· इ.स. 1861 मध्ये 'इंडियन हायकोर्ट अॅक्ट' पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.
· 'चार्लस वुड' ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
· इ.स. 1859 साली शेतकर्याविषयीचा 'बंगाल रेंट अॅक्ट' कॅनिंगच्या काळात करण्यात आला.
· इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन 'निल दर्पण' या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.
· लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास 'अर्ल' हा किताब बहाल केला.
· इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी 'फॅमिना कमीशन' ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.
· व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.
· 14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास 'प्रांतीय स्वायत्तेची सनद' असे मानण्यात येते.
· लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.
बॅ. जीनांचे चौदा मुद्दे विषयी माहिती
· सर्वपक्षीय सभेत नेहरू रिपोर्टवर एकमत झाले तरी ते दिखाऊ होते. कारण मूस्लीम लीगचा विरोध मूलभूत स्वरूपाचा व जातीय होता. लीगमधील मुस्लिमांना हा रिपोर्ट मान्य नव्हताच; म्हणून त्याचा फेरविचार करण्यासाठी आगाखानांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928मध्ये मुस्लीम लीगचे दिली येथे खास अधिवेशन भरविण्यात आले.
·
बॅ. जीना या
परिषदेला हजर
राहिले.
त्यांना सर्वपक्षीय
सभेत मोठा
विरोध झाला
होता.
त्यामुळे ते
नाराज झाले
होते.
लीगच्या
अधिवेशनात
त्यांनी आपले
राजकीय तत्वज्ञान
त्यांच्या
प्रसिद्ध 'चौदा
मुद्यात' सांगितले.
बॅ. जीनांचे चौदा मुद्दे :
· भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी. शेषाधिकार प्रांतांकडे असावेत.
· सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी.
· सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये.
· केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे.
· स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल.
· पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये.
· सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे.
· कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये.
· मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा.
· वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात.
· राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्या मिळाल्या पाहिजेत.
· मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.
· केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत.
· केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.
भारतातील जनक विषयी माहिती
· भारताचे राष्ट्रपिता - महात्मा गांधी
· आधुनिक भारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू
· भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक
· स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन
· राष्ट्रीय काँग्रेसचे जनक - अॅलन हयूम
· हरितक्रांतीचे जनक - डॉ. स्वामीनाथन
· चित्रपटसृष्टीचे जनक - दादासाहेब फाळके
· राज्यघटनेचे जनक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
· धवलक्रांतीचे जनक - डॉ. कुरियन
· वनमहोत्सवाचे जनक - कन्हैयालाल मुन्शी
भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 1
1. लॉर्ड कॅनिंग (सन 1858-62)
· फेब्रुवारी 1856 मध्ये लॉर्ड कॅनिंगने लॉर्ड डलहौसीकडून गव्हर्नर जनरल पदाची सुत्रे हातात घेताच सन 1857 च्या उठावाला सुरवात झाली. लॉर्ड कॅनिंगने मोठ्या कौशल्याने व धैर्याने हा उठाव दडपून टाकला. सन 1858 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने एक जाहीरनामा पास केला.
· राणीच्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील राज्यकारभाराचे अधिकार इंग्लंडच्या राणीकडे गेले.
· कंपनीच्या गव्हर्नर जनरलला व्हॉईसरॉयचा (इंग्लंडच्या राजाचा प्रतीनिधी) दर्जा देण्यात आला. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉईसरॉय होय.
· सन 1861 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा पास केला. या कायद्यानुसार मद्रास (1862), मुंबई (1862) व कलकत्ता (1862) या ठिकाणी उच्च न्यायालयाने स्थापन करण्यात आली.
· सन 1860 मध्ये इंडियन पिनल कोड लागू करण्यात आले.
2. लॉर्ड मेयो (सन 1869-72)
· लॉर्ड मेयोने भारतीय जनतेविषयी सुधारणावादी दृष्टीकोण स्विकारून अनेक महत्वपूर्ण सुधारणा केल्या.
· लॉर्ड मेयोच्या काळात भारतात जनगणना पद्धतीला सुरुवात झाली. भारताची पहिली जनगणना सन 1872 मध्ये करण्यात आली. त्यानंतर भारतात दर दहा वर्षानी जनगणना करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
· सन 1870 मध्ये लॉर्ड मेयोने एका ठरावाव्दारे प्रांतांना निश्चित स्वरूपाची रक्कम अनुदान देण्याची आणि त्या अनुदानची रक्कम खर्च करण्याचे प्रांतांना स्वतंत्र दिले. त्याने केलेल्या या सुधारणेमुळे लॉर्ड मेयोला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात.
· सन 1870 मध्ये भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान तांबडया समुद्रातून समुद्रतार टाकण्यात आली. या घटनेमुळे भारत इंग्लंड या दोन देशात थेट संदेश वहन सुलभतेने होऊ लागले. याच काळात सुवेझ कालवा बांधून पूर्ण झाल्यामुळे इंग्लंड आणि भारत या दोन राष्ट्रातील प्रवासाचा वेळ कमी झाला.
3. लॉर्ड लिटन (सन 1876 ते 1880)
· लॉर्ड डलहौसीनंतर भारतात सर्वोच्च अधिकारपदी आलेला लॉर्ड लिटनहा दुसरी साम्राज्यावादी विचारसरणीचा व्यक्ती होय. लॉर्ड लिटनची ही कारकीर्द भारताच्या इतिहासात जुलमी लिटनशाही म्हणून ओळखली जाते.
भारतभर दुष्काळ :-
· सन 1876 ते 1878 या काळात म्हैसूर, हैदराबाद, मध्यप्रदेश, पंजाब, मद्रास व मुंबई या सर्व प्रांतांत मोठया प्रमाणात दुष्काळ पडला होता. लॉर्ड लिटनने या दुष्काळावर उपाययोजना सुचविण्याकरिता सर रिचर्ड स्ट्रेचे समिती नेमली. या समितीच्या शिफाररसीवर आधारित लिटनने उपाययोजना केल्या परंतु तोपर्यंत बरीच मनुष्यहानी झाली होती. यामुळे लॉर्ड लिटनला भारतीय लोकांच्या रोषाला बळी पडावे लागले.
दिल्ली दरबार :-
· सन 1876 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने एका कायद्याव्दारे इंग्लंडच्या राणीला प्रदान करण्यात आलेल्या कैसर-ए-हिंद या पदवीची घोषणा करण्याकरिता लिटनने दिल्ली येथे शाही दरबार भरविला.
4. लॉर्ड रिपन (सन 1880 ते 1884)
· भारतीय इतिहासात उदारामतवादी रिपन म्हणून ओळखला जातो.
पहिला फॅक्टरी अॅक्ट :-
· भारतातील कारखान्यामध्ये काम करणार्या कामगारांची परीस्थिती सुधारण्यासाठी लॉर्ड रिपनने सन 1881 मध्ये पहिला भारतीय फॅक्टरी अॅक्ट पास केला.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक :-
· लॉर्ड रिपनने सन 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात.
शिक्षण पद्धतीत सुधारणा :-
· सन 1882 मध्ये लॉर्ड रिपनने सर विल्यम हंटर समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारसीमुळे शिक्षणव्यवस्थेतील सरकारी नियंत्रणे कमी होऊन भारतात खाजगी शिक्षण संस्था काढण्यास चालना मिळाली व त्यांना अनुदान देण्याची पद्धत अंमलात आली.
इलबर्ट बिल :-
· न्यायपद्धतीमध्ये समानता आणण्याच्या उद्देशाने लॉर्ड रिपनने सर पी.सी, इलबर्टच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. या समितीच्या अहवालातील तरतुदीनुसार भारतीय न्यायधीशांना इंग्रज व्यक्तीवर खटला चालविण्याचा अधिकार मिळणार होता.
भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 2
5. लॉर्ड डफरिन (सन 1884 ते 1888)
· लॉर्ड रिपननंतर लॉर्ड डफरिनची भारताचा व्हॉईसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर अॅलन ह्युमच्या प्रयत्नामुळे सन 1885 मध्ये व्हॉईसरॉय लॉर्ड डफरिनच्या काळात मुंबईत राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
6. लॉर्ड कर्झन (सन 1899 ते 1905)
· लॉर्ड कर्झनचा कार्यकाल भारताच्या इतिहासामध्ये कर्झनशाही म्हणून ओळखला जातो. लॉर्ड कर्झने त्याच्या काळात खालील सुधारणा केल्या.
शेतीविषयक सुधारणा :-
· शेतकर्यांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा व्हावा म्हणून कर्झनने 1904 मध्ये सहकारी पतपेढी कायदा पास केला. पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना आणि नागपूर, पुणे व कानपुर या ठिकाणी कृषी महाविद्यालये सुरू केली.
पोलिस विभागातील सुधारणा :-
· सन 1902 मध्ये प्रत्येक प्रांताकरिता सी. आय.डी.(गुन्हा अन्वेषण विभाग) स्थापना करण्यात आली व पोलिसांना प्रशिक्षण देण्याची योजना लागू केली.
प्राचीन स्थारक कायदा :-
· भारतातील प्राचीन स्मारकाचे रक्षण करण्याकरिता सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा पास केला. सांची येथील स्तूप, अंजिठा, वेरूळची लेणी यांच्या दुरूस्तीकरिता खर्च मंजूर केला.
बंगालची फाळणी :-
· साम्राज्यवादी विचारसरणीच्या कर्झनने राष्ट्रीय सभेतील सदस्यांमध्ये फुट पाडण्याकरिता केवळ प्रशासकीय सोयीचे कारण पुढे करुन बंगालच्या फाळणीची घोषणा केली. 19 जुलै 1905 रोजी फाळणीची योजना जाहीर करण्यात आली आणि 16 ऑक्टोबर 1905 रोजी ही योजना अंमलात आली. या दिवशी बंगाल प्रांताचे पुर्व बंगाल व पश्चिम बंगाल असे दोन स्वतंत्र प्रांत करण्यात आले.
7. लॉर्ड मिंटो (सन 1905 ते 1910)
· लॉर्ड मिंटो नंतरचा काळ भारतीय इतिहासामध्ये राजकीय जागृतीचा काळ म्हणून ओळखला जातो.
मुस्लिम लीगची स्थापना :-
· लॉर्ड मिंटो यांच्या सल्ल्यानुसार डिसेंबर 1906 मध्ये डाक्का येथे नवाब सलीमुल्लाखान यांच्या अधक्ष्यतेखाली मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली.
मोर्ले मिंटो सुधरणा कायदा :-
· भारतमंत्री लॉर्ड मोर्ले व व्हॉईसरॉय मिंटो विचार विर्मशातून भारतीय कायदेमंडळाच्या सुधारणेबाबत एक विधेयक तयार करण्यात आले. हे विधेयक मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909 म्हणून ओळखले जाते. या कायद्यानुसार मुस्लिम लोकांना जातीय मतदार संघ मंजूर करण्यात आले.
8. लॉर्ड हार्डिंग (सन 1910 ते 1916)
लॉर्ड हार्डिंगच्या काळातील सुधारणा :
दिल्ली दरबार :-
· ब्रिटनचे राजे पंचम जॉर्ज यांनी सन 1911 मध्ये भारताला भेट दिली. त्यांच्या भारत भेटीप्रीत्यर्थ दिली येथे बोलविण्यात आलेल्या शाही दरबारात भाषण करतांना त्यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची व भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
दिली कट :-
· सन 1912 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलविण्यात आली. राजधानी स्थलांतरित करण्याच्या प्रसंगी व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंग दिल्लीत प्रवेश करीत अवधबिहारी बोस नावाच्या क्रांतिकारकाने हार्डिंगच्या हत्तीवर बॉम्ब फेकला. यामध्ये हार्डिंग वाचला पण, हत्ती हाकणारा माणूस मात्र ठार झाला. ही गोष्ट दिली कट म्हणून ओळखली जाते.
भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 3
9. लॉर्ड चेम्सफोर्ड (सन 1996 ते 1921)
· लॉर्ड हार्डिंगनंतर लॉर्ड चेम्सफोर्ड भारताचा व्हॉईसरॉय झाला. याच काळात गांधीजीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली.
मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा (सन 1919) :-
· डिसेंबर 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा - 1919 पास केला. या कायद्यामध्ये प्रांतिक कायदेमंडळातील काही खाती भारतीयांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. जी खाती भारतीयांकडे सोपविण्यात आली त्यांना सोपीव खाती असे म्हटले जात व जी खाती शासनाने स्वत:कडे राखून ठेवली त्या खात्यांना आली त्यांना सोपीव खाती असे म्हटले जात व जी खाती शासनाने स्वत:कडे राखून ठेवली त्या खात्यांना राखीव खाती म्हणून ओळखली गेली आणि केंद्रीय कायदेमंडळात व्दिगृही सभागृहाची स्थापना करण्यात आली.
रौलॅक्ट कायदा :-
· भारतातील क्रांतिकारक कारवायांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सर सिडने रौलॅक्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारसीवर आधारित भारत सरकारने अनार्किकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. हा कायदा भारताच्या इतिहासात रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा म्हणून ओळखला जातो.
10. लॉर्ड आयर्विन (सन 1926 ते 1931)
आयर्विनच्या काळातील घटना :
सायमन कमिशन (सन 1927) :-
· भारतमंत्री बर्कनहेड यांनी सन 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली भारतात एक कमिशन पाठविले या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसने या कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
पहिली गोलमेज परिषद (सन 1930) :-
· सन 1930 मध्ये स्यामान कमिशन अहवालावर चर्चा करण्याकरिता ब्रिटिश शासनाने 1930, 1931 आणि 1932 या तीन वेळा लंडनला गोलमेज परिषद बोलाविली होती. काँग्रेसने पहिल्या व तिसर्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता.
गांधी आयर्विन करार (सन 1931) :-
· महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घ्यावे व सन 1931 मध्ये लंडन येथे होत असलेल्या दुसर्या गोलमेज परीषदेत काँग्रेसने भाग घ्यावा या उद्देशाने महात्मा गांधी व आयर्विन यांच्यात 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला. या कारारानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घेण्याचे व दुसर्या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे मान्य केले होते.
भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 4
11. लॉर्ड वेलिंग्टन (सन 1931 ते 1936)
लॉर्ड वेलिंग्टन च्या काळात ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनोल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला.
दुसरी गोलमेज परिषद :-
· सन 1931 मध्ये लंडन येथे दुसरी गोलमेज परिषद भरली होती. गांधी आयर्विन करारानुसार या गोलमेज परिषदेला काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधीजी हजर होते. मुस्लिम लीगचे नेते बॅरिस्टर जिना व गांधीजी यांच्यात मुस्लिम जनतेच्या नेतृत्वाच्या प्रश्नावरुन वाद निर्माण झाल्यामुळे हि परीषद यशस्वी होऊ शकली नाही.
जातीय निवाडा :-
· ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी अस्पृश्य लोकांकरीता स्वतंत्र जातीय मतदार संघाची घोषणा केली. हि गोष्ट जातीय निवाडा म्हणून ओळखली जाते. हा निवाडा लागू होऊ नये म्हणून सन 1932 मध्ये पुणे येथील येरवडा तुरंगात गांधीजींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 रोजी करार झाला. हा करार पुणे करार म्हणून ओळखला जातो. या कराराअंतर्गत स्वतंत्र जातीय मतदार संघाऐवजी राखीव जागा हे स्वीकारण्यात आले.
भारत सरकार कायदा (सन 1935) :-
· सन 1930, 1931 व 1932 या तीन वेळा भरलेल्या गोलमेज परिषदेच्या चर्चेवर आधारित 1933 मध्ये श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आणि या श्वेतपत्रिकेवर आधारित 1935 चा भारत सरकार कायदा पास करण्यात आला.
या कायद्याची वैशिष्टे -
· भारतात संघराज्य पद्धती स्विकारण्यात आली.
· प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली व प्रांतिक शासनाचा कारभार भारतीयांकडे सोपविण्यात आला.
· संपूर्ण विषयाच्या 1) मध्यवर्ती सूची 2) प्रांतिक सूची 3) समवर्ती सूची अशा तीन सूची तयार करण्यात आल्या.
· भारत मंत्र्याला सल्ला देण्याकरिता तयार करण्यात आलेले इंडिया कौन्सिल रद्द करून त्या ठिकाणी सल्लागार मंडळाची निर्मिती करण्यात आली. त्याचप्रमाणे भारतमंत्र्याचे अधिकार कमी करण्यात आले.
· केंद्रात व्दिदल राजकीय पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. या अंतर्गत मध्यवर्ती सूचितील काही खाती भारतीयांकडे सोपविण्यात आली तर महत्वाची खाती शासनाने स्वत:कडे राखून ठेवली.
· सिंध व ओरिसा नवीन प्रांत निर्माण करण्यात आले व ब्रम्हदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. पं. नेहरूंनी या कायद्याचे वर्णन इंजिनाशिवाय ब्रेकची व्यवस्था केली अशा शब्दात केले आहे.
12. लॉर्ड लिनलिथगो (सन 1936 ते 1944)
प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका :-
· 1935 च्या कायद्यानुसार प्रांतिक शासन व्यवस्था भारतीयांकडे सोपविण्याच्या उद्देशाने सन 1937 मध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये भारतातील एकूण अकरा प्रांतापैकी आठ प्रांतात काँग्रेसची सरकारे सत्तेवर आली व तीन प्रांतात संयुक्त पक्षाची सरकारे स्थापन झाली. मुस्लिम लिगला एकाहि प्रांतात बहुमत मिळाले नाही.
प्रातिक कायदेमंडळाचे राजीनामे (1939) :-
· 1 सप्टेंबर 1939 रोजी दुसर्या महायुद्धाला सुरुवात झाली. ब्रिटिश शासनाने काँग्रेसला विचारात न घेता भारताला युद्धात ओढल्यामुळे आठही प्रांतामधील काँग्रेसच्या सरकारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.
क्रिप्स मिशन :-
· दुसर्या महायुद्धाला भारतीय नेत्यांच्या सक्रिय पाठींबा मिळविण्याकरिता त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा उद्देशाने इंग्लंडचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी स्ट्रफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक मिशन भारतात पाठविले. मार्च 1942 मध्ये स्ट्रंफर्ड क्रिप्स भारतात आले. त्यांनी आणलेल्या अहवालामध्ये भारताला युद्ध संपल्यानंतर वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात येईल अशी तरतूद होती. ही तरतूद काँग्रेसने अमान्य केली व चलेजाव आंदोलनाची घोषणा केली.
महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 1
· महाराष्ट्रातील नेवासे,चांदोली, सोमगाव,टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
· महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.
· मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.
· जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे 'सातवाहन' हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय.
· 'सिमुक' हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.
· सातवाहन 'राजा सातकर्णी' प्रथम व त्याची रानी 'नागणिका' यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.
· चालुक्य हे वैष्णवपंथी होते, तरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते.
· इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या र्हासानंतर 'दंतीदुर्ग' याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली.
· राष्ट्रकूट घराण्यातील 'कृष्ण प्रथम' याने जगप्रसिद्ध असलेले 'वेरूळ येथील कैलास मंदिर' बांधले .
· शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.
· शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून 'विद्याधर जीमुतवाहन' हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर(तेर) हे त्याचे मूल स्थान होय.
· चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक 'कोल भिल' हा होता.
· यादवांचा प्रधान हेमाद्री याने 'चातुरवर्ग चिंतामणी' हा ग्रंथ लिहिला.
· अल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.
· महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना 'हसन गंगू बहामणी' याने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.
· बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले -
1. वर्हाडी-इमादशाही
2. अहमदनगर-निजामशाही
3. बिदर-बरीदशाही
4. गोवलकोंडा-कुतुबशाही
5. विजापूर-आदिलशाही
· विजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने 1489 मध्ये स्थापना केली.
महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 2
· 'गुरु नानक' हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात.
· गुरु गोविंदसिंग नांदेड मध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठांनांकडून त्यांची हत्या झाली.
· 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
· 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली.
· 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
· 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपति शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.
· 1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.
· 1802 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली.
· शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी एक काठी तयार केली होती तिला 'शिवशाही काठी' असे म्हटले जात असे.
· शिवाजी महाराजांनी दोन नाणी सुरू केली होती त्यामध्ये 'होन' हे सोन्याचे तर 'शिवराई' हे तांब्याचे नाणे होते.
· दक्षिण भारतामध्ये 'नायनार आणि अलवार' या भक्ती चळवळी उदयास आल्या.
· महाकवी सूरदास यांनी 'सुरसागर' हे काव्य लिहिले.
· शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसर्या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून 630 च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपुर ही आपली राजधानी बनवली.
· 23 जून 1757 च्या प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबचा पराभव करून ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली.
· 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.
महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 3
· इंग्रजांनी उमजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा 1826 साली काढला.
· उमजी नाईक व त्याचा साथीदार पांडुजी याला पकडण्यासाठी रु.100/- चे बक्षीस जाहीर केले.
· उमाजी नाईकांचा जुना शत्रू बापुसिंग परदेशी याने इंग्रजांना सहकार्य करून नाईकांना पकडून देण्यास मदत केली. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजिला पुण्याच्या मुळशिजवळ अवळसा येथे आणून पकडून देण्यास मदत केली.
· नानाने उत्तोळी येथे 15 डिसेंबर 1831 रोजी उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.
· 3 फेब्रुवारी 1834 रोजी उमजी नाईकाला फाशी देण्यात आली.
· कोळी जातीच्या लोकांनी 1828 मध्ये मुंबई विभागात ब्रिटीशांविरोधी रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली उठाव केला.
· पुणे जिल्ह्यात 1839 मध्ये कोळी जमातीच्या लोकांनी उठाव केला.
· ब्रिटिश राजवटीविरुद्ध सर्वात मोठा उठाव म्हणून 1857 च्या उठावाकडे पाहिले जाते.
· स्वातंत्र्य वीर सावरकरांनी 1857 च्या उठावास पहिले स्वातंत्र्य समर असे म्हटले आहे. तर इतिहासकार न.र. फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी असे संबोधिले आहे.
· सातार्याचे छत्रपति प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी रांगो बापुजी यांनी 1857 च्या उठावाच्या वेळी खूप प्रयत्न केले.
· 1857 च्या उठावाच्या वेळी 31 जुलै 1857 रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुद्ध उठाव झाला.
· नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला यामध्ये पेठचा राजा भगवंतराव नीलकंठ राव हा प्रमुख होता.
· 13 जून 1957 रोजी नागपूरमधील लोकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून इंग्रजांविरुद्ध उठाव केला.
· 1857 साली महाराष्ट्रात पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे घडून आले. हे दंगे म्हणजे शेतकर्यांनी सावकारविरुद्ध केलेले उठाव होत.
· वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर,1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील 'सिरधोण' येथे झाला.
· गणेश वासुदेव जोशी यांनी समाजामध्ये ऐक्य ,समन्वय निर्माण व्हावा म्हणून 'ऐक्यवर्धणी' ही संस्था स्थापन केली. व त्याच वेळी पुण्यात 1874 'पुना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू केली.
· 20 फेब्रुवारी, 1889 नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, कोळी,महार आणि मुसलमान इत्यादी लोकांच्या मदतीने पुणे जिल्ह्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली.
राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 1
· इ.स. 1905 बनारसच्या अधिवेशनात अध्यक्ष नामदार गोखल्यांनी ब्रिटिश सामज्यांतर्गत स्वराज्याचे ध्येय ठरवले.
· इ.स. 1906 कोलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजीनी 'स्वराज्य' हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सभेच्या व्यासपिठावरून 'स्वराज्य' या ध्येयाची प्रथमच घोषणा. याच अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव मंजूर करण्यात आला.
· 1907 च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले.
· व्हाईसरॉय कर्झनच्या राजीनाम्यानंतर लॉर्ड मिंटो व्हाईसरॉय बनला.
· भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून रिपनला ओळखतात.
· हार्डिंगने ब्रिटिशांची राजधानी कोलकत्याहून दिल्लील्ला हलवली.
· भारतमंत्री मॉन्टेंग्यूच्या रोपोर्टनूसार व्हाईसरॉय चेम्सफोर्डने प्रांतात व्दैध प्रशासनाचा (व्दिदल शासनपद्धती) प्रारंभ केला.
· 1919 ला पंजाब प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रॉलेक्ट अॅक्ट लागू केला.
· 13 एप्रिल 1919 रोजी जालीयनवाला बाग हत्याकांड घडले.
· लखनौ अधिवेशन (1916): या अधिवेशनात काँग्रेस 1907 नंतर सांधली गेली. या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजूमदार. या अधिवेशनात 1909 च्या मोर्ले मिंटो कायद्याव्दारे मुस्लिमांना दिलेल्या स्वतंत्र मतदार संघाची तरतूद काँग्रेसने मान्य केली.
· होमरूल चळवळ म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा अधिकार आपणास मिळणे होय.
· होमरूल चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरू केली होती.
· होमरूल चळवळ भारतात सुरू करण्याचे श्रेय आयरिश विदुषी अॅनी बेझेंटकडे जाते.
· 1 सप्टें. 1916 पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली.
· एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे स्वतंत्रपणे होमरूल चळवळीसाठी संघटना स्थापन केली.
राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 2
· टिळकांनी स्थापन केलेल्या होमरूल लिगचे अध्यक्ष - बॅरिस्टर बॅप्टीस्टा तर सचिव : न.ची. केळकर
· ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्याची निर्मिती हे होमरूल चळवळीचे उद्दिष्ट होते.
· होमरूल चळवळीमुळेच ब्रिटीश सरकारला ऑगस्ट 1917 मध्ये भारतात टप्या टप्याने वसाहतीचे स्वातंत्र्य देण्याबाबतची घोषणा करावी लागली.
· अॅनी बेझंट यांनी 'कॉमनविल' हे साप्ताहिक व 'न्यू इंडिया' हे दैनिक सुरू केले.
· 1917 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून अॅनी बेझंट यांची निवड करण्यात आली.
· 1916 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुस्लीम लीगच्या स्वतंत्र मतदार संघास मान्यता दिली.
· रौलेट अॅक्ट - राजद्रोह्यांना आळा घालण्यासाठी विनाचौकशी डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्यान्वये सरकारला मिळाला. हा कायदा 18 मार्च 1919 मध्ये पास झाला.
· जालीयनवाला बाग हत्यांकांड- 13 एप्रिल 1919, रौलेट कायद्याचा निषेध व डॉ. किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अमृतसर येथे भरलेल्या सभेवर जनरल डायरने 1600 फैरी झाडल्या.
· जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 1919 मध्ये हंटर कमिशन नेमले.
· खिलाफत चळवळ - 1919 (अलीबंधूंनी सुरू केली)
· 24 नोव्हेंबर 1919 रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषेदेचे अध्यक्ष माहात्मा गांधी होते.
· तुर्कस्थानाच्या पाशाला पाठींबा दर्शविण्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध एकत्र येऊन चळवळ करणार्या चळवळीस खिलाफत चळवळ म्हटले जाते.
· 20 फेब्रुवारी 1920 रोजी नागपूर येथे खिलाफत सभेचे खास अधिवेशन भरले. या अधिवेशनात असहकार चळवळीस पाठींबा दर्शविला.
· 1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळ प्रारंभ करण्याची गांधीजींची घोषणा केली.
वेव्हेल योजना विषयी माहिती
· मे 1945 मध्ये युरोपातील युद्ध संपले. इंग्लंड विजयी झाले. लवकरच पार्लमेंटच्या निवडणुका होणार होत्या. चर्चिल भारताचा प्रश्न सोडवू इच्छित नव्हता. त्यामुळे हुजूर पक्षीयांबद्दल स्वातंत्र्यप्रिय इंग्रज जनता नाराज होती. आंतरराष्ट्रीय दडपणही इंग्रज सरकारवर वाढत होते.
· युद्धसमाप्तीनंतर पारतंत्र्यातील राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत, अशी रशियानेही घोषणा केली होती. अशा परीस्थितीत चर्चिलला आपण भारताचा प्रश्न सोडविण्यास अत्यंत उत्सुक आहोत असा भास निर्माण करणे तरी आवश्यक होते. कारण मजूर पक्षाची पूर्ण सहानुभूती भारतीय स्वातंत्र्यलढ्याला होती. मजूर पक्ष सत्तेवर आला तर भारताला स्वातंत्र्य लवकर मिळण्याची शक्यता होती.
· विलायत सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी वेव्हेल मार्च 1945 मध्ये इंग्लंडला गेले होते. ते जून 1945 मध्ये परत आले. 14 जून रोजी त्यांनी योजना जाहीर केली.
· नवी घटना भारतीय लोकांनीच तयार केली पाहिजे.
· जपानबरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल अशी आशा आहे.
· त्याकरिता केंद्रीय सरकारच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येईल. गव्हर्नर जनरल व कमांडर-इन-चीफ याशिवाय सर्व सभासद भारतीय असतील. त्यात सजातीय हिंदू व मुस्लीम यांचे प्रमाण समान राहील.
· भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करील.
· पक्ष नेते, प्रांतांचे आजी व माजी पंतप्रधान यांची परिषद व्हाईसरॉय बोलावतील. ते त्यांना याद्या द्यावयास सांगतील व त्यातून केंद्रीय कार्यकारिणीकरिता सभासद निवडतील.
· केंद्रीय सहकार्य सुरू झाले म्हणजे प्रांतांतील 93 कलमी कारभार संपेल.
· विद्यमान घटनेप्रमाणे जास्तीतजास्त व्यवहार्य सत्ता दिली जाईल. त्यामुळे भविष्यकालीन घटनांवर किंवा घटनेवर परिणाम होणार नाही.
· 25 जून, 1945 रोजी परिषद चांगल्या वातावरणात सुरू झाली. युद्धाप्रयत्नात भारताचे सहकार्य, युद्ध संपेपर्यंत हंगामी सरकारचे अस्तित्व इत्यादी प्रश्नांवर सर्वांचे एकमत होते. तथापि, व्हॉईसरॉयच्या मंडळाच्या रचनेवर चर्चा येताच चर्चासत्राचे घोडे अडले. बॅ. जीनांनी नेहमीप्रमाणे अडवणुकीची भूमिका घेतली. व्हॉईसरॉयच्या मंडळात हिंदू व मुस्लीम यांचे समान प्रतिनिधी असावेत हे राष्ट्रसभा व लीग यांना तत्वत: मान्य असल्यासारखे असले तरी राष्ट्रसभेने फक्त हिंदू, मुस्लीम, पारशी, हरिजन, शीख इत्यादी धर्माचे व जातीचे प्रतिनिधी पाठविण्याचा नैतिक हक्क होता. तो हक्कच जिना अमान्य करीत होते.
· याशिवाय राज्यकारभाराच्या कोणत्याही प्रश्नावर मुस्लीम सभासदांनी बहुमताने संमती दिल्याशिवाय निर्णय होऊ नये असाही आग्रह त्यांनी धरला. हा आग्रह व्हॉईसरॉय मान्य करू शकले नाहीत. त्यांनी 14 जुलैला परिषद अपयशी होऊन बरखास्त झाल्याचे जाहीर केले. याचा अर्थ, आता भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्याच्या किल्ल्या इंग्रजांनी बॅ. जीनांच्या हाती दिल्या होत्या.
· भारतातील सर्व मुस्लिमांचे आपण एकमेव प्रतिनिधित्व करत आहोत, हा त्यांचा दावा फोल होता. भारतात पंजाब व सरहद्द प्रांत या ठिकाणी इतरही मुस्लीम संघटना होत्या व तेथे पूर्वी त्यांची प्रांतीय सरकारेही होती. मुस्लिमांच्या इतर संघटना होत्या. त्यांनाही कळून चुकले की, लीगशी सहकार्य केल्याशिवाय राजकीय प्रश्न सुटू शकत नाही. म्हणजे लीगचा पाया अधिकच भक्कम होऊ लागला.
सामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती
· समाजसुधारक - संस्था व समाज
· रमाबाई रानडे - सेवासदन-पुणे
· पंडिता रमाबाई - शारडासदन-मुंबई, मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे
· गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
· कर्मवीर भाऊराव पाटील - रयत शिक्षण संस्था, ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज, युनियन बोर्डिंग हाऊस.
· महात्मा गांधी - हरिजन सेवक संघ
· महर्षि विठ्ठल रामजी शिंदे - डिप्रेस्ड क्लास मिशन, राष्ट्रीय मराठा संघ.
· डॉ. शिवाजीराव पटवर्धन - जगदंबा कुष्ठ निवास.
· डॉ. आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज.
स्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना भाग 1
· स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.
· स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.
· भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.
· भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.
· 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण झाले.
·
20 फेब्रुवारी
1948 रोजी
जुनागड
संस्थानाचे
विलिनीकरण
झाले.
· 17 सप्टेंबर 1848 रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण झाले.
· भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली.
· डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
· घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
· 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.
· घटना समितीचे कार्ये 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.
स्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना भाग 2
· इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली.
· 'दार समितीने' भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.
· तेलगू भाषा बोलणार्याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले.
· आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य 1 ऑक्टोबर 1953 रोजी अस्तित्वात आले.
·
राज्य
पुनर्रचना
आयोगाची
स्थापना 22 मार्च
1953 रोजी
करण्यात आली. त्याचे
अध्यक्ष-श्री
फाजल. अली
होते.
सदस्य- के.
एम. पंनीकर व हृदयनाथ
कुंझरू हे
होते.
· केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 संमत केला.
· 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.
· 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.
· 1971 मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले.
· 1975 मध्ये देशात आणिबाणी लावण्यात आली.
· 1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार केंद्रात आले.
· 1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या केली गेली.
· 1991 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार मारले गेले.
No comments:
Post a Comment